आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll कपालभाती प्राणायाम ll
१.सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत.
२. श्वास घ्यावा.
३. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. नाही ठेवला तरी चालेल.
४. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल.
५. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.
६. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेउन शरीरां मध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.
७. अशाच प्रकारे अजून २ चरणं पूर्ण करावी.
श्वास बाहेर सोडण्यावर भर असावा. श्वास घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. पोटाचे स्नायू सैल सोडल्याबरोबर आपणहून श्वास आत घेतला जातो. श्वास बाहेर सोडण्यावरच लक्ष असू द्या.
कपाल भातीने होणारे लाभ:
चयापचयाची (म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.
पोटाचे स्नायू उत्तेजित होतात ज्याचा लाभ मधुमेहींना होतो.
रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते.
पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, पोशाक तत्वांचं शरीरात परिपाक जलद गतीने होतो.
पोट सुडौल राहते.
मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते.
मन शांत हलके होते.
ऑडियो लिंक खाली दिली आहे.
https://drive.google.com/file/d/13PavUgQynECQU7FHqn1cY7yU-aeN5Tq7/view?usp=sharing
टीप:
हृदयविकार असेल, पेस-मेकर बसवला असेल किंवा स्टेन्ट्स बसवले असतील, स्लिप-डिस्क मुळे पाठदुखीचा त्रास असेल, पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, फेफरे येत असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये.गरोदर महिलांनी किंवा मासिक पाळी चालू असल्यास कपालभाती करू नये कारण ह्या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात.उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीने योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.
दिलेली माहिती वैधकिय उपचार समजू नये. कोणाचे ऑपरेशन झाले असेल तर प्राणायाम करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल गोरे.