सुप्रभात.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

हास्यमेव जयते

हास्यमेव जयते कारण हसमुख चेहऱ्याचा व्यक्ती सर्वांना आवडतो व त्या व्यक्तीचा नेहमी विजय होतो. म्हणूनच सत्यमेव जयते सारखे हास्यमेव जयते असे म्हणायला काही हरकत नाही.

माझ्या ऑफिसमध्ये मागच्या आठवड्यात एका प्रोजेक्ट ची चाचणी घेत असताना एक व्यक्तीचा पाय घसरून पडला आणि त्या मधून विनोद तयार झाला. त्यादिवशी मी इतका हसलो की माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण त्यानंतर मला खूप relax वाटू लागले. या सर्व प्रसंगाचे शूटिंग केले आहे. मला तुमच्याशी शेयर करायला आवडेल पण नको ते योग्य होणार नाही.एरवी विनोद झाला किंवा कोणी जोक सांगितला तर आपण हसतो, परंतु मला त्यावेळी जाणीव झाली आपण रोज आपल्या जीवनात किमान १५ मिनिट खळखळून हसायला पाहिजे.

मग काय मी प्रयोग करायला सुरुवात केली. आता हसायचे कसे हा माझ्या समोर मोठा प्रश्न होता कारण मला आणि माझ्या बायकोला जोक तर येत नाही. मग आम्ही गंमतच हा हा हा हा करायला सुरुवात केली पण हसनाचे भाव काही येत नव्हते. आता मी जे काही सांगणार आहे ते जरा अतिशयोक्ती वाटू शकते कारण आम्ही एकामेकाला गुदगुल्या करुन हसवले. या अॅक्टिविटी मध्ये माझा मुलगा सहभागी होता. आम्ही इतके हसलो की त्याला काही सीमा नव्हती राहिली आणि ही practice आम्ही पुढे रोज चालू केली. आम्हाला फायदा होत आहे पाहा तुम्हीपण करून तुम्हाला पण फायदा होऊ शकतो. कारण आपण या अगोदर वाचलेच आहे आपल्या अचेतन मनाला खर खोट कळत नाही त्यामुळे आपण खोटं जरी हसलो तरी ती खऱ्या हसण्या‌‍सारखेच काम करणार व आपल्या जीवनात अंगठी तील हिरा सारखा अधिक आनंद देणारं. तसे हास्य योगाचे यू ट्यूब ला व्हिडीओ पण आहे त्याची पण मदत घेऊ शकतो.

हसण्याचे फायदे (source internet) :

1. हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो. हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते. आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. हसण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

2. एका संशोधनानुसार, ऑक्सिजनच्या उपस्थितीत, कर्करोगाच्या पेशी आणि अनेक प्रकारचे हानिकारक जिवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. हसण्याने आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप मजबूत होते.

3. सकाळी जर हास्य ध्यान योग केले तर दिवसभर आपण आनंदी राहतो. जर रात्रीच्या वेळी केले तर आपल्याला चांगली झोप लागते. हास्य योगामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो, ज्यामुळे मधुमेह, पाठीचे दुखणे आणि तणावग्रस्त व्यक्तींना आराम मिळतो.

4. हसण्यामुळे सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. सकाळी आनंदी राहण्याने ऑफिसचे वातावरण देखील आनंददायी होत.

5. दररोज एक तास हसण्याने 400 कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो. आजकाल बरेच हास्यक्लब देखील तणावपूर्ण जीवनात हसण्याच्या माध्यमाने दूर करण्याचे काम करत आहे.

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

(https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home)

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

(https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp)