आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा.
ll भस्त्रिका प्राणायाम ll
पद्मासनात किंवा सुखासणात बसून. मान व शरीर सरळ ताठ ठेवून तोंड बंद ठेवावे. नंतर जलदगतीने श्वास अंदर बाहेर टाकत पोट संकुचींत करून त्याचा संकुचित भाग वाढवत जावा. असे करताना नाकातून “भूस भूस” असा आवाज येणार याच्या अभ्यासासाठी श्वास अंदर बाहेर सोडतांना चांगल्या गतीने सोडावे व ग्रहण करावे.पहिल्यांदा १० वेळा करून पाहावे हळू हळू याचे प्रमाण वाढवावे. भस्त्रिका प्राणायामचे पहिले चरण पूर्ण होते.
आता श्वास शांत करा व ध्यानस्थ व्हा काही वेळ ध्यानस्थ बसून झाल्यावर पुन्हा हीच प्रक्रिया करावी. भस्त्रिका प्राणायामाचे लाभ
१.गळ्यातील खरखर कमी होईल
२.पोटातील जळजळ कमी होते.
3.नाक आणि छातीच्या संबधित आजारांवर परिणाम होवून त्या पूर्णपणे कमी होऊ शकतात.
४.एपेटाइट यामुळे दुरुस्त होतो.
५.ट्युमर यामुळे बऱ्यापैकी बरा होऊ शकतो.
६.श्वासासंबंधी आजारांमध्ये कमी येते.
७.शरीर संतुलित गरम राहते.
८.शरीरातील नाड्या शुद्ध होतात.
९.शरीरात ऑक्सिजन चांगल्या मात्रेत शरीरात पोहोचतो.
१०.या प्राणायामामुळे वात,पित्त, आणि कफ संतुलित होऊन ते कायमचे नाहीसे होतात. त्यामुळे रक्तशुद्ध राहते.
११.मनातील शांतता वाढते.
या प्राणायामामुळे आपल्याला कोणत्याही आजारापासून मुक्तता मिळू शकते. यामुळे शरीर स्वस्थ राहते. श्वासांना २० वेळा आतबाहेर केल्याने चांगला लाभ होते. त्याकरिता उजव्या नाकपुडीला बंद करून डाव्यांनी १० वेळा श्वास आतबाहेर करावा. नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने १० वेळा श्वास घ्यावा.
जर सर्दी खोकला असेल तर त्यामुळे नाकपुड्या बंद असतील तरच हि क्रिया दोन्ही बाजूनी नियमित. प्राणायामात गडबड आणि घाई करू नये. दोन्ही नासिका मधून १०-१० वेळा श्वास आत बाहेर करून आरामात प्राणायामाची सांगता करावी.
भस्त्रिका करताना जेव्हा आपण श्वास आत बाहेर करताना आपले अवचेतन शुद्ध व ध्यानस्त असावे. कोणतेही दुर्विचार मनात येवू देवू नका तरच याचा लाभ पूर्णपणे आपल्याला मिळेल. यामध्ये मनात शांतता व ध्यानमग्नता जरुरी बाब मानली जाते.घ्यायची काळजी.
१. हा प्राणायाम हाय बी.पी.रोग्यांनी करू नये.
२. गर्भवती स्त्रीने हा प्राणायाम करू नये.
३. या प्राणायामाचा आरंभ हळूहळू करावे.
शरीराला प्राणायामाची सवय पडू द्या. त्यासाठी चांगला वेळ द्या.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा.
ऑडियो लिंक खाली दिली आहे.
https://drive.google.com/file/d/15KPraCpaIS_3VLDh2BEIRPbePBmKMdGO/view?usp=sharing