सुप्रभात. १२-०८-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll परिवर्तन ll

“परिवर्तन इस संसार का नियम है, कल जो किसी और का था, आज वो तुम्हारा हैं एवं कल वो किसी और का होगा।" भगवद गीता.

या विश्वात प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. म्हनुणच परिवर्तन हा संसारचा नियम आहे.या विश्वात जन्मा मागुन मृत्यू ,सुखा मागून दुःख,दिवसा मागून रात्र,अश्या कितीतरी गोष्टीचे रोज परिवर्तन आपण पाहतो. परिवर्तनाच्या नियमा मध्ये आपण काहीही करू शकत नाही कारण ते एक अटळ सत्य आहे. आपलयाला शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात किंवा इंजिनिअरिंगला ऊर्जा अक्षयतेचा नियम अभ्यासाला आहे.," एकूण विश्वातील ऊर्जा ही अक्षय आहे. तिला नव्याने निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. फक्त एका रूपातून दुसऱ्या रुपात रूपांतर करू शकतो." .

उदा. धरणातील पाण्यात स्थीतीज ऊर्जा असते. याच ऊर्जेचे रूपांतर गतिज उर्जेत केले जाते व गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. विद्युत ऊर्जेचे आपण काय काय करतो हे थोडक्यात आपण काल पहिलेच आहे.यालाच इंग्लिश मध्ये एनर्जी रुल असे सुद्धा म्हणतात.

हा नियम हेच सांगतो की जग हे परिवर्तनशीलच आहे. जर सर्वच परिवर्तनशील आहे तर मग आपले पण कधी तरी परिवर्तन होणे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.जर आपण स्वतः परिवर्तनशील आहे मग आपण इथे पृथ्वीवर काय करत आहे. कारण कबीर जी तर म्हणतात,"निद्रा,भोजन,भोग,भय,ये पुरुख पाशुसमान। ज्ञान अधिक नरन में ज्ञान बिना पशु जान।"

कबीर जी म्हणतात," झोप,जेवण,शारीरिक सुख व भीती हे तर प्राण्याप्रमानेच आपल्या कडे आहे. तर मग आपल्यात आणि प्राण्यात फरक काय आहे. तो फरक एवढाच की आपल्याला विवेकी विचार करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. नाही तर आपण पण प्राणीच आहे. तसे पण विज्ञानानुसार माणूस समाजप्रिय प्राणीच आहे. विवेकी विचार करण्याची शक्ती प्राप्त असून पण आपण कधी कधी अविवेकी वागतो असे का होत असावे? कारण आपण परिवर्तनाचा नियम समजूनच घेतलेला नाही. म्हणूनच आपण दिवस रात्र लोभापायी धडपडत असतो. उदा. देवाकडे एक मनुष्य साकडं घालतो की, मी खूप गरीब आहे,माझ्यावर तू अन्याय केलास.देव त्याला प्रसन्न होऊन त्याला वर देतो. उद्या सूर्योदयाच्या वेळे पासून सूर्यास्तापर्यंत जेवढी भूमी तू चालून पार करशील तेवढी भूमी तुझी होऊन जाईल. मनुष्य खुश होतो. दुसऱ्या दिवशी तो चालायला सुरुवात करतो. चालता चालता मागे पाहतो व पळू लागतो. पुन्हा मागे पाहतो आणि अधिक जोरात पळतो.तो खूप थकतो.पुन्हा मागे पाहतो आणि अधिका अधिक जोरात पळतो.तो इतका धडपडत करत पळतो की, शेवटी सूर्यास्त होतो व त्याचे धड पडते.म्हणजे काय तर मृत्यू मुखी पडतो. जर त्याला परिवर्तनाचा नियम माहीत असता तर त्याने नक्कीच देवाला दोष दिला नसता व आपले जीवन आहे त्यामध्ये आनंदाने जगला असता. परंतु नाही आपण नेहमी आहे ते सोडतो आणि नाही त्याच्या मागे पळतो. मला असे मुळीच म्हणायचे नाही की, आपण प्रगती करायला नको. नक्कीच आपली प्रगती व्हायलाच पाहिजे.परंतु आपण आपले खरे रूप विवेकी विचार करणारा प्राणी आहे ते मात्र विसरायला नको. नाहीत अधोगती व्हायला वेळ लागत नाही. विवेकाने विचार करा आपल्या मनाला आनंदी राह्यला सांगा आणि "जितना भी मिला है,बहुत कुछ मिला है।" हा भाव लक्षात ठेवूया म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात परमानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻