सुप्रभात. ०४-०९-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll निराशा ll

माझ्या प्रिय मिंत्रानो,

अनेक नकरात्मक भावनांपैकी निराशा हि पण एक आहे. मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कधी कधी ना निराशेच्या भावनेचा सामना हा करावा लागतो. काही लोकांना तर रोजच या गोष्टीचा अनुभव येत असतो. उदाहरणार्थ पगार वाढला नाही म्हणून निराशा,नातेवाईक मान सन्मान देत नाही म्हणून निराशा,मनासारखे नवरा/ बायको नाही मिळाले तर निराशा, एखादा विध्यार्थी असेल अभ्यास झाला नाही म्हणून निराशा, परीक्षेत नापास झाला म्हणून निराशा,एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली कि निराशा, अशा कितीतरी कारणामुळे किंवा छोट्या छोट्या समस्यांमुळे काही लोक कायम निराशेत जीवन जगत असतात.

परंतु याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला आपल्यला कधी वेळच मिळत नाही आणि आपले सोन्यासारखे सुंदर जीवन निराशेच्या गर्तेत झोकून आपण उधवस्त करतो.

आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्यके संकटाला किंवा निराशेला उत्तर हे असतेच कारण निसर्गाचा नियमच असा आहे कि, प्रश्न आहे तर उत्तर पण आहे. परंतु आपण कधी कधी हि गोष्टी विसरून जातो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आलेला संकट किंवा निराशेच्या सामना करायला ज्या शक्तीची आवशक्यता असते ती आपल्याला पाहिजे त्या वेळेला उपयोगात आणता येत नाही आणि जो पर्यंत आपल्यला कोणीतरी आपल्या जीवनातील आदरणीय व्यक्ती आपल्या शक्तीची ओळख करून देत नाही तो पर्यंत आपण त्या शक्तीचा उपयोग करू शकत नाही. पण एक वेळा का आपल्यला आदरणीय व्यक्तींनी आपल्या शक्तीची ओळख करून दिली की,आपण त्या निराशेतून बाहेर येतो, म्हणून आपल्यापैकी बरेच जण म्हणत असतात आपल्या या जीवनात एक तरी विश्वासू मित्र असावा. जेणेकरून अशा संकटकाळी आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होऊ शकेल.

यावर मला एक रामायणातील हनुमानजींचे उदाहरण आठवले.

आपल्याला माहीतच आहे, हनुमानजी खूप पराक्रमी व बलशाली होते, परंतु त्याच्या याच पराक्रमामुळे त्याना एका ऋषिनी श्राप दिला होता कि, तू तुझी शक्ती विसरून जाशील, परंतु नंतर त्यानी त्या ऋषीला माफी मागितली आणि ऋषींनी त्यांना उशाप दिला की,'ज्या वेळेला तुला या शक्तीची गरज असेल त्या वेळेला तुला कोणी आठवण करून दिली तर तुला तुझ्या शक्तीची जाणीव होईल. ज्या वेळेला हनुमानजींना समुद्रावरून हवेत उडून लंकेत जायचे असते, त्या वेळेला हनुमाजीं ना त्याच्या शक्तीची आठवण जामवंत जी करून देतात व ते लंकेत उडून जातात. पुढे काय होते हे आपल्याला माहीतच असेल.

निराशेमुळे आपल्या जीवनावर होणारे परिणाम:

१. कोणत्याही कामात रुची नसणे.

२. स्वतःला दोषी समजणे.

३. चीड चीड करणे.

४. आवडीच्या गोष्टीत पण आवड न राहणे.

५. झोप न येणे किंवा जास्त झोप येणे.

६. थकवा जाणवणे.

७. भूक ना लागणे किंवा जास्त जेवणे.

८ . ऊर्जेची कमतरता.

९. पचनाच्या समस्या उद्भवणे.

१०.सारखा सारखा आत्महत्येचा विचार करणे.

निराशेवर मात करण्यासाठी उपाय:

१. सर्वात आधी आपला विश्वासू मित्र,जोडीदार किंवा आदरणीय व्यक्ती सोबत आपल्या समस्येची चर्चा करणे कारण त्या वेळेला आपले स्वतःचे डोके बरोबर काम करत नसते.

२.कायम सकारात्मक आणि मोठा विचार करणे

उदा. माझा परिवार माझ्या सहित तन,मन,धनाने स्वस्थ आहे.

३. वेळ मिळाला तर लहान मुलासोबत कार्टून पाहणे.

४.आपल्या आवडीच्या गोष्टीत किंवा कामात स्वतःला गुंतून ठेवणे.

५.रोज किमान अर्धा तास प्राणायम व ध्यान करणे.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻