सुप्रभात. १६-०८-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll निंदा ll

माझ्या प्रिय मिञांनो,मनुष्याला इतरांची निंदा करण्यामध्ये खूप आनंद मिळतो,त्याला आपण असुरी आनंद म्हणू कारण कोणाची निंदा करून मिळालेला आनंद,हा आनंद नसून मूर्खपणाचा कळस आहे,आणि ही परंपरा फार पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. तो माणसाचा एक स्वभाव गुण आहे. जो त्याला आजूबाजूच्या वातावरणातून नकळतपणे प्राप्त झालेला असतो.रामायणात लोकंनिंदे मुळेच प्रभू रामचंद्रांनी सीतेला अग्नीपरिक्षा देऊन पण सोडून दिले होते.महाभारत पण द्रौपदीने द्रुयोधनाला,"अंधे का पुत्र अंधा" म्हटले म्हणून झाले होते. आपल्या समजामध्ये पण असे कित्येक वादविवादाचे कारण हे वैयक्तिक निंदाच असते. आध्यात्मीक पुस्तकात तर असे पण म्हणतात की,दुसऱ्याची निंदा केली की त्यांचे पाप आपल्याला भोगावे लागते. हे जर खरे असेल तर खरच आपल्याला इतरांच्या पापांचा भागीदार व्हायला आवडेल का?नक्कीच नाही. म्हणून आपण कधीही कोणाची चुकून पण निंदा करायला नको.कारण ज्या व्यक्तीजवळ आपण कोणाची निंदा करतो तो आज आपला मित्र आहे पण उद्या काही कारणाने आपला शत्रू झाला तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि आपल्या आनंदी जीवनामध्ये विर्जन पडते किंवा ग्रहण लागते असे पण म्हणू शकतो. पाहिजे तर प्रयोग करून पहा. मी प्रयोग करण्यावर खूप विश्वास ठेवतो ही सवय मला शालेय जीवनापासून लागलेली आहे.याचे सर्व श्रेय माझे वर्गशिक्षक गिरासे सर यांना जात.

आता समजा आपली निंदा दुसऱ्यांनी केली किंवा करत असेल तर ती आपल्यासाठी फायद्याची कशी हे पण पाहू.

जसा आरसा आपल्या चेहऱ्याचे खरे रूप आपल्याला दाखवतो. तसेच निंदा करणारा व्यक्ती आपले अवगुण दाखवत असतो.आपले अवगुण जर का आपल्याला माहिती झाले तर आपण आपल्या मध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. म्हणुनच काय ते संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले आहे,"नींदकाचे घर असावे शेजारी.

संत कबीर महाराजांनी पण सुंदर लिहून ठेवले आहे," निंदक नियरे रखिये, आँगन कुटी छबाय, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाय।"म्हणजेच किमान एखाद्या निंदकाला तरी जवळ ठेवा,जेणेकरून तो आपल्याला पाणी आणि साबणा शिवाय निर्मळ करेल.

"निंदक माझा सखा" असे पण एका संतांनी म्हटले आहे. बहुतेक ते संत एकनाथ महाराज असावे. त्यांचे विषयी एक उदा.पण आठवले.

एकदा संत एकनाथ महाराज अंघोळी साठी नदीवर जातात.अंघोळ झाल्यावर ते जेव्हा परत येत असतात तेव्हा एक व्यक्ती त्यांचा अंगावर पान खाऊन थुंकतो. एकनाथ महाराज त्याला काही न बोलता पुन्हा अंघोळ करायला नदीवर जातात.पुन्हा ती व्यक्ती एकनाथ महाराजांवर थुंकतो. एकनाथ महाराज पुन्हा अंघोळ करतात.असे किमान १०८ वेळा होते. १०८ वेळा अंघोळ झाल्यावर एकनाथ महाराज त्या व्यक्तीचे आभार मानतात कारण त्यांच्या थुंकण्या मुळे एकनाथ महाराजांना १०८ वेळा अंघोळ करण्याचे पुण्य लाभले होते.तो व्यक्ती त्याच्या कृतीतून एकप्रकारे निंदाच करत होता. म्हणजे काय तर कोणी आपली निंदा करत असेल तर त्याला बेशक करू द्या त्याचे आपल्याला दोन फायदे होतात.

१. समजा आपल्याकडून काही पाप झाले असेल तर ते कमी होऊन निंदा करणाऱ्याच्या मस्तकी मारल्या जाते.

2.आपल्या मध्ये काय दोष आहे ते कळते. त्यापासून आपल्याला आपला स्वभाव बदलण्यासाठी प्रेरणा मिळते.

या दोन्हीही गोष्टीमुळे आपल्या जीवनात फायदा होऊन शेवटी आनंदच मिळतो.म्हणूनच या माझ्या प्रिय मित्रांनो पक्के लक्षात ठेवूया. आपण कोणाची कधीही निंदा करायची नाही.आपली कोणी केली तरी घाबरायचे नाही.

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

विठ्ठल गोरे.