सुप्रभात. १९-०७-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

II राग II

माझ्या प्रिय मित्रांनो,मी रागाबद्दल लीहणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविणे होय. कारण मी स्वतः काही महिन्यांपूर्वी राग राग करणारा व्यक्ती होतो. परंतु आता मात्र मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न मी यासाठी म्हणंत आहे. कारण अजुन पण मला कधी कधी दारू पिणाऱ्या व्यक्ती सारखी तलफ येते. परंतु मला आपल्याला सांगताना आनंद होत आहे की,पूर्वी मी 100% राग राग करत होतो ते प्रमाण आता 5% वर आला आहे असे मला वाटते.

मनुष्याला राग का येतो? जेव्हा एखादी गोष्ट किंवा काहीसुद्धा मनुष्याच्या मनाच्या विरूद्ध होते तेव्हा त्याला राग येतो आणि हाच राग माणसाच्या विनाशाला कारणीभूत होतो. यासाठी इतिहासात खूप सारी उदाहरण आहेत.त्याला रामायण आणि महाभारत सुध्दा अपवाद नाही.तसेच कोणत्याही भांडणाची सुरुवात ही राग राग केल्यानेच होते. जर आपल्या आता पर्यंतच्या जिवनात कधी भांडण झाले असेल, मग घरगुती असो वा बाहेरील.विचार केला तर आपल्या लक्षात येईल की,त्याचे मूळ कारण राग हेच होते.बर राग राग करणे हे भांडणापुरतेच मर्यादित नाही राहत तर त्याचे आपल्या आरोग्यावर पण वाईट परिणाम होतात.याच्या मुळे आपल्या शरीरातील ॲड्रेनॅलिन ,डोपोमिन,सिरोटोनिन,सारख्या विकराचे प्रमाण बिघडते. डोपोमिन मुळे तर आपल्याला कंपवात सारखे आजार होऊ शकतात.

(याची लिंक आपण ग्रूपवर शेयर केली होती. https://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/907924930-90691c93e930/91590292a93593e924-parkinson-s-disease)

ज्याच्यामुळे आपल्या जीवनातील आनंदाला ग्रहण लागते व आपण दुःखी होतो. एवढेच नाही तर आपण राग राग केल्याने जेवढा समोरच्याला त्रास होतो त्याही पेक्षा कितीतरी पटीने तो स्वतः ला होत असतो. परवा आपल्या ग्रुप मधील सोनालीजिने मला एक मेसेज पाठवला होता तो आपल्या ग्रुप वर पण टाकला होता,

"माचिस किसी दुसरी चीज को जलाने से पहले खुद को जलाती है ,इसी तरह गुस्सा पहले आपको बर्बाद करता है फिर दुसरे को।"

हे मला पण पटत कारण माझा अनुभव यापेक्षा वेगळा नाही.

आता आपण एक उदाहरण पाहू,समजा एक मनुष्य सकाळी लवकर उठला व अंघोळ वैगरे करून एकदम मस्त टकाटक कपडे घालून ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण जोश मध्ये तयार झाला. परंतु काही कारणास्तव त्याच्या बायकोला डबा तयार करण्यासाठी उशीर झाला.इकडे हिरोसारखे तयार झालेल्या महाशयांनी काहीही विचार न करता बायकोला राग राग करायला सुरुवात केली. बायकोच्या पण बऱ्याच दिवसाचे मनात होतेच नवऱ्याने आपल्या सोबत भांडण करावे म्हणजे आपलयाला आपला जुना वचपा काढता येईल. मग काय बायकोने पण फायरींग चालू केली आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यावर त्या महाशयांना डबा मिळणे दुरूच चहा पण मिळाला नाही. ते तसेच ऑफिसला जायला निघाले.त्यादिवशी उशीर झाल्यामुळे त्यांची बस चुकली त्यामुळे त्यांना टॅक्सी पकडावी लागली. टॅक्सीत प्रवास चालू झाला व टॅक्सीवाल्याने जोशिले गाणे लावले. हे आधीच टेन्शन मध्ये आणि त्यात असे गाणे. पुन्हा त्या महाशयांचा पारा वाढला आणि टॅक्सीवाल्यासोबत भांडण केले. शेवटी मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ऑफिस ला पोहचले. यांना आधीच उशीर झाला होता. त्यामुळे तिकडे बॉस आरतीचे ताट घेऊन उभाच होता. मग बॉसने त्यांच्या पद्धतीने स्वागत केले आणि महाशय रागा रागा मध्येच कामाला लागले. त्यांच्या एक दोन सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न केला, त्याचा पण या महाशयांना राग आला आणि सहकाऱ्यांसोबत सुद्धा भांडण झाले.अशाप्रकारे ऑफिस वेळ संपली व दिवसभराच्या कामाने नव्हे तर रागामुळे थकलेले महाशय घरी जाण्यासाठी निघाले.इकडे त्या बाईसाहेब पण दिवसभर रागाचे टेन्शन घेऊन बसले होते, त्यानी जेवणही केले नव्हते. महाशय घरी आले त्यांच्या लक्षात आले की, घरात सर्व समान इकडे तिकडे पडलेले आहे, झाड झुड पण केलेली नव्हती. मग काय महाशय पुन्हा चिडले आणि पुन्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.ते नुसते भांडण नव्हते तर दोन पैलवाना मध्ये कुस्तीच रंगली होती.पुढे काय काय झाले असेल हे मी सांगायची गरज नाही ते आपण सर्वजण समजू शकतो कारण आपण सर्व सुज्ञ आहोत. हे सर्व फक्त महाशयांच्या रागामुळे झाले होते. जर त्यांनी सकाळच्या वेळी थोडे रागावर नियत्रंण ठेवले असते तर यापेक्षा वेगळी परिस्थिती आज या उदाहरणात दिसली असती. यावरून आपल्या (आपल्या मध्ये मी पण आहे.) लक्षात आलेच असेल राग किती भयावह आहे.

रागाचे आपल्यावर होणारे परिणाम:

१. मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.

२. अस्वस्थता, बेचैनी, नैराश्याची भावना, तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते.

३. काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्चा्तापाची भावना, नैराश्य्, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्चाताप, नैराश्या.त्यातून इतरांना किंवा स्वतःला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.

रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाय:

१. पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे व ताबोडतोब १० पासून १ पर्यंत आकडे मोजणे.

२. इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.

३. आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे

४. समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत, अशी कल्पना करणे.

५. आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.

६. आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

७. आपल्याला राग आला कि आपण बसण्याच्या स्थितीत किवा झोपण्याच्या स्थितीत जायचं.( म्हणजे relax होणे.कसे relax करायचे याची पद्धत आपण या अगोदर ग्रुपवर शेयर केली आहे. आपल्या वेबसाईटवर पण मिळेल.)

८. स्वतः ला relax करून आपल्या मनाला सांगणे की,माझे हळू हळू माझ्या रागावर नियंत्रण येत आहे.

९. रोज प्राणायाम करणे.(काही निवडक प्राणायमा बद्दल आपल्या वेबसाईट वर माहिती दिली आहे अधिक माहिती साठी यू ट्यूब ला रामदेव बाबांचे व्हिडिओ पाहू शकता.)

१०. ध्यान करणे.

या माझ्या प्रिय मित्रांनो जर आपल्याला राग येत असेल तर रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करुया व आपल्यासह इतरांच्या जिवनात आनंद भरू या.

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

(https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home)

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

(https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp)