सुप्रभात. १५-०८-२०२०
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
ll मनाचे स्वतंत्र ll
आज आपली मान अभिमानाने वर करण्याच्या दिवस आहे.हा दिवस आपल्यासाठी दिवाळीपेक्षा पण खूप खूप महत्त्वाचा आहे.याच महत्वाच्या दिवसाचा उदय करण्यासाठी कित्येक महापुरुषांनी बलिदान केले होते. तेव्हा कोठे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता.हे मी आपणापैकी कोणालाच सांगायची गरज नाही. म्हणून मी आपल्याला स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या विषयाकडे येतो.
मनाचे स्वतंत्र किती मस्त वाटते ना उच्चार करताना. वाटायलाच पाहिजे.कारण मनाचे स्वतंत्र कोणाला नको आहे.परंतु आपण आपल्या मनाला कित्येक प्रकारच्या बंधना मध्ये अडकवून पारतंत्र्यात टाकले आहे. ही बंधने दुसरे तिसरे काही नसून कालच्या लेखात वाचलेला नकारात्मक भावना(निंदा,वैर,ईर्ष्या,घृणा,राग लोभ,मोह,द्वेष,मत्सर,भीती, चिंता,अहंकार,निराशा इत्यादी.) आहेत.जोपर्यंत आपल्या मनात नकारात्मक भावना आहेत तोपर्यंत आपण मानसिक रित्या स्वतंत्र होऊच शकत नाही.
मी असे मुळीच म्हणत नाही की आपण पूर्णपणे नकारात्मक विचारांनी ग्रासले आहे. परंतु आपल्या सामोर कधी कधी परिस्थिती किंवा प्रसंगच अशा निर्माण होते की,आपली इच्छा नसतानाही त्या नकारात्मक भावनेचा आधार घ्यावा लागतो.हा असा बुडत्यास काठीचा आधार घेणे पण आपल्या मानसिक आरोग्याच्या दष्टीने चांगले नाही. कारण आपलयाला माहिती आहे आपल्या मनाला खर खोटं काही पण कळत नाही. म्हणुनच कोणत्याही प्रसंगी अशा काठीचा आधार न घेतलेला बरा.
असे होऊ नये पण जर का आपल्याला नकारात्मक भावनेमुळे एकदा मानसिक आजार झाला तर स्वत:च्या अचारविचारावरील नियंत्रण जाते. अशा आजारामध्ये एकच विचार मनात पुन:पुन्हा येत राहतो, त्यातून खूप भीती आणि बेचैनी निर्माण होते,नको ते आभास होऊ लागतात,आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास डळमळीत होते. मी माझ्या मित्रांना नेहमी म्हणतो," एक वेळा जेवयला नाही मिळाले तरी चालेल पण आत्मविश्वास डळमळीत व्हायला नको" कारण माणसाचे खरे स्वतंत्र अस्तित्व काही असेल तर तो त्याचा आत्मविश्वास आहे. मित्रानो माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला आहे.कोणाला खायला देऊ नका,पैसे देऊ नका पण कोणाचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका.
एखाद्याचा आत्मविश्वास डळमळीत करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मानसिक स्वतंत्र हिरावून घेतल्या सारखे होय.आणि स्वतंत्र हिरावून घेतल्याने काय होत हे आपल्या पूर्वजांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी तर याही पलिकडे जाऊन सांगू इच्छितो की एकदाचा आत्मविश्वास डळमळीत करणे म्हणजे खून करणे होय. परंतु समाजामध्ये असे बरेच नग आपल्याला मिळतील जे स्वतःचा आत्मविश्वास तर गमवून बसतात आणि दुसऱ्याला पण आत्मविश्वास गमवण्याठी मदत करत असतात.हे एक प्रकारचे पाप आहे याहून मोठे पाप कोणते असूच शकत नाही. मी असेच एकदा माझ्या बायकोला म्हणालो होतो,"माझ्या जवळ जादूची छडी असती तर मी सर्वात आधी वर उल्लेख केलेला महानगांची मानसिक स्थितीमध्ये बदल केला असता." पण असे होत नाही हे आपल्या सर्वांना चांगले माहिती आहे.
एक उदा.देतो. मला शाळेला पोपटपंची नावाचा एक धडा होता. त्यामध्ये शिकाराच्या भीतीने घाबरलेला पोपट एका साधूच्या मांडीवर येऊन बसतो व घडलेली हकिकत साधूला सांगतो. साधू त्याला एक गुरुमंत्र देतो,’शिकारी येतो, जाळे लावतो,दाणे टाकतो..’ मग एके दिवशी पुन्हा शिकारी येतो जाळे लावतो, दाने टाकतो व पोपटाची वाट पाहत बसतो. तेवढ्यात त्याला झाडावर बसलेल्या पोपटाचा आवाज येतो,’शिकारी येतो,जाळे लावतो,दाने टाकतो.’ हे ऐकुन तो शिकारी अचंबित होतो पण तो काही त्याची चिकाटी सोडत नाही शेवटी पोपट आपले संतुलन गमवतात व दाने खाण्यासाठी झाडाच्या खाली उतरतात आणि जाळ्यात अडकतात व आपले स्वतंत्र गमावून बसतात. आपले पण आपल्या जिवनात कधी कधी असेच होते आपण आपले संतुलन गमवतो व नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये अडकून आपले मनाचे स्वतंत्र गमावून बसतो.
माझ्या प्रिय मित्रानो चला तर आपली कालच्या लेखातील शपथ पुन्हा घेऊ "मरेल पण नकारात्मक भावना व नको असलेल्या आठवणींना मनात अजिबात स्थान देणार नाही." व ही शपथ लक्षात ठेवू व आपले मनाचे स्वतंत्र आनंदाने जगू.
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
(https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home)
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
(https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp)