सुप्रभात. १३-०८-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll सुख दुःख ll

"सुख के सब साथी दुखमें न कोई"

माझ्या प्रिय मिञांनो आपल्या जीवनात आपण प्रत्येक क्षणाला सुख व दुःखाचा अनुभव घेत असतो. खर तर बाहेर अशी कोणतीच शक्ति नाही जे की आपलयाला सुखी किंवा दुखी करू शकेल. कारण या एकूण विश्वात सुख आणि दुःख अस काहीच नाही. ते फक्त आपल्या मनाच्या अवस्था आहेत. जे की आपल्या विचारी मेंदूतून आपल्या विचारांमुळे जन्म घेतात आणि आपल्याला सुख दुःखाची अनुभूति देतात.सुख आले की आपण आनंदी होतो व दुःख आले की नाराज होतो. म्हणूनच आपल्या जीवनात स्थिरता येत नाही. यासाठी

स्वामी विवेकानंद म्हणतात," जैसी भी हो परिस्थिती एक सी रहे मनस्थिती." नेमके हेच आपल्याला जमत नाही आणि आपण पाहिजे तसे जीवनामध्ये कायम आनंददायी अवस्था प्राप्त करू शकत नाही. कारण सुखामध्ये तर सर्व सोबत असतात आणि दुःखात कोणीच नसते.सुख सर्वच वाटून घ्यायला तयार असतात पण दुःख मात्र कोणालाच नको असते.

हरिवंशराय बच्चनजीची म्हणतात ,"सुख दुःख से परिपुर्ण हो जीवन हमारा।" परिपूर्ण जीवनासाठी सुख आणि दुःख दोन्ही असणे गरजेचे आहे.सुख हे साखरे सारखे गोड तर दुःख हे मिठा सारखे खारट आहे. परंतु खारट पणा कोणालाच नको असतो. परंतु जेवणाला मिठा शिवाय चव येत नाही. तसेच जीवनाला पण दुःख शिवाय अर्थ नाही.

उदा.

एकदा भगवान श्रीकृष्ण रुख्मिणी मातेची स्तुती करताना रुख्मिणी मातेला साखरे सारखी गोड आहेस असे म्हणतात व सत्यभामा मातेला मिठा सारखी खारट. या सर्व प्रसंगाचा सत्यभामा मातेला खूप राग येतो व ती देवावर नाराज होऊन तिच्या महली निघून जाते. भगवान श्रीकृष्ण तिची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात.

मग ते एके दिवशी भगवान श्रीकृष्ण गावातील सर्व प्रजेला जेवणासाठी बोलवतात. त्यांच्या साठी सर्व गोडाचे पदार्थ करतात. सर्व गावकरी त्याच बरोबर देवाच्या सर्व राण्या रुख्मिणी व सत्येभामे मातेसह जेवणाच्या मंडपात येतात. लोकांच्या जेवणाच्या पंगती बसतात त्यांना जेवण वाढले जाते व जेवणाला सुरुवात होते. सर्व पदार्थ गोडच असल्यामुळे लोक कुरबुर सुरू करतात. त्यामधील काही जन जोरात बोलतात," जेवणात फक्त साखरच आहे. भाजी मध्ये मीठ असायला पाहिजे पण भाजीत पण साखरच आहे कसे जेवण करायचे." त्यावेळेला सत्यभामा मातेला मिठाचे महत्व कळते. आणि ती आनंदी होते. थोडक्यात जीवनामध्ये सुखाइतकेच दुःख पण महत्वाचे आहे.

सुख किंवा दुःख हे कधीच कायम नसते. एकदा बादशहा अकबर बिरबल ला एक प्रश्न विचारतो, "सुख आणि दुःख एका वाक्यात लिहून दाखव." त्यावर बिरबल म्हणतो" ही पण वेळ निघून जाईल." म्हणजे सुख असेल तरी निघून जाईल. दुःख असेल तरी निघून जाईल.म्हणूनच गौतम बुद्ध म्हणतात," स्थितप्रज्ञ व्हा." कारण दुःख हे जर लोखंडी बेडी आहे तर सुख हे सोन्याची बेडी आहे. बेडी कोणतेही असो शेवटी बेडी ही बेडीच असते. आपलयाला अशी अवस्था प्राप्त करायची जिथे सुख दुःख काहीच नसेल फक्त आनंद असेल. कारण माझ्या माहिती नुसार या जगात प्रत्येक शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे पण आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही आहे.

संत रविदास महाराज म्हणतात," मेरी पूजा मत करना नहाही मुझसे कुछ उम्मिद जगाके रखना कि,मै कोई चमत्कार करूंगा,

दुख को पैदा तुमने किया है और उसको दूर तुम्हे ही करना होगा

मै सिर्फ तुम्हे मार्ग बता सकता हूं,लेकिन उस रास्ते पर तुम्हे ही चलना होगा।"

या माझ्या प्रिय मित्रांनो आपण पण आपल्या जीवनात ती आनंददायी अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू या व परमानंद मिळवून सदानंदी होऊ या.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻