सुप्रभात

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll कष्ट शिस्त सातत्य ll

आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यामध्ये कष्ट,शिस्त आणि सातत्य असणे खुप महत्वाचे आहे. कष्ट करण्याची सर्वांची तयारी असते परंतु शिस्त आणि सातत्य फार कमी लोकच टिकवू शकतात. उदा. एक व्यक्ती एका साधुकडे जातो आणि तो त्याचे गाऱ्हाणे त्या साधुला सांगतो मी खुप कष्ट करतो पण यश मिळत नाही. देव मला साथ देत नाही. एवढ कष्ट करून पण मला यश मिळत नाही. मी काय करू त्यावर साधू त्याला एका नदीवर पाठवितो आणि सांगतो तिथे दगडांचा ढीगारा आहे व त्यामध्ये एक चमकणारा परीस आहे जो की लोखंडाला स्पर्श करताच त्याचे सोने होते. तू जा आणि एक एक दगड चेक कर तुला तो परीस मिळेल व तुझे सर्व दुःख दूर होतील. त्याप्रमाणे ती व्यक्ती जाते आणि एक एक दगड चेक करते. दगड चेक करताना त्या व्यक्तीला मनामध्ये शंका येते असे कोठे असते का दगडाला स्पर्श झाला की सोने होते आणि तो दगड चेक करतो पण फारसे लक्ष देऊन चेक करत नाही. त्यामुळे उचलला दगड की फेकला नदी मध्ये असे करत असताना त्याला काय शोधायचे आहे त्याचा विसर पडतो आणि तो नकळत परीस पण नदीमध्ये फेकून देतो.व ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा तो नदीमध्ये शोधतो पण सर्व दगड एक सारखेच दिसतात. इथे हा वक्ती दगड चेक करण्याचे कष्ट करतो पण शिस्त आणि सातत्य जे ठेवायाला पाहिजे नेमके तेच तो अवलंबत नाही व परिसा पासून दूर राहतो.

म्हणून आपण जे काही करण्याचं नीश्चय करतो त्यामध्ये शिस्त सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण कायम वापरत असलेली च भांडी चमकतात, ठेवून दिलेली भांडी धूळ खात पडतात.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻