सुप्रभात.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll श्वास ll
माझ्या प्रिय मित्रांनो,
आपण सर्व जण आनंदी जीवन जगत आहे. आपण काही विसरत तर नाही ना? नक्कीच नाही कारण आपण आपल्या जीवनाविषयी आपण खूप जागृत आहे. तरी सुद्धा तुकाराम महाराजंनी म्हटल्याप्रमाणे "आयुष्य वेचुनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा फुकाचा चाकर झालास तू" अशी बोलण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणुन थोड श्वास यावर बोलूया.
माझे शिक्षण संत गाडगे बाबा आश्रम शाळा आमला, अमरावती इथे झाले. तिथे सकाळी एक प्रार्थना होते असे. "ओम सोहम सास से अपने" बहुधा असेच ते वाक्य आहे. म्हणजे काय तर आपल्या श्वास नेहमी ओम आणि सोहम च्या लय मध्ये आत बाहेर होत असतो. पाहिजे तर वाचन थांबवा आणि आताच पाच वेळा श्वास आत बाहेर करून बघा. तुमच्या लक्षात येईल. जर आपला श्वास या लयमध्ये नसेल तर आपली लय दुरुस्त करण्याची गरज आहे. स्वर विज्ञान सांगते श्वास आणि मनाचा जवळचा संबंध आहे. म्हणूनच काय ते संत कबीरांनी लिहून ठेवले "सास सास सीमरो गोविंद" म्हणजे प्रत्येक श्वसला ईश्वराचे चिंतन करा,ध्यान करा. ज्यामुळे श्र्वसाची लय सुधारेल. ही झाली अध्यात्मिक बाजू.
आता आपण रोजच्या जीवनातील पाहू. आपल्याला खूप राग आला आहे त्यावेळेला आपल्या श्र्वासांची गती ही जलद होते व आपल्या मनात नकारात्मक विचार वाढीस लागतात. आपण खूप दुखी किंवा उद्दास असू त्यावेळेला श्र्वासांची गती अतिशय हळू हळू होत असते व आपल्या मनात नैराश्य वाढीस लागते. परंतु ज्यावेळेला आपण आनंदी असू त्यावेळेला आपल्या श्वास अत्यंत शांत(मध्यम गतीला) लयबद्ध रित्या चालू असतो व आपल्या मनात सकारात्मक विचार वाढीस लागतात. पाहिजे तर पुन्हा एकदा वाचन थांबवा आणि प्रयोग करून पाहा. मी प्रयोग करण्यावर फार विश्वास ठेवतो. वर संगतलेला माझा अनुभव आहे तुमच्या कदचित वेगळा अनुभव असू शकतो. प्रयोग झाला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल आता कशप्रकरचा श्वास घेत आहे. म्हणून आपल्या श्र्वासांची लय खूप महत्त्वाची आहे त्यांनीच आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो. कारण आपले जीवन सुरू होते ते श्वासाने आणि संपते पण श्वासाने असे म्हणतात की, आपल्या आयुष्य वर्ष किंवा दिवसावर मोजल्या जात नाही तर ते आपल्या श्वासावर मोजल्या जाते. म्हणूनच मी वर तुकाराम महराजाच्या अभंगाच्या ओळीचा उल्लेख केला आहे.आपल्या श्वासा म्हणजे आपला प्राण आहे म्हणून आपण आपल्या श्र्वासांची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण काही प्रणायम सुद्धा शेयर केलेले आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती असेल तर त्यांचा पण उपयोग करू शकता. श्र्वसाबद्दल अधिक माहिती तुम्ही नेटवर स्वरविज्ञान सर्च करुन मिळवू शकाल.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻