सुप्रभात.

आनंदी राहा, सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ्य राहा,मस्त राहा.

ll मन ll

मन हा दोन अक्षरी शब्द आहे. आणि प्रत्यकाशी निगडित आहे. त्याशिवाय आपल अस्तित्व शून्य आहे. हे आपल्याला पुस्तक वाचून समजले आहे.एवढा महत्त्वाचा घटक आहे परंतु आपण त्याकडे लक्षच देत नाही. जसे आपल्या शरीराला तंदुरूस्त राहण्यासाठी सकस आहाराची गरज असते तसेच मन तंदुरुस्त राहण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज असते. खरे तर नकारात्मक विचार करण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाही. ते आपोआप मनात येतात. पण सकारात्मक विचारासाठी प्रयत्न करावे लागतात. कोणीतरी म्हटले आहे," सत्य को अर्जित करना पडता है, झूठ अपने आप पल्ले पड जाता है."

या सर्व विचार करण्याच्या प्रक्रीयेवर आपले व्यक्तिमत्व असते. जसे आपले विचार असतील तसेच आपण असतो. हे सूर्यप्रकाशाइतके खरे आहे. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. पाहिजे तर अनुभव घेऊन बघा रात्री झोपताना मनाला सांगा मी खूप आजारी आहे. सकाळी उठल्यावर आपण आजारी पडलेले असू. तेच झोपतांनी मनाला सांगा मी खूप आनंदी आहे. आपण सकाळी खूप आनंदी असू. हीच आपल्या मनाची शक्ती आहे.

माणसाचे मन हे दोन विभागात कार्य करते. पुस्तकामध्ये वाचून आपल्याला माहिती झालेच आहे. एक चेतन मन आणि दुसरे अचेतन मन. चेतन मन खूप चंचल असते आणि अचेतन मन स्थिर असते. आपण जागेपणी किंवा झोपेत पण आपण जे काही बोलतो,पाहतो,वाचतो, ऐकतो, त्या सर्व गोष्टीचा आपल्या अचेतन मनावर खूप मोठा परिणाम होतो.

याबद्दल उदा. घ्यायचे झाले तर लहान मुलाचे घेऊ या, लहान मुल ज्या वातावरणात,प्रान्तामध्ये किंवा विभागात राहतो त्याच गोष्टीचा त्याचावर प्रभाव पडतो. मी महाराष्ट्रात राहतो तर माझा मुलगा आपसूक मराठी भाषा शिकणार पण दुसऱ्या भाषा त्याला शिकव्या लागतील.तेच मी अमेरिका सारख्या ठिकाणी राहत असतो तर त्याला इंग्रजी भाषा शिकवायची गरज पडली नसती. मात्र मराठी भाषा शिकवावी लागली असती.पण मी अमेरिकेत राहत नाही.

थोडक्यात काय या सर्वा मुळे आपले व्यतकीमत्व तयार होत असते. मग आपण जसे आत तसेच बाहेर असणार आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर बदल हवा असेल तर आपण आत बदल करायला हवा. जेव्हापासून मला हे तंत्र कळाले तेव्हापासून मी रोज या गोष्टींचा अनुभव घेतो. तुकाराम महाराजांनी पण म्हटलं आहे," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण."

खरच आपल्याला आनंदी जीवन जगायचे असेल ना आपण कोणत्याही किंवा कितीही विपरीत परिस्थितीतही आनंदी जीवन जगू शकतो. त्यासाठी मनावर काम करावे लागेल. हे आपल्याला पुस्तक वाचन कळून आले.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, आज पर्यंत जेवढे साधुसंत झाले त्यानी पण मनाच्या शक्तीला खूप महत्त्व दिले. त्यापैकीच एक संत रविदास महाराज जी लिहतात," मन चंगा तो, कटौती मे गंगा."मन जर चांगले असेल तर आपल्या घरी जे पाणी आहे ते पण गंगेच्या पाण्यासमान पवित्र आहे.म्हणून जो काही खेळ आहे तो सगळा मनाचा आहे.

गौतम बुद्धांनी मनाचाच अभ्यास केला. त्यांना या जगतातील सर्वात पाहिले मनोचीकत्सक म्हटले जाते. ते सांगतात एक अशी अवस्था येते जिथे दुःख नसते व जो पर्यंत आपण एखादा विचार ग्रहण करत नाही तो पर्यंत त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही.विचारा मध्ये काहीच शक्ती नसते तर ती आपल्या मनात असते. आपण ठरवू शकतो कोणत्या विचारला शक्तिशाली करायचे सकारात्मक की नकारात्मक आणि हे तर संशोधकांनी पण मान्य केले आहे.

आपल्या समाजामध्ये एक म्हण आहे,"मानला तर देव नाही तर दगड." खरं तर देव आहे नाही या भानगडीत पडू इच्छित नाही कारण तो ज्याच्या त्याच्या क्ष्रध्देचा विषय आहे.परंतु ही म्हण आपल्या मनाला महत्व देते म्हणजे कळत नकळत का होई ना समाजामध्ये मनाचे महत्व सर्वांना माहिती आहे,पण त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही.

मला कळाले की, आजपर्यंत माझ्या जीवनात जे चांगले वाईट झाले ते सर्व माझ्या मनावर पडलेल्या विचारामुळे च झाले यामध्ये कोठेही शंका घेण्यासाठी जागा नाही. व हे सूर्यप्रका एवढे सत्य आहे. हे सत्य स्वीकारून मी माझ्या मध्ये बद्दल करण्याचे ठरवले आणि त्यामध्ये मला यश पण मिळत आहे. आता हे आपल्या ग्रुप वर का सांगत याचे पण कारण आहे. माऊली म्हणतात,"जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे शाहणे करुनी सोडावे सकळ जना."




आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻