सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll सेल्फ टॉक ll
आज रक्षा बंधन. ताईने भावाला राखी बांधायची व भावाने ताईचे रक्षण करण्यासाठी वाचन द्यायचे. खूप पवित्र असा सण आपल्या संस्कृती मध्ये साजरा केल्या जातो.
असाच काहीसा आज आपण एक प्रण करू की, आपण आपल्या अचेतन मनाचे नकारात्मक विचार किंवा बाबी पासून रक्षण करू कारण मी अगोदर लीहले होते की, ,"आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक विचार व बाबिंचा आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपले व्यक्तीमत्व घडत". ज्याप्रमाणे गाडीच्या इंजिन मध्ये हवा फिल्टरच्या साह्याने फिल्टर करून घेतली जाते आणि त्यामुळे गाडीचा परफॉर्म चांगला मिळतो.
त्याप्रमाणे आपण पण आपल्या चेतन मनाच्या साह्याने प्रत्येक विचार फिल्टर करूनच आपल्या अचेतन मनाकडे पाठविला पाहिजे त्यामुळे आपला जीवन जगण्याचा परफॉर्म चांगला होतो.
आता हे करायचे कसे? या साठी एक पद्धत आहे त्याला म्हणतात "सेल्फ टॉक". आपण नेहमी स्वतः शी बोलायला पाहिजे त्यामुळे आपल्याला हवे ते परिणाम मिळविणे शक्य होते. समजा मला कोणीतरी रागवले तर मी बोलणार ,"अरे विठ्ठल मला एक सांग ती व्यक्ती तूझ्यावर रागवली ठीक आहे काही हरकत नाही. ती व्यक्ती मनाने खूप छान आहे आता काहीतरी टेन्शन मध्ये असेल म्हणून बोलून गेली असेल". असे सेल्फ टॉक केल्याने हळूहळू आपल्या मनावर कंट्रोल यायला सुरुवात होते आणि आपल्या मनासारख्या सगळया गोष्टी होऊ लागतात. मी स्वतः ओव्हर थिकिंग चा शिकार होतो. एखाद्या दिवशी झोपायला गेल्यावर मी एवढा विचार करायचो की,माझी पूर्ण रात्र विचारत जात असे. आणि विचार तर पूर्ण फालतू जे कधीच प्रत्येकक्षात घडलेच नाही. परंतु मी पण सेल्फ टॉक वापरले आणि स्वतःवर नियंत्रण मिळविले.
तुम्हाला पण या गोष्टीची गरज असेल तर नक्की करा नाही तर सोडून द्या.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻