सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll जैसी दृष्टि वैसी सृष्टि ll

माझ्या प्रिय मिञांनो, आपण काय पाहतो हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. विचारच आपला स्वभाव कसा आहे ठरवतात.विचारच आपला दृष्टीकोण ठरवतात. विचार इनपुट आहे तर वागणूक आऊटपुट आहे. जसे विचार कराल तसेच आऊटपुट मिळेल. विचार करण्याची शक्ती तर एकच आहे परंतु इनपुट काय देत आहे त्यावर आऊटपुट आहे.

उदा. घरामध्ये विद्युत आहे.विद्युत वापरून टीव्हिच्या साह्याने चित्र पाहतो.विद्युत वापरून इस्त्रीच्या साह्याने कपडे प्रेस करतो.विद्युत वापरून हिटर च्या साह्याने पाणी गरम करतो.आपण विद्युत ला कितीतरी गोष्टीचे वेग वेगळे इनपुट साधन देऊन परिणाम वेग वेगळे मिळवतो. इथे इनपुट म्हणजे दृष्टी आऊटपुट म्हणजे सृष्टी. दृष्टि बदलली सृष्टि बदलली.

अजुन एक उदा. पाहू जे बहुतेक सर्वांनी माहिती असावे.

एक पाण्याचा ग्लास आहे. त्याकडे एक जण पाहून म्हणतो," ग्लास अर्धा रिकामा आहे". दुसरा म्हणतो,"अर्धा ग्लास पाण्याने भरला आहे". तिसरा म्हणतो,"ग्लास अर्धा पाण्याने व अर्धा हवेने भरलेला आहे".

वस्तू,प्रसंग एकच आहे पण विचार वेगळे आहेत. हा फरक फक्त आपल्या दृष्टीचा.

अजुन सुचले ते पण लीहतो. एक ग्रुप फिरायला कोकणामध्ये जातो.

त्यापैकी काही म्हणतात," सुंदर झाडी,सुंदर समुद्र,मन मोहून घेणाऱ्या समुद्राच्या लाटा,

काय मजा येत आहे. त्यापैकीच काही असे म्हणतात,"काय राव सगळी कडे फक्त झाडच झाड आणि ते समुद्राचे खार पाणी सगळे शरीर चिकट झाले.लाटेमुळे त पार जीव कसाबसा झाला.इथे येऊन अंगोळ करायची होती. तर आपण घरी पण केली असती". इथे पण तेच,प्रसंग एकच विचार वेगळा. यामधून काही आनंद घेतात तर काही दुखी होतात.

म्हणून आपण अगोदर पण लीहले आहे," आपल्या मनाला खर खोटं काहीही कळत नाही त्याला जो विचार आपण देणारं तेच ते समोर हजर करणार". आपण हे पण लिहले आहे बाहेर बदल हवा असेल तर आत बदल करायला पाहिजे.

चला बदलू दृष्टी आणि पाहू अपेक्षित आनंद देणारी सृष्टि.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻