आनंदी राहा, सुखी राहा,शांत राहा स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll भ्रामरी प्राणायाम ll

१.एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे. चेहऱ्यावर मंद हास्य असावे.

२. तर्जनीच्या साह्याने ज्ञान मुद्रा तयार करा.

३.एक दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना भुंग्याचा स्वरात आवाज काढा.

४. तुम्ही खालच्या स्वरातसुद्धा आवाज काढू शकता परंतू चांगल्या परिणामांकरिता एकदम वरच्या स्वरात आवाज काढणे हे चांगले राहील..

पुन्हा श्वास घ्या आणि हा संच ६-७ वेळा करा.

भ्रामरी प्राणायामाचे फायदे:

मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यापासून झटपट सुटका. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांकरिता हे अतिशय परिणामकारक आहे कारण हे त्यांच्या क्षुब्ध मनाला शांत करते.

जर तुम्हाला गरमी जाणवत असेल किंवा तुम्हाला किंचित डोकेदुखी होत असेल तर त्यापासून आराम मिळतो.

अर्धशिशी सुसह्य करण्यात मदत करते.

एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.

आत्मविश्वास निर्माण होतो

रक्तदाब कमी करण्यात मदत करते.

ऑडियो लिंक खाली दिली आहे.

https://drive.google.com/file/d/11o-J_TkASmVlIS-ES1hCOgXLyvmr11Z9/view?usp=sharing

टीप:

दिलेली माहिती वैधकिय उपचार समजू नये. कोणाचे ऑपरेशन झाले असेल तर प्राणायाम करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.


धन्यवाद.

आनंदी राहा, सुखी राहा,शांत राहा स्वस्थ राहा,मस्त राहा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻