सुप्रभात. १४ -०८-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll त्याग ll

माझ्या प्रिय मिञांनो, आपण आपल्या जीवनात नेहमी कशाचा ना कशाचा त्याग करत असतो.

‘त्याने घरासाठी किती त्याग केला’ हे वाक्य तर आपल्या कानावर कायमच पडत असते. त्याचा अर्थही लक्षात येतो. हे पण कधीतरी ऐकले असेलच,"त्यागाशिवाय जीवन नाही."परंतु आज आपण थोड वेगळया त्यागा बद्दल बोलणार आहे.

आपण आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच नकारात्मक गोष्टी या ना त्या कारणाने अनुभवत असतो. यापूर्वीच्या लेखामध्ये लिहल्याप्रमाने त्यांचा आपल्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो व त्यानुसार आपले व्यक्तिमत्व किंवा आपला स्वभाव तयार होतो. आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक असेल तर काही हरकत नाही आपल्यावर चांगला परिणाम होईल पण नकारात्मक असेल तर मात्र आपल्या मनाने हरकत घ्यायला पाहिजे. कोणीतरी म्हटले आहे,"बुरे कर्म करने नहीं पड़ते है,हो जाते है और अच्छे कर्म होते नहीं करणे पडते।" असेच आपल्या विचाराचे असते.

आपल्या मध्ये खूप साऱ्या प्रकारचे नकारात्मक भावना असतात. उदा.निंदा,वैर,ईर्ष्या,घृणा,राग लोभ,मोह,द्वेष,मत्सर,भीती, चिंता,अहंकार,निराशा इत्यादी. या सर्व नकारात्मक भावनेच्या बंधनात अडकुन आपण नानाप्रकाराचे आजारांना आमंत्रण देत असतो. या क्षेत्रातील विद्वान असे म्हणतात आपले ७५% आजार हे मनोदैहीक असतात. म्हणजे मानसिक व शारिरीक असतात.जर आपण कधी डॉ. कडे गेले असाल तर आपलयाला आठवत असेल की,दवाखान्यात गेल्याबरोबर तिथल्या वातावरणामुळे आपल्याला थोड बर वाटू लागते. कारन आपला डॉ. वर विश्वास असतो की ते आपल्याला आता गोळ्या औषध देतील व आपण बरे होऊ. हाच मानसिक विश्वास आपल्याला बरा करतो.म्हणूनच आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे या लेखातील मजकूरा सारखे तंदुरुस्त जीवन जगायचे असेल तर वर दिलेल्या ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्याचा आपल्याला त्याग करायला पाहिजे. या त्यागामुळे आपण आपलेच नाही तर आपल्या परिवाराचे तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या समाजाचे पण हित करू शकतो.आपण समजा त्याग करायचे ठरवले.परंतु त्याग करताना आपल्याला बराच अडचणी येतात. आपल्याला लोक नावे ठेवू लागतात तो/ती स्वतः ला खूप हुशार समजते,खूप शहाणा झाली,त्यात आपण इतरांपेक्षा लहान असेल तर मग विचारूच नका.पण आपण या गोष्टींचा विचार करायलाच नको. आपल्याला जर बदल करायचे असेल आणि निरोगी राह्याचे असेल तर लोक काय म्हणतील हा विचार च करायला नको. कारण लोक पैदल चालू देत नाही घोड्यावर पण बसू देत नाही. आपण फक्त दृढ नीश्चय लेखातील विचारा प्रमाणे दृढ नीश्चय करून अमलबजावणी करणे गरजेचे आहे.

मला एक सांगा,एखाद्या व्यक्तीच्या अवयवाला गँगरीन झाला तर तो काय करतो? सोप आहे. डॉ.च्या सांगण्याप्रमाणे तो अवयव कापून टाकतो. नाहीतर त्याच्या एका अवयवा मुळे बाकी पण अवयवांना गँगरीन होऊ शकतो. नकारात्मक भावना पण गँगरीन सारख्या आहेत त्या पण मुळासकट काढून टाकायला पाहिजे नाहीतर त्यापण आपल्या सोबत आपल्या परिवाराला पण हानी पोहोचू शकतात. रोजच्या जीवनातले उदा. पाहू. एक कांदा सडला आणि त्याला वेळीच टोपलीतुन काढून फेकले नाही तर सर्व कांदे सडतील. तसेच आपल्या मनात एक जरी नकारात्मक भावना असेल तर ते आपले मन अशांत करू शकते आणि आपल्याला आनंदापासून वंचित ठेवू शकते.

बऱ्याच वेळेला असे पण होते काही नको असलेल्या आठवणी पण आपलयाला त्रास देत असतात. त्या चांगल्या वाईट दोन्ही पण असू शकतात. अश्या गोष्टी पण आपण आपल्या मनातून काढून टाकल्या पाहिजे नाहीतर त्या पण गोष्टी मधी मधी डोकं वर काढून आपल्याला नाहक त्रास देत राहतात. जसे शेतामध्ये शेतकरी मशागत करताना काट्यांचे छोटे छोटे झुडप मुळासकट उपटून टाकतो. म्हणजे पुन्हा कोंब येऊन पिकाला त्रास होणार नाही. तसेच त्रास देणाऱ्या किंवा नको असलेल्या आठवणी पण मनातून मुळासकट उपटून टाकायला पाहिजे.

आता ह्या सर्व नकारात्मक भावना व नको असलेल्या आठवणी मनातून काढायच्या कशा? हा एक प्रश्न आहे. याचे पण उत्तर सोपे.मनापासून क्षमा करणे. इतरांना आणि स्वतः ला क्षमा करणे हा एकच उपाय आहे. क्षमा या विषयी पण आपण अगोदर वाचले आहेच. क्षमा कशी करायला पाहिजे हे पण आपण शिकलो आहे.

तर या माझ्या प्रिय मित्रांनो आपण एक शपथ घेऊ,"मरेल पण नकारात्मक भावना व नको असलेल्या आठवणींना मनात अजिबात स्थान देणार नाही." तसेच क्षमा या शस्त्राचा साह्याने नकारात्मक भावना व नको असलेल्या आठवणीच्या त्याग करूया आणि आपले व आपल्या परिवारासह इतरांचे जीवन आनंदी बनवूया.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻