सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll ईर्ष्या ll

माझ्या प्रिय मित्रांनो, आपण निंदा,वैर,विषयी जाणून घेतले. तसेच आता आपण ईर्ष्या या नकारात्मक भावने विषयी पाहू या. खर तर ईर्ष्या हा राग, घुर्णा,द्वेष,मत्सर या भावनांचा संगम आहे. थोडक्यात जर समजून घ्यायचे झाले तर तुलना करणे म्हणजेच ईर्ष्या. मनुष्य नेहमी स्वतः ची तुलना कोणातरी सोबत करत असतो.दुसऱ्याला मिळाले मला का नाही या भावनेने नेहमी जळत राहतो आणि दुःखी होतो. म्हणूनच आजकाल मनुष्य स्वतः च्या दुःखा ने जेवढा दुःखी नाही तेवढा इतरांच्या सुखाने दुःखी असतो.

ही भावना मनुष्याच्या बालणापासूनच त्यांच्या मध्ये हळू हळू घर करत असते. या भावनेला आपल्या मनाच्या साह्याने वेळीच आवर घालने गरजेचे आहे नाहीतर त्याचे भयंकर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात.अशा कित्येक क्रिमिनल केसेस मध्ये जर कोणती नकारात्मक भावना असेल तर ती म्हणजे ईर्ष्या होय.

एक उदा. पाहू.

एकदा एक व्यक्ती देवाला खूप दोष देत असतो. मी खूप गरीब आहे ,देवाने माझ्यावर अन्याय केला आहे. हे सर्व ऐकुन त्याला देव प्रसन्न होतो आणि त्याला वरदान देतो की,"तुला जे मिळेल त्यांच्या दुप्पट तुझ्या शेजाराला मिळेल." तो खूश होऊन व्यक्ती हो म्हणातो.मग तो व्यक्ती टीव्ही मागते देव त्याला टीव्ही देतो पण शेजाराला दोन टीव्ही देतो.तो व्यक्ती देवाला ट्रॅक्टर मागतो पुन्हा तोच नियम याला एक ट्रॅक्टर मिळतो शेजारच्याला दोन ट्रॅक्टर देतो. मग ती व्यक्ती घर मागते, याला एक घर शेजारच्या ला दोन घर. आता मात्र ती व्यक्ती शेजारच्या सोबत तुलना करू लागते आणि दुःखी होतो. त्याच्या मनात शेजारचे सुख पाहून हा मनातल्या मनात जळू लागतो आणि त्यावर तोडगा म्हणून तो देवाला म्हणतो माझे घर जळू दे कारण काय तर शेजारचे दोन्ही घर जळतील.

हा गोष्ट खरी खोटी हे मला माहिती नाही पण मनुष्याला ईर्ष्या कोणत्या स्तराला नेऊन ठेवू शकते हेच या उदा.दिसून येते.

एक म्हण आहे,"जलो मगर दीपक समान" खरच मनुष्याने दिव्या प्रमाणे जळून स्वतः प्रकाशित व्हायला पाहिजे व इतरांना पण प्रकाशित करायला हवे.ज्याने आपल्या जिवनात १००% आनंद येऊ शकतो.

या माझ्या प्रिय मित्रांनो स्वत: ची स्वतःशी तुलना करूया इतरांबरोबर नाही आणि इतरांबरोबर करायची असेल ना अशा लोकांशी करू ज्यांना पाहता,बोलता,ऐकता,चालता येत नाही म्हणजे आपल्याला कळेल आपण किती नशीबवान आहे.

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

(https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home)

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

(https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp)