सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,

शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll चिंता ll

आपण आपल्या जीवनात कधी कधी ना कशाची तरी चिंता करत असतो. मी पण खूप चिंता करत होतो,पण मी चिंता सोडा आणि सुखाने जगा हे पुस्तक वाचले आणि चिंता करणे सोडून दिले. माणसाची चिता एक वेळा जळते पण चिंता रोज जळते. जशी वाळवी लाकडाला पोखरून पोकळ करते तसेच चिंता आपल्याला पोखरून पोखरून सर्वनाशाकडे नेते.

बरेच लोक म्हणतात मला टेन्शन घ्यायचे नाही चिंता करायची नही पण काय करू ते येतेच.यापैकीच मी पण एक होतो,पण मी धन्यवाद देऊ इच्छितो डेल कारनेगी ना त्यांनी "चिंता सोडा सुखाने जगा" हे पुस्तक लिहून ठेवले. जणू काही ते माझ्यासाठीच आहे असे मला वाटते.

उदा. एक व्यक्ती एका साधुकडे जाते आणि सांगते की,मला दारू सोडायची आहे. पण सुटत नाही काय करू. त्यावर साधू त्याला फार काही न सांगता,उद्या सकाळी नदीवर बोलवतो. ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती नदीवर येते आणि पाहतो की साधूने एका झाडाले घट्ट मिठीत पकडून ठेवले आहे व जोराने ओरडत आहे मला सोड मला सोड मला सोड. त्यावर ती व्यक्ती अाश्चर्यचकित होऊन सांगतो साधू महाराज झाडाने नाही तर तुम्ही झाडाला पकडून ठेवले आहे. तुम्ही झाडाला सोडा. त्यावर साधू महाराज बोलतात हो रे बाबा हेच मला तुला सांगायचे आहे दारूने तुला नाही तर तू दारूला पकडून ठेवले आहे. तू दारू सोड. म्हणजे तुझी समस्या संपेल. तसेच आपल्या जीवनात चिंता आणि टेन्शन चे असते. तर मग चला वाचूया "चिंता सोडा सुखाने जगा" आणि चिंतामुक्त होऊया. काल एक धडा अपलोड केला रोज एक धडा अपलोड करणार आहे. वाचा खूप छान आहे. मस्त आहे. भारी आहे.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻