सुप्रभात. २०-०७-२०२०
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
~ll लोभ ll~
माझ्या प्रिय मित्रांनो,
एक वेळा माझ्या वाचनात आले की,"लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास होय." परंतु हे मला थोड सुसंगत वाटत नाही कारण एखाद्या ध्येया विषयी हव्यास ठेवला नाही तर आपली उन्नती कशी होणार. बऱ्याच वेळा असे म्हटले जाते जी गोष्टी आपल्याला पाहिजे आहे त्याच्या ध्यास धरा तरच ते आपल्याला मिळते. जर असे असेल तर ध्यास धरणे हा पण एक प्रकारचा लोभ आहे का? तर याचे उत्तर नाही.मग लोभ म्हणजे काय? स्वतःकडे आधीच एखादी गोष्ट असून, गरज नसतांना सुद्धा एखाद्या गोष्टीची अशा ठेवणे म्हणजे लोभ होय किंवा स्वतःकडे भरपूर असून आहे त्यामध्ये समाधानी न राहता फक्त स्वतः च्या स्वार्था साठी एखाद्या गोष्टीची अधिकची अपेक्षा असणे म्हणजे लोभ होय.
यासाठी आपल्या सर्वांना माहिती असलेले दोन उदाहरण घेऊ.
_१. लोभी कुत्रा.
एकदा एका कुत्र्याला खूप भूख लागली होती. तेव्हाच त्याला रस्त्यात एक पोळी सापडली. तो ती पोळी बाकीच्या कुत्र्यांना न दाखवता एकटाच खाऊ इच्छित होता म्हणून तो सगळ्यांची नजर चुकवून आपल्या तोंडात पोळी दाबून नदीवर निघून गेला.नदीवरील पुल पार करताना त्याला स्वत:चे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात दिसले व त्या प्रतिबिंबला तो दुसरा कुत्रा समजून त्याच्या तोंडातील पोळी हिसकावण्याचा विचार करू लागला.त्या प्रतिबिंबची पोळी खेचण्याच्या नादात तो त्या पाण्यात दिसणाऱ्या कुत्र्यावर भूकंला, तोंड खोलत्याक्षणी त्याचा तोंडातली पोळी पाण्यात पडून गळून गेली आणि अचानक पाण्यातील ते प्रतिबिंब नाहीसे झाले. जोपर्यंत हे त्या कुत्र्याला लक्षात आले तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अशाप्रकारे तो लोभी कुत्रा उपाशीच राहिला. थोडक्यात काय "तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे आले"
२.सोन्याची अंडी देणारी कोंबडी
एका गावात गरीब माणूस राहत असतो. योगायोग त्याच गावात एक दिवस तपस्वी साधु महाराज येतात. आपल्याला माहितीच आहे साधू महाराज गावात आले म्हणजे सारे गाव साधूच्या दर्शनाला जात असते. तसेच त्या गावातील पण लोक साधूच्या दर्शनासाठी जातात. त्यामध्ये तो गरीब माणूस पण जातो आणि साधूला त्याच्या गरिबी विषयी सांगतो. साधूला त्याची दया येते व ते त्याला एक कोंबडी देतो. साधू त्याला सांगतो,"हे पहा ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे पण ती रोज एकच अंडे देणार ते तू विकत जा अश्याने तुझी गरिबी दूर होऊन जाईल." तो होकारार्थी मान डोलवतो आणि आनंदाच्या भरामध्ये कोंबडीला घेऊन घरी निघून जातो.
साधूने सांगीतल्या प्रमाणे याचा दिनक्रम चालू असतो परंतु एके दिवशी त्याचा मनात लोभाची भावना येते आणि तो विचार करतो की,"रोज रोज एक अंडी विकायला जाण्यापेक्षा एकाच दिवशी कोंबडीला कापू व सर्व अंडी विकून आपण श्रीमंत होऊ."
आता मनात विचारा आला की आपलयाला माहिती आहे अचेतन मन लगेच तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कामाले लागते. होते पण तसेच तो माणूस चाकू ने कोंबडीला कापतो पण त्याला कोंबडीच्या पोटामध्ये एकही अंडी मिळत नाही आणि तो पश्चा्तापाने दुःखी होऊन रडू लागतो. यालाच म्हणतात " लालच का फल बुरा होता है।“
या माझ्या प्रिय मित्रांनो वरील दोन्ही उदाहरणावरून आपल्या हेच लक्षात येते की अती लोभ हा आपल्यासाठी नेहमी दुःखाचे कारण ठरू शकतो.
आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s
अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.
https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home
आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.
https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp
धन्यवाद.
आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.
आपला नम्र
विठ्ठल गोरे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻