सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll जे जे इच्छी प्राणी ते ते पुरवी चक्रपाणी ll

वरील अंभंगाच्या ओळी प्रमाणे आपण ज्या ज्या गोष्टीची मनात कल्पना करू शकतो त्या त्या सर्व गोष्टी अचेतन ( ईश्वर ) मन आपल्या समोर साकार करते. याचा मी काल एक अनुभव घेतला तो शेयर करत आहे.

मी आणि माझा मित्र जो की आपल्या ग्रुप मध्ये पण आहे.

आम्ही दोघे एका प्रोजेक्ट वर काम करत आहे. परवा आमच्या कंपनीच्या management ने आम्हाला सांगितले की काहीही झाले तरी एक सँपल तयार झाले पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता,परंतु आमचा प्रोजेक्ट इन प्रोसेस मध्ये आहे आणि आमचे त्याला लागणारे पार्टस व ASSY तयार करण्यासाठी लागणारे फिक्स्चर तयार नव्हते आणि काही तयारी पण नव्हती.

मग परवा मी घरी आलो आणि माझा अचेतन मनाला ठणकावून सांगितले काहीही झाले तरी एक सँपल तयार झाले पाहिजे ते कसे होणार हे मला माहिती नाही ते काम तुझ आहे माझे नाही.

त्यानंतर मी जेवण केले आणि रोजच्या वेळे प्रमाणे झोपायच्या आधी स्वतः ला स्वसंमोहन मध्ये नेले आणि कल्पना केली की, एक सँपल तयार झाले आहे. त्याची चाचणी पण यशस्वी झाली. सर्व जण खूप आनंदी आहे. managment पण खूप खुश झाले. सर्व जण माझे व माझ्या मित्राचे अभिनंदन करत आहे.

त्यानंतर मी झोपी गेलो.सकाळी रोजच्याप्रमाणे कंपनीत गेलो आणि मला एका एका मागे सँपल तयार करण्यासाठी कल्पना सुचत गेल्या. आम्ही सकाळी ९ वाजता काम चालू केले आणि रात्री ११ वाजता सँपल तयार झाले त्याची चाचणी पण कल्पना केल्या प्रमाणे यशस्वी झाली. कल्पना केल्याप्रमाणे अभिनंदन पण झाले.

आता हे यासाठी सांगितले की, आपण आपल्या अचेतन मनाच्या शक्ती च्या साह्याने अशक्य पण शक्य करू शकतो. फक्त गरज आहे अचेतन मनाला ओतप्रोत भावनेने ठणकावून सांगण्याची.

आपण स्वसंमोहन आणि त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करायचा हे पण शिकणार आहोत. हे शिकण्यासाठी मी upload करत असलेले पुस्तक वाचणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻