सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll द्रूढ निश्चय ll
माझ्या प्रिय मिञांनो या जगात दूसरी अशी कोणतीच शक्ती नाही किंवा व्यक्ती नाही जे आपल्यासाठी काही चमत्कार करू शकते. परंतु आपले अंतर्मन व आपला द्रूढ निश्चय आपल्यासाठी चमत्कार करू शकतो. जो पर्यंत आपण द्रूढ निश्चय करून आपल्या अंतर्मनाला सांगत नाही तोपर्यंत आपण या विश्वात काहीही साध्य करू शकत नाही.पण एकदा का आपण आपल्या अंतर्मनाला द्रूढ निश्चयाने सांगितले की, हे मला साध्य करायचे आहे. साध्य झालेच समजा. याच द्रूढ निश्चयाच्या व अंतर्मनाच्या जोरावर संशोधक शोध लावतात. त्यापैकी एक एडिसन. ज्यांनी विजेच्या दिवेचा शोध लावण्यासाठी दहा हजार प्रयोग केले हा इतिहास आहे. याच शक्तीच्या जोरावर मार्कोनी ने रेडिओ चा,जे एल बेवेरजन ने टीव्ही चा,राईट बंधूंनी विमानाचा,गॅलिलिओ ने दुर्बीणचा शोध लावला. असे कितीतरी शोध आहेत जे याच शक्तीच्या जोरावर आज जगात आहेत.
यापेक्षा आपल्या जवळचे म्हणजे महात्मा गांधी. ज्यांच्या बद्दल तर मला शाळेत धडा होता. "द्रूढ निश्चय" त्यामध्ये गांधीजींना काही श्लोक पाठ करायचे होते पण त्यांच्या वेळेमध्ये ते शक्य नव्हते म्हणून त्यांनी ते एका कागदावर लिहून काढले आणि येता जाता दिसतील अशा ठिकाणी चिकटवले व येता जाता त्यावर नजर टाकू लागले.
त्यांच्या याच द्रूढ निश्चयाने देशाला स्वतंत्र मिळवून दिले.याच द्रूढ निश्चयाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. म्हणून त्यांच्यासाठी म्हटले जाते," निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू ।" याच द्रूढ निश्चयाने हिरकणी बुरूज नाव अमर झाले.याच द्रूढ निश्चयासाठी आपण APJ अब्दुल कलाम साहेबांना सलाम करतो. हाच द्रूढ निश्चय व अंतर्मन प्रत्येकामध्ये असतो. जेवढे ज्ञान आइस्टाइन, आयझॅक न्यूटन ला होते तेवढेच आपल्याला पण आहे फक्त गरज आहे त्या शक्तीला ओळखण्याची आणि आचरणात आणण्याची.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻