०२-०९-२०२०
सुप्रभात .
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
एक अनुभव कोरोनाचा.............
माझ्या प्रिय मित्रांनो,
खर तर मला आपल्या ग्रुपमध्ये कोरोना हे नावच घ्यायचे नव्हते, म्हणूनच आता पर्यंत मी कोराना बद्दल एकही मेसेज किंवा काही पोस्ट टाकली नव्हती, परंतु माझ्या कर्मयोगाने मला आज कोरोना बद्दल लिहण्यासाठी भाग पाडले आहे. आपल्याला माहितीच आहे,काही दिवस मी आपल्या ग्रुपमध्ये नवीन लेख व पुस्तक पोस्ट करू शकत नव्हतो. त्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून कोरोना हेच होते. कारण अंदाजे पंधरा वीस दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मध्ये काही कोरोना रुग्ण सापडले होते आणि त्याच दरम्यान मला पण थोडी ताप आणि सर्दी सारखे सौम्य लक्षण दिसत होती, म्हणून मी दोन दिवस घरी राहून माझ्या डॉक्टरांच्या सल्याने परेसीट्यामल टॅबलेट घेतल्या. पण मला काही आराम मिळाला नाही. त्यामुळे मी माझ्या बॉस च्या सांगण्यावरून कोरोना टेस्ट करायचे ठरवले.
ऑगस्ट महिनाचा २० तारीख असलेल्या गुरुवार दिवस उजाडला आणि मी टेस्ट करण्यासाठी महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे कोरोनाच्या टेस्ट चालूच होत्या तिथे माझ्याच ऑफिसमधील एक मित्र पण आला होता. मी त्याला विचारले," काय रे भाऊ काय प्रोसेजर आहे." तो म्हणाला इथे इथे जा,नाव दे. ते लोक तुला नावाने आवाज देतील तेव्हा आत मध्ये जा. कारण त्याचे सँपल टेस्ट ला गेले होते तेवढ्यात त्याच्या नावाचा पुकारा झाला आणि त्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आला. मग मी पण माझे नाव दिले आणि पुकारा येईपर्यंत बाहेर उभा थांबलो,तसेच बरेच स्त्री,पुरुष,मुली, मूल,पण माझ्या सारखे बाहेर थांबले होते आणि त्यापैकी जास्तीत जास्त लोक टेन्शन मध्ये दिसत होते. तेवढ्यात माझ्या नावाचा पुकारा झाला आणि मी सँपल देण्यासाठी आतमध्ये गेलो. गेल्याबरोबर त्यांनी मला खुर्चीवर बसवले व माझ्या नाकातील स्वाब घेतला आणि पुन्हा मला बाहेर थांबवले. तो पर्यंत माझ्या घरून कमीत कमीत २५ वेळा मिस कॉल येऊन गेला होता. मग मी घरी कॉल करणे गरजेचे समजून एक कॉल केला आणि तिथे चालू असलेल्या घडामोडींचे वर्णन करून सांगत होतो तेवढ्यात पुन्हा माझ्या नावाचा पुकारा झाला आणि माझा पण रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. जसे मला हे कळले की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसे मी हसायला लागलो. कारण मला कळले होते की, हे माझ्या विचारांचे फळ आहे. त्याचे झाले असे कि, काही दिवसापुर्वि माझ्या मनात विचार आला होता कि,जर मी स्वतः कोरोना पॉसिटीव्ह आलो तर काय करणार? आणि मी त्याच वेळेला ठरवून टाकले होते कि जर आपल्यासोबत असे झाले तर आपण तिथे जाऊन पुस्तके वाचू आणि किमान दहा लोकांना प्राणायाम शिकवू. म्हणूनच मला हसायला येत होते.माझे हेच हसणे पाहून काही लोकं माझ्याकडे कावरेबावरे होऊन पाहू लागले. लगेच मी स्वतः ला सावरून गाडी मध्ये बसलो आणि झिंगाट घरी आलो आणि माझ्या मुलगा व बायकोला घेऊन त्यांची टेस्ट करण्यासाठी हॉस्पिटलला घेऊन गेलो. माझ्या घरच्या लोकांची टेस्ट झाली आणि मला आनंद झाला कारण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मग आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि घरी आलो. मला अगोदरच तेथील डॉक्टरांनी कल्पना दिली होती की," तुम्हाला विलगीकरण केंद्रावर राहावं लागेल." म्हणूनच मी घरी आल्यावर आवश्यक तेवढे कपडे आणि लॅपटॉप घेऊन दिघी विलगीकरण केंद्रावर गेलो. तिथे गेल्यावर माझी व माझ्या सोबत इतर लोक जे होते त्यांची ॲडमिशन करण्यात आली. माझी ऍडमिशन झाली आणि माझ्यासह इतर सर्वांना त्यांचे बेड मिळाले. खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली होती. कारण त्यादिवशीच सेंटरचे उद्घाटन झाले होते. मग काय मी माझ्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे प्रतीक भाऊ म्हणून होते त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. अशाप्रकारे माझा कोरोना प्रवास सुरू झाला.
दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो आणि रोजच्या सवयीप्रमाणे प्राणायाम केले. त्यानंतर सकाळचा नाष्टा आला. दुपार झाली,दुपारचे जेवण झाले आणि जेवन झाल्यावर माझ्याकडे शंकर महाराज साकोरे नावाची व्यक्ती आली आणि मला म्हणाले,"हे तुम्ही जे काही फुस फुस (प्राणायाम) करता ते आम्हाला पण शिकवाल का?" हे ऐकुन मला खूप आनंद झाला कारण पुन्हा माझ्या मनासारखेच झाले होते. म्हणून मी त्यांचे बोलणे ऐकल्यावर क्षणाचही विलंब न करता लगेच होकार दिला आणि त्याचदिवशी संध्याकाळी ६ वाजता योगाचा वर्ग चालू झाला. मग मी योगा चालू असतानाच आपल्या ग्रुप बद्दल पण माहिती दिली.
अशाप्रकारे रोज आम्ही सकाळ संद्याकाळ योगा करू लागलो तसेच एक दिवस अतुल शिंदे जी यांचे अध्यात्मिक विषयावर प्रवचन झाले. मी पण थोडंसे माझ्या माहितीनुसार अध्यात्मिक,अचेतन मनाची शक्ती आणि संमोहन या विषयावर छोटेसे व्यख्यान दिले. तसेच आमचे सर्वांचे लाडके शंकर महाराज साकोरे यांनी पण छत्रपती शिवाजी महाराज राजे आणि धर्मवीर संभाजी महाराजचा जीवनातील काही प्रसंगाचे वर्णन सांगितले. अजून आमच्या सर्वा मध्ये प्रतीक चौधरी म्हणून एक व्यक्ती होता तो खूपच कॉमेडी करत होता आणि त्याच्या बद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. असेच आमचे दिवसा मागून दिवस आनंदाने जात होते. हा सर्व कोरोना प्रवास चालू असताना, आमच्यापैकी एकालाही एकदा पण आम्हला कोरोना झाला असे वाटले नाही. कारण आम्हला कसल्याही प्रकारचे लक्षण दिसत नव्हती परंतु डॉक्टर च्या पुढे आपण जाऊ शकत नाही. असो.
जवळ पास आम्ही ७० ते ७५ लोक तिथे राहत होतो. आम्ही खूप खूप धमाल,मस्ती केली जसे कि आम्ही सहलीला आलॊ आहे. आमच्याच बाजूला स्त्रियांचा वार्ड होता एक दिवस तिकडे पण योगाचा कार्यक्रम करण्याची संधी डॉक्टरांनी मला दिली तिकडे पण पुरुषानं सारखाच प्रतिसाद मिळाला. हे सर्व असे आनंदाने चालू असताना माझ्या घरी एक प्रॉब्लेम झाल्यामुळे मला सातव्या दिवशीच घरी यावे लागले परंतु तिथे घालविलेले सात दिवस हे माझ्या आयुष्यातुन मी कधीच विसरू शकणार नाही कारण तिथे खूप सारे मित्र मिळाले त्यापैकी संदीप बऱ्हाटे सर, बालाजी उर्फ नेता, कृष्णा,मुकेश,अभिजित ,तुषार भाऊ,प्रदीप,निखिल असे बरेच नाव मी लिहू शकतो.काहींचा तर मी अगोदरच उल्लेख केला आहे. सर्वानी मला खूप खूप प्रेम दिले त्याच बरोबर गुरुजी हि उपाधी पण दिली त्यापैकी बऱ्याच जणांनी आपला ग्रुप पण जॉईन केला आहे. मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम कायम मिळत राहू द्या. हीच विनंती.
तसेच आपल्या ग्रुप मधील किंवा अजून कोणालाही कोरोना होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि जर समजा झालाच तर घाबरण्याचे काही कारण नाही मस्त १० दिवस विलगीकरण केंद्रावर राहायचे आणि धमाल मस्ती करून,स्वस्थ व मस्त होऊन घरी यायचे, फक्त माझी आपल्याला एकच विनंती आहे. स्वतः साठी रोज एक तास काढा आणि प्राणायाम करा कारण तिथे एक दिवस फुफ्फुस स्पेशालिस्ट डॉक्टर विजय शेट्टी आले होते ते सांगत, “जर या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आपले फुफ्फुस मजबूत ठेवायचे असेल तर प्राणायम करा कारण प्राणायाम केल्याने आपले फुफ्फुसाची मजबुती वाढते.”
त्यामुळे च आता पर्यंत आपण अभ्यास केलेला प्राणायामाचं एकत्रित ऑडिओ आपल्या ग्रुप वर टाकत आहे. कोणाला प्राणायाम करण्यासाठी काही अडचण आली तर अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक खाली देत आहे. तसेच मला पण कॉल करू शकता आणि यु टयूब ला रामदेव बाबांचे विडिओ पाहू शकता. तसेच मित्रांनो मी पुन्हा कल टेस्ट केली व ती टेस्ट निगेटिव आली. अगोदर मला स्वतः ला फिजिकली फिट वाटत होते आणि आता तर डॉक्टरांनी फिटनेस सर्टिफिकेट दिले त्यामुळे काळजी करण्याचे काहीच करण नाही.
या मित्रांनो आपण सर्वजण आपल्यासह इतरांची आवश्यक ती काळजी घेऊ आणि आनंदाने जीवन जगू.
धन्यवाद .
आनंदी राहा,सुखी राहा,
शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🏻🏻🏻🏻🏻
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.