सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll शिस्त ll

मी शाळेत असताना माझे PT चे धुमाळे सर सारखे आम्हाला म्हणायचे,"तुम्हाला काही शिस्त नाही जरा शिस्त पाळायला शिका." त्यावेळेस त्यांचे काही फारसे मनावर घेतले नाही पण आता मात्र शिस्त आपल्या जीवनात किती महत्वाची आहे ते कळते. कारण सकाळी वेळवर उटले पाहिजे,ऑफिस ला गेलेच पाहिजे नाहीतर काय होईल ते सांगायची गरज नाही.म्हणून शिस्तीला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.यासाठी आपण एक उदाहरण घेऊ.

एकदा काही कारणास्तव इंद्रदेवाला राग येतो आणि पाच वर्षासाठी पाऊस पडणार नाही असे तो जाहीर करतो. इकडे सगळे चिंतित होतात विशेषकरून शेतकरी अधिकच. मग शेतकरी इंद्रदेवाची प्रार्थना करतात देवा असे करू नका आमचे संसार उघड्यावर येतील इंद्रदेव शांत होतात आणि सांगतात आता मी तर काहीच करू शकत नाही.शंकर जी जेव्हा डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस येईल. शंकर जी ध्यान करत असतात, आणि शंकर जिना ध्यानातून उठवणे म्हणजे आपण कधीतरी मालिकेमध्ये पाहिले असेलच काय होते.

म्हणून कोणीच शंकर जिना काही उठवत नाही. इकडे शेतकरी विचार करतात आता पाच वर्ष पाऊस येणारच नाही तर जमिनीची मशागत करून काय फायदा,पण एक शेतकरी असा असतो तो त्याची शेताची मशागत करत असतो. बाकीचे शेतकरी त्याला म्हणतात पाच वर्ष पाऊस येणार नाही तर तू कशाला मशागत करतो त्यावर तो शेतकरी म्हणतो बरोबर आहे पण मी माझे शेती मशागत करण्याचे काम विसरू नये म्हणून करत आहे. नेमक हेच वाक्य माता पार्वती ऐकते व शंकर जिना उठवते आणि सांगते की,"तो एक शेतकरी त्यांचे काम विसरू नये म्हणून पाऊस पडणार नाही तरी काम करत आहे आणि तुम्ही बसले ध्यान करत तुम्ही तुमचे डमरू वाजवणे विसरले तर? त्यावर शंकर जी जागे होतात आणि विचार करून पार्वती मातेला म्हणण्यात बरोबर आहे तुझ दे माझे डमरू मी पण वाजवतो,

आणि ते डमरू वाजवतात. जसे डमरू वाजते तसे सगळीकडे धो धो पाऊस सुरू होते. मशागत करणाऱ्या शेतकऱ्याला खूप आनंद होतो आणि बाकीचे शेतकरी लज्जित होतात.

आता ही गोष्ट खरी खोटी मला माहिती नाही पण त्या शेतकऱ्याच्या शिस्तीमुळे देवाला पण विचार करण्यास भाग पाडलं. म्हणून आपण आपल्या मनाला चांगली शिस्त लावली पाहिजे जेणेकरून अपल्यापण जीवनात त्या शिस्तीचा कधीना कधी कोठेतरी आपल्याला फायदा होईल.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻