आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll अनुविलोम ll
१. पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा आणि खांदे सैल सोडा. चेहऱ्यावर मंद स्मित हास्य असू द्या.
२. तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा, तळवा आकाशाकडे उघडा ठेवा किंवा चीन मुद्रेत (अंगठा आणि तर्जनीचे टोक एकमेकांना हळुवारपणे स्पर्श करत ठेवावे).
३.अनामिका आणि करंगळी डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. आपण अनामिका आणि करंगळी डावी नाकपुडी बंद करण्यासाठी किंवा उघडण्यासाठी वापरणार आहोत आणि अंगठा उजव्या नाकपुडीसाठी.
४. तुमचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून हळुवारपणे श्वास घ्या.
५. आता डाव्या नाकपुडीवर करंगळी व अनामिका ठेवा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा.
६. उजव्या बाजूने श्वास घ्या आणि डाव्या बाजूने सोडा. अशाप्रकारे तुम्ही अनुविलोम प्राणायामाचे एक चक्र पूर्ण केले आहे. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे चालू ठेवा.
७. अशाप्रकारे आळीपाळीने दोन्ही नाकपुड्यामधून श्वास घेऊन ९ चक्रे पुर्ण करा. प्रत्येकवेळी श्वास सोडल्यावर त्याच नाकपुडीने श्वास घेण्याचे लक्षात ठेवा. प्राणायामाच्या संपूर्ण वेळी डोळे बंद ठेवा आणि कोणताही जोर किंवा प्रयत्नांशिवाय लांब, खोल आणि सहज श्वास चालू ठेवा.
अनुविलोम मन तणावमुक्त करण्यास मदत करते.
अनुविलोम प्राणायामाचे फायदे:
मन शांत आणि स्थिर करण्यासाठी अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र
आपल्या मनाची ही प्रवृत्ती आहे की ते नेहमी भूतकाळाबद्दल पश्चाताप किंवा गौरव करते आणि भविष्यकाळाबद्दल चिंतीत होते. अनुविलोम प्राणायाम मनाला परत वर्तमानकाळात आणतो.
बऱ्याचशा अभिसरण आणि श्वसनाच्या समस्यांवर चिकित्सेप्रमाणे काम करते.
शरीर आणि मनातील संचित ताणताणाव प्रभावीपणे घालवण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत करते.
शरीराचे तापमान संतुलित ठेवते.
लक्षात ठेवायच्या गोष्टी:
श्वासावर जोर देऊ नका आणि प्रवाह हळुवार आणि नैसर्गिक ठेवा.
ऑडियो लिंक खाली दिली आहे.
https://drive.google.com/file/d/10mc42Swlz6ZAL1cVX3kJXA5T4Tj5l0A1/view?usp=sharing
टीप:
दिलेली माहिती वैधकिय उपचार समजू नये. कोणाचे ऑपरेशन झाले असेल तर प्राणायाम करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल गोरे.