सुप्रभात. १७-०८-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll वैर ll

माझ्या प्रिय मित्रांनो,

"वैऱ्यावर प्रेम करा." येशू जींच्या महान वाक्या पैकी हे एक वाक्य आहे.मनुष्यला सामान्यपणे जो आपल्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करणे आणि वैराचा बदला घेणे हे आपल्याला माहिती आहे.मी पण काही महिन्यांपूर्वी याच विचारचा होतो परंतु "चिंता सोडा सुखाने जगा"पुस्तक वाचून मला कळले की, बदलल्याची भावना आपल्या मनात घेऊन जगणे म्हणजे नरकात जगण्यासारखे होय.मला लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टीत अडचणीचा सामना करावा लागला.त्यामुळे मला कोणी त्रास दिला की माझ्यामध्ये लगेच बदलल्याची भावना येत असे. एका व्यक्ती बद्दल तर मी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला होता.पण मला कळून चुकले की तो गाढवपणाचा निर्णय होता. हे तुम्हाला सांगताना मला माझीच लाज वाटते की मी किती चुकीचे वागत होतो. परंतु आता मात्र मी कोणाविषयी पण वैर ठेवले नाही. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या विषयी वैराची किंवा बदलल्याची भावना ठेवतो त्यांच्या पाठीमागे लगेच बाकीच्या सर्व नकारात्मक भावांना आपल्या मनात लगेच प्रवेश करतात. म्हणूनच मी येशू जिंचे वाक्य सुरुवातीलाच लिहिले कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असणार "लोकांना वैरावर प्रेम करायला शिकवले की बाकी नकारात्मक भावना आपोआप निघून जातात."हाच माझा पण अनुभव आहे.म्हणुनच काय ते एक दिवस माझ्या मनात एक वाक्य सहजपणे तरळले," अच्छे के साथ अच्छा होना चाहिए और बुर के साथ उससे भी अच्छा होना चाहिए।" कारण या जगामध्ये मित्रांवर किंवा आपल्याशी जो चांगला वागतो त्याच्याशी प्रेम करणाऱ्याची कमी नाही आहे. गरज आहे ती वैऱ्यावर प्रेम करणाराची.आपले पैकी कोणाचे कोणाशीच फार मोठे वैर नसेल याची मला पूर्ण खात्री आहे.पण छोटेसे जरी वैर असेल तर त्याला एक वेळा म्हणून पहा,"माझे थोडे चुकलेच त्या वेळेला, मला माफ कर" बघा एका सेकंदाच्या आत कशी जादू होते आणि समोरचा पण आपल्याला म्हणतो,"मी पण थोड शांत पणे घ्यायला पाहिजे होत." याही पेक्षा सर्वात मोठे म्हणजे आपल्या मनावरील ओझे हलके होते आणि आपल्याला खूप relax वाटू लागते.

मी मुळीच असे सांगणार नाही की,तुम्ही तुमच्या वैऱ्या ला घरातील.देवरात आणून पूजा करा पण त्यांच्याविषयी बदल्याची भावना ठेवू नका. कारण कोणीतरी म्हटले आहे,

"भावनाओं का कहां द्वार होता है।

मन जहां मिल जाये वहीं हरिद्वार होता है।"

आणि आपल्याला मनाचे कार्य चांगलेच माहिती आहे.अचेतन मनाला खर खोटं कळत नाही.शेवटी साने गुरुजींचे ते वाक्य आठवले,"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे."


धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

विठ्ठल गोरे