आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll ध्यान ll

ध्यान ही एक अशी अवस्था आहे जी आपल्याला शांत करते,ऊर्जा व परमानंद मिळवून देऊ शकते. सदानंद देऊ शकते.

स्वामी विवेकानंद म्हणतात, "आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त सहाय्य होत असेल तर ध्यानाचे होय".

आजपर्यंत जेवढे साधू ,संत,महापुरुष होऊन गेले त्यांनी ध्यानाला खूप महत्त्व दिले आहे. ध्यान मध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते फक्त आपण सातत्य ठेवायला पाहिजे. जर आपल्याला आपली अध्यात्मित्क प्रगती करायची असेल तर ध्यान करणे फार आवश्यक आहे. ध्यानामुळे एकाग्रता वाढते. एकाग्रता मनाला स्थिर ठेवते.आणि मग आपण मनाच्या उच्च पातळीवर पोहचतो. विद्यार्थी असताना अभ्यासावर ध्यान करावे लागते. आपल्यापाशी असलेले ज्ञान दुसऱ्याला देताना एकाग्रता लागते. अर्जुनाला दिसणारा पोपटाचा डोळा हे अर्जुनाचे ध्यान आहे. एखाद्या विषयावर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करणे हेही ध्यानच आहे. ध्यानातली एकाग्रता ही आपल्या जाणिवेचा दरवाजा उघडण्याची कील्ली आहे. यासाठी मनाची इतर दारे बंद करावी लागतात. एकाग्रता प्रथम अंत:करणात प्रवेश करते. याने आंतरिक स्पर्श लाभतो.‌ध्यान अकारण विचारलहरींना थांबविते. दिव्य स्फूर्तीची ग्रहणक्षमता आपल्यात येते. शांती, नीरवता, आनंद यांचा अनुभव येतो मन:शांतीने आपल्या नव्या कामात समतोल येतो. कामात पूर्ण रंगतो. मनास छान वाटते. कामातले ओझे संपते.मनाला ताजेपण येते आणि अत्यंत आनंदाने व ऊर्जेने भरून वाहू लागते.

आपण जर रोज नियमित relaxation,ध्यान,किंवा नामस्मरण करत असाल तर आपल्याला काही अडचणी येऊ शकतात. उदा. खूप विचार येणे, अंगाला खाज सुटणे,अंगावर मुंगी चालल्या सारखे वाटणे. हे सगळे होतच कारण आपल चेतन मन आपल्याला कधीच स्थिर होऊ देणार नाही कारण त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.

जे खूप विचार मनामध्ये येतात ते येऊ द्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक जोरात उसळी मारतात. उदा. एकदा गोल स्प्रिंग घ्या आणि त्याला दाबा व सोडा. आपल्या लक्षात येईल आपण जेवढ्या शक्ती ने दाबले तेवढ्याच शक्तीने वर उडाले.

येणाऱ्या विचारांना वाहू द्या. त्याने मन स्वच्छ होईल. उदा. नदीला पूर आल्यानंतर त्यामध्ये सर्व घान,कचरा वाहून जाते आणि मागे स्वच्छ पाणी तेवढे राहते.

अंगाला खाज सुटणे किंवा मुंगी वळवळ करणे हे एक आपल्या साठी खूप चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की,आपल्या शरीरा मध्ये ऊर्जेचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली आहे त्यामुळेच ज्या ठिकाणी ब्लोकेज असतात ते ओपन होत असल्यामुळेच खाज सुटणे किंवा मुंगी वळवळ करणे असे होते. काही दिवसांनी हे बंद होईल.दुसरे असे की, मी आपल्या ग्रुप मधील मित्रा सोबत पुस्तक वाचता की नाही यावर चर्चा केली सर्वांनी मला एकच कारण सांगितले. पुस्तक वाचताना झोप येते. खरच आहे. मी शाळेला होतो तेव्हा कधीच पुस्तक वाचू शकलो नाही कारण मला पण झोपच येत होती,पण आता नाही कारण मी माझ्या मनाला पुस्तक वाचण्या आधी प्रेमाने ओतप्रोत भावनेने सांगतो मला हे दोन धडे वाचायचे आहे हे वाचल्याशिवाय मला झोप आली नाही पाहिजे. आपल मन खूप भोळ आहे. त्याला सांगितले ते ऐकत.मन भोळ कसे आहे. याविषयी वेगळे कधीतरी लिहिलं.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

धन्यवाद.

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻