सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आत्महत्या

मित्रांनो,

अलीकडच्या काळामध्ये एका अभिनेत्याने आत्महत्या केली. काल परवा माझ्या जवळच्या व्यक्तीने पण आत्महत्या केली. खरच माणसाचे जीवन एवढे स्वस्त आहे का?प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे येत असतात पण कोणताही मागचा पुढचा विचार न करता स्वताल संपविणे योग्य आहे का? मनुष्य जन्माबद्दल संतांनी खूप सुंदर लीहले आहे," एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा कोठे लागे मानवाचा वारा".एका एका जन्मामध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेतल्यावर मनुष्याचा जन्म मिळतो पण एवढा मौल्यवान देह एका क्षणात का नष्ट करतात? कबीर जी म्हणतात ," निद्रा,भोजन,भोग,भय ये पुरख पशुसमान, ग्यान अधिक नरन मे ग्यान बिना पशू जान". झोप,जेवण, मूलबाळ,भीती हे मनुष्याला प्रण्याप्रमाने मिळालेले आहे फक्त एक विचार करण्याची क्षमता अधिक आहे. मग ती काय आत्महत्या करण्यासाठी आहे का? प्राणी पण आत्महत्या करत नाही मग माणूस का? असे खूप सारे प्रश्न निर्माण होतात. मग बरेच लोक टेन्शन होते से उत्तर देतात, डिप्रेसड होता असे उत्तर देतात. खरच या सर्व गोष्टींमुळे जीवन संपविणे योग्य आहे का? मी मन या विषयाबद्दल लिहताना लीहले होते,मानुस‌ कितीही किंवा कोणत्याही विपरीत परिस्थितीत अानंदी जीवन जगू शकतो." हे जर खरे असेल तर असे काय कारण असते की लोक आत्महत्या करतात? मला आज असे खूप सारे पडलेली प्रश्न आहेत. कृपया तुम्हाला काय वाटतं ते लिहून काढा आणि मला पाठवा.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻