सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा.

ll सूचनेची शक्ती ll

ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला सूचना देतो. आपल्या लक्षात येईल ती व्यक्ती हुबेहूब सूचनेनुसार कार्य करते. सूचना देणे म्हणजे मानसिकरित्या त्या व्यक्तीच्या मनात भरविणे. आता हे चांगले वाईट दोन्ही असू शकते. मला सांगायचे हेच आहे की सुचनेने आपण एखाद्याला किंवा स्वतःला इच्छित काम करण्यास भाग पाडू शकतो. आपण " अचेतन मनाची शक्ती" या पुस्तकात जहाजावरील प्रवास्याचे उदाहरण वाचलेच आहे.

अजुन एक उदाहरण घ्यायचे झाले तर, एक जुना मराठी सिनेमा आहे. ज्याचे नाव आहे "आत्मविश्वास". या सिनेमामध्ये एक आई दाखविले आहे. जी फक्त आपला नवरा,मुले यांचेच ऐकत असते तिचे स्वतः चे असे काही निर्णयच नसतात. एक दिवस काही कारणामुळे त्यांचे घर विकण्याचे वेळ येते आणि ते घर त्या आईच्या नावावर असल्यामुळे त्यांना विकण्यासाठी अडचण निर्माण होत असते. परंतु त्यांना माहिती होते की आई नाही म्हणणार नाही. इकडे तर आईची घर विकायची इच्छा नसते कारण तिला एकत्र कुटुंब हवं असत. मग ही अडचण ती तिच्या आफ्रिकेवरून आलेल्या मैत्रिणी सोबत शेयर करते. त्यावर ते मैत्रीण म्हणते तू सही करू नको. ती आई सांगते माझ्यात एवढी कोठे हिम्मत आहे. मैत्रीण तिला सांगते मी एका तांत्रिक कडून आत्मा बदलण्याचा मंत्र शिकलेली आहे. ज्यामुळे माझे व्यक्तिमत्वे तुझे व तुझे माझे होईल नंतर आपण पुन्हा बदली करून घेऊ. ठरल्याप्रमाणे ते एक प्रयोग करतात. त्यानंतर त्या आईला जेव्हा सही करायची वेळ येते तेव्हा अत्यंत आत्मविश्वासाने सांगते मी सही करणार नाही आणि डॉक्युमेंट फाडून टाकते. हे सर्व झाल्यावर ती आई तिचे व्यक्तिमत्व घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे जाते. त्यावर तींची मैत्रीण तिला सांगते अस काही नसते मी फक्त तुझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे सर्व काही केले.

आता यावरून हेच लक्षात येते की, सुचनेमुळे आपल्यामध्ये बदल येऊ शकतो किंवा हवे ते परिणाम आपण मिळवू शकतो.

हे आपण स्वसंमोहन चा अभ्यास करताना पाहणार आहे.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻