सुप्रभात. १६-०७-२०२०

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

ll गुणाकार ll

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

असे मी बराच वेळा दिवस भरा मध्ये जो भेटलं त्याला बोलतो.कोणाला आवडत असेल कोणाला नसेल, परंतु मला काल संध्याकाळी कळले की याचा फायदा मला कसा होत आहे.

आपल्या या ग्रुप मध्ये एक पाटील सर आहेत. ज्यांचे आता वय ७३ वर्ष आहे.ते गेली ३५ वर्षांपासून मनाच्या शक्तीचा वापर आनंदी जीवन जगण्यासाठी करत आहेत व ते खुप आनंदी जीवन जगत आहेत.

ते मला सांगत होते,"आपण जसे बोलतो किंवा वागतो त्या गोष्टीचा आपल्या जीवनात गुणाकार होत असतो.उदा. दोन व्यक्तीचे भांडण कसे होते. एक व्यक्ती दुसऱ्याला एक शिवी देतो. दुसऱ्या पहील्याला दोन शिव्या देतो. नंतर पहिल्या दुसऱ्याला एक चापट मारतो,दुसऱ्या पहील्याला दोन चापाटा मारतो मग पहिला दुसऱ्याला चार मारतो आणि नंतर कपडे फाड कार्यक्रम चालू होतो" हा कार्यक्रम आपण कधी ना कधी कोठेतरी पाहिलेला असेलच . याचा अर्थ हाच की आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा गुणाकार होत असतो. म्हणून आपण निर्णय घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनात कशाचा गुणाकार करायला पाहिजे.

आपण खूप आनंदी आहे. ही खुप छान बाब आहे.

परंतु बरेच असे पण आहेत की जे खूप दुखी पण आहेत.

मनुष्याला आनंदी जीवन जगण्यासाठी पाच प्रकारचे आरोग्याची आवशकत्या असते असे विचारवंतांचे मत आहे तेच माझे पण मत आहे. ते आरोग्य क्रमानुसार खालील प्रमाणे आहेत.

१.आध्यात्मिक २. मानसिक ३. शारारिक ४.सामाजिक ५. आर्थिक

हे पाच आरोग्य मिळवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करतो,परंतु ते काही त्याला सर्वच्या सर्व एका वेळेला मिळत नाही.कारण तो क्रम चुकवितो व वर दिलेल्या क्रमाच्या विरुध्द दिशेने सुरुवात करतो म्हणून तो आनंद मिळवू शकत नाही. पण त्याने वरील क्रमानुसार प्रयत्न केले तर त्याला ते नक्कीच प्राप्त होऊ शकते मी पुढे या पाच ही आरोग्य विषयी लीहण्याच्या प्रयत्न करेल.

धन्यवाद.

आपल्या यु ट्यूब चॅनलला लाईक करा,शेयर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही विनंती.

https://www.youtube.com/watch?v=uROPm5WnzwY&t=7s

अजून लेख वाचण्यासाठी कृपया वेबसाईट ला जाऊन भेट द्या. वेबसाईट ची लिंक देत आहे.

https://sites.google.com/view/the-power-of-subconscious-mind/home

आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअँप लिंक खाली दिली आहे.

https://chat.whatsapp.com/BdtGl4K1D92LnbU5wKuCBp

आनंदी राहा,सुखी राहा,शांत राहा,स्वस्थ राहा,मस्त राहा.

आपला नम्र

विठ्ठल गोरे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻