सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आरोग्य हीच संपत्ती आहे
HEALTH IS WEALTH हे वाक्य सर्वात आधी मी शाळेला असताना वर्गांतील भिंतीवर वाचलं होत. त्यावेळेला फारस समजत नव्हत. पण आता या गोष्टीचे महत्व लक्षात येते. शाळेत जे शिकवतात ते फक्त नोकरी पुरते च नसते. असो.
आजच्या तान तणावाच्या काळामध्ये आरोग्याची जपणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्या सर्वांना माहितच आहे व ते आपण करतो. उदा. आपल्याला एखाद्या गावी जायचे असेल तर जी गाडी किंवा जे काही साधन आपण वापरणार असू ते ठणठणीत असायला पाहिजे. म्हणजे काय, गाडी असेल तर त्यामध्ये पेट्रोल पाहिजे. इंजिन मध्ये ऑईल पाहिजे.सर्व्हिसिंग केलीली पाहिजे जेणेकरून जेथे आपल्याला जायचे आहे तिथे आपण कोणतेही कष्ट न होता जाऊ शकतो. तसेच आपल्याला जीवनामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपले शरीर ठणठणीत ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या निष्काळजी पणामुळे जीवनातील कित्येक वर्ष वाया जाऊ शकतात. आणि आपल्याला पश्छतापची वेळ येऊ शकते.
याचा अनुभव आज मी घेतला. मला काल सकाळीच कळाले की,गाडीतील सीएनजी गॅस संपला. पण मी स्वतः ला म्हणालो पेट्रोल आहे. आता जाऊ ऑफिस ला आणि संध्यकाळी भरू परंतु lock down मुळे संध्याकाळी पेट्रोल पंप बंद होते. आज सकाळी जेव्हा मी ऑफिस ला जायला निघालो तर काय गाडी चालूच होत नव्हती. गाडीत गॅस नाही हे मला माहीत होते. पण पेट्रोल पण संपले होते. शेजाऱ्याच्या दोन लोकंच्या गाडी मधील पेट्रोल घेऊन ऑफिस ला पोहचलो.
आता या सर्व कार्यक्रमा मध्ये माझे दोन तास वाया गेले. बाकी ऑफिस मध्ये जे कमचे प्लॅनिंग होते ते पण फेल. हे कशामुळे घडले तर फक्त माझा थोड्या निष्काळजी पणा मुळे. म्हणूनच आपण आपले आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपण काही प्राणायाम चा पण अभ्यास करू. काहींना अभ्यास असेल काही ना नसेल किंवा सर्वांना असेल. पण आपण हे उजळणी म्हणून अभ्यास करू.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
(https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home)
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
(https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp)