सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,

शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

अध्यात्मिक आरोग्य

मिंत्रानो आपल्याला जर अध्यात्मिक आरोग्य म्हणजे काय? हे जर समजून घ्यायचे असेल तर आधी आपल्याला " आरोग्य म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. साधारणपणे शरीराने निरोगी राहणे म्हणजे आरोग्य असे समजल्या जाते परंतु आरोग्ययाची फार सुंदर अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेनें केली आहे. ज्याला आपण WHO असे म्हणतो. ते असे म्हणतात,

"आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे"

या व्याख्येवरून आपल्या असे लक्षात येते, आपल्याला निरोगी राहण्यासाठी अध्यात्मिक आरोग्य आपल्या जीवनात असणे फार महत्वाचे आहे.

आता आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल कि, यात काय नवीन आहे? आम्ही रोज सकाळी उठून अंघोळ झाल्यावर देवाची पूजा पाठ करतो आम्ही तर अध्यात्मिक आहे. बरोबर आहे सकाळी उठून पूजा पाठ करणे, प्राथर्ना करणे हा एक अध्यात्माचा भाग आहे पण ते पूर्ण अध्यात्म नाही,असे साधू संत यांचे मत आहे आणि तेच माझे पण मत आहे. संत ज्ञानेश्वर माउली हरिपाटात सांगतात,

" योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायची उपाधी दंभ धर्म.”

मिंत्रानो,माउली म्हणतात," तुम्ही कितीही योग करा ,यज्ञ करा,पूजा पाठ करा किंवा कोणताही विधी करा याने तुम्हाला सिद्धी भेटणार नाही (अध्यात्मिक होणार नाही) हे सर्व व्यर्थ आहे त्याच बरोबर हे सर्वात मोठे धार्मिक ढोंग आहे हे संत ज्ञानेश्वर माउलीनि साधारण सातशे ते आठशे वर्षांपुवी लिहून ठेवले आहे.

मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो अध्यात्म किंवा अध्यात्मिक आरोग्य असणे म्हणजे काय?

मित्रांनो जर आपण अध्यात्म या शब्दाची फोड केली तर आपल्या लक्षात येईल कि,"आत्माचे अध्ययन करणे म्हणजे अध्यात्म होय" किंवा "मनाशी संबंध असणे म्हणजे अध्यात्म होय" कारण Psychology हा दोन शबदांपासून तयार झालेला शब्द आहे. Psyche म्हणजे आत्मा आणि Logos म्हणजे अभ्यास. थोडक्यात आत्म्याचा किंवा मनाचा अभ्यास करणे म्हणजे अध्यात्म होय. याच आत्मच्या किंवा मनाच्या अभ्यासाला आत्मज्ञान असे पण म्हणतात कारण रामदास स्वामीनि लिहून ठेवले आहे,"ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण" थोडक्यात, "स्वतःला ओळखणे म्हणजे म्हणजे अध्यात्म होय"

आणि एकदा का स्वतःची, स्वतःच्या मनाची किंवा आत्म्याची ओळख झाली कि,आपल्या जीवनात जे परिवर्तन येते त्यालाच आध्यत्मिक आरोग्य असे म्हणतात असे माझे मत आहे.

त्याची आपल्या जीवनात गरज काय?

जितकी आपल्यला या पृथ्वीवर किंवा जगात जिवंत राहण्यासाठी किंवा शाररिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अन्नाची गरज आहे तितकीच गरज अध्यात्मिक आरोग्याची किंवा विचारांची आहे. कारण अन्न हे आपल्या शरीराचे पोषण करत आणि अध्यात्मिक विचार हे माणसाच्या मनाचे पोषण करत म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,"मन करा रे प्रसन्न" जर आपल्यला कायम प्रसन्न, आनंदी राहायचे असेल तर आपल्या जीवनात अध्यात्मिक आरोग्य असणे फार गरजचे आहे.

त्यासाठी वयाची मर्यादा काय?

मित्रांनो खरं तर अध्यात्मासाठी वयाची काहीच मर्यादा नसते आणि असा कोठे नियम पण नाही पण आपल्या समाजामध्ये एक खूप मोठा गैरसमज आहे

तो असा कि, अध्यात्म किंवा भक्ती हे म्हाताऱ्या लोंकाचे काम आहे तरुणांचे नाहि आताच्या काळात हा गैरसमज हळू हळू दूर होत आहे परंतु अजूनही काही प्रमाणात तसेच आहे

मिंत्रानो मला तर असे वाटते अध्यात्म हा विषय बालपणापासूनच आपल्या जीवनात यायला पाहिजे कारण त्या वयात जर आपल्याला आपली स्वतःची ओळख झाली तर आपल्या पुढच्या जीवनात त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.

आपल्या समोर काही उदाहरण पण आहेत जे आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माउली,मुक्ताबाई,धुरव बाळ, भक्त प्रल्हाद जे वयाने खूप लहान होते पण त्याच्या अध्यात्मिक विचारांमुळे महान झाले आणि आज आपण त्याचे नाव घेतो.


धन्यवाद .

आनंदी राहा,सुखी राहा,

शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

विठ्ठल गोरे