tarkhad5

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

अनुक्रमणिका

१. साईंची पहिली भेट

२. बाबासाहेब तर्खड यांच्या सोबतची दुसरी साई भेट

३. साई बाबांचे चंदनी मंदिर

४. गणेश मूर्तीचे रक्षक साई

५. मरीआई देवीचे भयावह दर्शन

६. पंढरपूरच्या श्री विठ्ठलांची भेट

७. शिर्डीतल्या ढगफुटीत मृत्यूपासून संरक्षण

८. मृत शरीराच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव

९. साईंनी घेतलेली सुवर्ण परीक्षा

१०. साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय

११. साई सच्चरित्रातले इतर प्रसंग

"वाघाला मुक्ती"

"पर्जन्य देवतेवर (इंद्रावर) बाबांचे नियंत्रण"

"अग्नीवर प्रभूत्व"

"मेघाद्वारे भगवान शिव यांना स्नान"

१२. श्रींबरोबरचे इतर अनुभव

"नानावलींच्या क्लुप्त्या"

"मोरेश्वरांचा दमा नाहीसा झाला"

"कलिंगडाची साल खाण्याचा अनुभव..."

"कीटकांना मारण्या संबंधी…"

"आगीशी झुंज"

"बाबांची कफनी धुण्याचा अनुभव"

"एका भुताशी भेट झाली तेव्हा…"

"माझ्या पणजीला मिळालेले साई दर्शन"

१३. साईंशी संस्मरणीय अशी शेवटची भेट

१४. मुंबईत साई महानिर्वाणाचा पुरावा

१५. श्रावणी सोमवार - १६ ऑगस्ट १९६५

१६. संत गाडगे महाराजांचे अनुभव

१७. लेखकाचे स्वतःचे अनुभव

"शिर्डीतील गुरुपौर्णिमा"

"विज्योत ची निर्मिती"

"आबा पणशीकर यांच्याकडून साई प्रसाद"

१. साईंची पहिली भेट

ॐ श्री साईनाथाय नमः

ही घटना एका उन्हाळ्याच्या दिवशी घडली. ज्योतिंद्रने नुकतच मेट्रो सिनेमाच्या जवळ असलेल्या इराणी हॉटेलमध्ये आपलं दुपारचं जेवण घेतलं होतं आणि तो शिकत असलेल्या सेंट झेवियर या आपल्या शाळेत परत येण्याकरिता रस्ता पार करत होता. हा त्याचा रोजचा नेम होता की दुपारच्या सुट्टीत इराणी हॉटेलमध्ये जेवण घ्यायचं. त्या दिवशी रस्ता पार करताना, सफेद वस्त्र परिधान केलेला एक फकीर त्याचा जवळ आला आणि त्याच्याशी संभाषण करू लागला आणि भिक्षा मागू लागला. ज्योतिंद्रने आपल्या खिशातून १ पैशाचे नाणे काढले आणि ते त्या फकिराला दिले आणि शाळेकडे जाऊ लागला. पण फकिराने त्याला थांबविले आणि तो ज्योतिंद्रला म्हणाला की ते १८९४ चं १ पैशाचं नाण आहे. त्या काळी लोक १ पै दान म्हणून देत असत, म्हणून १ पैसा ही एका विद्यार्थ्याकडून दान करण्यासाठी एक फार मोठी रक्कम होती. ज्योतिंद्रने फकिराला सांगितलं की त्याला रोज दुपारच्या जेवणाकरता ४ आणे मिळतात आणि म्हणून तो १ पैसा दान म्हणून देऊ शकत होता. आणि हा १ पैसा चलनातला आहे, म्हणून फकिराने त्याची काळजी करू नये. फकीर मग हसला आणि म्हणाला "अल्ला भला करेगा". ज्योतिंद्र मग शाळेकडे गेला व ह्या घटनेबद्दल विसरला.

ज्योतिंद्रला, सत्येंद्र आणि रवींद्र असे दोन मोठे भाऊ होते, जे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. सत्येंद्रने मग जी. जी. एम. सी. (एम. बी. बी. एस.) ही पदवी घेतली. ते लेखकाचे काका आहेत आणि माटुंगा येथील कोकणनगर येथे राहतात. ज्योतिंद्रचे भाऊ डॉक्टर होते, त्याचे काका डॉक्टर होते आणि त्याचे आजोबा हे तर केवळ एक प्रख्यात वैद्यकीय अधिकारीच नव्हे तर त्या काळच्या मुंबईच्या व्हाईसरॉय यांचे कौटुंबिक डॉक्टर होते. थोडक्यात सांगायचं तर ज्योतिंद्रच्या कुटुंबात सर्वच डॉक्टर होते.

पण कुटुंबात एवढे सगळे डॉक्टर असतानाही ज्योतिंद्रची आई, म्हणजेच लेखकाची आजी अर्धशिशी (मायग्रेन) च्या आजाराने पिडीत होती आणि तिला तीव्र डोकेदुखी होत असे. सगळी औषधं करून झाली होती पण तिचा मायग्रेन बेइलाज वाटत होता.

त्यांच्याकडे एक मोलकरीण काम करत असे आणि तिने तिला सुचवलं की तिने वांद्रे येथील मशिदीनजीक असणाऱ्या एक पीर ज्यांचे नाव मौलाना बाबा होते, त्यांच्या कडे जावे. तिने आणखी सांगीतलं की ते आयुर्वेदिक औषध देतात ज्याने तीव्र आजार सुद्धा बरे होतात.

आता त्या दिवसांत, एका हिंदू स्त्रीने एका पीराची भेट घेण्यासाठी मशिदीत जाणे ही एक फार कठीण गोष्ट होती. माझ्या आजीने ही गोष्ट तिचा मुलगा ज्योतिंद्र याच्या कानावर घातली. ज्योतिंद्र स्वभावानेच धाडसी होता. त्याने एका बुरख्याची व्यवस्था केली आणि त्याने मोटारीने आपल्या आईला पीर मौलाना बाबांकडे नेलं. हे स्वाभाविक आहे की जेव्हा एखादा मनुष्य कोणत्याही तीव्र आजाराने पिडलेला असतो, तेव्हा अशा धार्मिक सीमा ओलांडणे पुढे कठीण राहत नाही. पण मौलाना बाबांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या समस्या कमी व्हायच्या ऐवजी आणखी वाढल्या. मौलाना बाबांनी माझ्या आजीला सांगितलं की ती ज्या आजाराने पिडलेली आहे, त्या आजारावर त्यांच्याकडे देण्यासाठी कोणतेही औषध नाही पण त्यांनी तिला सांगितलं की, "मला एक भाऊ आहे ज्यांचे नाव साई बाबा आहे आणि जे शिर्डीत राहतात आणि तूम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. ते तुम्हाला बरे करतील आणि तुम्हाला तुमच्या सर्व पीडांपासून सोडवतील".

आता दोघे ही मोठ्या पेचात पडले. पहिली गोष्ट म्हणजे, माझे आजोबा हे प्रार्थना समाजाचे एक कर्मठ अनुयायी होते आणि त्यांना माहित होते की ते त्यांना अशा बाबांना भेटायला परवानगी देणार नाहीत. दुसरी गोष्ट शिर्डी कुठे आहे आणि तिथे कसं जायचं हा एक मोठा प्रश्न होता?

पण ज्योतिंद्रने हार मानली नाही. (प्रिय वाचकांनो, येथे मला असं वाटतं की श्री साई बाबांची भेट होणं त्यांच्या नशिबात लिहिलं होतं, म्हणून कोणीही त्यांना त्या कामात अडवू शकला नाही.)

त्याने मेट्रो चित्रपटगृहाच्या जवळ असणाऱ्या इराणी हॉटेलच्या मालकाकडून सर्व माहिती गोळा केली. त्याला माहित झाले की शिर्डी गाव हे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि आगगाडीने मनमाड मार्गे कोपरगाव पर्यंत जावे लागते. मग शिर्डीला पोहोचण्यासाठी कोपरागावहून घोडागाडी ने ९ कि. मि. प्रवास करावा लागतो. याचा अर्थ घरापासून कमीतकमी ३ दिवस दूर रहावे लागते. तरीही, ज्योतिंद्रने वडिलांची परवानगी मिळवली आणि प्रवासाची सर्व तयारी केली. एका शुक्रवारच्या संध्याकाळी, आई आणि मुलगा दोघे ही शिर्डीकरता निघाले. शनिवारी सकाळी ते शिर्डीत पोहोचले. त्यांनी सर्व चौकशी केली होती आणि ताजेतवाने झाल्यावर ते श्री साई बाबांना भेटण्यासाठी द्वारकामाईत पोहोचले. त्यांनी पाहिलं की बाबा पवित्र धुनिसमोर बसले होते. माझी आजी बाबांसमोर नतमस्तक झाली आणि तिने बाबांचे पाय धरले.

त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोघांमध्ये काय संभाषण झालं ते अशा प्रकारे आहे.

बाबा माझ्या आजीला म्हणाले "अगं आई तू आलीस. वांद्र्यातील माझ्या भावाने तुला माझ्या पर्यंत येण्याकरिता मार्गदर्शन केलं. कृपया खाली बस. ए आई, तुला फार तीव्र डोकेदुखी आहे, नाही का?". मग साई बाबांनी आपली पाच बोटं उदीच्या पात्रात घातली आणि त्या उदीने भरलेला हात माझ्या आजीच्या कपाळावर आपटला. त्यांनी पाचही बोटांनी कपाळ घट्ट धरून ठेवलं आणि म्हणाले, "ए आई, आत्तापासून तू मरेपर्यंत, तुला तुझ्या डोक्यात कधीच दुखणार नाही. तुझी डोकेदुखी कायमची निघून गेली आहे". प्रिय वाचकांनो, साईंच्या ह्या कृतीने माझी आजी स्तब्ध झाली. तिने आपल्या दुखण्याबद्दल एक शब्ध ही उच्चारला नव्हता मग साई बाबांना त्यांच्या येण्याचे कारण आणि तिच्या व्यथा कशा काय कळल्या होत्या. मला वाटतं की साई बाबांच्या दोन कृतींनी माझ्या आजीमध्ये पूर्ण बदल घडवून आणला. पहिली - त्यांचं एकमेकांकडे बघणं म्हणजेच दृष्टीक्षेप. दुसरी - उदीने भरलेला हात कपाळावर मारणे. खरं पाहू जाता, तो त्या दुखण्याला त्या डोक्यातून निघून जाण्यासाठी एक आदेशच होता. माझ्या आजीने औषधाचा एवढा रामबाण प्याला कधीच घेतला नव्हता. तिच्यामध्ये घडून आलेला ज्या परिवर्तनाचा अनुभव ती घेत होती तो तिचा तिलाच निट माहित होता. डोकेदुखीमुळे तिच्या चेहऱ्यावर असणारी उदास मुद्रा निघून गेली होती. तिला ताजतवानं वाटत होतं. तिने माझे वडील ज्योतिंद्र यांना बाबांना वाकून नमस्कार करायला सांगितला. माझ्या वडिलांना हे सर्व पाहून आश्चर्य झालं. त्यांच्या आईने त्यांना पूर्वी कधीही अशाप्रकारे हुकुम दिला नव्हता. मग माझ्या वडिलांनी बाबांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरले. लगेचच बाबा त्यांना म्हणाले "ए भाऊ, तू मला ओळखलं नाहीस का?" माझ्या बाबांनी नकारार्थी उत्तर दिलं. मग बाबा त्यांना म्हणाले "कृपया माझ्याकडे बघ आणि आपल्या स्मृतीवर जोर टाक आणि आठवण्याचा प्रयत्न कर. माझ्या वडिलांना काहीच आठवलं नाही. मग बाबांनी आपल्या कफनीच्या खिशात हात घालून १ पैशाचे तांब्याचे नाणे काढलं. त्यांनी ते माझ्या वडिलांना दाखवलं आणि म्हणाले, "ए भाऊ! तुला हे १८९४ च तांब्याचं नाणं आठवतं का, जे तू एका फकिराला दान म्हणून दिलं होतस, जेव्हा तू शाळेकडे जायाला निघाला होतास? आता माझ्या वडिलांना ती घटना आठवू लागली जी ह्या धड्याच्या सुरवातीला सांगितली आहे. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून गेले आणि त्यांनी लगेचच बाबांचे पाय आपल्या हातात धरले. बाबांनी त्यांना वर उचललं आणि म्हणाले "ए भाऊ, त्या दुपारी तुला जो फकीर भेटला होता तो दुसरा कोणी नव्हता, मीच होतो आणि तुझे हे १ पैशाचे नाणे मी तुला परत देत आहे. कृपया हे परत घे आणि ह्याचं काळजीपूर्वक जतन कर. हे तुझ्यासाठी कित्येक पट पैसे उत्पन्न करेल."

प्रिय वाचक भक्तांनो, तुम्ही माझ्याशी निश्चित सहमत व्हाल की असं सुखद साई दर्शन, जे माझ्या आजी व वडिलांना प्राप्त झालं, ते त्या दोघांसाठी अविस्मरणीय ठरलं असेल आणि तेव्हापासून ते आपोआप त्यांच्याकडे कायमचे आकर्षित झाले.

पहिल्या दिव्य साई भेटीनंतर, तर्खड कुटुंबाने साई बाबांना आपले गुरु मानण्याचा निर्णय केला आणि त्यांनी स्वतःला त्यांच्या भक्तीत पूर्णपणे झोकून दिलं. माझ्या आजीची डोकेदुखी कायमची गेली होती आणि तिची देवाप्रतीची भक्ती कित्येक पट वाढली. ते १ पैशाचं नाणं आमच्या घरात पूजेसाठी लावण्यात आलं.

आम्ही आमच्या वडिलांना विचारायचो की साई बाबांना भेटल्यावर नक्की काय व्हायचं. ते सांगायचे की त्यांच्या डोळ्यातील परम सुखदाई दृष्टीमध्ये प्रचंड आकर्षण होतं, जे कुणालाही त्यांच्याकडे खेचून घ्यायचं. आणि त्यांच्या सामर्थ्यवान हातांमधील सुवर्ण स्पर्श कुठलीही खोल जखम भरून काढू शकत होता. तुम्हा सर्वांना हे माहित आहे की साई बाबा स्वतःला कधीही देव म्हणत नसत पण नेहमी म्हणायचे की ते देवाचे दूत आहेत. पण माझे वडील म्हणायचे की खंडोबा मंदिराचे पुजारी भगत म्हाळसापती यांनी पहिल्याच भेटीत "आओ साई आओ" अस म्हणत त्यांना योग्यच नाव ठेवलं. आपला भारत देश हा अनेक साधू पुरुषांचा देश आहे आणि त्यांचे भक्त त्यांना साजेसं असं नाव देतात. माझे वडील म्हणायचे की साई नावाचा अर्थ आहे 'सर्व काही'. त्यांचे स्पष्टीकरण असे होते की 'सा' चा अर्थ आहे साक्षात आणि 'ई' चा अर्थ आहे ईश्वर. अशा प्रकारे त्यांच्या मते साई बाबांचा अर्थ आहे साक्षात ईश्वर बाबा. मी खरच सांगतो की माझ्या वडिलांनी आपल्या शिर्डी भेटींच्या वेळी जे अनुभवलं ते कमालीचं होतं आणि त्यांच्यासारखी कोणीतीही सामान्य व्यक्ती अशा दिव्य अनुभवांतून गेल्यावर एकाच निष्कर्षापर्यंत पोहोचेल की, साई बाबांकडे अदभुत दैवी शक्ती होती. अशा धन्य कुटुंबात जन्म झाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि इच्छा करतो की साई बाबांचे आशीर्वाद पुढे येणाऱ्या संपूर्ण काळात आमच्याबरोबर असावेत.

ॐ श्री साईनाथाय नमः

विवरण: वरील अनुभवावरून हे स्पष्ट होतं की संत हे सर्वज्ञ असल्यामुळे, त्यांना सर्व गोष्टी न सांगताच माहित असतात. लोकांची दुखणी, संसारातील अडी-अडचणी त्यांना न सांगताच ठाऊक असतात. जर एखादा जीव, अनन्य शरण आला, तर संत त्याची त्याच्या प्रारब्ध भोगांतून लवकर सुटण्याची योजना करतात.

तसेच, सर्वसामान्यपणे संसारात मग्न असलेला माणूस देवाची आठवण काढत नाही, पण जीवनातील कठीण समस्या तसेच आपत्ती यांनी तो गांगरून गेला की देवाकडे प्रार्थना करतो. जर त्याची वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती संपली असेल तर देव त्याची एका संताशी भेट घडवून आणतो, जेथून पुढे त्याचा कायमचा उद्धार होतो.

===========================================================================================

२. बाबासाहेब तर्खड यांच्या सोबतची दुसरी साई भेट

साई बाबांबरोबर अशा अप्रतिम भेटीचा अनुभव घेतल्यानंतर, आई आणि पुत्र दोघांनाही घरी लवकर परत येऊन त्यांचा अनुभव माझे आजोबा बाबासाहेब तर्खड यांना सांगावासा वाटला. पण साई बाबांनी त्यांना आणखी काही दिवस शिर्डीत राहाण्याचा सल्ला दिला म्हणून त्यांची आज्ञा त्यांनी मानली. त्यांची श्री माधवराव देशपांडे यांच्याबरोबर चर्चा झाली, जे साई बाबांच्या फार जवळचे होते आणि जे भक्तांना मार्गदर्शन व मदत करायचे. त्यांनी त्यांना सांगितलं, की बाबा सकाळी कोणाचातरी शोध घेत होते आणि त्यांना विचारलं असता ते म्हणाले की त्यांची आई आणि भाऊ त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत. श्री माधवरावांनी त्यांना माहिती दिली की शिर्डीचे भक्त जी नेहमीची रीत पाळतात ती अशी की, बाबांची परवानगी घेतल्यावरच कुणी तेथून निघून जाऊ शकत असत. मग त्यांनी वांद्र्यातील बाबासाहेबांना पत्र लिहून कळवलं की ते त्यांचे शिर्डीतील वास्तव्य काही दिवस वाढवत आहेत कारण त्यांनी काहीतरी विशिष्ट अनुभवलं आहे. अशा प्रकारे त्यांनी शिर्डीत एक आठवडा वास्तव्य केलं आणि मग बाबांची परावानगी घेऊन आणि बाबासाहेब तर्खडांना घेऊन पुन्हा येण्याचं वचन देऊन ते वांद्र्याला स्वतःच्या घरी परतले.

त्यांच्या एका आठवड्याच्या वास्तव्यात त्यांची ओळख श्री म्हाळसापती, काकासाहेब महाजनी, शामराव जयकर ई. अशा अन्य साई भक्तांशी झाली.

XXX

माझे वडील आणि आजी यांनी घडलेली सर्व घटना माझ्या आजोबांना सांगितली आणि त्यांना विनवण्याचा प्रयत्न केला की शिर्डीचे साई बाबा हे काही साधारण मनुष्य नाहीत. ते फक्त चांगली औषधंच देतात अस नाही तर त्यांच्याकडे दैवी शक्ती सुद्धा आहे. माझ्या आजोबांनी माझ्या आजीचे अनुभव गंभीरतेने घेतले नाहीत पण तेच माझ्या वडिलांकडून ऐकतांना ते उलट आश्चर्यचकित झाले.

प्रिय वाचकांनो, मला अस निश्चित वाटतं की बाबासाहेब यांना सुद्धा शिर्डीच्या साई बाबांची भेट होणं विधिलिखित होतं,म्हणून काही काळानंतर त्यांना त्यांचे मित्र श्री शामराव जयकर, काकासाहेब दीक्षित, न्यायाधीश धुरंधर भेटले आणि त्यांना कळलं की ते सर्व साई भक्त आहेत. शेवटी माझे आजोबा कुटुंबाबरोबर शिर्डीला फिरायला म्हणून जायाला तयार झाले. ते फार व्यस्त पुरुष होते म्हणून त्यांना नोकरी पासून दूर राहणे कठीण होते. त्यांनी एके शुक्रवारी रात्री आठवड्याच्या शेवटी, आपल्या मित्रांसाहित जाण्याचा निर्णय केला.

ते रात्रीच्या आगगाडीने मनमाड पर्यंत जाण्यासाठी प्रवास करत होते. माझे वडील आणि आजी यांनी आपलं अंथरूण पसरलं होतं आणि ते आराम करत होते. पुरुष मंडळी पत्ते खेळत बसली होती. आगगाडी नाशिक रोड स्थानकातून निघाली होती आणि एक फकीर ज्याचे केस सफेद फडक्याने बांधलेले होते, आगगाडीच्या डब्यात शिरला. तो माझ्या आजोबांकडे आला आणि भिक्षा मागू लागला. माझ्या आजोबांनी त्याच्याकडे पहिलं आणि त्याची अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी एक रुपयाचं चांदीचं नाणं बाहेर काढलं आणि त्याला दिलं आणि त्याला तेथून जाण्यास सांगितलं. फकिराने त्यांच लक्ष्य त्या एक रुपयाच्या नाण्याकडे वेधलं कारण त्या काळात तेवढी रक्कम दान म्हणून देण्यास मोठी समजली जायची. येथे मला वाचकांना सांगावसं वाटतं की माझे आजोबा खटाव गिरणी समुहाचे सचिव होते आणि १९०८ या साली ते रु. २००० दर महा एवढा पगार घ्यायचे. त्यांनी फकिराला सांगितलं की ते नाणं खरंखुरं आहे आणि त्याच्यावर जॉर्ज - ५ यांची छाप मुद्रित आहे आणि ते १९०५ साली जारी करण्यात आले आहे आणि त्यांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी त्याला दूर जाण्यास सांगितलं कारण त्यांच्या पत्त्याच्या खेळात व्यत्यय येत होता. मग तो फकीर तेथून निघून गेला.

पुढच्या दिवशी सकाळी ते शिर्डीला पोहोचले. माझ्या आजीने व वडिलांनी त्यांना मार्गदर्शन केलं कारण ते येव्हाना त्या जागेशी परिचित झाले होते. त्यांनी आंघोळ केली आणि न्याहारी केली आणि पूजेचे साहित्य घेऊन द्वारकामाईत प्रवेशले. माझे वडील आणि आजी यांनी बाबांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरले. बाबांनी मग स्मित हास्य केलं आणि माझ्या आजोबांकडे वळले आणि म्हणाले "म्हाताऱ्या, माझी आई आणि भाऊ यांना तुला समजावयाला लागले आणि फार विनवणी केल्यावर तू शिर्डीला यायला तयार झालास. तू मला ओळखलस का ?" माझ्या आजोबांनी नकारार्थी उत्तर दिलं. मग बाबांनी आपला हात आपल्या कफनिच्या खिशात घातला आणि त्यांनी एक रुपयाचं चांदीचं नाणं बाहेर काढलं, ज्यावर जॉर्ज - ५ यांची छाप होती. त्यांनी ते माझ्या आजोबांना दाखवलं आणि विचारलं, "तू कमीतकमी ह्या नाण्याला तरी ओळखतोस का जे तू मला काल रात्री दिलं होतस?" आता माझ्या आजोबांना आदल्या रात्री आगगाडीत घडलेली घटना आठवू लागली आणि ते पुढे काही बोलायच्या आधीच बाबा त्यांना म्हणाले, "ए, तो रात्रीचा फकीर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर मीच होतो." बाबासाहेब लगेच गहिवरून गेले. त्यांना त्यांची चूक कळली की ते बाबांना एक भिक्षेकारी म्हणून समजले होते. त्यांना आपल्या रात्रीच्या वागण्याबद्दल अत्यंत खेद वाटला. ते बाबांसमोर नतमस्तक झाले आणि त्यांची क्षमा मागितली. त्यांना जाणीव झाली की त्यांच्या पत्नीने व ज्योतिंद्रने बाबांबद्दल जे सांगितलं होतं ते १०० टक्के खरं होतं आणि बाबा हे एक सामान्य मनुष्य नाहीत आणि ते खऱ्या अर्थाने ईश्वराचे दूत आहेत.

ह्या घटनेनंतर, बाबासाहेब तर्खड यांचा मध्ये एक अमुलाग्र बदल झाला. ते आता प्रार्थना समाजीष्ठ राहिले नाही. त्यांच्या मध्ये बाबांबद्दल आध्यात्मिक प्रेम उत्पन्न झालं. ते महत्वाचे निर्णय बाबांचा कौल घेऊनच करू लागले. ते बाबांना कपड्याचे ताग पाठवू लागले जेणेकरून बाबा त्यापासून कफनी शिवू शकतील.

त्यांनी द्वारकामाईत रात्री उजेड व्हावा म्हणून रॉकेलचे कंदील सुद्धा पाठवले होते. माझे वडील जेव्हा शिर्डीत वास्तव्यास असायचे तेव्हा ते कंदील दर संध्याकाळी पेटवायचे आणि ते द्वारकामाईत ठरलेल्या जागी टांगायचे. याबद्दल एक मनोरंजक घटना आहे, जी मी तुम्हाला नंतर सांगीन.

प्रिय वाचकांनो, अशा प्रकारे तर्खड कुटुंबियातील तीन व्यक्ती शिर्डीच्या साई बाबांच्या संपर्कात आल्या. खरं पाहू जाता,बाबांनीच त्यांना एका शक्तिशाली चुंबकाप्रमाणे स्वतः जवळ खेचून घेतलं. त्या सर्वांमध्ये बाबांप्रती तीव्र प्रेम उत्पन्न झालं. त्यांच्या शिर्डीच्या वाऱ्या वाढल्या होत्या, कारण सोपं होतं, की त्यांना दिव्य अनुभव भेटू लागले होते, जे स्वभावतःच अनोखे होते. ते बाकी काही नसून केवळ चमत्कार होते आणि ह्यामुळे त्यांना उमजलं की साई बाबा हे भगवंताचे अवतार आहेत. मी तुमच्यापुढे हे अनुभव उघड करणार आहे आणि मला खात्री आहे की ते वाचाल्यानंतर तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल.

बाबांनी ते एक रुपयाचं चांदीचं नाणं माझ्या आजोबांना परत दिलं आणि ते म्हणाले "म्हाताऱ्या, मी तुझ नाणं तुला परत देत आहे. कृपया याची पूजा कर आणि तुझं जीवन यशस्वी होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मी जेव्हा ह्या पवित्र द्वाराकामाईतून बोलतो तेव्हा कधी खोटं बोलत नाही." अशा प्रकारे बाबांनी माझ्या आजोबांना "म्हाताऱ्या" व माझ्या वडिलांना "भाऊ" म्हणून संबोधलं आणि भविष्यातील सर्व संभाषणामध्ये हेच संबोधन कायम राहिलं.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: साई बाबांनी सांगितलं आहे की, "माझे लोक माझ्याकडे स्वतःहून येत नाहीत, तर मी विविध लीला करून चिमणीप्रमाणे त्यांना स्वतः जवळ खेचून घेतो आणि माझ्या भक्तीला लावतो". अर्थात असं करण्यामागे, भक्तांचा कायमचा उद्धार व्हावा हाच त्यांचा हेतू आहे.

===============================================================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबंचे चंदनी मंदिर

ॐ श्री साईनाथाय नमः

आधी वर्णन केल्या प्रमाणे, तर्खड कुटुंबीयांच्या शिर्डी भेटी वाढल्या होत्या. त्यांचे बाबांप्रती प्रेम हे शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. जरी त्यांना शिर्डीत बाबांच्या चरणांपाशी सदा सर्वकाळ असावं अस वाटायचं, पण ते कुठल्याही परिस्थितीत शक्य नव्हतं. त्यांना तीव्र इच्छा निर्माण झाली की त्यांच्या वांद्र्यातील घरी बाबांचा एक मोठ्या आकाराचा फोटो असावा, ज्याची पूजा करता येईल. ह्या मागचा हेतू असा होता की जेव्हा ते शिर्डीपासून दूर असायचे तेव्हा त्यांना बाबांचा विसर न पडावा. कारण दृष्टीच्या आड म्हणजे स्मृतीच्या आड. वडील व मुलगा दोघांचाही एक विशेष स्वभाव होता तो असा की ते बाबांप्रती त्यांच्यात असणाऱ्या प्रेमाबद्दल कधीच बोलायचे नाहीत. त्यांची बाबांवर प्रचंड श्रद्धा होती. त्यांना माहीत होतं की बाबा हे अंतर्यामी आहेत जे त्यांच्या मनातील विचार वाचू शकत होते आणि ते निश्चितपणे त्यांची इच्छा योग्य वेळी पूर्ण करण्याचे योजतील. तसं बाबांच्या दोन मुख्य शिकवणी होत्या - श्रद्धा आणि सबुरी.

एका भल्या पहाटे, बाबासाहेब आणि ज्योतिंद्र यांना एक स्वप्न पडलं. त्यांना एक सुंदर कोरीवकाम केलेलं मंदिर दिसलं ज्यात बाबा बसले होते. त्या स्वप्नाचा त्यांचा मनावर खोल ठसा पडला. ते जागे झाले आणि त्यांनी त्याचे चित्र रेखाटले. तसं दोघेही चित्रकलेत प्रवीण होते. जेव्हा ते सकाळच्या न्याहारीच्या वेळी एकत्र आले त्यांनी सकाळी पडलेल्या स्वप्नाबद्दलचे आपले विचार एकमेकांना सांगितले. त्यांनी त्यांची रेखाटलेली चित्र आणली आणि हे पाहून आश्चर्यचकित झाले की दोघांनी रेखाटलेली चित्र तंतोतंत जुळत होती. त्यांनी तसे मंदिर त्यांच्या घरी असावे असा लगेच निश्चय केला. त्यांनी चौकशी करून २ किलोलगेच चंदन विकत घेतलं. त्यांनी एका कुशल सुताराची नेमणूक केली आणि त्यांना मंदिराचं रेखाटलेलं चित्र दाखवलं आणि त्यांच्यासाठी तसं एक मंदिर घडवण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्या वांद्र्यातील घराला एक छोटी गच्ची होती आणि मंदिर बनवण्याचं काम तिथे सुरु झाले. मला वाटतं की मंदिर पूर्णपणे आकारास येण्यास एका वर्षापेक्षा जास्त काळ लागला. ह्या काळाच्या शेवटी ९ फुट उंच व २ १/२ x २ १/२ फुट चौकोनी चंदनी मंदिर तयार झालं. आता ते एका दुविधेत पडले की बाबांची तसबीर कुठून आणायची, जी त्या मंदिरात पूजेसाठी लावली जाऊ शकेल.

प्रिय वाचकांनो, तुम्हाला माहीत असेल की बाबा कुणालाही कॅमेराने स्वतःचे छायाचित्र घेऊ देत नसत म्हणून त्यांची तसबीर मिळणं हे एक मोठ काम होतं. पण तर्खडांना विश्वास वाटत होता की ते स्वप्न हे बाबांची निर्मिती होती आणि म्हणून तेच हे काम पूर्ण करतील.

त्यांच्या सवईप्रमाणे ते एका शुक्रवारी दुपारी मुंबईतल्या चोर बाजारात गेले. ते एक ठरलेला पोशाख करत असत. बाबासाहेब कोट व विजार आणि इंग्रजांप्रमाणे डोक्यावर हॅट घालायचे व ज्योतिंद्र कोट विजार व डोक्यावर काळ्या रंगाची गांधी टोपी घालायचे.

ते चोर बाजाराच्या गल्लीबोळांतून जात असताना काहीतरी विशेष घडलं. एक मुसलमान दुकानदार त्यांच्या दिशेने ओरडत आला आणि म्हणाला "हे सज्जनांनो, मी इतके दिवस तुम्हाला भेटण्यासाठी वाट बघत होतो, कारण माझ्याकडे माझ्या दुकानात तुमच्याकरता एक पुडके आहे". बाबासाहेब आणि ज्योतिंद्र विस्मित झाले आणि काळजीत पडले की तो दुकानदार काही चोरीचामाल त्यांच्या गळ्यात बांधेल. त्यांनी त्याला प्रश्न विचारला की एवढ्या माणसांमधून त्याने त्यांनाच कसे काय निवडले. दुकानदाराने मग त्यांना त्यांच्या दुकानात चलण्याची विनंती केली जेथे तो सर्व काही खुलासा करू शकत होता. त्याच्या दुकानात पोहोचताच, त्याने त्यांना सांगितलं की काही दिवस आधी, साधू सारखा दिसणारा एक वयस्कर पुरुष त्याचा दुकानात आला आणि त्यांनी त्याला एक गठडा दिला. तो पुरुष त्याला म्हणाला की शुक्रवारी एक हिंदू वडील-पुत्र त्या जागी येणार आहेत. वडील इंग्रज टोपी (हॅट) घालतात आणि पुत्र काळी गांधी टोपी घालतो. त्याने त्यांना देण्याकरता एक गठडा दिला आणि सेवा शुल्क म्हणून रु. ५० सुद्धा दिले.

म्हणून मी जोडीने फिरणाऱ्या माणसांवर नजर ठेवून होतो आणि तुम्हाला बरोबर ओळखलं. आता त्यांना त्याच्या बोलण्याची खात्री पटू लागली. त्याने मग गठडा आणला आणि त्यांना दिला. पण अजूनही त्यांच्या मनात चोरीचा माल असण्याचा संशय होता म्हणून ते घेण्यापूर्वी त्यांनी त्याला ते गठडे उघडावयास सांगितले. त्याने ते गठडे उघडले आणि माहित झालं की एका सुंदर लाकडी फोटो फ्रेम मध्ये बसवलेली ती श्री साईंची कृष्ण-धवल तसबीर होती. दोघांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू दाटले आणि त्यांनी दुकानदाराला पुष्टी दिली की ते त्यांचेच गठडे आहे. त्यांनी त्याचे भरपूर आभार मानले आणि बदल्यात काही पैसे देऊ केले. दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिला कारण त्याला गठडा देणाऱ्याचे सक्त आदेश मिळाले होते. ते'स्टुडबेकर चॅम्पिअन' प्रकारच्या मोटार कारीतून प्रवास करायचे आणि ते तीतून वांद्र्याला ती फोटो फ्रेम सुरक्षित घेऊन जाऊ शकले.

त्यांना आणखी एक सुखद धक्का मिळाला कारण फोटो फ्रेम कुठलाही बदल न करता चंदनी मंदिरात बरोबर मावली. पूर्ण तर्खड कुटुंब आनंदाने भारावून गेलं, ज्याला काही सीमा नव्हती. मग त्यांनी साई बाबांच्या तसबिरीची चंदनी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना केली. माझे वडील नेमाने पहाटे लवकर उठायचे आणि ५ वाजता बाबांच्या कपाळाला चंदनाचा लेप लावून व दिवा व अगरबत्ती लावून पूजा करायचे. खडी साखर नैवेद्य म्हणून दाखवला जायाचा, जो ते सर्व, दुपारच्या जेवणाच्या वेळी भक्षण करायचे. आता ते सर्व त्यांच्या शिर्डीच्या पुढच्या भेटीची आतुरतेने वाट बघत होते.

नेहमीप्रमाणे ते द्वारकामाईत आले आणि आपल्या भेट वस्तू साई बाबांना अर्पण केल्या. बाबांनी त्यांना तेथे बसायाला सांगितलं. शिर्डीत वसतीला असलेले एक साई भक्त फार उमेदीने मागील काही दिवसांपासून कॅमेराने साईंचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते ज्यात त्यांना यश मिळालं नव्हतं. ते बाबांकडे आले आणि शेवटची संधी देण्याची विनंती केली. बाबा अचानक रागावले आणि त्यांच्यावर ओरडले आणि म्हणाले, "ए, तू माझा फोटो घेण्यासाठी आसुसलेला का आहेस. कृपया माझ्या भाऊच्या घरी जा आणि तेथे त्याच्या मंदिरातील फोटोत मी तुला जिवंत भेटीन". हे ऐकताच माझे वडील, त्यांनी आपल्या घरी जे काही केले होते त्याबद्दल फार सुखावले. बाबा ह्या गोष्टीची पुष्टी देत होते की त्यांना त्यांची रोजची पूजा प्राप्त होत होती. माझे वडील त्वरित उठले आणि बाबांसमोर नतमस्तक झाले. माझ्या वडिलांनी प्रभू साईंकडे अंतरात प्रार्थना केली की त्यांना असा वर मिळावा की त्यांना साईंचा कधीच विसर न पडावा आणि ते निरंतर बाबांच्याच आणि फक्त बाबांच्याच प्रार्थना गात राहावेत. (हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.)

तर अशा प्रकारे शिर्डी साई बाबांनी तर्खडांच्या घरच्या चंदनी मंदिरात स्वतःला स्थापन केलं. हे मंदिर दर्शनासाठी माझे दिवंगत बंधू रवींद्र यांच्या घरी वसई येथे उपलब्ध आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

साई बाबंचे चंदनी मंदिर

नाना योजना आखून, नाना लीला करून, संत आपल्या भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधतात कारण त्यातच त्यांचे कायमचे हित असते आणि संतांना आपल्या भक्तांच्या उद्धाराची नेहमी तळमळ लागलेली असते. हे आई-मुला सारखेच नाते आहे. लहान मुलाला जरी कसली काळजी नसली तरी त्याच्या आईला त्याची पूर्ण काळजी असते.

तसेच या अनुभवातून, घरामध्ये देवपूजेचे महत्व सुद्धा विषद होते. आपण केलेली रोजची पूजा, देवापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला दीर्घ आयुष्य, स्वास्थ्य, संतती, संपत्ती तसेच सात्विक बुद्धीची प्राप्ती होते तसेच आपल्या मनातील कलिमल (स्वार्थीपणा, विषयासक्तपणा, लोभ, क्रोध, मत्सर, लबाडी करण्याचे विचार ई.) क्रमाक्रमाने नष्ट होवून चित्तशुद्धी होते. म्हणून संत आपल्या गृहस्थ भक्तांना नित्य पूजेचा नेम लावून देतात तसेच भक्तांचे त्यांच्यावर असलेले प्रेम दृढ व्हावे म्हणून स्वतःच्या तसबिरीच्या रुपाने त्यांच्या देव घरात स्वतःची स्थापना करून घेतात. अर्थात हे सर्व ते स्वतःसाठी नाही करत तर भक्तांच्या शीघ्र उद्धाराकरता.

====================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

गणेश मूर्तीचे रक्षक साई

ॐ श्री साईनाथाय नमः

चंदनी मंदिरात, गणपतीची एक लहान संगमरवरी मूर्ती आहे. ही एक अनोखी मूर्ती आहे कारण गणपतीची सोंड उजवीकडे वळली आहे. ही मूर्ती एका चंदनाच्या मंदिरात ठेवलेली आहे, जे खास ह्या मूर्तीसाठी बनवलेलं होतं. ह्या गणेश मूर्तीची गोष्ट फार रंजक आहे आणि म्हणून मला तुम्हा सर्व वाचकांना सांगावीशी वाटते.

माझे आजोबा मुंबईतील रिगल सिनेमागृहाजवळील एका जुन्या दुकानात जायचे. अशाच एका भेटीच्या वेळी, दुकानाभोवती जाताना, त्यांनी एका इंग्रज माणसाला दुकानदाराबरोबर घासाघीस करताना ऐकलं. माझ्या आजोबांना कुतूहल वाटलं की एक इंग्रज माणूस घासाघीस करत आहे, म्हणून त्यांनी त्यात सक्रीय रस घेतला. घासाघीस ही गणपतीच्या एका सुंदर संगमरवरी मूर्तीसाठी होती. ती ९ इंच उंच होती व कमळाच्या फुलात बसलेली होती आणि विविध रंगात खूप योग्य रितीने रंगवलेली होती. दुकानदार १५ रुपये किंमत मागत होता आणि हे स्पष्टीकरण देत होता की ती सोमनाथ मंदिरातील आहे आणि फार पुरातन आहे म्हणून तिची तेवढी किंमत आहे. त्या इंग्रज माणसाने मूर्तीसाठी सुरुवातीला ५ रु. देऊ केले आणि मग ८ रुपयांपर्यंत गेला. माझे आजोबा आता त्या खरेदी व्यवहाराकडे आकर्षित झाले. त्यांनी निव्वळ कुतूहलाने त्या इंग्रजाकडे विचारणा केली की तो मूर्तीचा कसा वापर करू इच्छितो. इंग्रजाने उत्तर दिलं की तो त्या सुंदर संगमरवरी मूर्तीचा स्वतःच्या टेबलावर पेपरवेट म्हणून वापर करू इच्छितो. ते ऐकल्यावर, माझे आजोबा खूप रागावले. त्यांनी स्वतःच्या पाकीटातून १०० रुपयांची नोट काढली आणि दुकानदाराला दिली. त्यांनी त्याला ८० रुपये घेण्यास सांगितले (म्हणजेच इंग्रजाने देऊ केलेल्या किंमतीच्या दहा पट) आणि त्यांच्यासाठी मूर्ती आवरणबद्ध करण्यास सांगितली. त्यांनीस्पष्टपणे सांगितलं की ते कुणालाही त्यांच्या देवाचा वापर पेपरवेट म्हणून करू देणार नाहीत. दुकानदाराकडे अधिक चोकशी करता, त्यांना असं कळलं की ती मूर्ती सोमनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारातील होती आणि म्हणून खूप पुरातन होती. घरी पोहोचताच त्यांनी जाहीर केलं की ते ती मूर्ती चंदनी मंदिरात ठेऊ इच्छितात जेणेकरून साई पूजेबरोबर तिची सुद्धा पूजा घडेल, जी कुठल्याही परीस्थित पेपरवेट म्हणून वापर होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुटुंबातील लोक त्यांच्याशी सहमत झाले. खोका उघडताच, माझ्या आजीला समजलं की मूर्तीला सोंड आहे जी उजवीकडे वळलेली आहे आणि अशा प्रकारचा गणपती (सिद्धिविनायक) हा सहसा पूजेसाठी घरात ठेवत नाहीत कारण त्यामुळे घराच्या सर्व क्रिया कर्मांमध्ये फार कडक शिस्त पाळावी लागते. मग त्यांनी पुजाऱ्यांचा सल्ला घेतला, ज्यांनी त्यांना सल्ला दिला की ते एका अटीवर मूर्तीची पूजा करू शकतात की प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी ते तिला नवा रंग देतील आणि ते तिचे विसर्जन करणार नाहीत. तर्खड कुटुंबीय ह्या योजनेने आनंदी झाले आणि पुढील गणेश चतुर्थीच्या दिवशी, त्यांनी मूर्तीसाठी चांदीचे मंदिर आणले आणि त्याची समारंभपूर्वक चंदनी मंदिरात स्थापना केली.

तेव्हापासून प्रत्येक हरताळकेला (गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी) माझे वडील मुर्तिवरचा जुना रंग टर्पेन्टाइनने काढत असत. मग सुगंधी जलाने तिला अंघोळ घालीत. आमच्या पैकी प्रत्येक जण त्यात सहभागी होत असे आणि मूर्तीला पुन्हा रंग द्यायचो. गणेश चतुर्थीच्या दिवशी ते तिची पुन्हा आपल्या चांदीच्या मंदिरात स्थापना करायचे आणि आम्ही सर्व पूजा करायचो. मला आठवतं की मी युवा अवस्थेत असताना, माझे शाळेचे मित्र मला विचारायचे की तुमच्या घरी गणपती येतो का. मी त्यांना सांगायचो की आमचा गणपती कायमचा आहे. तेव्हा ते माझे बोलणे समजू शकत नसत. अशा प्रकारे तर्खड कुटुंबीयांचं परिवर्तन प्रार्थना सामाजीष्ट असण्यापासून मूर्ती पूजक होण्यामध्ये झालं.

आमच्या घरातील ही गणेश मूर्ती एकदा माझ्या आजीद्वारे अग्नी परीक्षेला घातली गेली. माझे आजोबा जे कापड उद्योग जगतात विख्यात होते, त्यांना बरोदाच्या महाराजांकडून, त्यांच्या राज्यात कापड गिरणी स्थापन करण्याचे काम मिळाले. म्हणून ते बारोद्याला स्थलांतरित झाले आणि त्यांना नदीच्या काठी असलेल्या एका बंगलयात राहण्याची सोय मिळाली. एका पावसाळ्यात, रात्रभर भरपूर पाउस झाला आणि सकाळ होइस तोवर त्यांचा बंगला पाण्याने वेढला गेला. हा त्यांच्या साठी नवीन अनुभव होता. माझी आजी घाबरली कारण जसजसे तास जात होते, पाण्याची पातळी वाढत होती. शेवटची पायरी सोडून बंगल्याच्या इतर सर्व पायऱ्या पाण्याखाली गेल्या. माझ्या आजीने मग तांब्याचं एक सपाट भांडं आणलं आणि ते शेवटच्या पायरीवर ठेवलं. मग तिने चांदीच्या मंदिरातील "विघ्नहर्त्याला" उचललं आणि तांब्याच्या भांड्यात ठेवलं आणि घोषणा केली की जर मूर्ती पाण्याखाली गेली तर ती त्याच पाण्यात गणेश मूर्तिच्या विसर्जनाचा कार्यक्रम करण्यास प्रारंभ करेल. अर्थात तिचा असा पवित्र हेतू होता की देवाने त्यांना त्या गंभीर अवस्थेतून वाचवलं पाहिजे. मला वाटतं की फक्त पूर्ण श्रद्धा असलेले भक्तच असं बेधड़क साहस करण्याची जोखीम घेऊ शकतात आणि बहुदा देवाला ते आवडत असावं. पाण्याची पातळी आणखी वाढली आणि तिने तांब्याच्या पात्राला स्पर्श केला आणि आणखी वाढण्याची थांबली. ३-४ तासांनंतर, पाण्याची पातळी कमी झाली आणि ते सगळे सुखावले. त्यांनी इच्छा केल्या प्रमाणे विघ्नहर्ता त्यांच्या बचावाकरता आला होता. त्या वर्षी त्यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव दिड दिवसांऐवजी पाच दिवसांकरिता साजरा केला.

मी ह्या गणेश मूर्ती बद्दल अजून एक किस्सा सांगण्यासाठी पुढे सरसावत आहे. ही घटना ह्या अध्यायाच्या शिर्षकावरती प्रकाश टाकेल. एका हर्ताळकेच्या दिवशी (प्रिय वाचकांनो, योगायोगाने माझी आजी हर्ताळकेच्या दिवशी निर्वाण पावली) जुना रंग काढत असताना, मूर्तीचा उजव्या हाताचा भाग कोपऱ्यापासून निघाला. माझे वडील फार घाबरले कारण हिंदू धर्माप्रमाणे, विघटीत झालेल्या मूर्तीची पूजा करण निषिद्ध मानले जाते. पण आतापर्यंत ती मूर्ती कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली होती आणि तिच्या पासून वेगळं होणं त्यांना जमलं नसतं. त्यांनी तो उत्सव पूर्ण करून मग साई बाबांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. अशा प्रकारे ते शिर्डीला गेले. प्रिय वाचकांनो, ही त्यांच्या कडून अनुचित कृती नाही का घडली? त्यांनी आतापर्यंत गणेश मूर्तीच्या व्यवहारात बाबांना कधीच सामील करून घेतलं नव्हतं आणि आता कठीण काळी त्यांना त्यांची मदत हवी होती. त्या प्रसंगी ते जेव्हा द्वारकामाईत होते, तेव्हा बाबा असामान्यपणे त्यांच्याशी गप्प होते. त्यांना त्यांची चूक कळली होती आणि ह्या गोष्टीचे अपराधी वाटत होते की बाबांना सुरुवातीपासून सामील करून घेतलं नाही. ते आतल्या आत ह्या गोष्टीसाठी क्षमा मागत होते. ते संयमाने वाट बघत बसले. मग द्वाराकाईतली गर्दी कमी झाल्यावर बाबांनी त्यांना जवळ बोलावलं. ते म्हणाले, "ए आई, आपल्या मुलाचा हात अस्थिभंग पावला तर आपण त्याला आपल्या घरातून काढून टाकत नाही. उलट आपण त्याला खाऊ घालतो आणि पोषण करतो जेणेकरून तो प्रौढ़त्व प्राप्त करेल." हे ऐकताच, ते लगेच त्यांच्या पायावरती पडले आणि त्यांचे भरपूर आभार मानले. प्रिय वाचकांनो, बाबांच्या प्रज्ञेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे योग्य शब्द नाहीत. ते खरे खुरे अंतरज्ञानी होते कारण ते कुणाच्या मनात काय चालले आहे ते वाचू शकत होते.

बाबांच्या लीला थोर होत्या आणि ते आई पुत्र सुद्धा थोर होते. तर अशा प्रकारे बाबांनी त्या गणेश मूर्तीचं रक्षण केलं जी अजूनही तर्खड कुटुंबीयांकडे पूजेसाठी आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

गणेश मूर्तीचे रक्षक साई

सनातन हिंदू धर्मात मूर्ती पुजेला महत्व आहे. अशा प्रकारे केलेली पूजा देवा पर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. परंतु असे करत असताना काही दोष होवू नये याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः देवघराचे पावित्र्य व सुचीभूर्तपणा हे राखले पाहिजेत. यासंबंधी काही संशय किंवा दुविधा असेल तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे.

====================================================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

मरीआई देवीचे भयावह दर्शन

प्रिय साई भक्त वाचकांनो, आपण २१ व्या शतकातून जात आहोत आणि म्हणून माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही ज्योतिंद्रांच्या ह्या अनुभवावर विश्वास ठेवा, जो मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. ज्यांनी साई सच्चरित्र वाचलं आहे, त्यांना माहीत असेल की एकदा शिर्डीत पटकीची (कॉलेराची) सात आली होती. गावातल्या लोकांची अशी श्रद्धा होती की जेव्हा अशी महामारी दूरदूरपर्यंत पसरते, तेव्हा मरीआई देवीकडे प्रार्थना करायची असते जेणेकरून मृत्यूंची संख्या नियंत्रणात राहील. अर्थात त्या काळात वैद्यकीय मदत आजच्या सारखी सहज साध्य आणि प्रगत नव्हती आणि साथीचे रोग पसरणे ही भारताच्या ग्रामीण भागात सामान्य गोष्ट होती. संपर्क व्यवस्था सुद्धा तेवढी विकसित नव्हती आणि म्हणून माझे वडील जेव्हा शिर्डीत पोहोचले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की शिर्डीत पटकीची साथ आहे. अर्थात, तोपर्यंत त्यांच्या मध्ये बाबांबद्दल नितांत श्रद्धा विकसित झाली होती आणि त्यांना माहीत होतं की बाबा त्यांची काळजी घेतील आणि जर का तिथे राहणे खूप धोकादायक असेल तर बाबा त्यांना त्वरित मुंबईला परत जाण्यास सांगतील. म्हणून ते निर्भय होते आणि आपले रोजचे विधी करू लागले. पुढच्या दोन ते तीन दिवसात, त्यांनी पाहिलं की मृत्यूंची संख्या वाढत आहे आणि पटकीची साथ शिर्डीच्या आजूबाजूच्या गावांत धोकादायक प्रमाणात वाढत आहे. ते आतल्या आत घाबरले. एके संध्याकाळी, नेहेमीच्या विधी प्रमाणे त्यांनी रॉकेलचे कंदील पेटवले आणि ते द्वारकामाईत ठेवत होते. बाबा जेथे नेहमी धुनीसमोर बसायचे, तिथल्या पायऱ्या माझे वडील चढून जाताच बाबा त्यांच्यावर रागावले. ते त्यांना शिव्या घालू लागले. हा ज्योतिंद्रांसाठी नवा अनुभव होता. बाबांचा राग टोकास पोहोचत होता. रागाच्या भरात ते माझ्या वडिलांना म्हणाले की मी तुझे सात तुकडे करीन आणि मशिदीत गाडीन. ज्योतिंद्र फार घाबरले. ते बाबांच्या पायावर पडले आणि क्षमा करण्याची याचना करू लागले कारण त्यांना वाटलं की त्यांनी अनावधानाने काही तरी चूक केली असावी, ज्यामुळे बाबांमध्ये राग उत्पन्न झाला असावा. मग त्याच मनःस्तिथीत बाबांनी त्यांना तिथे बसून पाय चेपण्याची आज्ञा केली. माझ्या वडिलांनी ती आज्ञा लगेच पाळली आणि त्यांच्या पायापाशी पाय चेपत बसले. त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा अजूनही काहीतरी पुटपुटत होते आणि अजूनही रागाच्या मुद्रेत कायम होते. काही वेळानंतर त्यांना घाम फुटू लागला कारण त्यांना त्यांच्यासमोर काली देवी दिसत होती जी एका भयावह मुद्रेत होती. तिची मुद्रा भयभीत करणारी होती आणि तिची जीभ रक्ताने माखलेली होती. हे दृश्य पाहिल्यावर माझे वडील आपले भान हरवून बसले. आपोआप त्यांनी आपल्या शरीरातल्या पूर्ण शक्तीनिशी बाबांचे पाय घट्ट धरले. ते त्या अवस्थेपासून वाचवण्याचा संदेश बाबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा झालेला थरकाप एवढा जास्त होता की त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हते आणि त्यांची बोबडी वळली होती. त्यांची मान फक्त दोन दिशांकडे वळत होती, बाबांकडून कालीकडे आणि उलट. ते पाहात होते की बाबा काहीतरी पुटपुटत आहेत पण नक्की काय ते ऐकण्यास व समजण्यास ते असमर्थ झाले. थोड्याच वेळात ते बेशुद्ध झाले. जेव्हा ते जागे झाले, तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की बाबा त्यांना हालवत आहेत आणि त्यांना जागे होण्यास सांगत आहेत. ते पुन्हा शुद्धीवर आले आणि घामाने डबडबले. बाबा त्यांना म्हणत होते, "ए भाऊ, मी तुला पाय चेपायला सांगितले पण तू ते एवढे घट्ट पकडून ठेवले आहेस की तुझी नख मला बोचत आहेत." माझे वडील फार तहानलेले होते आणि त्यांनी पाणी मागितलं. बाबांनी त्यांना द्वारकामाईत असणाऱ्या कोळंब्यातील (मातीच्या मडक्यातील) थोड पाणी दिलं. माझे वडील ते पाणी प्यायले आणि सामान्य स्थितीत आले. त्यांनी लगेच बाबांना अशी भयावह दृश्य न दाखवण्यास सांगितलं कारण ती झेलण्याची त्यांच्यामध्ये शक्ती नव्हती. त्यांनी त्यांना सांगितलं की पुढचे चार दिवस त्यांना अन्न ग्रहण करणं होणार नाही आणि शिर्डीत पुन्हा यायचे की नाही याबद्दल त्यांना पुनर्विचार करावा लागेल. तेव्हा बाबांनी त्यांना विचारलं "ए भाऊ, मला सांग तू नक्की काय पाहिलस ?". मग माझ्या बाबांनी ती संपूर्ण घटना विस्तृतपणे सांगितली, जी त्यांच्या स्मृतीत अजून ताजी होती. त्यांनी बाबांना विचारलं "तुम्ही त्या भयावह व्यक्तीशी काहीतरी पुटपुटत होता, पण मला काहीच ऐकायला आलं नाही कारण मी बेशुद्ध झालो." बाबांनी उत्तर दिलं "ए भाऊ, तू म्हणतोस ती भयावह व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर मरीआई होती." ती तुझं काळीज मागत होती आणि मी तिला नाही म्हणत होतो. ती निघून जायाला नकार देत होती, मग मी तिला सांगितलं की तू आणखी पाच लोकांना घेऊन जाऊ शकतेस पण मी भाऊला माझ्या पासून वेगळा होऊ देणार नाही. शेवटी तीने तो नाद सोडला आणि द्वारकामाई सोडून निघून गेली." बाबा पुढे असं म्हणाले "भाऊ एक लक्षात ठेव की मी तुला शिर्डीत मरण्यासाठी घेऊन येत नाही आणि जेव्हा तू माझ्या पायापाशी असशील तेव्हा कोणीही तुला माझ्यापासून खेचून घेऊन जाऊ शकत नाही." माझ्या वडिलांसाठी हे पुनर्जन्म झाल्या सारखच होतं. ते बाबांच्या पायावर पडले आणि पुन्हा एकदा अशी भयानक दृश्य न दाखवण्याची विनंती करू लागले कारण ते त्यांच्या झेलण्याच्या शक्ती बाहेर होतं. जेव्हापण,माझे वडील ही घटना वर्णन करून सांगायचे, ते म्हणायचे की त्या दृश्याचं स्मरण झालं तरी त्यांना रात्री झोप लागत नसे.

प्रिय साई भक्तांनो, ह्या प्रसंगातून गेल्यानंतर, मला खात्री वाटते की तुमच्या पैकी कित्येकांना शंका असतील आणि तुम्हाला स्पष्टीकरण हवं असेल, पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, कृपया ह्यावर विश्वास ठेवा. शिर्डी साई बाबा हे बाकी कोणी नसून भगवंताचे अवतार होते आणि म्हणून त्यांच्याकडे त्या दैवी शक्ती होत्या ज्या भक्तांना वाचवण्यासाठी गरजेच्या होत्या. मला खात्री आहे की असे पुष्कळ लोक असतील ज्यांनी असे जीव वाचावण्याचे प्रसंग अनुभवले असतील. बाबा स्पष्ट सांगायचे की त्यांच्या भक्ताचं वाईट शक्तीपासून रक्षण करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. ते माझ्या वडिलांना म्हणाले "भाऊ, मी शिर्डीतून देहाने निघून गेल्यावर, लोक मुंग्यांसारखे शिर्डीला येतील आणि हे लक्षात ठेव की मी द्वारकामाईतून बोलताना खोटं बोलत नाही."

प्रिय वाचकांनो, ह्या २१ व्या शतकात शिर्डीत जे काही घडून आलं आहे ते आपण सर्व पाहतो आणि अनुभवतो आहे आणि मला खात्री वाटते की जगाच्या शेवटापर्यंत हे असच चालू राहिल.

==================================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

पंढरपूरच्या श्री विठ्ठलांची भेट

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय साई भक्त वाचकांनो, मी तुमच्याकडे मला क्षमा करा अशी विनंती करतो कारण माझ्याकडे माझ्या वडिलांनी अनुभवलेल्या घटनांचा कालक्रमानुसारचा क्रम नाही आहे. माझ्या मनाला येतील तसे मी तुम्हाला कथन करतो आहे. माझे वडील जेव्हा आध्यात्मिक मनोदशेत यायचे तेव्हा आम्हाला वर्णन करून सांगायचे आणि म्हणून घटनांचा वेळेनुसारचा क्रम देणे मला शक्य नाही.

आधी सांगितल्याप्रमाणे, तर्खड कुटुंब हे साई बाबांची नित्य पूजा करू लागले आणि गुरुवारी संध्याकाळी, ते सर्व एकत्र येउन आपल्या घरी आरती करायचे. माझ्या आजीला पूर्ण मनशांती लाभली होती आणि तिची डोकेदुखी कायमची निघून गेल्याबद्दल ती खूप आनंदी होती. ती आता अध्यात्माकडे जास्त आकर्षित होत होती. ती अध्यात्मिक पुस्तके नेमाने वाचू लागली. एकदा तिने माझ्या वडिलांकडे पुण्यक्षेत्र पंढरपूरला तीर्थयात्रेला जाण्याची आणि विठुरायाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आणखी सांगितलं की पवित्र ग्रंथ सांगतात की आपण जग सोडून जाण्यापूर्वी, पंढरपूरला भेट द्यावी. माझ्या वडिलांनी तिला, बाबांची भेट घेऊन त्यांची परवानगी घ्यावी असं सुचवलं.

त्याप्रमाणे, त्यांच्या शिर्डीच्या पुढील भेटीत, तिने बाबांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी मागितली. बाबा तिला म्हणाले, "अग आई, आपल्यासाठी शिर्डीच सर्व काही आहे आणि तिथे जाण्याची गरज नाही." ती थोडी खिन्न झाली. ती बाबांना म्हणाली की भाविक पंढरपूरला जातात कारण त्यांना दृढ विश्वास आहे की श्री विठोबा तेथे आहेत आणि एकदा का त्यांचे दर्शन घेतलं की मग आपला मोक्ष प्राप्त करण्याच मार्ग मोकळा होतो.

तिने त्यांच्याकडे आपले मनोगत व्यक्त केले की तिला पंढरपूरला भेट देण्याची आणि आयुष्यात एकदा तरी विठोबाची पूजा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. बाबा तिची इच्छा खरी खुरी आहे हे जाणुन म्हणाले "आई, काळजी करू नकोस, तू पंढरपूरला जाशील आणि आपली इच्छा पुरवशिल." घरी परतताच त्यांनी बाबासाहेब तर्खड यांना याबद्दल सांगितलं आणि योग्य नियोजन करून, माझे वडील आणि माझी आजी पंढरपूरला जाण्याकरता निघाले. वाचक ह्या गोष्टीला वाखाणतील की मुसलमानांसाठी जशी मक्का आहे, ख्रिस्तीयांसाठी जसे बेथलेहेम आहे, तसेच महाराष्ट्रातल्या लोकांसाठी पंढरपूर आहे.

तिथे पोहोचल्यावर माझ्या वडिलांनी सर्व आवश्यक व्यवस्था केली.

आंघोळ करून न्याहारी केल्यावर जेव्हा सकाळची गर्दीची वेळ निघून गेल्यावर, ते पूजेचे साहित्य घेऊन विठ्ठल मंदिरापर्यंत चालत गेले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच त्यांनी मंदिराच्या पुजारी महोदायांकडे पूजा करण्यासाठी परवानगी मागितली. माझ्या आजीने आपल्याच मार्गाने पुढाकार घेऊन पूजा जवळपास पूर्ण केली. आता वेळ होती ती विठ्ठल मूर्तीला हार घालून सुशोभित करण्याची आणि इथे एक पेच निर्माण झाला. माझ्या आजीला स्वतःच्या हातांनी हार घालायचा होता पण पुजारी तसं करू देण्यास अनुमती देत नव्हते कारण ज्या मंचावर मूर्ती असते त्यावर कुणालाही चढू देत नाहित. माझ्या आजीने माझ्या वडिलांना सांगितलं की जर तिला स्वतःच्या हातांनी मूर्तीला हार घालता आला नाही तर तिची पूजा अपूर्ण राहील. माझ्या वडिलांनी तिला बाबांची प्रार्थना करून त्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला कारण त्यांनीच त्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी दिली होती. तिने आपले डोळे बंद केले आणि हातात हार धरून दोन्ही हात उंचावले, आणि श्री विठोबाला तिची पूजा स्विकारण्याची विनंती केली. मग एक चमत्कार झाला. पहा काय झालं ते ! श्री विठोबाची मूर्ती मंचावरून सरकत पुढे आली. माझ्या वडिलांनी लगेच माझ्या आजीला हलवलं. त्यांनी तिला डोळे उघडून स्वतःच पाहण्यास सांगितलं की देवाने तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आहे आणि आता ती त्यांना हाराने सुशोभित करू शकत होती. तिने त्वरित हार विठोबांच्या गळ्यात घातला आणि देव आपल्या जागी मागे गेला. आई आणि मुलगा दोघे ही श्री विठ्ठला समोर नतमस्तक झाले.

हे पाहिल्यावर, पुजारी पूर्णपणे आश्चर्यचकित आणि स्तब्ध झाला. त्याने मंचावरून खाली उडी मारली आणि माझ्या आजी आणि वडिलांचे पाय धरले आणि त्यांना विठोबा आणि रखुमाई समजू लागला आणि त्यांना जाऊ न देऊ लागला. त्याने आपल्या गर्विष्ठ वागण्याबद्दल क्षमा करण्याची विनंती केली. माझ्या वडिलांनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला म्हणाले की आमच्या ओळखीबद्दल गैरसमज करून घेऊ नये. त्यांनी त्याला सांगितले की ते शिर्डी साई बाबांचे भक्त आहेत आणि त्यांची परवानगी घेऊन ते पंढरपूरला आले आहेत. त्यांनी आणखी त्याला श्री विठोबांमध्ये कणखर श्रद्धा ठेवण्यास सांगितले जे तेथे जागृत आहे आणि केवळ पाषाणाचे देव नाहीत. त्यांनी त्याला हृदयापासून पूजा करून विठोबाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मग पुजाऱ्याला प्रसाद देण्याची विनंती केली जेणेकरून ते मंदिरातून बाहेर येवू शकत होते. त्यांनी विठ्ठल राखुमाईच्या पितळाच्य मूर्ती विकत घेतल्या आणि त्या आपल्या चंदनाच्या मंदिरात नित्य पूजेसाठी ठेवल्या.

हा अनुभव त्या दोघांसाठी स्वर्गीय आनंद मिळाल्या सारखा होता. ते जरी शुद्ध भावाने देवाची प्रार्थना करायचे तरी त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की श्री विठोबा त्यांना अशा पद्धतीने अभिवादन देईल. ह्या भेटीनंतर जेव्हा ते पुढच्या वेळी शिर्डीला गेले, बाबांनी माझ्या आजीला विचारलं "आई, तुला विठोबाची भेट झाली का?". माझ्या आजीने उत्तर दिलं "बाबा, हे सर्व तुम्ही घडवून आणलत. मी आता हे जग सोडून जायाला तयार आहे कारण माझ्या मते माझ्या आयुष्याला आता पुर्णत्व प्राप्त झालं आहे." तिने त्यांचे खूप आभार मानले.

प्रिय साई भक्त वाचकांनो, माझे वडील म्हणायचे की आपण दगडाच्या कुठल्याही मूर्तीची पूजा करतो त्यात देव नेहमी असतोच. मला एकाला प्रकर्षाने वाटतं की त्यांना ते सर्व दैवी अनुभव मिळाले ते निव्वळ त्यांचा भूतकाळाच्या सहृदय आणि पुण्य कर्मामुळे आणि निःसंशय ते सदा सर्वकाळ साईंच्या आशीर्वादरुपी कृपेच्या छत्रछाये खाली होते, ज्यामुळे हे शक्य झालं.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य : साई बाबांनी सांगितलं आहे, "जेव्हा तू माझ्या पायापाशी असशील तेव्हा कोणीही तुला माझ्या पासून खेचून घेऊन जाऊ शकत नाही.". म्हणून गुरु चरणांच्या सेवेत असण्यातचं आपला विश्राम आणि सुख आहे.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: देव तसेच संत, आपल्या भक्तांच्या भक्तीशी निगडीत प्रेमळ इच्छा पूर्ण करतात. तसेच आपल्या भक्तांबरोबर लीलाही करतात. ह्यामुळे भक्तांची भक्ती द्विगुणीत होते.

आणखी पहा, भगवान कृष्ण म्हणतात की एखाद्याने हृदयापासून आपल्या गुरूची भक्ती सेवा केली तर त्यांना ते त्यांची भक्ती सेवा करण्यापेक्षाही जास्त आवडतं. अर्थात गुरु आणि देव हे एकच आहेत.

===================================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

शिर्डीतल्या ढगफुटीत मृत्यूपासून संरक्षण

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय साई भक्त वाचकांनो, मी असं गृहीत धरतो की तुम्ही शिर्डीला एकदा तरी भेट दिली असेल. आत्ताची शिर्डी आणि त्या काळाची शिर्डी, जेव्हा माझे वडील तेथे जायचे, यांमध्ये बराच फरक आहे. त्या काळी, जेव्हा आपण कोपरगावहून शिर्डीत प्रवेश करायचो, तेव्हा तेथे एक नाला असायचा, जो आपल्याला शिर्डी गावात प्रवेश करण्यासाठी पार करणे जरुरी होते. वर्षाचा बराच काळ तो नाला सुकलेला असायचा, फक्त पावसाळ्यात तो भरून वाहायचा. आजच्या काळात आपल्याला त्याच्यावर एक छोटा पूल दिसतो, जो मुख्य रस्त्यावर आहे.

ते पावसाळ्याचे दिवस होते, जेव्हा माझे वडील शिर्डीत होते. त्यांना सकाळी लवकर उठायची सवय होती आणि मग प्रातःविधी आटपून ते काकड आरतीला जायचे. त्या घटनात्मक दिवशी, ते लवकर उठले, आणि नैसर्गिक विधी करण्यासाठी नाल्याच्या किनारी जाण्यासाठी निघाले. पाउस रिमझिम पडत होता म्हणून त्यांनी स्वतः बरोबर एक छत्री आणि टॉर्च(विजेरी) घेतला. नैसर्गिक विधी उरकत असताना त्यांनी कोणाला तरी नाल्याच्या पलिकडच्या किनाऱ्यावरून ओरडताना ऐकले. सुरुवातीला त्यांनी त्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी त्या माणसाचा पत्ता लावण्याचा प्रयत्न केला पण अंधारामुळे, त्यांच्या दृष्टीस कोणीही पडलं नाही. त्यांच्या लवकरचं असं लक्षात आलं की तो माणूस ओरडत होता आणि किनाऱ्यापासून दूर पळायला सांगत होता. तो मराठीत ओरडत होता आणि म्हणत होता "लोंढा आला रे आला पळा". माझ्या वडिलांना लोंढ्याचा अर्थ कळला नाही कारण त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झाल होतं आणि ती रांगडी मराठी भाषा त्यांना समजणं अवघड होतं. पण त्यांना जाणीव झाली की तो माणुस सर्वांना त्या जागेवरून पाळायला सांगत होता. त्यांनी घाईघाईने आपला विधी उरकला आणि उभे राहिले आणि आजूबाजूला काय चाललं आहे ते जाणुन घेण्यासाठी आपली विजेरी पेटवली.

लवकरच त्यांच्या असं लक्षात आलं की काळ्या रंगाच्या पाण्याचा एक मोठा ओघ, जो १५ ते २० फुट उंच होता, तो त्यांच्या दिशेने येत आहे. रात्रीच्या वेळी, एका दूरच्या ठिकाणी ढगफुटी झाली होती, ज्यामुळे नाल्यात अचानक पूर आला होता. त्यांना जाणवलं की आपला अंत जवळ आला आहे आणि ओरडून म्हणाले "बाबा मेलो मला वाचवा". त्यांनी डोळे बंद केले आणि तेथेच स्तब्ध उभे राहिले आणि एकसारखं बाबांचं नाव घेऊ लागले. काही वेळाने त्यांच्या असं लक्षात आलं की आपण वाहून गेलो नाही आहोत आणि अजून जिवंत आहोत. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी जे पाहिलं ते अविश्वसनी होतं. पाण्याच्या ओघाचे दोन फाटे फुटले होते आणि ते त्यांना स्पर्श न करता त्यांच्या दोन बाजूंनी निघून जात होते. त्या घोंघावणाऱ्या पाण्याच्या मधोमध ते स्तब्ध उभे होते. ते मृत्युसम घाबरले होते आणि एकसारखे बाबांचे नाव घेत (नामस्मरण करत) होते. काही वेळाने, पाण्याची पातळी कमी झाली आणि जेव्हा ती गुढग्या एवढी झाली तेव्हा पाण्याने त्यांच्या शरीराला स्पर्श केला. आता ते गुढग्या एवढ्या पाण्यात उभे होते. त्यांना आपल्या आजूबाजूला झाडाच्या फांद्या, ----, जनावरं इ. पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसले. त्यांनी तिथल्या तिथे बाबांचे आभार मानले कारण त्यांच्या हे लक्षात आलं की फक्त बाबांनीच त्यांना त्या निश्चित मृत्यूच्या अवस्थेतून वाचवलं होतं. ते नंतर हळू हळू गुडघ्याभर पाण्यातना मागे चालत आले. ते आपल्या राहण्याच्या जागी परत आले आणि आंघोळ केली. आता हे सांगायची गरज नाही की त्या पहाटेची त्यांची काकड आरती चुकली होती. त्यांनी आपल्या आईला त्या दिवशी सकाळी ते कुठल्या अनुभवातून गेले ते सांगितलं. तिने त्यांना सल्ला दिला की बाबांनी त्यांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले होते, म्हणून त्यांनी त्वरित बाबांकडे जावे आणि त्यांचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानावे. ते पटकन द्वारकामाईकडे गेले आणि जेव्हा पूजेचं साहित्य हातात धरून पायऱ्या चढू लागले, तेव्हा बाबा चढ्या आवाजाने म्हणाले, "ए भाऊ आज भल्या पहाटे, तू माझ्या मदतीसाठी का ओरडत होतास आणि तू मृत्युला घाबरतोस का?" माझे वडील त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले आणि बाबंना म्हणाले की ते सर्व जाणतात आणि त्यांच्यासाराखा एक सामान्य माणूस, स्वतःच्या डोळ्यासमोर निश्चित मृत्यूचे दृश्य पाहून निश्चितपणे घाबरेल. बाबांनी मग त्यांच्या दोन्ही खांद्यांना धरत त्यांना वर उठवलं आणि म्हणाले "ए भाऊ उठ. मी तुला शिर्डीत आणतो ते काही मरण्यासाठी नव्हे. कृपया लक्षात ठेव की तू असा सहजासहजी मरणार नाहीस, कारण तुला भविष्यात फार रचनात्मक कार्य करायचं आहे."

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला समजतं की आपल्या सारख्या सामान्य लोकांना असा अनुभव समजणे कठीण आहे. मग माझ्या आयुष्यात एक विचार करायला लावणारी घटना घडली, जी मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे.

माझी स्मृती बरोबर असेल तर हे १९६२ च्या जुन महिन्यात घडलं. वांद्र्याच्या न्यू चित्रपटगृहात एक प्रसिद्ध चित्रपट लागला होता. चित्रपटाचं नाव होतं "टेन कमांडमेंट्स". ह्या चित्रपटाची निर्मिती केली होती सेसिली बी डीमिली यांनी जे हॉलीवूडचे एक खूप प्रख्यात निर्माता होते. ह्या चित्रपटाने कुलाब्यातील रिगल चित्रपटगृहातील पूर्वीचे सर्व विक्रम तोडले होते आणि वांद्र्याच्या न्यू चित्रपटगृहाचे ७० एम एम पडदा लावून तसेच स्टीरियोफोनिक ध्वनी यंत्रणा लावून नुतनीकरण करण्यात आले होते. मी तो चित्रपट पाहिला आणि माझ्या असं लक्षात आलं की चित्रपटात दाखवलेले चमत्कार हे माझ्या वडिलांनी शिर्डीच्या साई बाबांच्या संगतीत अनुभवलेल्या चमत्कारांशी जुळत आहेत. खूप विनवणी करून मी माझ्या वडिलांना माझ्याबरोबर येऊन चित्रपट बघण्यासाठी तयार केलं. कदाचित ३०-३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर, ते सिनेमागृहात चित्रपट बघण्याकरिता येत होते. त्यांनी ती दृश्य पाहिली. मोसेस जेव्हा पर्वतावर जातात तेव्हा त्यांना दिव्य प्रकाश दिसतो. इजिप्तचा भूप्रदेश सोडून मोसेस आपल्या सर्व ज्यू बांधवांना घेवून लाल समुद्राच्या तीरावर येतात आणि भगवंताकडे प्रार्थना करतात आणि मग समुद्राचे पाणी दोन भागांमध्ये विभाजित होतं ज्याने मध्ये पायवाट तयार होते ज्यावरून ते जाऊ शकतात आणि स्वतःला फारोहा राजाच्या क्रोधापासून वाचवू शकतात. माझ्या वडिलांना ते चित्रीकरण पाहून खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जेव्हा ते सिनेमागृहाच्या बाहेर आले, तेव्हा त्यांनी मला या गोष्टीची पुष्टी केली की शिर्डीच्या साई बाबांकडे सुद्धा तशाच प्रकारच्या दैवी शक्ती होत्या आणि ते "टेन कमांडमेंट्स" या चित्रपटातल्या मोसेसच्या पात्रासाराखेच होते. ते आणखी म्हणाले "वीरेंद्र, शिर्डीच्या साई बाबांच्या सानिध्यात ज्या अभूतपूर्व अनुभवांतून मी गेलो, त्यांवर विश्वास ठेवण्यासाठी आता तरी तुझ्या कडे काही कारण आहे."

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: जल, वायू, अग्नी, पृथ्वी व आकाश या पंचतत्वांपासून जग बनलं आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, सर्व जीवांना या पंचतत्त्वांपासून धोका संभवतो.

संतांचं पंचतत्त्वांवर पूर्ण नियंत्रण असल्यामुळे त्यांच्याकडे भक्तांना या धोक्यापासून रक्षण करण्याचं पूर्ण सामर्थ्य असतं.

=====================================================================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

मृत शरीराच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

मला पूर्ण खात्री आहे की कित्येक साई भक्तांना असे दैवी अनुभव आले असतील आणि म्हणून बाबांचं नाव आणि कीर्ती सर्व भूभागांवर सर्वत्र पसरली. माझी ओळख श्रीमती भकुनी यांच्याशी झाली ज्या नवी दिल्लीच्या नजीक असलेल्या छत्रपूर येथील श्री साई मंदिराशी संबंधित आहेत. त्या साहित्यात पी. हेच. डी. करत आहेत आणि त्यांनी निवडलेला विषय आहे साई बाबा. त्यांनी बाबांवर फार संशोधन कार्य केलं आहे. त्यांचं संस्थान हिंदी मध्ये एक तिमाही मासिक प्रकाशित करत आहे आणि ते फार शिक्षाप्रद आहे. अर्थात बाबांच्या जीवन काळाच्या वेळी, त्यांचा संदेश मुंबई आणि महाराष्ट्रभर पसरवला तो मुखत्वे दासगणू महाराजांनीच. बाबा त्यांना "गण्या" म्हणून संबोधायचे. दासगणू महाराज किर्तन करायचे ज्यातून ते बाबांच्या लीलांची छाप लोकांवर पाडायचे आणि त्यांचा संदेश पण लोकांपर्यंत पोहोचवायचे.

एकदा दासगणू शिर्डीत मुक्कामी असताना, त्यांना शिर्डी नजीक एका गावात किर्तनास बोलावण्यात आले. दासगणू महाराज आपले किर्तन सुरु करण्यापूर्वी बाबांचा फोटो एका स्टूलवर ठेवत असत आणि त्याला हार घालत असत. अर्थात, किर्तन शिर्डी नजीक असले तर ते निघण्यापूर्वी बाबांचे आशीर्वाद घेत असत. एके दुपारी ते द्वारकामाईत आले आणि त्यांनी बाबांना सांगितलं की ते संध्याकाळी एका जवळच्या गावात किर्तनासाठी जाणार आहेत आणि म्हणून त्यांना बाबांच्या आशीर्वादाची गरज आहे. बाबांनी त्यांना जाण्यास अनुमती दिली पण भाऊंना (माझ्या वडिलाना) स्वतः बरोबर घेऊन जाण्यास सांगितले.

दासगणू म्हणाले की त्यांना माझ्या वडिलांना स्वतः बरोबर घेऊन जाण्यास काहीच हरकत नव्हती पण त्यांना त्यांच्या संध्याकाळी द्वाराकामाईत रॉकेलचे कंदील लावण्याच्या विधीपासून वंचित करायचे नव्हते. हे ऐकल्यावर बाबा म्हणाले की द्वारकामाईतल्या दिव्यांची काळजी करायची त्यांना गरज नाही कारण कोणीतरी दुसरी व्यक्ती ते काम करेल पण दासगणुंनी भाऊंना स्वतः बरोबर घेऊन जावे असा त्यांनी आग्रह केला. दासगणू आणि माझे वडील (जे तेथे उपस्थित होते) या दोघांनाही हे समजलं की ही निव्वळ बाबांची आज्ञा आहे. मग ठरलेल्या वेळेनुसार, संध्याकाळी ते त्या गावी जाण्यास निघाले. ते गाव ७ ते ८ कि. मि. दूर होते. त्या काळी आजच्या सारखी वाहतूक व्यवस्था नव्हती, म्हणुन त्यांना चालत जावं लागलं. ते गावात पोहोचेपर्यंत सुर्य आधीच मावळला होता. त्यांनी जमिनीवर चटया अंथरल्या, स्टूल ठेवला ज्यावर बाबांचा फोटो होता आणि त्या फोटोला हार घातला. त्यांनी रॉकेलचे कंदील पेटवले आणि चार कोपऱ्यात ते टांगले. गावकरी जमा झाले होते आणि दासगणू महाराजांनी आपले किर्तन सुरु केले. जेमतेम एक तास उलटून गेल्यानंतर जेव्हा रात्र झाली होती, तेव्हा त्यांना एका संकटाला तोंड द्यावे लागले.

काळ्या वर्णाचे ७ ते ८ लोक तेथे आले. बहुधा ते भिल्ल जमातीचे होते. ते स्वतःच्या खांद्यावर एक मृत शरीर घेऊन चालले होते आणि ते अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी कडे चालले होते. त्यांचा पुढारी थेट दासगणू महाराजांकडे आला आणि त्यांना धाक दाखवू लागला. त्याने स्टुलवर असलेल्या फोटो बद्दल विचारले. दासगणुंनी विनम्रतेने समजावून सांगितले की फोटो साई बाबांचा आहे जे शिर्डी येथे वास्तव्य करतात, आणि ते त्यांना गुरु तसेच देव मानून त्यांची पूजा अर्चा करतात. त्यांनी आणखी सांगितलं की साई बाबा गरीब लोकांना औषध देतात आणि त्यांना त्यांच्या वेदने पासून सोडवतात. ते त्यांचे किर्तन करत आहेत जेणे करून गावकऱ्यांना सुखाची प्राप्ती होइल. मग त्या भिल्लांच्या पुढाऱ्याने आपल्या माणसांना प्रेत खाली ठेवण्यास सांगितलं आणि दासगणूंना संबोधून म्हणाला की जर त्यांचा देव जर इतका पराक्रमी असेल तर त्या देवामध्ये त्या मृत शरीरात पुन्हा जीवन टाकण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. त्याने त्यांना तसं करण्याचं आव्हान दिलं आणि तसं नाही केलं तर त्यांना व त्यांच्या मंडळींना ठार करण्याची धमकी दिली. दासगणू फार घाबरले आणि ते माझ्या वडिलांकडे येउन त्यांचा सल्ला मागू लागले.

माझ्या वडिलांना जाणवलं होतं की ही बहुधा बाबांचीच निर्मिती असावी आणि आपण त्यांनाच निवेदन केलं पाहिजे आणि आपल्या मदतीला धाऊन येण्यासाठी त्यांच्या दयेची याचना केली पाहिजे. त्यांनी दासगणूंना "साई रहम नजर करना, बच्चो का पालन करना" हे प्रसिद्ध किर्तन करण्याचं आणि बाकी सर्व साईंवर सोपवण्याचं सुचवलं. मग दासगणूंनी आपलं लोकप्रसिद्ध किर्तन करण्यास आरंभ केला आणि ते त्यात इतके तल्लीन झाले की माझ्या वडिलांनी त्यांना तशा अवस्थेत पूर्वी कधीच बघितलं नव्हतं. ते अक्षशः नाचू लागले आणि सर्व गावकरी त्यांना साथ देऊ लागले. माझे वडील तर त्या मृत शरीरावर नजर ठेउन होते. जवळ जवळ १ तास उलटून गेला असेल तोच एक अभूतपूर्व गोष्ट घडली. त्या मृत शरीरात पुन्हा प्राण आले होते. जिवंत झालेल्या भिल्लाने स्वतः भोवती बांधलेल्या सर्व दोऱ्या तोडुन टाकल्या आणि उठुन तिरडीवर बसून राहिला आणि टाळ्या वाजवून इतर लोकांबरोबर किर्तनात सहभागी झाला. माझ्या वडिलांना हे बघून अत्यानंद झाला. ते आपल्या जागेवरून उठुन दासगणूंकडे गेले, जे त्या वेळी स्वतःला विसरून गेले होते कारण ते गढून गेले होते. माझ्या वडिलांनी त्यांना त्यांच्या दोन्ही हातांनी पकडलं आणि किर्तन थांबावायाला सांगितलं. बाबांनी त्यांना स्वतःचे जीव गमावण्याच्या भीती पासून वाचवलं होतं. किर्तन थांबलं. ते भिल्ल जागेवरून उठले. त्यांनी त्या मृत शरीराला (जो आता मृत नव्हता) स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. त्यांनी त्याला दासगणूंना नमस्कार करायला सांगितलं आणि मग बाबांबद्दल सखोल माहिती विचारली आणि त्यांचं दर्शन घेण्याकरिता शिर्डीला येण्याचं वचन दिलं.

पुढच्या दिवशी जेव्हा दासगणू आणि माझे वडील द्वारकामाईत गेले, तेव्हा बाबा म्हणाले, "ए गण्या, काल बरं झालं की माझा भाऊ तुझ्या बरोबर होता, नाहीतर भिल्लांच्या क्रोधापासून तुला कोणी वाचवलं असतं ?". हे ऐकून दोघेही बाबांना म्हणाले की ही सर्व त्यांचीच निर्मिती होती आणि अशा परिस्थितींमध्ये ते त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि बाबांनी त्यांच्या कृपाशीर्वादाची वृष्टी त्यांच्यावर चालू ठेवावी.

प्रिय वाचकांनो, येथे तुमच्या मनामध्ये सर्व प्रकारच्या शंका येतील. मी फक्त ह्या घटनेवर विश्वास ठेवण्याची तुम्हाला विनंती करू शकतो. असं असू शकेल की ते मृत शरीर मृत नसेल तर बेशुद्ध असेल. पण महत्त्वाची गोष्ट अशी की बाबांना कीर्तनाच्या वेळी काय घडणार आहे हे आधीपासून ठाउक होते किंवा असं असु शकेल की दासगणुंमध्ये आत्माविश्वास निर्माण व्हावा म्हणून बाबांनी हे मुद्दाम घडवून आणले असेल. स्वतःकडे लोकांना कस खेचायचं हे बाबांना चांगलं ठाउक आहे आणि हे असचं चालू राहणार आहे. आपण आपली श्रद्धा त्यांच्यावर दृढ ठेवली पाहिजे.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: आपल्या भक्तांची भक्ती व श्रद्धा दृढ व्हावी म्हणून संत जाणून बुजून परीक्षा घेणारे प्रसंग घडवून आणतात. अशा समयी गांगरून न जाता, जर का श्रद्धा बळकट ठेवली तर आपण यशस्वी होतो आणि आपली आध्यात्मिक प्रगती देखील होते.

===================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साईंनी घेतलेली सुवर्ण परीक्षा

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला असं वाटतं की मी आतापर्यंत सांगितलेले अनुभव तुम्हाला आवडले असतील. आपली सामान्य जीवन पद्धती अशी असते की आपण आधी कुटुंबरुपी आवरण घालून घेतो आणि मग आपल्याला जीवनाचे चांगले वाईट अनुभव येतात. त्यातून जाताना आपण कायमची मनःशांती प्राप्त करण्यासाठी अधात्माकडे आकर्षिले जातो. पण माझ्या वडिलांच्या बाबतीत ही पद्धती एकदम उलटी होती. ते पहिल्यांदा सर्व पवित्र अनुभवांतून गेले आणि मग त्यांना कठीण अशा कौटुंबिक जीवनाच्या कुरबुरींतून जावे लागले. एक गोष्ट स्पष्ट होती की, त्यांना साई बाबांचे सानिध्य लाभल्यामुळे, बहुतेक त्यांना कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची कला अवगत झाली होती. मला सुद्धा असं वाटतं की भक्ती मार्ग असा आहे की, एखाद्याने त्याचा अंगीकार केला की, मग तो जीवनातील कोणत्याही भीतीला सामोरा जाण्यासाठी सुसज्ज होतो.

आता पर्यंत माझ्यां वडिलांनी शिर्डीला कित्येक वेळा गमन केलं होतं आणि ते दिव्य अनुभवांनी बरेच समृद्ध झाले होते. काही आव्हानात्मक क्षणांना सामोरे जाण्याची त्यांची वेळ आली होती. ते हिवाळ्याचे दिवस होते, जेव्हा दिवस छोटे होते आणि रात्री मोठ्या होत्या. अशाच एके दिवशी, जेव्हा सूर्यास्तानंतर आकाशात चमकणाऱ्या चांदण्या दिसू लागल्या, तेव्हा बाबांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर येण्यास सांगितले. हे अनपेक्षित आमंत्रण होते कारण दिवसाच्या त्या प्रहरी बाबा द्वारकामाई सोडून कधीच जात नसत. ते लेंडी बागेच्या दिशेने चालत गेले आणि मग तिला पार करून ते (आधीच्या धड्यात वर्णन केलेल्या) नाल्याच्या तीरापाशी आले. तोपर्यंत पुष्कळ अंधार झाला होता आणि आकाशात चंद्र उगवला होता. मग बाबा माझ्या वडिलांना म्हणाले की ते त्यांना काही गंमत दाखवणार आहेत आणि ह्या कारणासाठीच ते त्यांना त्या जागी घेऊन आले आहेत. माझ्या वडिलांना फार आनंद झाला कारण त्यांना काही का असेना, बाबांचा वैयक्तिक व विशेष असं लक्ष भेटत होतं. मग ते खाली बसले आणि बाबा मऊ माती आपल्या हातने बाजूला करू लागले. त्यांनी मग माझ्या वडिलांना मातीकडे बघून काही दिसतं का ते विचारले. माझ्या वडिलांनी बघून, नाही असं उत्तर दिलं. बाबांनी मग तेच पुन्हा केलं आणि माझ्या वडिलांनी त्या जागेवरती दुसऱ्यांदा पाहिलं आणि म्हणाले की मला फक्त माती दिसत आहे. बाबांनी मग तसच तिसऱ्यांदा केलं आणि ह्या वेळी माझ्या वडिलांच्या डोक्यावर, मागच्या बाजूस हाताने टपली मारली आणि काळजीपूर्वक पाहण्यास सांगितलं. जेव्हा माझ्या वडिलांनी त्या जागी पाहिले, तेव्हा त्यांना तेथे कोणतातरी चमकणार धातू दिसला आणि तो चंद्रप्रकाशामुळे आणखी चमकत होता. बाबांनी माझ्या वडिलांना काही दिसत आहे का ते विचारलं. माझ्या वडिलांनी मग उत्तर दिलं की तो धातूचा कोणतातरी पदार्थ आहे आणि तो चमकत आहे. मग बाबा त्यांना म्हणाले "भाऊ, तो पदार्थ बाकी काही नसुन, सोनं आहे आणि तुला जेवढे पाहिजे तेवढे तू घेऊ शकतोस." मग माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं "बाबा, मला हे नको आहे. तुमच्या आशीर्वादाने आमच्याकडे सर्व काही आहे आणि मी शिर्डीला येतो ते काही तुमच्याकडून अशा भौतिक गोष्टी प्राप्त करण्याच्या इच्छेने नव्हे. मग बाबा त्यांना सावध करत म्हणाले की, "भाऊ, ही देवी लक्ष्मी आहे. ती तुझ्यावर प्रसन्न आहे आणि जर का तू तिने देऊ केलेला वर नाकारलास तर ती पुन्हा कधीही तुझ्याकडे परत येणार नाही, कमीतकमी या जन्मात तरी नाही. म्हणुन पुनर्विचार कर". मग माझे वडील त्यांना म्हणाले, "बाबा, तुम्ही मला कुठल्यातरी अग्नी परीक्षेत टाकताय आणि मी ह्या 'माये'ला बळी पडणार नाही. आणि एकदा का तुमचे आशीर्वाद माझ्याबरोबर असले की मी या मायेशिवाय शांती आणि सुखाचं आयुष्य जगू शकतो. मग बाबांनी माती पुन्हा जागेवर सरकवली आणि दोघे द्वारकामाईला परत आले.

त्या वेळी एक गमतीदार गोष्ट घडली. शिर्डीतील एका ग्रामस्थाने नाल्याच्या किनारी काय घडले ते पाहिलं होतं. त्याने अंदाज केला की साई बाबांनी माझ्या वडिलांना तेथे जमिनीखाली गाडलेला खजिना दाखविला असावा. त्याने रात्री उशिरा तेथे येऊन, खणून, खजिना बाहेर काढण्याचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे तो मध्यरात्री खजिना शोधण्याच्या उपक्रमाकरिता उठला. पण अरेरे ! त्याने कुदळ उचलण्याकरता हात खाली घेताच, एक विंचू त्याला बोटांवर चावला आणि तो रात्रभर अस्वथ राहिला. सकाळ होईपर्यंत त्याच्या वेदना असह्य झाल्या होत्या म्हणून त्याने शहाणपणे साई बाबांकडे जाऊन चूक कबुल करण्याचा निश्चय केला. त्याच्या लक्षात आले होते की तो त्याचा आदल्या रात्रीचा खजिना शोधण्याचा कट बाबांशिवाय आणखी कोणालाही सांगू शकत नव्हता. जेव्हा तो द्वारकामाईमध्ये आला, तेव्हा तो तीव्र वेदनेत होता. माझे वडील तेथेच होते. त्यांनी पाहिलं की तो ग्रामस्थ बाबांकडे आपली चूक कबुल करत होता आणि म्हणत होता की मी असं पाप पुन्हा कधीही करणार नाही पण बाबांकडे तो विंचू दंशामुळे होणाऱ्या तीव्र वेदनेपासून सुटका व्हावी म्हणून विनंती करत होता. बाबा त्याला म्हणाले की ज्याच्या नशिबी तो खजिना होता त्याने तो घेण्यास नकार दिला, याचा अर्थ असा नाही की कोण्या दुसऱ्या माणसाला तो भेटेल. ह्या जगात देवाने एक नियम बनवला आहे की प्रत्येकाला आपल्या 'कर्मा' प्रमाणे भेटेल आणि जर कोणी हा नियम तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला देवाकडून शिक्षा ही व्हायचीच. माझ्या वडिलांना ते संभाषण समजलं. बाबांनी मग आपली पवित्र 'उदी' विंचू दंश झलेल्या त्याच्या बोटाला लावली आणि त्याला भविष्यात गैरवर्तन न करण्यास सांगीतले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, की देव त्याला त्याच्या असह्य वेदनेतून सुटका करेल.

तर अशी होती ती 'सुवर्ण परीक्षा' जी माझ्या वडिलांना शिर्डीत सामोरी जावी लागली. आणि मला वाटतं की ते त्यात यशस्वी झाले कारण ते मायेला बळी पडले नाहित. पण एक गोष्ट खरी आहे की ते आपल्या भविष्यातील कारकीर्दीत संपत्ती गोळा करू शकले नाहित. देवी लक्ष्मीने त्यांच्या कडे जाण्याचं टाळलं होतं आणि त्यांची आर्थिक स्थितीही तशीच होती पण आपण त्या इतिहासात जाण्याचं टाळूया.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

तात्पर्य: साई बाबांनी इथे काय म्हटलं आहे ते गंभीरतेने ध्यानात घेण्याची गरज आहे - "ह्या जगात देवाने एक नियम बनवला आहे की प्रत्येकाला आपल्या 'कर्मा' प्रमाणे भेटेल आणि जर कोणी हा नियम तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला देवाकडून शिक्षा ही व्हायचीच."

याचा सरळ अर्थ असं आहे की कोणाकडे किती धन-संपदा असेल ह्याचा निर्णय त्याने (पैशाचा वापर करून) केलेल्या सत्कर्मावर घेतला जातो. जर एखाद्याने आपल्या पैशाचा वापर अन्नदान करण्यासाठी किंवा देवळात किंवा ब्राम्हणांना दक्षिणा देण्यासाठी किंवा एखाद्या सामाजिक कार्यासाठी केला (जसे गरजवंतांच्या कल्याणासाठी राबवलेले प्रकल्प ई.) तर भविष्यात त्याला कित्येक पट अधिक धन-संपत्तीची प्राप्ती होते. साई बाबांनी म्हटलेलं आहे की "धन प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो दान देणे हा आहे".

हा एवढा सरळ-सोपा मार्ग असतानाही आपण पाहातो की समाजामध्ये कित्येक लोक निर्धन अवस्थेत जीवन जगत असतात. ह्याचं कारण हेच की त्यांनी आधी दान-धर्म केलेला नसतो. उलट आपल्या पैशाचा वापर फक्त स्वार्थासाठी तसेच इंद्रिय सुख उपभोगण्यासाठी केलेला असतो. तसेच काही मंडळीनी चुकीच्या मार्गाने (लांडी लबाडी करून किंवा भरमसाठ हुंडा घेऊन ई. मार्गाने) धन अर्जित केलेलं असतं. तसेच पैशाच्या बाबतीत गैरव्यवहार केलेला असतो (एका कामासाठी लोकांनी दिलेले पैसे त्या कामासाठी न वापरता, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणे ई.) आणि लोकांची फसवणूक केलेली असते. याची शिक्षा म्हणून त्यांना भविष्यात गरिबीत जीवन कंठावं लागतं. म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.

येथे अजून एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या कमाईचा वापर आपल्या मुलभूत गरजा (जसे अन्न, वस्त्र, निवारा ई. ) भागवण्यासाठीही केला पाहिजे. आणि दान-धर्म करताना, तो केलेल्या ठिकाणी, त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच योग्य ठिकाणी दान-धर्म केला पाहिजे.

थोडक्यात सांगायचं तर,

१. माणसाने प्रामाणिक मार्गाने धन अर्जित केलं पाहिजे आणि

२. आपल्या कमाईतील काही भाग (कमीतकमी १० टक्के) तरी परोपकारासाठी खर्च केला पाहिजे आणि

३. स्वार्थासाठी पैशाचा गैरवापर पूर्णपणे टाळला पाहिजे.

हे तीन नियम पाळले तर मग त्याला जीवनात काही कमी पडणार नाही, हे निश्चित.

=================================================================================6

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय

ॐ श्री साईनाथाय नमः

मी तुमच्या पुढे तर्खड कुटुंबियांच्या अनुभवांचा खजिना उघडून ठेवला आहे आणि मला खात्री वाटते की तो वाचल्यावर तुमचा बाबांवर असलेला विश्वास द्विगुणीत झाला असेल. आता आपण साई सच्चरित्रात दिलेल्या अनुभवांकडे वळणार आहोत.

मी साई सच्चरित्रातील ९ व्या अध्यायाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. अर्थात इथे मी गृहीत धरतो की आपले वाचक ह्या पवित्र ग्रंथाबद्दल सुज्ञ आहेत आणि त्यांनी तो कमीतकमी एक वेळ तरी वाचला असेल. जर आपण तसं केलं नसेल तर माझी नम्र विनंती आहे की कृपया तसं करावं. तो ग्रंथ शिर्डी साई बाबांच्या जीवन चरित्राचे फार सखोल वर्णन करतो आणि त्यांनी शिर्डीतील आपल्या आयुष्य कालखंडात आपल्या भक्तांसाठी केलेल्या विविध लीलांचे ही वर्णन करतो. ह्या पवित्र ग्रंथाचा ९ वा अध्याय हा मुख्यतः तर्खड कुटुंबाप्रती समर्पित आहे, म्हणजेच माझी आजी, माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड उर्फ बाबासाहेब तर्खड आणि माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांच्या प्रती. आधी सांगितल्या प्रमाणे तर्खड कुटुंबीय हे पक्के प्रार्थना सामाजीष्ट होते आणि त्यांचा मूर्ती पूजेवर विश्वास नव्हता. त्या बाबतीत त्यांचा देवावर विश्वास नव्हता. पण त्यांच्या नियतिने त्यांना शिर्डी साई बाबांच्या संपर्कात आणले आणि मग एक फार मोठा बदल घडला. तसं पाहिलं तर साई बाबांची विख्यात आरती सांगते की त्यांच्या कडे नास्तिकालाही, देवावर पूर्ण श्रद्धा असलेला बनवण्याचं सामर्थ्य आहे. (नास्तीकांनाही तू लाविसी नीज भजनी). तर्खड कुटुंबियांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडलं.

साई सच्चरित्राचे लेखक कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर ९ व्या अध्यायात सांगतात की बाबासहेब तर्खड हे फार भाग्यवान होते जेणेकरून त्यांना माझ्या वडिलांसारखा पुत्र मिळाला, जो देवाची फार चांगली पूजा करायचा. माझे वडील पहाटे ४ वाजता उठायचे आणि आंघोळ केल्यानंतर ते घरातील देव्हाऱ्यातल्या बाबांच्या तसबिरीला चंदनाचा लेप लावून बाबांची आरती करायचे. ते चांदीचे निरंजन लावायचे ज्यात बाबांनी दिलेलं १ पैश्याचं नाणं ठेवलेलं होतं. आणि खडी साखरेचा नैवेद्य प्रसाद म्हणून रोज दाखवला जायाचा, जो ते सर्व दुपारच्या जेवणाच्या वेळी खायचे. पूजा झाल्यानंतर वडील व मुलगा हे दोघे भायखळा येथील आपल्या कापड गिरणीत जायला निघायचे. बाबांच्या कृपेने त्या काळात माझे आजोबा दर महा ५००० रुपये व माझे वडील २००० रुपये एवढे वेतन प्राप्त करत होते. एकदा माझ्या आजोबांना बाबांना सुताचे ताग पाठवण्याची इच्छा निर्माण झाली, ज्याचा वापर करून ते स्वतःच्या वापरासाठी कफनी शिवू शकले असते. त्यांनी ज्योतींद्राला आपल्या आई बरोबर शिर्डीला जाण्याचं व ते साहित्य बाबांना देणाचं सुचवलं. पण ज्योतिंद्र हा काही जायाला तयार नव्हता कारण मग घरातील पूजा कोणी केली असती? मग माझ्या आजोबांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्याला आश्वासन दिलं की तो करायचा त्याप्रमाणे ते पूजा विधी करतील आणि त्या बाबतीत कोणतीही उणीव राहणार नाही. हे आश्वासन मिळाल्यावर माझे वडील त्यांच्या आई बरोबर शिर्डीला रवाना झाले. पुढचे २ दिवस सुरळीत गेले पण तिसऱ्या दिवशी माझे आजोबा पूजेच्या वेळी खडी साखरेचा नैवेद्य दाखवायला विसरले. हे त्यांच्या लक्षात आलं ते दुपारीच जेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटात प्रसादाची खडी साखर नव्हती. ते लगेच उठले आणि त्यांनी शिर्डीतील ज्योतिंद्र यांना पत्र लिहून त्यांच्या घोड चुकीबद्दल बाबांकडे माफी मागण्यास सांगितलं.

तेथे शिर्डीत त्या वेळी एक मनोरंजक गोष्ट घडली. द्वारकामाईतील मध्यान्ह आरती नंतर, जेव्हा माझी आजी आणि वडील बाबांकडे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले, बाबा माझ्या आजीला म्हणाले "अग आई! आज मी फार भुकेला आहे. नेहमीप्रमाणे मी वांद्र्याला गेलो, आणि पाहिलं की दार बंद आहे पण कोणीही मला अडवू शकत नाही कारण मी दाराच्या फटीतून आत गेलो पण पूर्णपणे निराश झालो कारण मला दुपारच्या जेवणाकरिता काहीच भेटलं नाही आणि मला उपाशी पोटी परत यावं लागलं". माझ्या आजीला बाबा काय म्हणत होते ते काहीच कळलं नाही पण माझ्या वडिलांनी लगेच ताडलं की त्यांचे वडील सकाळच्या पूजेच्या वेळी बाबांना प्रसाद दाखवायला विसरले असावेत. त्यांनी बाबांकडे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या घोड चुकी बद्दल क्षमा करण्याची विनंती केली आणि मुंबईला त्वरित जाण्याची परवानगी मागितली. बाबांनी परवानगी दिली नाही आणि आणखी काही दिवस राहण्यास सांगितलं. तरीही माझे वडील अधीर झाले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना पत्र लिहून बाबा काय उद्गारले त्याचा तपशील कळवला. दोन्ही पत्र एकमेकांना मिळाली आणि ती वाचल्यावर पिता पुत्र दोघांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू आले. त्यांना बाबांचे त्यांच्यावरील प्रेम किती अगाध आहे याची जाणीव झाली. दुसऱ्या दृष्टीकोनातून बघायचं झालं तर बाबांनी त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली की ते त्या तसबिरीत निश्चितपणे जिवंत आहेत आणि ते त्यांनी दाखवलेला नैवेद्य न चुकता स्वीकार करतात.

एकदा ते शिर्डीत असताना, माझी आजी तीचं दुपारचं जेवण घेणार होती इतक्यात एक कुत्रा तिथे आला आणि आपली शेपटी हलवू लागला. माझ्या आजीने त्याला चपातीचा एक तुकडा टाकला जो त्याने आवडीने खाल्ला आणि तिथून निघून गेला. थोड्या वेळाने चिखलाने संपूर्णपणे माखलेला एक डुक्कर तिथे आला. सामान्यपणे असा घाणेरडा दिसणारा जीव पाहिल्यानंतर एखाद्याला जेवणाचा घास गळ्याखाली उतरवणं जड जाईल पण माझी आजी फार दयाळू व देवा मध्ये श्रद्धा ठेवणारी होती. तिने चपातीचा तुकडा त्या कुरूप डुकराला सुद्धा दिला. डुकाराने तो तुकडा खाल्ला आणि निघून गेला. मग त्याच दिवशी नंतर जेव्हा ते द्वारकामाईत गेले आणि बाबांच्या जवळ पोहोचले तेव्हा ते तिला म्हणाले "अग आई, तू आज मला स्वतःच्या हाताने भरवलस आणि ते जेवण एवढं चमचमीत होत की मी अजूनही ढेकर देत आहे." माजी आजी हे ऐकून आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली "बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तुम्हाला शिर्डीत असताना कधीही अन्न दिलेलं नाही, कारण काही झालं तरी मी इथे जेवण बनवतच नाही.

खर हे आहे की मी स्वतः श्री सगुण यांनी चालवलेल्या इथल्या एका खानावळीत पैसे देवून जेवते". मग बाबा तिला म्हणाले "अग आई, आज दुपारी, जेव्हा तू जेवण करत होतीस, तेव्हा तू एका कुत्र्याला आणि मग एका कुरूप दिसणाऱ्या डुकराला नाही का अन्न दिलस? ते अन्न माझ्या पर्यंत पोहोचलं." मग माझी आजी त्यांना म्हणाली, "बाबा याचा अर्थ तुम्ही प्राण्यांचं रूप घेऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेता." बाबा मग तिला म्हणाले "अग आई, तू ह्या जीवांवर दया दाखवणं चालू ठेव आणि मग देव तुझ्यावर कृपा करणं चालू ठेवेल. देव काळजी घेईल की तुझ्या घरात अन्नाचा तुटवडा कधीच होणार नाही".

आता पर्यंत तर्खड कुटुंबियांच्या इतर साई भक्तांबरोबर फार ओळखी झाल्या होत्या आणि त्या पैकी काही जसे श्री दाभोळकर, श्री पुरंदरे, श्री तेंडूलकर हे त्यांच्या वांद्रे येथील घराच्या जागेपासून जवळ अंतरावर राहात होते. ते एकमेकांना भेटत असत आणि मग आपले बाबांबरोबरचे गोड अनुभव एकमेकांना सांगत असत. जेव्हाही ते शिर्डीला जाण्याचे ठरवत, तेव्हा एकमेकांना खबर देत असत आणि जर कोणाला बाबांकरिता काही पाठवायचं असेल तर ते त्या भक्तासाठी दूत बनत असत. अर्थात ह्या मागचा उद्देश्य होता की बाबांप्रती शुद्ध भक्ती आणि प्रेम व्यक्त करणे. एकदा श्री पुरंदरे कुटुंबासहित शिर्डीला जायला निघाले आणि माझ्या आजीने श्रीमती पुरंदरे यांना दोन मोठी गडद रंगाची वांगी दिली आणि त्यांना विनंती केली की एका वांग्याचे भरीत करावे आणि दुसऱ्या वांग्याच्या काचऱ्या (तळलेली वांग्याची कापं) कराव्यात आणि त्या बाबांना दुपारच्या जेवणात द्याव्या. श्रीमती पुरंदरे यांनी पहिल्या दिवशी भरीत बनवले आणि स्वतः बनवलेल्या इतर जेवणाबरोबर ते बाबांच्या दुपारच्या जेवणाच्या ताटात दिलं. बाबांनी भरीत खाल्लं आणि काचऱ्या खाण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमती राधाकृष्णमाई, ज्या शिर्डीच्या स्थानिक भक्त होत्या आणि ज्या बाबांच्या जेवण व्यवस्थेची काळजी घेत असत, त्या चक्रावून गेल्या. त्यांनी इतर बायकांकडे चौकशी केली आणि त्यांना माहित झालं की श्रीमती पुरंदरे यांनी वांग्याचा पदार्थ आणला होता. काही असलं तरी तो वांग्याचा हंगाम नव्हता आणि म्हणून शिर्डीत एखाधं वांग मिळणं कठीण होतं. म्हणून श्रीमती राधाकृष्णमाई श्रीमती पुरंदरे यांच्याकडे घाईने गेल्या आणि वांग्याच्या उपलब्धतेबद्दल चौकशी केली. त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे एक वांग आहे आणि त्याच्या काचऱ्या बनवून पुढच्या दिवशी बाबांना देण्याचा त्यांचा बेत आहे. मग श्रीमती राधाकृष्णमाई यांनी ते वांग घेतलं आणि घाईघाई बाबांसाठी काचऱ्या तळल्या कारण त्या खाऊनच दुपारचं जेवण आटोपण्याचा त्यांचा विचार होता.

आता हे तर निव्वळ, भक्तांप्रती आपल तीव्र प्रेम व्यक्त करण्याचं कृत्य होतं आणि भक्ताला बदल्यात या गोष्टीची सुद्धा पोच देत होतं की त्याच्याकडून/तिच्याकडून भक्ती पोहोचली. जेव्हा श्रीमती पुरंदरे यांनी वांद्र्याला परत येताच माझ्या आजीला या घटनेची माहिती दिली, ती संपूर्णपणे भारावून गेली आणि तिने बाबांचे हृदयापासून आभार मानले.

अशाच प्रकारे, एका संध्याकाळी श्री गोविंदजी (श्री बाळकराम यांचे पुत्र) तर्खड यांच्या घरी आले कारण ते त्या रात्री शिर्डी येथे जाण्यासाठी निघणार होते. ते नाशिक येथे आपल्या दिवंगत वडिलांच्या अस्थींचे विसर्जन विधी करणार होते आणि मग शिर्डीला जाणार होते. ते फार घाईत होते आणि माझी आजी बाबांकडे पाठवण्याकरिता काहीतरी चांगली भेटवस्तू जुळवू शकली नाही.

तिला एक पेढा मिळाला जो चंदनी मंदिरातील बाबांच्या तसबिरीसामोरील प्रसादाच्या डब्यात ठेवलेला होता. तिने त्यांना तो पेढा बाबांना अर्पण करायला सांगितला, जरी ती आतून नाखूष होती कारण तो पेढा आधीच प्रसाद म्हणून दाखवण्यात आलेला होता. आणखी एक गोष्ट ही होती की श्री गोविंदजी यांनी आपली अस्थीविसर्जनासाठीची यात्रा शिर्डी भेटीबरोबर जोडून घेतली होती. तरीही माझ्या आजीने हे सर्व तर्कशुन्य विचार बाजूला ठेवले कारण तिच्या हेतू मध्ये दिव्य प्रेम होतं. तेच प्रेम जे शबरी ने श्री रामांप्रती व्यक्त केलं होतं जेव्हा तिने त्यांना उष्टी बोरं दिली होती.

जेव्हा गोविंदजी आपले सर्व इतर विधी करून द्वारकामाईत पोहोचले, ते पेड्याबद्दल पूर्णपणे विसरले होते. बाबांनी त्यांना विचारलं की तू माझ्यासाठी काही आणलस का?. गोविंदजींनी नकारार्थी उत्तर दिलं. मग बाबांनी त्यांना आठवण करून दिली की कोणीतरी त्यांना (बाबांना) देण्याकरिता त्यांच्याकडे काहीतरी दिलं होतं. गोविंदजी दगडासारखे अनभिज्ञ उभे राहिले आणि पुन्हा नकारार्थी उत्तर दिलं. बाबा आता रागावले आणि अक्षरशः त्यांच्या वर ओरडले आणि म्हणाले "अरे, मुंबईतून निघताना माझ्या आईने मला देण्याकरिता तुझ्याकडे काहीतरी दिल होतं. ते कुठे आहे?" आता गोविंदजींच्या ध्यानात आलं. ते जिथे उतरले होते तिथे धावत गेले आणि त्यांनी पेढा आणून बाबांना दिला. बाबांनी तो पेढा लगेच खाउन टाकला आणि त्यांनी गोविंदजींना आईला सांगण्यास सांगितलं की पेढा फार गोड लागला.

प्रिय साई भक्त वाचकांनो, अशा दैवी प्रेमाची उदाहरणं कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी साई सच्चरित्राच्या ९ व्या अध्यायात फार प्रभावशाली पद्धतीने दर्शवलेली आहेत. माझे वडील जेव्हा हे अनुभव आम्हाला सांगायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाह्याचे. मला वाटतं की कुठल्या भक्ताला तसं वाटणार नाही, जेव्हा त्याला भगवंताकडून अशा प्रकारे पोच मिळाल्याची पावती मिळेल. मला एकाला असं वाटतं "तशी लोक आज कुठे गेली? आणि तसे भक्त आज कुठे आहेत आणि तशा प्रकारची भक्ती आज कुठे आहे?". पण साई बाबाचं आपल्या भक्तांप्रती प्रेम चिरंतन आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय

आधी सांगितल्या प्रमाणे, आपण देवघरात केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत असते आणि आपल्याला त्याचा लाभही होत असतो. पहिल्या अनुभवातून साई बाबांनी आठवण करून दिली आहे की, देवघरातील तसबिरीत ते जिवंत आहेत आणि त्यांना दाखवलेला नैवेद्य ते निश्चितपणे ग्रहण करतात.

दुसऱ्या अनुभवातून साई बाबांनी फार मोलाची शिकवण दिली आहे की "सर्व जीवांमध्ये देव वास करत असतो". सामान्य माणसाचा असा समाज असतो की देव हा फक्त देवळात किंवा पवित्र तीर्थक्षेत्रात असतो आणि तिथेच त्याला गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत, पण हे काही खरं नाही. भगवंताने स्वतः भगवद गीतेत सांगितलं आहे की तो सर्व जग व्यापून आहे. म्हणजेच तो किडा मुन्गीत सुद्धा आहे, पशु पक्ष्यात सुद्धा आहे, मनुष्यात सुद्धा आहे आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टींत सुद्धा आहे. म्हणून आपण जर कुत्रा मांजर किंवा कुठल्याही जीवाला खाऊ घातले आणि त्याची भूक भागली तर ते सरळ सरळ देवापर्यंत पोहोचत असतं आणि देव आपल्यावर संतुष्ट होतो आणि आपलं कल्याण करतो. आपल्याला काही कमी पडणार नाही याची काळजी घेतो. म्हणून आपण नेहमी सर्व जीवांवर भूतद्या दाखवली पाहिजे. कुणाला हड-हड करू नये.

तिसऱ्या आणि चवथ्या अनुभवातून, आपल्याला समजतं की संत तसेच देव, त्यांना प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टी फार आवडीने घेतात आणि त्या मिळाल्याची पोच सुद्धा देतात.

=============================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई सच्चरित्रातले इतर प्रसंग

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय वाचकांनो, मला पुन्हा एकदा वाटतं की ह्या अध्यायातले प्रसंग हे मुख्यतः त्या लोकांसाठी आहेत, ज्यांनी साई सच्चरित्रवाचलं आहे. अर्थात निःसंशयपणे इतरांनाही हे बऱ्यापैकी मनोरंजक वाटेल. साई सच्चरित्रामध्ये पुष्कळ घटना सांगितलेल्या आहेत जेव्हा माझे वडील तेथे शिर्डीमध्ये उपस्थित होते, आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी त्या सांगितल्या होत्या, ज्या मी तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे. मला खात्री वाटते, की कित्येक भक्त जे त्या वेळी तेथे उपस्थित होते, त्यांनी सुद्धा तेच अनुभवलं असेल. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला ते थेट माझ्या वडिलांकडून ऐकावयास मिळालं आणि जसं ते माझ्या स्मृतीत साठवलं गेलं, तसच मी ते तुमच्यापुढे उघड करणार आहे. मला निश्चितपणे वाटतं की जर मी कुठे चुकलो तर तुम्ही मला क्षमा कराल.

========================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

"वाघाला मुक्ती"

ही घटना १९१८ साली घडली. माझे वडील ही विशेषपणे आठवणीत ठेवायचे कारण बाबा सदेह असतानाची ही त्यांची शिर्डीतील शेवटची भेट होती. ह्या घटनेनंतर, मला वाटतं बाबांनी महासमाधी घेतली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे द्वारकामाईतला बाबांचा दरबार चालू होता आणि अचानक द्वारकामाईबाहेर मोठा गोंधळ सुरु झाला. तिथे काय चालले आहे ते जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक होते. चार दरवेशी एका पूर्ण वाढलेल्या वाघाला बैलगाडीतून घेऊन जात होते. तो वाघ साखळ्यांनी बांधलेला होता. त्यांनी बैलगाडी द्वारकामाईच्या प्रवेशद्वारानजिक आणली होती आणि तिथेच उभी केली होती. त्यातला एक दरवेशी द्वारकामाईच्या आत आला आणि श्री माधवराव देशपांडे (जे बाबांचे जवळचे भक्त होते) यांना निवेदन करू लागला आणि म्हणाला की तो वाघ त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. ते वाघाला जागोजागी घेऊन जातात आणि त्याचा खेळ लोकांना दाखवात आणि जे उत्पन्न प्राप्त होतं ते वाघासहित त्यांच्या उपजीविकेसाठी खर्च केल जातं. पण वाघ आजारी झाला होता आणि शिर्डीतून जाताना त्यांना माहित झालं की साई बाबा नावाचे एक थोर संत तेथे राहतात. त्यांना हे सुद्धा माहित झालं की साई बाबांकडे दिव्य शक्ती होती आणि ते जीवांना फक्त आपल्या दिव्य नजरेनेच बरे करू शकतात. म्हणुन त्यांनी विचार केला की जर त्यांना परवानगी मिळाली तर त्या आजारी वाघाला बाबांना दाखवावं. बाबांना विचारलं असता बाबांनी वाघाला द्वारकामाईत घेऊन यायला परवानगी दिली. दर्वेशींनी पूर्ण काळजी घेतली आणि वाघाला आत घेऊन आले. तो फार हळू चालत होता. तो द्वाराकाईच्या पायर्यांच्या जवळ आला जेथे बाबा नेहमी बसायचे. त्याने बाबांकडे पाहिलं आणि आपले पुढचे दोन्ही पंजे पुढे टाकले आणि स्वतः वाकला, जणू काही तो वाकून बाबांना नमस्कार करत होता आणि मग अचानक त्याने मोठी डरकाळी फोडली. डरकाळीचा आवाज येवढा मोठा आणि भयावह होता की संपूर्ण द्वारकामाई जवळजवळ हादरली. मोठी डरकाळी फोडताच वाघ जमिनीवर आडवा पडला आणि हालचालविहीन झाला. वाघाला काय झालं ते बघण्यासाठी दरवेशी पुढे सरसावले आणि त्यांच्या लक्षात आलं की तो मृत झाला आहे. त्यांनी बाबांना सांगितलं की वाघाचा मृत्यू झाला आहे आणि आता त्यांनी त्याच्या मृत शरीराचे काय करायचे. बाबांनी त्यांना मृत वाघाच्या शरीराला शिव मंदिराच्या बाहेर नंदीच्या मूर्तीजवळ पुरण्याचा सल्ला दिला. शिर्डीचे सर्व लोक मृत वाघाचा दफनविधी बघण्यासाठी जमले होते. माझ्या वडिलांनी संपूर्ण घटना थेट आणि फार विस्तृतपणे पाहिली होती आणि त्यांना वाटलं की बाबा आणि वाघ यांमध्ये कोणत्या तरी प्रकारची देवाणघेवाण झाली होती आणि मगच वाघाने आपले प्राण सोडले होते. माझ्या वडिलांनी योग्य संधीची वाट बघितली जेव्हा ते बाबांना विचारू शकत होते की त्यांच्या आणि वाघाच्यामध्ये काय देवाण घेवाण झाली. बाबांनी मग स्मितहास्य केले आणि माझ्या वडिलांना म्हणाले "हे भाऊ, तो वाघ तीव्र वेदनेत होता आणि तो मला त्या यातनामय वेदनेतून सोडवण्याची विनंती करत होता कारण त्याला त्या आता असह्या झाल्या होत्या. मला त्याच्या दिन अवस्थेची दया आली आणि म्हणून मी भगवंताकडे त्याला मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना केली. माझा भगवंत फार दयाळू आहे आणि त्याने माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आणि त्याला मुक्ती दिली. तो वाघ जन्म-मृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला." माझे वडील बाबांकडून हे स्पष्टीकरण ऐकून पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. माझे वडील बाबांना म्हणाले की आतापर्यंत त्यांनी त्यांना माणसांवरती कृपेचा वर्षाव करताना पाहिलं होतं पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा त्यांनी त्यांना वाघासारख्या हिंस्र प्राण्यावरती कृपेचा वर्षाव करताना पाहिलं. अर्थात, शिर्डीचीही शेवटची भेट माझ्या वडीलांसाठी अभूतपूर्व होती, ज्याबद्दल मी तुम्हाला पुढील अध्यायात सांगेन.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।। हरी ओम ।।

वरील घटनेतील वाघ हा आपल्या पूर्व जन्मी एक ज्ञानी मनुष्य होता, पण त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झाल्यामुळे त्याने एका श्रेष्ठ भक्ताचा अपमान केला व त्यामुळे त्याला त्या भक्ताकडून शाप देण्यात आला, म्हणून तो क्रूर वाघ योनीला जन्माला आला. असं असलं तरी, शेवटी प्राण त्यागताना, पूर्व जन्मीच्या पुण्याईमुळे, त्याला साई बाबांचे दर्शन घडले व त्यामुळे, तो पूर्णपणे पापमुक्त झाला आणि त्याला मुक्ती मिळाली.

अशा प्रकारे, एखादा जीव संतांच्या समक्ष आपले प्राण सोडतो तेव्हा त्याला जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळते. म्हणून संतांसमक्ष निर्वाण होणे हे दुःख नसून परम सुःख आहे.

===================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शरद नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

पर्जन्य देवतेवर (इंद्रावर) बाबांचे नियंत्रण

श्री साई सच्चरित्रात एक घटना सांगितली गेली आहे. शिर्डीत एकदा अभूतपूर्व पाउस पडला होता. माझे वडील सुद्धा तेव्हा तेथे होते. ते त्या भाग्यवान माणसां मधील एक भाग्यवान होते ज्यांनी दोन महाशक्तिंमधील द्वंद्व उध्द पाहिले. ते नेहमी म्हणत असायचे की साई बाबांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणी जेव्हापण भक्तांच्या संकट निवारणाकरता त्यांना पाचारण केल जायच, तेव्हा ते त्यांचा(अष्टसिद्धीचा) वापर करायचे. अर्थात, निसर्गाची महाशक्ती बाबांना मान देऊन त्यांच्या आदेशाला अनुकूल प्रतिसाद देत असे, कारण साई बाबा स्वतः पृथ्वीवरील भगवंताचे अवतार होते.

ते पावसाळ्याचे दिवस होते, आणि दुपारपासून पाऊस पडत होता. संध्याकाळ येताच, पाऊस आणखी जोराने कोसळू लागला. आकाशात काळे भोर ढग जमा झाले होते. वादळी वारे वाहू लागले. वादळ येण्याचे हे स्पष्ट संकेत होते. विजांच्या चमकण्याने आकाश प्रज्वलित होत होते. त्यामागून ढगांचा गडगडाट होत होता. वादळ फार सक्रिय होतं आणि संपूर्ण शिर्डी गाव उग्र पावसाने झोडपून निघत होतं. सगळीकडे पाणी भरू लागले आणि सगळे ग्रामस्थ आपल्या गुरा-ढोरांसहित द्वारकामाईत गोळा होऊ लागले, कारण त्यांनी पूर्वी कधीही एवढी तीव्र अतिवृष्टी आणि वादळ अनुभवलं नव्हतं. माझे वडील सुद्धा अपवाद नव्हते. ते सुद्धा द्वारकामाईत आले. त्यांना भागवत पुराणातील त्या घटनेची आठवण झाली ज्यात भगवान श्रीकृष्ण यांना अख्खा गोवर्धन पर्वत उचलावा लागला होता आणि सर्व जीवांना आश्रय द्यावा लागला होता आणि निसर्गाच्या अभूतपूर्व कोपापासून त्यांना संरक्षण द्यावे लागले होते. शिर्डीत तो दिवस असा होता की ग्रामस्थांना "गोवर्धनगिरी" सारख्या एखाद्याची गरज भासत होती, फक्त जोच त्यांना त्या गंभीर अवस्थेतून सोडवू शकेल. अर्थात सर्व जण काळजीत पडले होते आणि बाबांचे आशीर्वाद आपल्यावर कधी पडतील याची वाट बघत होते. वादळ शांत होण्याची कुठलीच चिन्ह दिसत नव्हती आणि लवकरच बाबांची सहनशीलता संपली. ते आपल्या जागेवरून उठले, त्यांनी आपला सटका हातात उचलून घेतला आणि ते खाली उतरून द्वारकामाईच्या द्वारापाशी आले. ते तिथे उघड्यावर उभे राहिले. आकाशात जोरात वीज चमकली होती. बाबांनी जमिनीवर आपल्या सटक्याने आघात केला आणि मोठ्याने ओरडले "जातेस की नाही?". त्या ओरडण्याची तीव्रता इतकी जास्त होती की ती संपूर्ण जागा कापू लागली, जणू काही शिर्डीत भूकंप येउन गेला. पुन्हा एकदा विजांचा तीव्र कडकडाट झाला आणि बाबांनी जमिनीवर आपल्या सटक्याने आघात करून पर्जन्य देवतेला शिर्डीतून निघून जाण्यास सांगितले. असं तीन वेळा घडलं. दोन महाशक्तिंमधील हे उघड द्वंद्व उध्द होतं आणि लवकरच वादळ बाबांच्या आदेशापुढे नमतं येऊ लागलं. कडकडाट थांबला, पाऊस कमी झाला आणि वारे मंद झाले. एका तासाभरात सर्व काही पुन्हा एकदा शांत झालं. आकाश स्वच्छ झाले आणि बाबांनी सर्वांना आपापल्या घरी परत जाण्यास सांगितले. माझे वडील रॉकेलचे कंदील पेटवण्याचे संध्याकाळचे आपले नेहमीचे कर्तव्य करू लागले. ते मोठ्या हौसेने त्या क्षणाची वाट बघत होते, जेव्हा ते बाबांना त्या द्वंद्व युद्धा बद्दल विचारू शकले असते. मग तो क्षण आला आणि त्यांनी बाबांना विचारले की त्यांच्या कडे निसर्गावरही राज्य करण्याचे सामर्थ्य आहे का. बाबा म्हणाले "भाऊ, जेव्हा माझे भक्त संकटात असतात, मी जगच्चालक ईश्वराकडे त्यांच्यावर दया करण्याची प्रार्थना करतो. मग देव माझ्या बचावास येतो आणि आपली मदत मला देतो."

अर्थात माझे वडील ते दृश्य कधीच विसरू शकले नाहीत, जेव्हा बाबा पावसाच्या मधोमाध उभे होऊन पर्जन्य देवतेवर शिर्डीपासून दूर जाण्यासाठी ओरडत होते. तेव्हा बाबा स्वतः एका कोपलेल्या देवाप्रमाणे दिसत होते.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: हे भौतिक जग पंचतत्वांपासून बनलेलं आहे - म्हणजेच पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश यांपासून. अर्थात आपलं शरीरही ह्या पंचतत्वांपासून बनलेलं आहे. संत मंडळींचं पंचतत्वांवर पूर्ण नियंत्रण असतं.

=================================================================================5

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

अग्नीवर प्रभूत्व

एकदा "धुनी" - म्हणजेच बाबांनी द्वाराकामाईत प्रज्वलित केलेला पवित्र अग्नी तीव्रपणे पेटू लागला. बाबांनी आधीच त्यांच्या जग सोडून जाण्याच्या दिवसाचे भाकित केले होते, म्हणून मला वाटतं की तो दिवस "विजयादशमी" असावा, जो दसरा या नावाने प्रख्यात आहे. संध्याकाळची वेळ होती. बाबा द्वारकामाईत धुनीसमोर आपल्या नेहमीच्या जागी बसले होते. माझे वडील सुद्धा तिथे उपस्थित होते. प्रत्येक संध्याकाळी ते द्वारकामाईत यायचे, तिथे बसायचे, काही मनोरंजक घडणाऱ्या गोष्टी असतील तर ते पाहायचे आणि आपले रॉकेलचे कंदील पेटवण्याचे नित्य कर्तव्य करायचे. त्या दिवशी बाबा अचानक उठले, धुनी जवळ गेले, धुनीतील लाकडं हलवली आणि काहीतरी पूटपुटू लागले आणि द्वारकामाईत वर खाली चालू लागले.

हे फार असामान्य होतं आणि माझ्या वडिलांना वाटलं की काहीतरी विचित्र होण्याची शक्यता आहे. इथे मला एक सांगावासा वाटतं की त्या काळातही, बाबांचे असे कित्येक भक्त होते ज्यांना बाबांचा जन्मजात धर्म कोणता हे जाणुन घेण्याची उत्कंठा होती. म्हणजेच ते हिंदू आहेत का मुसलमान आहेत. काही झालं तरी ते मनुष्य रूपात होते ज्याचा अर्थ हा की त्यांनी मानवी शरीरातून जन्म घेतला असावा, आणि अस असल्यास त्यांचे आई वडील हे हिंदू होते की मुसलमान होते, हा प्रश्न होता? अर्थात माझे वडील सुद्धा याला अपवाद नव्हते.(त्यांना सुद्धा बाबांचा धर्म जाणुन घ्यायचा होता.)

बाबा हळूहळू रागाच्या मनःस्थितीत येत होते. ते तिथे जमलेल्या लोकांना शिव्या घालू लागले. इथे धुनीतील अग्नीचा प्रकोप सुद्धा बाबांच्या क्रोधित मनःस्थिती येवढाच उंच उंच होत होता. संपूर्ण द्वारकामाई ही लाकडांच्या प्रज्वलनाने निर्माण झालेल्या प्रकाशाने उजळली होती. एव्हाना बाबा संतापाने भरून गेले होते. त्यांनी आपल्या डोक्याला बांधलेला सुताचा कपडा काढला आणि धुनीत टाकला. अचानक आगीच्या ज्वाळा उंच वाढल्या. बाबांचे लांब केस मोकळे झाले. काही वेळाने, बाबांनी आपली कफनी काढली आणि ती धुनीत टाकली. आगीच्या ज्वाळा आणखी एवढ्या उंच झाल्या की द्वारकामाईला आग लागते का काय अशी लोकांना भीती वाटू लागली. बाबांचा क्रोध शिखरावर पोहोचत होता. ते त्या क्रोध मुद्रेत लोकांसमोर उभे होते आणि एका क्षणार्धात त्यांनी आपले लंगोट काढून ते धगधगणाऱ्या धुनीत टाकले. ते अशा प्रकारे दिगंबर (निवस्त्र /उघडे) झाले होते आणि ते लोकांसमोर त्या अवस्थेत उभे राहिले. ते मग त्यांच्यावर ओरडले आणि त्यांना त्यांच्या शरीराकडे बघून ते हिंदू आहेत का मुसलमान आहेत ते ओळखून खात्री करून घेण्यास सांगितलं. स्वतः बद्दल पुरावा देण्याची ही किती आगळी रीत. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या वडिलांनी त्या वेळी काय पाहिलं. माझे वडील म्हणायचे की बाबांनी तेव्हा एक भयानक मुद्रा घेतली होती. त्यांची डोळ्यांची बुबुळं जळत्या कोळशा सारखी लाल भडक झाली होती आणि त्यांच्या शरीराच्या प्रत्येक छिद्रातून प्रकाशाचे किरण बाहेर निघत होते आणि त्यांचं पूर्ण शरीर त्या प्रकाशाच्या आध्यात्मिक गोलाच्या तेजा मागे लपून गेले होते. प्रकाशाचे किरण एवढे प्रखर होते की माझ्या वडिलांना त्यांचे डोळे बंद करावे लागले. अर्थात हे सांगण्याची गाज नाही की ते बाबांच्या धर्माची ओळख पटवू शकले नाहीत. द्वारकामाईत उपस्थित असलेले सर्व जण स्तब्ध झाले. बाबांचं ओरडणं चालूचं होतं. धुनीच्या ज्वाळा फार उंच पोहोचत होत्या आणि प्रचंड प्रमाणात प्रकाश फेकत होत्या. बाहेर विजा चमकत होत्या आणि ढगांचा कडकडाट होत होता. मग श्री भागोजी शिंदे, जे बाबांचे जवळचे भक्त होते आणि कुष्टरोगी होते, ते पुढे आले आणि त्यांनी मोठ्या धैर्याने त्यांच्या कंबरेभोवती नवीन लंगोट बांधला. मग बाबा सामान्य अवस्थे पर्यंत शांत झाले. त्यांनी आपला सटका उचलला आणि धुनी जवळ आले. ते सटक्याने ज्वाळांवर प्रहार करू लागले आणि "उगी उगी" म्हणजे "शांत हो, शांत हो" असे म्हणू लागले. सटक्याच्या प्रत्येक प्रहाराने ज्वाळा उंचीने कमी होऊ लागल्या आणि लगेच सर्व काही पुन्हा सामान्य झालं. मग लोकांकडे बाबांना नवीन कफनी घालण्याचं धैर्य आलं आणि त्यांच्या जटा (केस) कापडाच्या नवीन फडक्याने बांधण्यात आल्या. जरी रात्री फार उशीर झाला होता तरी भक्तांनी बाबांची पूजा अर्चा केली आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळची आरती केली. अर्थात माझे वडील सर्वात जास्त प्रभावित झाले ते म्हणजे बाबांचे दिव्य शरीर प्रकाश उत्सर्जित करत होते याने व त्यांच्या अग्नीवर नियंत्रण ठेवण्याच्या शक्तीने. बाबांनी एका विशेस हेतूने विजयादशमीचा दिवस निवडला होता. त्यांनी आपल्या भक्तांना संकेत दिला होता की हाच दिवस असेल जेव्हा ते शारीरिक दृष्ट्या जगाचा निरोप घेतील. पुढे १९१८ सालच्या विजयादशमीच्या दिवशी बाबांनी समाधी घेतली.

प्रिय साई भक्त वाचकांनो, हे जाणल्यावर, मला वाटतं की आपण सर्वांनी बाबांच्या धर्माविषयीच्या असलेल्या उत्सुकतेचा वाद मिटवला पाहिजे आणि परम भक्तीने आणि १०० टक्के श्रद्धेने त्यांची निव्वळ पूजा केली पाहिजे कारण "साई" या शब्दाचा अर्थ होतो "साक्षात ईश्वर" ज्याला कोणताही धर्म नसतो आणि जो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान आणि सर्व-भूत आहे.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। हरी ओम ।।

साई बाबा

तात्पर्य: वरील घटनेतून साई बाबांनी आपला अवतार संपवण्याचे संकेत दिले. अर्थात हे फक्त देहापुरते मर्यादित होते कारण संत हे ब्रम्हस्थितीत असल्यामुळे जन्म मृत्युच्या पलीकडे असतात व देह असला किंवा नसला तरी, नेहमी मानव जातीच्या उद्धाराकरता कार्यरत असतात.

===============================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

मेघाद्वारे भगवान शिव यांना स्नान

एक निस्सीम साई भक्त, ज्यांनी स्वतःला शिर्डीत स्थायीक करून घेतलं होतं, ते म्हणजे श्री मेघा. ते भगवान शिवांचे निस्सीम भक्त होते आणि बाबांना ते माहित होतं. बाबांनी म्हणून त्यांना भगवान शिवांचे लिंग (पिंडी) भेट म्हणून दिला होता, जेणेकरून ते आपल्या देवाची नित्य पूजा करू शकतील. बाबांचे सुद्धा मेघावर अत्याधिक प्रेम होतं, ज्यामुळे ते त्यांच्या शिर्डीतील अंतयात्रेत उपस्थित राहिले. बाबा त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले आणि त्यांच्या मृत शरीरावर स्मशानभूमीत पोहोचेपर्यंत पुष्प वृष्टी करत राहिले. बाबांनी एका सामान्य माणसाप्रमाणे अश्रू सुद्धा ढाळले आणि आपलं दुखः व आपल्या खऱ्या भक्तावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं.

अर्थात, मेघा बाबांना आपला शंकर देव समजत असे आणि म्हणून बाबांनी आपल्या कपाळावर त्याला त्याच्या इच्छेनुसार त्रिशूळ काढण्यास अनुमती दिली होती. एका महाशिवरात्रीच्या दिवशी, मेघाला गंगाजलाने (गोदावरी नदीच्या जलाने) बाबांना आंघोळ घालण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून तो बाबांकडे तसं करण्याची अनुमती देण्यासाठी फार आधीपासूनच विनवणी करू लागला, कारण त्याला माहित होतं की बाबा त्याला एवढ्या सहजासहजी तसं करण्याची परवानगी देणार नाहीत. शेवटी फार विनवणी केल्यानंतर, बाबा मेघाकडून स्नान घेण्यास तयार झाले.

परावानगी मिळताच मेघा खूप आनंदी झाला. एक दिवस आधी, मेघाने आपल्या ओळखीच्या लोकांना कळवलं आणि तो समारंभ पाहण्यासाठी आमंत्रण दिलं. माझे वडील निमंत्रितांमधले एक होते. आदल्या रात्री मेघा कळशी घेऊन शिर्डीतून निघाला ते गोदावरी नदीतून गंगाजल आणण्यासाठी. ती नदी शिर्डीपासून ११ कि. मि. दूर आहे. पण मेघासारख्या उत्कट भक्तासाठी अंतर हे काही अडथळा नव्हते आणि तो गंगाजल घेऊन दुपार होण्यापूर्वी शिर्डीत परत आला. मध्यान्ह आरती नंतर मेघाने बाबांना स्नान विधीसाठी येण्याची विनंती केली. बाबा त्याला म्हणाले की ते गंगाजल स्नान घेण्याविषयी फक्त थट्टा करत होते, आणि तसं पाहिलं तर त्यांच्यासारख्या फकिराला अशी कृत्य करण्याची परवानगी नसते. बाबांनी त्याला पवित्र गंगाजल शिर्डीतल्या शिव मंदिरातील भगवान शंकरांच्या लिंगावर अर्पण करण्याचा सल्ला दिला. मग मेघा त्यांना म्हणाला की तो त्या लिंगाला रोज स्नान घालत होता आणि तो बाबांना सजीव भगवान शंकर मानतो आणि महाशिवरात्री हा सर्व शिवभक्तांसाठी सर्वात शुभ दिवस असल्यामुळे त्यांनी त्याला निराश करू नये. मेघा खूप हट्ट करू लागल्यामुळे बाबा त्याला म्हणाले की ते त्याला पाणी ओतू देतील पण एकाच अटीवर. बाबांनी त्याला समजाऊन सांगितलं की गंगा ही भगवान शिवांच्या मस्तकातून प्रकट होते आणि म्हणून बाबा पुढे वाकतील आणि मेघाने फक्त त्यांच्या डोक्यावरच पाणी ओतायचे. मेघा जरी असंतुष्ट होता तरी ही अट पाळायला तयार झाला. मग बाबा आपल्या जागेवरून उठले आणि लेंडी बागेकडे निघाले. तिथे एक विशेष दगड होता ज्यावर बाबा आपली आंघोळ करायचे. ते त्यावर बसले व आपलं डोकं पुढे वाकवलं आणि मेघाला पुढचं काम करण्यासाठी इशारा केला. मेघा बाबांच्या डोक्यावर फार हळुवारपणे पाणी ओतू लागला, पण तो अशा प्रकारच्या आंघोळीने संतुष्ट झाला नाही म्हणून त्याने इतके दिवस आपल्या मनात कल्पना करून ठेवल्याप्रमाणे करण्याचा निर्णय केला. त्याने अचानकपणे "हर हर महादेव" म्हणत पाण्याची बादली, उरलेल्या पाण्यासकट बाबांच्या संपूर्ण शरीरावर रिकामी केली. तो फार उल्हसित झाला आणि आनंदाने नाचू लागला कारण त्याला वाटलं की त्याने त्याची इच्छा संपूर्णपणे पुरवली आहे. पण हे जास्त काळ राहिलं नाही. त्याच्या लवकरच लक्षात आलं की जरी त्याने पाणि बाबांच्या संपूर्ण शरीरावर ओतलं होतं तरी फक्त त्यांचं डोकचं ओलं झाल होतं आणि कफनीसकट त्यांचं बाकीचं शरीर नेहमीसारख एकदम सुकं होतं. मेघा ते पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याचा विश्वास बसला नाही. मग बाबा त्याला म्हणाले "हे तुला माहित आहे का की गंगा भगवान शिवांच्या मस्तकातून वाहते आणि त्यांच्या बाकीच्या शरीराला स्पर्श करत नाही." माझे वडील ही सर्व गंमत इतर निमंत्रीतांसहित पाहात होते. त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा मेघावर बिंबवू इच्छित होते की त्यांचा शब्द हा अखेरचा आहे आणि कोणीही त्यांची आज्ञा न पाळण्याच दुःसाहस करू नव्हतं. आणखी बाबा मेघाला खात्री पटवू इच्छित होते की तेच त्याचे सजीव भगवान शिव आहेत. माझ्या वडिलांना तेव्हाना बाबांच्या वेगवेगळ्या कृती पूर्णपणे समजाल्या होत्या. त्यांच्या मते बाबांनी काही काळाच्या अवधीत आपल्या भोवती वैशिष्टपूर्ण लोकांचा संग्रह केला होता. त्यांच्या गूढ कृतींद्वारे, ते लोकांवर भगवंताच्या अस्तित्वाची तसेच त्याच्या अफाट शक्तीची जाणीव ठसवत असत, ज्याचा लोकांनी आपल्या श्रद्धायुक्त भक्तीने आदर राखणे शिकलं पाहिजे. काही नावं घ्यायची झाली तर ती म्हणजे मेघा (भगवान शिव), नानावली (श्री हनुमान) आणि दासगणू (श्री विठ्ठल). खरं पाहू जाता दासगणू आपल्या एका आरतीत म्हणतात "शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर". माझे वडील सांगायचे की कधीकधी उल्हसित असतांना बाबा म्हणायचे "हे भाऊ, मी दुसरा तिसरा कोणी नाही तर देवी लक्ष्मी आहे, आणि ह्या द्वारकामाईत बसून मी कधीच खोट बोलत नाही." आपल्या पूर्ण आयुष्यात, त्यांनी स्वतःला भगवंताचा दूत म्हटलं आणि कधीच स्वतःला भगवंत म्हटलं नाही. खचितच ते जे काही बोलायचे ते न चुकता घडून यायचं. माझे वडील बाबांचा ते बोलण आठवायचे की, "हे भाऊ, मी ह्या मानवी शरीरातून निघून गेल्यानंतर, तू बघशील की मुंग्या साखरेला येतात त्याप्रमाणे लोक शिर्डीला येतील." आजच्या मितीस वर्षाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही शिर्डीला गेलात, तरी तुम्हाला बाबांनी कित्येक वर्षांपूर्वी केलेल्या विधानाचा पुरावा मिळेल.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

मेघाद्वारे भगवान शिव यांना स्नान

वरील अनुभवातून देव आपल्या भक्तांबरोबर कशा प्रकारे क्रीडा करतो ते दिसून येते. अशाच प्रकारच्या क्रीडा भगवान श्री कृष्ण यांनी गोपिंसहित तसेच इतर भाक्तांसहित केल्या होत्या. देव आपल्या भक्तांच्या भक्तीसंबंधी मनोकामना तर पूर्ण करतोच पण कधी कधी खेळता खेळता, देव मधूनच आपल्या अद्भूत शक्तीची जाणीव सुद्धा करून देतो.

=========================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

श्रींबरोबरचे इतर अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

प्रिय वाचकांनो, आधी सांगितल्याप्रमाणे, माझ्या वडिलांनी शिर्डीला १७ वेळा भेट दिली होती आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ७ दिवस ते एक महिना असायचा. त्यांच्या मुक्कामाच्या वेळी, त्यांना बाबांच्या अशा काही मनोरंजक लीला अनुभवायला मिळायच्या की त्यांना शिर्डी सोडून जावसं कधीच वाटायचं नाही. अर्थात बाबांकडून निघण्याचा आदेश मिळताच ते शिर्डीतून निघून जायचे. माझ्या वडिलांकडे ह्या अनुभवांचा चांगला संग्रह होता, जे मी कदाचित सर्व आठवू शकणार नाही. ह्या अध्यायात, मी तुम्हाला ह्यातील काही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जे साई सच्चरित्रात वर्णन केलेल्या अनुभवांच्या व्यतिरिक्त आहेत. मला खात्री वाटते की त्या काळच्या साई भक्तांनी असे कित्येक मनोरंजक अनुभव पहिले असतील आणि त्यांनी ते आपल्या प्रियजनांना सांगितले असतील. मी तुम्हाला ते सांगत आहे ते निव्वळ श्री साईंबद्दल माझं प्रेम व भक्ती व्यक्त करण्यासाठी.

===========================================================

नानावलींच्या क्लुप्त्या

साई बाबांचे एक विक्षिप्त भक्त होते, ज्यांचे नाव नानावली होते. मी त्यांना विक्षिप्त संबोधण्याचं स्वातंत्र्य घेतोय कारण ते फार विनोदी चाळे करायचे (माकड चाळे किंवा मर्कट लीला) ज्यामुळे लोकांना थोडा त्रास व्हायचा आणि ते बाबांकडे त्यांच्या गैरवर्तणुकी बद्दल तक्रार करायचे. बाबा मग नानांना दरडावत म्हणायचे की तू जर असाच गैरवर्तणूक करत राहिलास तर भक्त शिर्डी सोडून जातील. माझ्या वडिलांना नानावलींबद्दल एका वेगळ्या प्रकारचं कौतुक होतं. त्यांना हर्निया (अन्तर्गळ) हा आजार होता. तो एवढा होता की त्यांचा वाढलेला भाग जमिनीला स्पर्श करायचा आणि ते त्याच पद्धतीने चालायचे. कधीकधी ते आपल्या पायजम्याला मागच्या बाजूने कापडाचे फडके बांधायचे जेणेकरून लांब शेपूट तयार होईल आणि मग माकडासारखे उडी घ्यायचे. गावातली सगळ्या मुलांची त्यांच्या मर्कट लिला पाहून करमणूक व्हायची आणि मग त्या अवस्थेत ते मुलांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी बाबांकडे धावत यायचे. माझ्या वडीलांना आश्चर्य वाटायचं की हे मनुष्य हर्निया च्या त्या अवस्थेत, एवढ्या वेगाने कसे काय पळू शकतात. त्यांना ते वेडे मनुष्य आहेत असं कधीच वाटलं नाही. नानावली माझ्या वडिलांना "गवळ्या" या नावाने हाक मारायचे आणि त्यांच्याकडे अन्नाची भिक्षा मागायचे. मग माझे वडील श्री सगुण हे चालवत असलेल्या खानावळीत जायाचे आणि त्यांना नानावलींना पुरेसं जेवण खाऊ घालायला सांगायचे. माझ्या वडिलांच्यामते साई बाबा आणि नानावली हे प्रभू श्री राम आणि त्यांचा निस्सीम भक्त श्री हनुमान यांच्या जोडी सारखे होते.

नानावलींनी एकदा बाबांकडे त्यांच्या जागेवर बसण्याची परावानागी देण्याचं फर्मान सोडलं. बाबांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या जागेवरून उठले आणि नानावालींना ती जागा व्यापाण्यास अनुमती दिली. नानावली त्या जागी काही वेळ बसले आणि मग उठले आणि म्हणाले, "हे देवा, फक्त तूच ही जागा घेऊ शकतोस, कारण ती तुलाच शोभते, माझी खरी जागा तुझ्या पायापाशीच आहे". तुम्ही सर्व कल्पना करू शकता की नानावालींकडे किती धाडस असेल,बाबांकडे त्यांच्या जागेवर बसण्यास, त्यांना अनुमती देण्यासंबंधी विचारण्याचं आणि बाबांनीही त्यांना किती प्रचंड प्रमाणांत प्रेम दिलं आणि आपलं आसन प्रिय नानावलींसाठी रिकामं केलं. अर्थात, माझे वडील त्यांना प्रभू राम आणि हनुमान या जोडीसामान का मानत होते, त्याला वेगळच कारण आहे. एकदा नानावली माझ्या वडिलांना म्हणाले "ए गवळ्या, माझ्या बरोबर चल, मी तुला थोडी गंमत दाखवतो". त्यांनी मग माझ्या वडिलांना चावडीकडे नेलं जी द्वारकामाई पासून थोड्या अंतरावर आहे. बाबा तेथे चावडीत बसले होते. काही क्षणाचाही विलंब न लागता, नानावालींनी आपली उंची कमी केली आणि स्वतःला येवढं छोटं केलं की ते 'हंडी' (काचेचे वाडगे जे रशीने चावडीच्या छताला टांगून ठेवलेला असायचे) मध्ये मावू शकत होते आणि मगअक्षरशः वर उडी मारून एका हंडीत जाऊन बसले. एका माकडाप्रमाणे, ते हंडीत बसून माझ्या वडिलांना चिडवून दाखवत होते. माझे वडील ते कृत्य पाहून आश्चर्यचकित झाले. ते अविश्वसनीय होतं. ते एका चमात्कारापेक्षा कमी नव्हतं. नानावली त्यांच्या शरीराच्या त्या अवस्थेत, एवढ्या उंच उडी कसे काय घेऊ शकत होते आणि त्या हंडीत बसण्याएवडे स्वतःला छोटे कसे काय करू शकत होते. ते निव्वळ विस्मयकारक आणि अविश्वसनीय होतं. त्यांना मग जाणवलं की साई बाबा आणि नानावली हे शिर्डीत प्रभू श्री राम आणि श्री हनुमान यांचे अवतार आहेत. त्यांनी लगेचच बाबांसमोर नमस्कार केला आणि मग त्यांची पूजा केली.

प्रिय साई भक्त वाचकांनो, बाबांनी समाधी घेतल्यावर नानावली तीव्र दुखात होते आणि तेराव्या दिवशी ते स्वतः जग सोडून गेले. नानावलींची समाधी लेंडी बागेच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या नजीक स्थित आहे. मी जेव्हा पण शिर्डीला जातो तेव्हा तिच्यासमोर नमस्कार करतो. प्रभू साई आणि त्यांच्या लीलांना माझे लाख लाख नमस्कार.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

नानावलींच्या क्लुप्त्या

संतांच्या सानिध्यात राहिल्याने मनुष्यामध्ये अद्भूत शक्ती निर्माण होतात.

साई बाबा हे लौकिकी माणसाप्रमाणे गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी असा भेदभाव कधीही करत नसत कारण ते सर्व जीवांमध्ये नारायण पाहत असत. ते सर्वांच्या विश्रांतीचे स्थान होते. त्यांनी नानावलींना आपली बसण्याची जागा सुद्धा रिकामी करून दिली. यावरून संतांमध्ये अहंभाव तसेच मान सम्मानाची इच्छा किंचितसुद्धा नसते हे दिसून येते.

===========================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शरद नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

मोरेश्वरांचा दमा नाहीसा झाला

मोरेश्वर प्रधान हे बाबांचे जवळचे भक्त होत. ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते दम्याच्या तीव्र आजाराने त्रासलेला होते. ते माझ्या आजोबांचे पत्ते खेळतानाचे सोबती होते. त्यांचा दम्याचा आजार बरा व्हावा म्हणून माझ्या आजोबांनी त्यांना शिर्डीला जाण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी त्याप्रमाणे केले. त्यांच्या शिर्डीच्या पहिल्याच भेटीत, जेव्हा ते साई बाबांना भेटले तेव्हा त्यांना साई बाबांकडून चिलीम ओढण्यास देण्यात आली. मोरेश्वर आधी काहीसे घाबरले पण त्यांनी ती चिलीम ओढली आणि एक चमत्कार झाला. त्या क्षणापासून त्यांना पुन्हा केव्हाच दम्याचा झटका आला नाही. एखाद्याचा आजार बरा करण्याचा हा किती विलक्षण मार्ग आहे. मोरेश्वरांनी माझ्या आजोबांचे आभार मानले आणि तेव्हा पासून ते श्री साई बाबांचे निस्सीम भक्त झाले. पुढे १९१८ च्या विजयादशमीच्या दिवशी, दुपार नंतर अचानक मोरेश्वरांना दम्याचा झटका आला. झटका तीव्र होता आणि त्यांनी आपल्या गड्यास वांद्रे येथे पाठवून माझ्या आजोबांस त्यांच्या सांताक्रूझ येथील घरात येण्यास बोलावणे पाठवले. मोरेश्वरांचा गडी माझ्या आजोबांना म्हणाला की त्याचे मालक अचानक आजारी झाले आहेत आणि त्वरित मदतीस येण्याची विनंती केली. मग माझे आजोबा माझ्या वडिलांबरोबर घरातून निघाले. अर्थात त्यांनी स्वतः बरोबर 'उदी' घेतली, जी बाबांनी स्वतः त्यांना मागील शिर्डी भेटीच्या वेळी दिली होती. त्यांनी मोरेश्वरांना अत्यंत अस्वस्थ अवस्थेत पाहिले. माझ्या आजोबांनी त्यांचं सांत्वन केलं. त्यांनी बाबांची उदी एका पाण्याच्या पेल्यात टाकून मोरेश्वरांस ते पाणी पिण्यास सांगितले. मोरेश्वरांनी माझ्या आजोबांच्या सांगण्याचे पालन केले कारण ते त्यांना घनिष्ट मित्र मानत होते. त्यांनी ते पाणी पिऊन घेताच, झटक्याची तीव्रता कमी होत गेली आणि थोड्याच वेळात त्यांना बरे वाटले. मोरेश्वरांनी माझ्या आजोबांना विचारले की बाबा म्हणाले होते की दमा कायमचा गेला, तर मग हा झटका पुन्हा कसा काय आला? माझ्या आजोबांनी त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले की जर तसं पुन्हा झालं तर बाबांची उदी औषध म्हणून घ्यावी. पण मोरेश्वरांना तसं करण्याची गरज पुन्हा पडली नाही. उदी घेतल्याने दम्याच्या झटक्याची तीव्रता निश्चितपणे कमी झाली होती, पण ह्या घटने मागे एक अगदी वेगळाच संदेश होता, जो त्या सर्वांना नंतर लक्षात आला. अगदी त्याच दिवशी दुपारी २ वाजता, साई बाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली होती आणि तसं करताना त्यांनी आपल्या निस्सीम भक्तांना आपल्या विशिष्ट पद्धतीत बिनतारी संदेश पाठविले होते. अर्थात माझ्या आजोबांना आणि वडिलांना सुद्धा बिनतारी संदेश मिळाला होता, ज्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांना एका पुढच्या अध्यायात वर्णन करून सांगेन.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य : संत मंडळींकडे आपल्या भक्तांचे रोग व भोग घालवण्याचे सामर्थ्य असते. अर्थात हे भोग प्रारब्धामुळे प्राप्त झालेले असतात. प्रारब्ध म्हणजे पूर्व आयुष्यात तसेच पूर्व जन्मांमध्ये केलेल्या चांगल्या किंवा वाईट कामाचे फळ, जे माणसाला वर्तमानात भोगावे लागत असते. आधी सांगितल्याप्रमाणे संत मंडळी आपल्या सामर्थ्याचा उपयोग भक्तांना त्यांच्या कष्टातून लवकर सुटका करण्यासाठी करतात. म्हणून माणसाने स्वतःच्या भल्यासाठी, विनम्रपणे संतांना शरण जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे सत्कर्म केले पाहिजे तसेच पापाचारण पूर्णपणे थांबवलं पाहिजे.

पूर्णपणे शरण आलेल्या भक्तांना, संत एका घनिष्ट मित्राप्रमाणे, घडणाऱ्या घटनांचे संकेत किंवा सुचनाही देतात. ईश्वर सर्वव्यापी असल्यामुळे, भक्त त्यांच्यापासून कितीही दूर असले तरीही त्यांच्या पर्यंत सुचना पोहोचवल्या जातात.

=================================================================================4

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

कलिंगडाची साल खाण्याचा अनुभव...

बाबांच्या हयातीत, काही लोकांना शिर्डीत येऊनही बाबांचे आशीर्वाद भेटू शकले नाहीत, कारण असं असु शकेल की त्यांच्या कडे श्रद्धा नसेल किंवा सबुरी नसेल. अशी मंडळी श्रीमंत घरातील असायची आणि ते जेव्हा बाबांच्या दर्शनाला यायचे तेव्हा बाबांचे गरीब राहणीमान पाहून, ते विचार करायचे की असा फकीर त्यांच्या समस्या कसा काय सोडवू शकेल. अर्थात बाबांचीही अशा गोष्टी हाताळण्याची तऱ्हा गमतीदार असायची आणि पहिल्याच भेटीत समजणे कठीण असायची.

उन्हाळ्याचे दिवस होते. एक कलिंगड विकणारी बाई द्वारकामाई मध्ये आली. तिच्या कडे टोपलीभर कलिंगड होते. बाबांनी तिचे सारे कलिंगड विकत घेतले. मग त्यांनी एक कलिंगड कापून त्याची कापे केली आणि तिथे असणाऱ्या साऱ्या भक्तांना वाटू लगले. सारे भक्त कलिंगडाचा आस्वाद घेवू लागले. तिथे उपस्थित असणाऱ्या माझ्या वडिलांना, बाबांनी काप दिली नव्हती. त्या वेळी, उच्च पोशाख केलेला एक श्रीमंत माणूस, आपल्या दोन नोकरांसहित द्वारकामाईत आला. तो तीव्र मधुमेहाच्या आजाराने पिडलेला होता. कुणाच्यातरी सल्ल्याने तो शिर्डीत आला होता. बाबांनी एक गंमत केली. बाबांनी कलिंगडाचा एक काप घेवून त्याचे गर आणि साल वेगवेगळे केले. गर माझ्या वडिलांना दिला व साल त्या श्रीमंत माणसाला दिला. तो श्रीमंत माणूस रागाने लाल झाला आणि म्हणाला की कलिंगडाचे साल खायला मी काही गाय किंवा बकरी नाही. बाबांनी मग तेच साल माझ्या वडिलांना दिले आणि म्हणाले "ए भाऊ, आता तूच हे खा".

जेव्हा माझ्या वडिलांनी ते साल चावलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ते साल केळी एवढे मऊ आणि आधी खाल्लेल्या गरापेक्षाही गोड होते. माझे वडील म्हणायचे की असा गोड कलिंगड त्यांनी आयुष्यात कधीच खाल्ला नव्हता. तो श्रीमंत माणूस आपला अपमान झाला असं समजून तेथून निघून गेला. यत्किंचित त्याने मुधुमेहावरील आपला कायमस्वरूपी इलाज गमावला होता. माझे वडील निधन पावले तेव्हा त्यांचे वय ७० वर्षांचे होते आणि त्यांना तोपर्यंत कधीही मधुमेहाचा आजार झाला नाही. प्रिय भक्तजनहो, खरे औषध काही कुठल्या पदार्थात नव्हते, ते तर बाबांच्या पवित्र हातांमध्ये होते. त्यांचे पवित्र हातचं पदार्थाला दिव्य स्पर्श द्यायाचे, जेणे करून तो पदार्थ अमृतमय होत असावा. ज्या भक्तांना ह्या गोष्टींची माहिती असायची, त्यांना भरपूर फायदा होत असे. अर्थात, बाबांच्या सर्वात मोठ्या शिकवणी होत्या त्या म्हणजे - श्रद्धा आणी सबुरी. जे कोणी हे दोन महामंत्र आचरणात आणतील, ते नेहमीच आयुष्यात यशस्वी होतील.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: संत महंतांकडे अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य असते, ज्याने आपले दुःख व भोग घालवले जाऊ शकतात, परंतु त्यांच्याकडे जाताना, आपण विनम्र झालं पाहिजे आणि त्यांना शरण गेलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्यांच्या कृपेचा लाभ होतो. आपल्यामध्ये आपल्या धनसंपत्तीचा किंवा विद्वत्तेचा किंवा निव्वळ अज्ञानाचा अहंकार आणि उर्मटपणा असेल तर संत संगती घडूनही आपल्याला काहीच लाभ होऊ शकत नाही.

=================================================================================2

कीटकांना मारण्या संबंधी…

बाबांच्या हयातीत, जे भक्त शिर्डीत येत असत, ते स्वतःहून, सेवा कर्तव्यात भाग घेत असत. जसे द्वारकामाई स्वच्छ करणे, द्वारकामाई ते लेंडी बाग या मधला रस्ता, ज्यावर बाबा रोज चालत असत, तो स्वच्छ करणे. ही सेवा कोणी त्यांच्यावर लादत नसत. ती बाबांची पूजा आहे असं समजून, ती मंडळी ही सेवा करत असत. शिर्डीचे स्थानिक भक्त अशा सेवा नित्य नेमाने करत असत. माझे वडील जेव्हा शिर्डीत असायचे, तेव्हा ते रॉकेलचे कंदील स्वच्छ करून, ते संध्याकाळी पेटवण्याचे व द्वारकामाईमध्ये नियोजित जागी ते टांगण्याचे काम हाती घेत. ह्या संधीचा वापर करून, ते बाबांना मनात येणाऱ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मागत असत. एकदा त्यांनी बाबांना सांगितले की ह्या पुढे मी हे रॉकेलचे कंदील लावत जाणार नाही कारण त्यामुळे माझे पाप वाढत चालले आहे. अंधार होता व कंदील लावताच, पुष्कळ कीटक त्या भोवती गोळा होतात, तिथेच काही काळ भ्रमण केल्यावर, ते कंदीलात पडून मृत्यू पावतात. जर कंदील लावलेच नसते, तर तिथे कीटक आलेच नसते आणि कदाचित मृत्यू पावले नसते. थोडक्यात माझ्या वडिलांना जाणून घ्यायचे होते की ईश्वराने सृष्टीची अशी रचना का केली आहे आणि बाबांचे त्याबद्दल काय स्पष्टीकरण आहे. बाबा ह्या प्रश्नावरती हसले आणि म्हणाले, "ए भाऊ, तू वेडा आहेस. तुला काय वाटतं की तू जर कंदील लावले नाहीस तर कीटक मरणार नाहीत का ? ते जिकडे दिवे असतील तिथे जातील आणि तिथे मरतील. ही सर्व भगवंताची रचना आहे. त्याने त्यांच्या जन्माच्या वेळीसच त्यांच्या मृत्यूची योजना आखून ठेवली आहे. जर दिवा किंवा प्रकाश नसेल तर, बाकीचे प्राणी त्यांना खावून टाकतील. अशा प्रकारच्या कृत्याने (कंदील लावणे) माणसाच्या पापात भर पडत नाही. कंदील लावण्यामागे तुझा मुख्य उद्देश्य द्वारकामाईतला अंधार दूर करणे आहे जेणेकरुन भक्त त्यांची पूजा अर्चा सहजतेने करू शकतील. म्हणून तू कुठल्याही पाप कर्मात गुंतत नाही आहेस. किंबहुना कीटकांच्या मृत्यूने तुला दुखः होतं यावरून तुझे हृदय मवाळ आहे हे दिसून येते. देवाला त्याची कर्तव्यं काय आहेत ते माहित आहे आणि आपण त्याच्या कामात दखल नाही दिली पाहिजे. त्याने आपल्यात जीव घालतानाच्या वेळीच, दुसऱ्या हाताने आपल्या अंताची व्यवस्था योजून ठेवली आहे. म्हणून तू काळजी न करता तुला आनंद देणारे काम करत जा. अल्ला भला करेगा." अशा प्रकारे बाबांच्या शिकवणी ह्या अति सोप्या आणि पटणाऱ्या होत्या. ह्या घटनेतून त्यांनी माझ्या वडिलांना एक थोर सल्ला दिला आणि देवाने बनवलेल्या एका प्रमाणाची जाणीव करून दिली.

।। श्री गणेशया नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: माणसाने जाणून बुजून जर इतर जीवांना काया वाचा किंवा मनाने इजा केली तर त्याला पाप लागत असतं. परंतु हेतू शुद्ध ठेवून कुणी जर रचनात्मक कार्य करत असेल ज्यात अपरिहार्य रीतीने कुणाला अपाय झाला तरी त्याचे पाप माणसाला लागत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर, माणसाच्या काम करण्याच्या हेतूवर ते काम पाप आहे का पुण्य आहे ते ठरत असतं.

आपण पाहतो की समाजामध्ये बरेच लोक एकमेकांशी वाद घालत असतात तसेच स्वार्थाने प्रेरीत कामं करत असतात, ज्याने इतर जीवांना कष्ट होतात. हे सर्व पाप म्हणून गणलं जातं. तसेच समाजामध्ये काही सद्गुणी लोकं सुद्धा असतात जी भक्ती, प्रेम, सेवा करण्यात मग्न असतात, ज्याचा समाजाला फार लाभ होतो. हे पुण्य म्हणून गणलं जातं. अर्थात माणसाला आज केलेल्या पाप किंवा पुण्यामुळे पुढे अनुक्रमे दुःख किंवा सुःख अनुभवायला मिळतं. म्हणून माणसाने ईश्वरावर श्रद्धा ठेवून नेहमी पुण्य कर्म करण्यात मग्न असलं पाहिजे. त्यामुळे त्याला भविष्यात न मागताच सुःख प्राप्ती होते.

=================================================================================3

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

आगीशी झुंज

प्रिय साई भक्तांनो, तुम्हाला ठाऊक असेल की बाबांनी एका कुंभाराच्या मुलीचा जीव वाचवला होता, जी आगीच्या भट्टीमध्ये चुकून पडली होती. असं करत असताना, त्यांच्या स्वतःच्या हाताला भाजण्याच्या तीव्र जखमा झाल्या होत्या. भागोजी शिंदे नावाचा एक कुष्ठरोगी, त्यांच्या जखमांना तूप लावायचा आणि मग त्याच्यावर कापडाच्या पट्ट्या बांधायचा. बाबा गरम डाळ किंवा मटणाचा सांभार ढवळण्यासाठी आपल्या हातांचा वापर पळीसारखा सुद्धा करायचे आणि ह्या गोष्टी त्यांच्या भक्तांना प्रसाद म्हणुन देण्यात येई. अर्थात मला ह्या गोष्टीची खात्री आहे की त्या पवित्र हाताच्या स्पर्शाने त्या पदार्थांमध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुण उतरत असावेत. एखाद्याने ते पदार्थ प्रसाद म्हणून खाल्ले, की ते क्षणार्धात सर्व तीव्र रोग पळवून लावत असेल. मात्र मी आता तुम्हाला सर्वांना येथे एक अभूतपूर्व घटना सांगणार आहे.

एका पहाटे माझ्या आजोबांना एक स्वप्न पडलं. त्यांना स्वप्नामध्ये दिसलं की त्यांची खटाव गिरणी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे आणि म्हणून त्यांची झोपमोड झाली. पुढे जेवण्याच्या पंगतीत बसले असताना जेव्हा त्यांनी माझ्या वडिलांसमोर तो विषय काढला, तेव्हा त्यांनी गिरणीचे मालक श्री धरमसी खटाव यांना त्याविषयी सांगण्याचा निर्णय केला. गिरणी समुहाचे सचिव म्हणून त्यांनी मालकांना गिरणीचा आगी विरुद्ध योग्य विमा उतरवण्याचा सल्ला दिला. त्या काळात विमा संरक्षण प्रचलित नव्हते, कारण त्यासाठी मोजले जाणारे पैसे नफा कमी करत असत आणि मुनीमजी त्याच्या विरोधात होते. शेवटी माझे आजोबा श्री धरमसी यांना पटवण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी संपूर्ण कापड गिरणीच्या पुर्नमूल्यांकनाची व्यवस्था केली आणि विमा संरक्षणाचे जास्त मूल्याने नूतनीकरण केले.

५ ते ६ महिन्यांनंतर, एका पहाटे त्यांना गिरणीकडून आपात संदेश आला, की गिरणीत आग लागली आहे आणि त्यांना त्वरित बोलवण्यात आलं होतं. त्यांनी साहजिकच गिरणीकडे त्वरित धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की विणकाम विभाग आगीच्या भक्षस्थानी पडला होता. त्या दोघांनी बाबांकडे प्रार्थना केली आणि आग रोखण्याकरता तसेच गिरणी पूर्ण नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या मदतीची याचना केली. ते दुसऱ्या माळ्यावर चढून गेले, जेथे विणकाम विभाग होता तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांना अत्याधिक नवल वाटलं. त्यांना एक फकीर दिसला ज्याच्या डोक्यावर कापडाचा फडका बांधलेला होता आणि तो आगीच्या मधोमध उभा राहून आपले दोन्ही हात हलवत, आग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना विचारलं "हे आपले बाबाच नाही का जे आग विझवाण्याचा प्रयत्न करत आहेत ?". त्यांना ह्या गोष्टीची पुष्टी मिळाली की बाबांनी त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला होता. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखी एक तास लागला. त्यांनी सुटकेचा श्वास घेतला कारण नुकसान फक्त विणकाम विभागपुरते मर्यादित राहिले आणि गिरणी बंद करण्याची आवश्यकता भासली नाही. आणखी विमा संरक्षण असल्यामुळे, आर्थिक नुकसान सुद्धा भरून निघालं. कामकाजाची परिस्थिती सामान्य होताच, ते दोघे बाबांचे आभार मानण्याकरिता शिर्डीला गेले. ते द्वारकामाईच्या पायऱ्यांच्या जवळ येताच,बाबा माझ्या आजोबांची जवळजवळ खुशामत करत म्हणाले "ए म्हाताऱ्या, तुझी गिरणी कोण चालवत आहे ?" माझे आजोबा त्यांच्या पायाशी नतमस्तक झाले आणि त्यांना त्या सर्वांवर आपले अमोघ आशीर्वाद चालू ठेवण्यास सांगितले. आगीशी झुंज दिल्याबद्दल त्यांनी बाबांचे खूप आभार मानले. त्यांनी तिथल्या तिथे बाबांना पुष्टी दिली की तेच गिरणीचे खरे मालक आहेत. हे ऐकल्यावर बाबा आपल्या जागेवरून उठले, त्यांनी बाबासाहेब तर्खड यांना जमिनीवरून वर उठवलं आणि म्हणाले "ए म्हाताऱ्या,कृपया उठ आणि हे लक्षात ठेव की मी माझ्या भक्तांना गंभिरातल्या गंभीर संकटातून वाचवण्यासाठी वचनबद्ध आहे. ह्या द्वारकामाईतून मी माझ्या भक्तांना दिलेली सर्व वचनं पूर्ण करीन. माझा भक्त मला संकटाचा इशारा पाठवताच लगेच मी त्याच्या सेवेला हजर आहे, मग तो जगाच्या कुठल्याही भागात असो."

मला खात्री आहे की तुम्ही माझ्याशी सहमत असाल की ही एक अभूतपूर्व घटना होती. हे साई देवा, मी तुझ्या आणि तुझ्या लीलांसमोर खऱ्या भावाने नतमस्तक होतो.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: संत आपल्या भक्तांना येणाऱ्या संकटाची सुचना देतात तसेच संकट निवारणही करतात. साई बाबांनी स्वतः म्हटलेलं आहे की "मी माझ्या भक्तांना गंभिरातल्या गंभीर संकटातून वाचवण्यासाठी वचनबद्ध आहे."

भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे की, अशा ह्या अनिश्चित संसारामध्ये पडल्यानंतर, लोकांना कोणाचा भरवसा वाटतो ? रणांगणावर जाताना कुणी उघड्या छातीने जाऊ शकत नाही, त्याला आपलं सुरक्षा कवच घालणे अनिवार्य आहे, नाहीतर तोफ गोळे किंवा शस्त्र आघात होवून तो सहज मृत्यूमुखी पडू शकतो. तशाच प्रकारे अनिश्चित भवसागरातून जाताना भगवंताचे संरक्षण न घेता जाणे म्हणजे अनर्थ ओढवून घेण्यासारखे आहे. भगवंताची भक्ती केल्यास भगवंत आपली ढाल किंवा सुरक्षा कवच बनून आपलं रक्षण करतो.

म्हणून कमीत कमी स्वतःच्या रक्षणाकरता तरी माणसाने वेळात वेळ काढून देवाची भक्ती केली पाहिजे.

===================================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

बाबांची कफनी धुण्याचा अनुभव

आता मी आपल्या प्रयत्नांत जसा पुढे चालत आहे, मला फार वाटतं की माझ्या वडिलांनी त्यांची डायरी लीहून ठेवायला हवी होती. ह्यामुळे आपल्याला त्यांच्या बाबांच्या सहवासातील वाढत जाणाऱ्या अनुभवांची कालक्रमानुसार नोंद प्राप्त झाली असती, ज्याचं पर्यवसन त्यांच्या साई बाबांबद्दलच्या वाढत जाणाऱ्या प्रेमात झालं. अर्थात त्यांच्या साई बाबांशी पहिला भेटीनंतर, त्यांना अशी बारीकशी सुद्धा कल्पना आली नसेल की ते एका महाशक्तीच्या संपर्कात आले होते, जी त्यांच्या आयुष्याला नवीन वळण देणार होती. मला वाटतं की बहुतेक त्या काळात फक्त श्री नरसिंह स्वामी हे एकमेव स्वामी होते ज्यांनी स्वतःची डायरी लिहिली होती, जिने बाबांच्या लीलांवर बराच प्रकाश टाकला आहे. हे सगळे माझ्यासाठी उशिराचे विचार आहेत, कारण मी स्वतः मला मिळालेल्या अनुभवांची तारखेसहित नोंद ठेवली नाही. अर्थात हे सांगण्याची गरज नाही, की माझे अनुभव हे माझ्या वडिलांच्या प्रचंड आणि विलक्षण अनुभावंपेक्षा कमी आहेत.

जरी माझ्या वडिलांचं बाबांवरचं प्रेम आणि भक्ती हे वाढत जाणारे होते, बाबांकडे आपल्या भक्ताशी असलेली बांधिलकी धृढ करण्याचं कौशल्य होतं. शिर्डीत असताना माझ्या वडिलांना तेथील ग्रामस्थांकडून कळलं होतं की बाबांची आंघोळ सुद्धा विशेष प्रकारची होती. ते आपल्या सर्वांसारखे फक्त शरीर बाहेरून स्वच्छ करत आणि धुवत नसत तर ते आतले भाग सुद्धा स्वच्छ करत आणि धुवत असत. ते आपली आतडी बाहेर काढत असत आणि ती धुवत असत आणि शरीरात पुन्हा टाकत असत. माझे वडील म्हणायचे की फक्त प्रभू श्री राम आणि प्रभू श्री कृष्ण हे अष्टसिद्धिंसहित (आठ महाशक्तिंसहित) जन्मले होते आणि म्हणून त्यांना माणसाच्या रूपातील देव म्हटलं जायचं. त्यांच्यानुसार बाबांची जन्म तारीख कुणालाच माहित नव्हती पण त्यांच्या लीला सर्व बाबतीत महाशक्तीच्या लिलांइतक्याच सक्षम आणि त्याच तोडीच्या होत्या.

शिर्डीच्या त्यांच्या एका भेटीच्या वेळी, बाबांनी माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांना त्यांच्या बरोबर त्यांच्या आंघोळीच्या ठिकाणी यावे लागेल आणि त्यांना एक विशेष कार्य देण्यात येईल. माझे वडील असं काम करायला नेहमीच उत्सुक होते. त्यांनी अनुमान लावला की त्यांना अजून थोडा दैवी संग भेटेल. बाबा म्हणाले, "भाऊ, काम फार सोपं आहे. मी माझी आंघोळ करतो आणि ती करत असताना तू माझी कफनी धु. ती धुतल्यानंतर, तुला सूर्यप्रकाशात आपले दोन्ही हात उंच करून, ती सुकेपर्यंत धरून ठेवायची आहे. तुला माहित आहे की मला आंघोळ करायला असामान्यपणे फार वेळ लागतो, म्हणुन माझी आंघोळ उरकेपर्यंत ती सुकेल आणि मी ती पुन्हा घालू शकेन. निट काळजी घे की ती सुकताना जमिनीला स्पर्श नाही झाली पाहिजे". माझ्या वडिलांनी ते काम करण्यासाठी होकार दिला आणि ते काम करायला प्रत्यक्ष सुरु केले.

ते लेंडी बागेत गेले, जेथे पत्र्याची एक खोली होती आणि एक मोठा चौरंगी दगड होता, ज्यावर बाबा आंघोळ करत असत. माझे वडील स्नानगृहाच्या बाहेर उभे राहिले, जेणेकरुन बाबा आपली कफनी त्यांना धुवायला देतील. बाबांकडून कुठलीही हाक आली नाही आणि कफनी बाहेर येत नव्हती, म्हणून ते अधीर झाले. त्यांना वाटलं की ही बाबांची एक क्लुप्ती असावी. त्यांनी दरवाजाला असणाऱ्या भोकातून त्या खोलीत डोकावून बघण्याचं ठरवल. त्यांनी जे पाहिलं त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. बाबांच्या शरीराच्या प्रत्येक भोकातून प्रकाशाचे किरण बाहेर येत होते. त्यांना तो उग्र प्रकाश सहन झाला नाही आणि आपली दृष्टी जाईल की काय अशी भीती वाटली. आणि आपलं कुकर्मसुद्धा उघड होईल अशी भीती वाटली. त्याच क्षणी त्यांनी बाबांना हाक मारताना ऐकलं. ते कफनी धुण्याकरिता घेउन जाण्यासाठी सांगत होते. माझ्या वडिलांनी कफनी घेतली आणि ती विहिरीजवळ नेली आणि साबणाने निट धुतली. ती पिळून घेतल्यावर, त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी ती प्रखर सूर्यप्रकाशात धरून ठेवली. सुरवातीला त्यांना तिचं वजन सहन झालं पण जसजसा वेळ जाऊ लागला, कफनी सुकल्यामुळे हलकी होण्याच्या ऐवजी जड होऊ लागली. माझ्या वडिलांना आता जाणवलं की ते त्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणार आहेत, कारण कफनी लवकरच जमिनीला स्पर्श करणार होती. त्यांनी प्रभू हनुमानांकडे प्रार्थना करून मदत मागण्याचं ठरवलं, जेणेकरुन त्यांच्याकडे ते कष्टाचं काम उरकण्यासाठी पुरेसे बळ प्राप्त व्हावे. ते प्रभू हनुमंताकडे प्रार्थना करत असताना, त्यांनी बाबांना आतून ओरडताना ऐकलं "ए भाऊ! तू प्रभू हनुमंताकडुन मदत का मागता आहेस?". निशंकपणे बाबा अंतरज्ञानी होते, जे कुणाचेही मन एकदम अचूकपणे वाचू शकत होते. मग माझ्या वडिलांनी बाबांकडे क्षमा याचना केली कारण त्यांनी बाबांच्या उघड्या शरीराकडे बघण्याचं पाप केलं होतं. बाबांनी त्यांच्या कबुलीजबाबाला अनुकूल प्रतिसाद दिला आणि काहीच विलंब न लागता कफनी हलकी झाल्याची माझ्या वडिलांना जाणीव झाली. माझ्या वडिलांनी बाबांचे आभार मानले आणि प्रतिज्ञा केली की ते असा उपक्राम करण्याचे दुःसाहस करणार नाहित. त्यांना समजलं की कोणीही बाबांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू शकत नाही.

बाबांच्या शिकवणी किती थोर होत्या आणि तुमच्या संमतीने मी हे म्हणण्याचं स्वातंत्र्य घेतो की "ते लोक भाग्यवान होते, ज्यांना बाबांकडूनच थेट शिकवणी मिळाल्या."

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: संत हे फक्त सर्वज्ञच असतात असे नाही तर त्यांच्या कडे "संकल्प-सिद्धी" सुद्धा असते. "संकल्प-सिद्धी" चा अर्थ असा आहे की आपण बऱ्याच गोष्टींची कल्पना करतो आणि म्हणतो की ही गोष्ट जर झाली असती तर किती बरं झालं असतं. वास्तविकपणे कल्पना केलेली गोष्टी सामान्य माणसाला प्रत्यक्षात प्राप्त होत नाही. पण संतांकडे एखाद्या गोष्टीची फक्त कल्पनामात्र केल्याने, त्यांना ती गोष्ट प्राप्त होत असते. ह्या त्यांच्या सामर्थ्यालाच "संकल्प-सिद्धी" असे म्हणतात.

शास्त्रात सांगितलेल्या अष्ट सिद्धी सुद्धा संतांकडे असतात. वर सांगितलेल्या अनुभवात, साई बाबांनी कफनी हलकी तसेच जड केली. हे सामर्थ्य अष्ट सिद्धींपैकी एक आहे.

===================================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

एका भुताशी भेट झाली तेव्हा…

प्रिय वाचकांनो, मला पूर्णपणे ठाऊक आहे की आपण २१व्या शतकात राहत आहोत आणि भुताच्या अस्तित्वाबद्दल विश्वास ठेवणं कठीण आहे. मी स्वतः एक अभियंता आहे आणि विज्ञानामध्ये दृढ विश्वास ठेवणारा आहे आणि जगभर भ्रमण केलं आहे. हा अनुभव माझ्या वडिलांचा आहे आणि तो सुद्धा शिर्डी बाबांच्या कर्मभूमी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रातला आहे, जेथे बाबांनी सर्व दैवी चमत्कार केले जे मानवजातीसाठी अविश्वसनीय आहेत. म्हणून मी तुम्हाला माझ्या वडिलांनी कथन केलेला अनुभव जसाच्या तसा सांगेन जो माझ्या स्मरणामधे सक्षमपणे ठेवण्यात आला आहे. शिर्डीतील आपल्या एका भेटीत, एके दिवशी भल्या पहाटे माझे वडील नैसर्गिक विधी (शौच) करत होते. हे नाल्याच्या किनारी होते आणि ते पिंपळाच्या झाडाखली बसले होते. अजून अंधार होता आणि त्यांच्या दृष्टी समोर एक वन्य कोंबडा दिसला. तो आरवत होता पण त्याचा आरवण्याचा आवाज खूप विनोदी होता, जो माझ्या वडिलांनी पूर्वी कधीच ऐकला नव्हता. त्या वन्य कोंबड्याने माझ्या वडिलांचे चित्त स्वतः कडे वेधून घेतले. माझे वडील त्याला बघू लागले आणि एकदम तो कोंबडा एका काळ्या रंगाच्या सापामध्ये रुपांतरीत झाला. तो साप उठला आणि तेथे उभा राहिला व त्याने आपला फणा उगारला. माझे वडील घाबरले आणि बाबांच्या मदतीकरता प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर तो साप तेथून अदृश्य झाला. माझे वडील जिवावर बेतले एवढे घाबरले. त्यांनी घाई घाईने आपला नैसर्गिक विधी उरकून त्या जागेवरून पळून जाण्याचा निश्चय केला. ते तसे करत असताना त्यांनी कोणालातरी अस बोलताना ऐकलं "ए माणसा, तू माझ्या वाटेत बसला आहेस, जेथून मी रोज जातो. मी तुला माझ्या वाटेतून दूर जाण्याचा आदेश देतो. काही क्षणातच, एक बुटका कुरूप दिसणारा माणूस त्यांचा समोर उभा राहिला. माझ्या वडिलांनी त्याला सांगितलं की तेथे ये जा करण्यासाठी त्याला पुष्कळ जागा आहे आणि नाहीतरी त्यांचा नैसर्गिक विधी झाल्यानंतर ते ती जागा सोडून देणार होतेच. पण तो बुटका माणूस उंच उंच वाढू लागला आणि म्हणाला "तू मला ओळखला नाहीस का ? मी वेताळ आहे आणि ही माझी जागा आहे आणि मी पुन्हा एकदा तुला येथून दूर जाण्याचा आदेश देतो." माझे वडील जरी फार घाबरले होते तरी त्यांच्यासाठी फक्त बाबाच त्यांना शिर्डीत आदेश देऊ शकत होते कारण त्यांच्या दृष्टीने तेच त्या जागेचे स्वामी होते, आणि दुसरे कोणीच नाही. माझ्या वडिलांनी मग मुठभर माती उचलली आणि बाबांचं नाव घेत त्या उंच उभ्या असणाऱ्या वेताळावर फेकली आणि बाबांना त्यांच्या बचावाकरिता येण्यासाठी प्रार्थना केली. त्यांना वेताळाच्या जागी धुराची एक मोठी रेघ दिसली, वेताळ हवेतल्या हवेत नाहीसा झाला होता. माझे वडील अक्षरशः त्या जागेवरून पळून गेले. आंघोळ केल्यावर आणि न्याहारी घेतल्यावर ते द्वाराकामाईत गेले. जेव्हा ते बाबांच्या चरणांपाशी आले तेव्हा त्यांनी बाबांना विनोदाने विचारताना ऐकले, "ए भाऊ आज भल्या पहाटे, तू माझ्या उदीची मदत का मागत होतास?" माझे वडील त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाले आणि जे काही घडलं होतं ते सर्व काही सांगितलं. त्यांनी बाबांना सांगितलं की त्यांच्या कडे त्यांची उदी नव्हती म्हणून त्यांनी शिर्डीची (बाबांच्या कर्मभूमीची) माती उचलली आणि ती उदी आहे असं मानली आणि ती वेताळावरती फेकली. हे ऐकल्यावर बाबा म्हणाले "भाऊ, तू आज एक चांगलं काम केलं आहेस. त्या वेताळाला तू मुक्ती दिली आहेस." माझे वडील बाबांना म्हणाले की त्यांना ज्या काही सुचना बाबांकडून मिळत गेल्या त्याप्रमाणे ते करत गेले कारण त्या धडकी भरवणाऱ्या क्षणी, त्यांनी त्यांची विचार करण्याची शक्ती गमावली होती. त्यांनी बाबांचे खूप-खूप आभार मानले. बाबांची परवानगी घेऊन त्यांनी बाबांना प्रश्न केला की हे भूत डाकिणी ई. ह्या जगात खरेच असतात का? बाबा उत्तर देत म्हणाले "भाऊ, ही सुद्धा भगवंताची निर्मिती आहे. पण लक्षात ठेव की वाचवणारा हा नेहमी मारणाऱ्यापेक्षा शक्तिशाली असतो. मी इथे पवित्र द्वारकामाईमध्ये बसलो असताना, कोणी तुला इजा करू शकत नाही. शिर्डी मध्ये निर्भय रहा".

प्रिय साई भक्तांनो, खरं सांगतो, तुम्हा सर्वांना हे कथन करताना, माझ्या सर्वांगाला कंप सुटतो. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, ह्यावर विश्वास ठेवा. कुठल्याही प्रकारे, हा माझ्या वडिलांचा कल्पना विलास नव्हता, कारण त्यांनी तसं का केलं असतं ? मला खात्री आहे की माझ्या वडिलांना त्यांच्या जिज्ञासू मनात प्रश्न येत असावेत आणि बाबा ते आपल्या पद्धतीने सोडवायचे. त्या वेळच्या अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला असणार.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य: भगवंताने ह्या जगात ८४ लक्ष योनी निर्माण केल्या आहेत, जसे मनुष्य, विविध प्राणी, विविध पक्षी ई. ह्या पैकी काही भूत योनी आहेत, जसे वेताळ, डाकीणी ई. काही जीवांना स्वतःच्या कर्मानुसार ह्या योनीत जन्म घ्यावा लागतो.

सर्वसामान्यपणे या योनीतील जीव उपद्रवी असल्यामुळे, लोक या योनीला घाबरतात. परंतु भगवंताला शरण आल्यावर, भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करत असल्यामुळे, काळजीचे कारण उरत नाही.

=================================================================================7

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

माझ्या पणजीला मिळालेले साई दर्शन

प्रिय साई भक्त वाचकांनो, शिर्डीच्या त्या १७ भेटींमधून माझे वडील बहुसंख्य अनुभवांनी समृद्ध झाले आणि जेव्हाही ते त्या अध्यात्मिक रंगात रंगून जायचे तेव्हा ते, आपले ते अनुभव सांगायचे आणि आम्हाला तृप्त करायचे. मला खात्री आहे की त्यांना त्यातून भरघोस आनंद प्राप्त होत असेल. मला पुन्हा एकदा प्रामाणिकपणे वाटतं की त्यांनी ते लिहून ठेवायला पाहिजे होते. मी तुम्हाला ते थोडे अनुभव सांगतोय जे माझ्या मनावर कायमचे बिंबले आणि अर्थात ते जे मला आठवतात. माझा हेतू निव्वळ हा आहे की शिर्डी साई बाबांचे सामर्थ्य साई भक्तांपर्यंत पोहोचावे आणि तसं करत असताना माझी त्यांच्या प्रती भक्ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे.

माझे पणजोबा-पणजी, जे चरनी रोड चौपाटी (गिरगाव चौपाटी) येथील त्यांच्या बंगल्यात राहात होते, त्यांना माहीत झालं की रामचंद्र (माझे आजोबा) व ज्योतिंद्र (माझे वडील) वारंवार शिर्डीला जात होते. वडील व आजोबा वांद्रे येथील टाटा ब्लॉक्स येथे भाड्याने राहात असल्यामुळे, ते त्यांना फक्त क्वचित भेटायचे. माझ्या पणजोबा-पणजी यांची जीवन शैली त्या काळच्या इंग्रज लोकांसारखी होती. पण माझी पणजी फार जिज्ञासू स्वभावाची व्यक्ती होती आणि माझे वडील जेव्हापण त्यांच्याकडे चौपाटी येथे भेट देत, तेव्हा ती माझ्या वडिलांकडे शिर्डी साई बाबा आणि त्यांच्या लीलांबद्दल चौकशी करायची. ती नेहमी त्यांना, तिला साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला घेऊन जाण्यास सांगायची आणि माझे वडील नेहमी तिला आश्वासन द्यायचे. त्यांची खात्री होती, की हे कधीच शक्य होणार नाही कारण त्यांचे आजोबा अशा भेटीसाठी कधीच परवानगी देणार नाहीत. तीचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक होतं आणि आजोबा, संत व बाबा यांमध्ये विश्वास ठेवणारे नव्हते.

पुढे असं घडलं की मुंबईत प्लेगची साथ पसरली आणि डॉक्टरांना काही त्या काळापर्यंत त्या भयाण रोगावर कुठलंही ठोस औषध किंवा उपचार सापडलेला नव्हता. माझ्या पणजीला ताप आला आणि तिच्या डॉक्टर असलेल्या पतींनी दिलेल्या उपचाराने कोणतेच चांगले परिणाम हाती येत नव्हते. तिच्या आजाराबद्दल समजताच, माझे वडील त्यांच्या घरी गेले. त्या भेटीच्या दरम्यान, माझी पणजी माझ्या वडिलांना म्हणाली की ती त्या प्लेगच्या आजारातून बरी होणार नाही आणि तिच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी त्यांनी साई बाबांकडे प्रार्थना करावी. मग ती शिर्डीला येईल आणि बाबांचे दर्शन घेईल. तिची याचना ऐकल्यावर, माझ्या वडिलांनी तिला सल्ला दिला की तिचा साईंवर खराखुरा विश्वास असेल तर तिने अंथरुणातूनच त्यांची प्रार्थना करावी आणि प्रभू साई निश्चितपणे तिच्या मदतीसाठी धावून येतील. माझ्या वडिलांनी उदीचं एक छोटं पाकीट (जे नेहमी ते आपल्या पाकिटात ठेवायचे) तिच्या उशी खाली ठेवलं आणि घरी परत येऊन तिला बरं वाटण्यासाठी भगवान साईंकडे प्रार्थाना केली. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे, चौपाटी बंगल्यातला नोकर वांद्र्याला आला आणि म्हणाला की ज्योतीबाला (माझ्या वडिलांना) बरोबर घेऊन येण्यास त्याला सांगण्यात आलं आहे. माझे आजोबा आणि वडील दोघेही घाबरले आणि प्रार्थना करू लागले की कोणतीही अनुचित घटना घडलेली नसावी. ते लगेच चौपाटीला गेले. तिथे पोहोचताच आणि पणजीला खाटेवर बसलेले पाहून, त्यांना जन्मभरीचा धक्काच बसला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती म्हणाली "ज्योतिबा, काल रात्री तुझे साईबाबा इथे आले होते. त्यांनी सफेद कपडे घातले होते आणि डोक्याला सफेद कपडा बांधलेला होता. त्यांना सफेद दाढी होती. ते माझ्या खाटेजवळ उभे राहिले आणि उदीने भरलेला आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले की, आई, आता पासून तुला बरं वाटू लागेल आणि ते अदृश्य झाले. त्यानंतर, मला दरदरून घाम फुटला आणि माझा ताप गेला. भल्या पहाटे, मला एकदम बरं वाटत होतं आणि मी माझे दात घासले नाहीत आणि गड्याला माझ्यासाठी आरसा आणण्यास सांगितला. माझा चेहरा त्यात पाहताच, मला माझ्या कपाळावर उदीने माखलेल्या हाताची छाप स्पष्ट दिसली. म्हणून मी गड्याला तुला बोलावण्याकरता पाठवलं आणि आता तू स्वतः पाहू शकतोस." पणजीचा आणि नातवाचा आनंद त्या क्षणी गगनात मावेनासा झाला. माझ्या वडिलांनी तात्काळ प्रभू साईंचे त्यांच्या दैवी मदतीसाठी आभार मानले. डॉक्टर तर्खड (पणजोबा) सुद्धा अचंबित झाले कारण प्लेगने ग्रासलेले त्यांचे कित्येक रुग्ण दगावले होते. त्यांनी त्यांच्या बंगल्यात दासगणू महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तसं पाहिलं तर पणजीला बाबांचं दर्शन आधीच घडून गेलं होतं. प्रभू साईंनी स्वतःहून तिची इच्छा पूर्ण केली होती. साई बाबा, आमची तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. कृपा करून आम्हां सर्वांवर तुमचा कृपाशीर्वाद चालू राहू देत.

प्रिय साई भक्त वाचकांनो, तर्खड कुटुंबियांचा हा स्वतःचा अनुभव सांगून मी हा अध्याय संपवू इच्छितो. पुढे जाण्यापूर्वी, मी माझ्या वडिलांच्या (ज्यांना आम्ही दादा म्हणायचो) आत्म्याला खरीखुरी प्रार्थना करतो की मी जर का हा बहुमूल्य अनुभव सांगताना कुठे चुकलो असेल आणि काही चुका केल्या असतील तर मला खरीखुरी क्षमा करावी. मला खात्री आहे की तो पवित्र आत्मा जिकडे कुठे असेल, तो मला क्षमा करेल, कारण हे पुस्तक लिहिण्यामागे माझा एकमेव हेतू हा आहे की दादांना अनन्यपणे वंदन करावं जे मी त्यांच्या हयातीत करू शकलो नाही आणि मला वाटतं की कधीच न करण्यापेक्षा उशिराने केलेल बरे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संतांकडे आपल्या भक्तांचे प्रारब्धाने आलेले भोगांचे निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. साई बाबांनी त्यांच्या अनेक भक्तांचे भोग व रोग दूर केले आहेत आणि आजही दूर करत आहेत. कित्येक दृष्टीहीनांना दृष्टी दिली आहे, अपंगांना त्यांचे पाय दिले आहेत, दुर्धर आजारांनी ग्रासालेल्यांचे रोग बरे केले आहेत. अर्थात हे फक्त देवच करू शकतो. कुठलाही सामान्य माणूस, किंवा डॉक्टर किंवा वैद्य असे चमत्कार करू शकत नाही. म्हणून आपण संतांना नेहमी शरण येऊन राहिले पाहिजे.

==================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साईंशी संस्मरणीय अशी शेवटची भेट

ॐ श्री साईनाथाय नमः

माझे तर्खद कुटुंबियांचे साई बाबांबरोबरचे जिवंत अनुभव कथून झाले आहेत. कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकतो की तर्खद कुटुंबाच्या भाग्यातच प्रभू साईंच्या संपर्कात येणं लिहिलं होतं आणि हे घडलं ते त्यांच्या पूर्वपुण्याई (मागच्या जन्मांतील सुकृता) मुळे. एक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्यांना बाबांकडे काही मागण्याची कधीच गरज पडली नाही. जरी त्यांची पहिली भेट ही एका शारीरिक व्याधीतून सुटका होण्यासाठी होती, तरी त्या भेटीत देखील त्यांना आपल्या येण्याचे कारण सांगावे लागले नाही. बाबांनी त्यांचे मन अगदी अचूकपणे वाचले आणि त्यांच्यावर कृपाशिर्वादाची वृष्टी केली जेणेकरून ते त्यांच्या जवळ यावेत. जसजसा काळ गेला, त्यांच नातं अधिकाधिक धृढ होत गेलं, आणि मी आता प्रामाणिकपणे प्रार्थना करतो की हे जगाच्या शेवटा पर्यंत कायम रहावं.

मला वाटतं की वर्ष १९१८ असावं आणि नवरात्रीचे दिवस असावेत कारण बाबांनी आपली महासमाधी विजयादशमीच्या दिवशी घेतली. एका आजारी वाघाला मुक्ती दिल्यानंतर सात दिवसांनी घेतली. बाबा फार वृद्ध झाले होते आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी एक भक्त अशा दोन भक्तांच्या सहाय्याने चालायचे. एके संध्याकाळी, राँकेलचे कंदील त्यांच्या निश्चित जागी ठेवल्यानंतर, माझ्या बाबांनी पाहिलं की बाबा फार थकलेले दिसत होते. त्यांनी बाबांना थोडा आराम वाटावा म्हणून पाय चेपू का म्हणून विचारलं. बाबा मग म्हणाले "तू इच्छा व्यक्त केली आहेस, तर चेप आणि स्वतःचं समाधान कर". माझे बाबा मग त्यांच्या पायापाशी बसले. काही वेळानंतर, बाबा त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले "भाऊ, ही आपली अखेरची भेट आहे आणि आपण यानंतर भेटणार नाही. तुला माहित आहे की अनेक प्रकारची लोकं शिर्डीत येतात आणि माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मागतात, जसं संपत्ती, संतती, स्वास्थ्य इत्यादी. मी कोणालाही निराश करत नाही आणि त्यांच्या तर्फे भगवंताला प्रार्थना करतो. माझा भगवंत माझ्या प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद देतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतो. तू, मी बघितलेला असा एकमेव मनुष्य आहेस ज्याने काहीच मागितलं नाही. बहुतेक तू अविवाहित आहेस आणि तुझ्याकडे कुटुंब नाही म्हणून तुला कशाची गरज भासत नसावी. पण भाऊ, आपण यापुढे भेटणार नाही, म्हणून तुला हवं असलेलं काहीही माग, नाहीतर तू माझी आतापर्यंत जी काही सेवा केलीस त्याबद्दल मला तुझा कायम ऋणी झाल्यासारखं वाटेल". माझे बाबा मग म्हणाले "बाबा तुमच्या कृपेने, माझ्याकडे जीवनात सर्व काही आहे आणि मला कोणत्याही भौतिक गोष्टीची खरच जरुरी नाही. फक्त काळजी घ्या की तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या बरोबर असावेत आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात तुम्ही माझ्या स्मृतीतून निघून जाता कामा नये. (हेचि दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा)". मग बाबा म्हणाले "भाऊ, कुठल्याही परिस्थिती मी माझ्या भक्तांशी कर्तव्यबद्ध आहे आणि मी तुला स्वतःसाठी काहीतरी मागून घेण्यासाठी सांगत आहे कारण प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक ओळख असते आणि त्याला संसार सागरातून यशस्वीपणे पार पडण्यासाठी काही बाह्य मदतीची गरज असते. काही संकोच न करता माग?". माझ्या वडिलांना जाणीव झाली की ही त्यांच्यासाठी अग्नी परीक्षा आहे आणि म्हणून ते म्हणाले "बाबा आता तुम्ही एवढा आग्रह करता आहे, म्हणुन मी मागण्यापूर्वी, तुम्ही मला वचन द्या की तुम्ही निशितपणे माझी मनोकामना पुरी कराल". मग बाबा म्हणाले "भाऊ, मी कित्येकांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत, म्हणून तुला माझ्याबद्दल थोडीदेखील शंका असता कामा नये. तू माग आणि मी ती पूर्ण करतो". मग माझे वडील म्हणाले "बाबा, तुमच्याकडे माझं एकच मागणं आहे. मला कुठेही जन्माला घाला पण तुमचे चरण मला नेहमी दिसले पाहिजेत". बाबा मग काही वेळ शांत होते. मग आपली शांतता खंडित करत ते म्हणाले "भाऊ, मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकत नाही."

माझे वडील मग म्हणाले "बाबा मी काहीच मागत नव्हतो आणि तुम्हीच मला मागायला भाग पाडलत आणि मला तुमच्याकडून याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीची गरज नाही. मग बाबा स्मितहास्य करून म्हणाले "भाऊ, कितीएक लोकं शिर्डीला येतात, पण तुझ्यासारखे फारच कमी असतात, ज्यांना मी पूर्णपणे समजलो आहे. तुझ्या इच्छेने तू मला कायमचा बांधू पाहत आहेस. आणि मला माझ्या देवाकडून अशाप्रकारे कुणाशी बद्ध होण्याची अशी परवानगी नाही. पण तू निराश होऊ नकोस. मी तुला वाचन देतो की आपल्या पुढच्या जन्मात, जेव्हा आपण दहा वर्षाचे असू, आपण एकत्र बसणार आहोत आणि एकाच थाळीतून खाणार आहोत". माझे वडील मग म्हणाले "बाबा जशी तुमची इच्छा." थोडक्यात सांगायचं झाल तर बाबांनी त्यांना पुढच्या जन्मात पुन्हा भेटण्याचं वचन दिलं. माझे वडील संतुष्ट झाले आणि त्यांनी लगेचच त्यांच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. बाबांनी त्यांना वर उठवलं आणि मग आपला हात त्यांच्या जवळ असणाऱ्या उदी पात्रात घातला आणि त्यांना एक मुठभर उदी देऊन म्हणाले "भाऊ ही उदी फार काळजीने जतन करून ठेव आणि हीचा वापर फार क्वचित कर कारण हिच्यात प्रचंड शक्ती आहे, मृत शरीरामध्ये पुन्हा प्राण घालण्याचीही शक्ती आहे." संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली. माझ्या वडिलांच्या अंतरंगात त्यावेळी फार समाधानाची भावना होती. त्याचवेळी, ते थोडे उदास होते कारण बाबांनी सांगितलं होत की ही त्यांची शेवटची भेट आहे. पुढच्या दिवशी बाबांनी त्यांना मुंबईला जाण्यास सांगितलं. घरी पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या आई वडिलांना शिर्डीत जे काही घडलं ते सर्व सांगितलं. त्यांनी एक चांदीचा डबा आणला आणि तो उदीने भरला, जो त्यांनी देवानेच त्यांना दिलेल्या अमृताप्रमाणे बहुमुल्य समजून जतन केला. मला आठवतं की आमच्यापैकी कोणी गंभीर आजारी झालो, तर माझे वडील त्यातली थोडीशी उदी काढत आणि पाण्यात टाकत आणि आम्हाला बरे होण्यासाठी प्यायला देत असत. एक गोष्ट निश्चित होती, की त्यांच्या आयुष्यभरात, त्यांच्या सात मुलांपैकी एकही निधन पावला नाही.

प्रिय साई भक्तांनो, माझे वडील जीवनात कित्येक चढ-उतारातून गेले. त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा बंगला, गाडी आणि ते सर्व काही होतं ज्याची एखादा मनुष्य जीवनात अभिलाषा धरतो. पण उत्तरोत्तर त्यांचा भौतिक जीवनातला रस निघून गेला. मी त्यांना कधीही आजारी पडताना पाहिलं नाही. ते ७० वर्षाचे असताना आजारी झाले आणि निधन पावले, ज्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई बाबा

तात्पर्य : संतांकडे येणाऱ्या लोकांपैकी बरेचसे लोक, आपल्या संसारातील उणीवा भरून काढण्यासाठी मदत मागतात. कुणी त्यांच्याकडे संपत्ती मागतात, कुणी मुलं व्हावं असं मागतात, कुणी नाव लौकिक व्हावं हे मागतात, कुणी आपल्या आरोग्यासंबंधी आधी-व्याधी दूर व्हाव्यात हे मागतात.

पण खरं पाहता, देवाची अशी अपेक्षा असते की, लोकांनी संतांकडे त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं व आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी हेच मागितले पाहिजे. कारण याच मार्गाने मनुष्याला कायमचं सुख आणि मुक्ती मिळू शकते. संसार हा नेहमी बदलत असल्याने, संसारात कधीही कायमचं सुख प्राप्त होत नसतं. समर्थ रामदास यांनी सांगून ठेवलं आहे, "सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे". म्हणून फक्त संसारात गुंतून व त्यात धडपड करून, संसारात आपण सुखी होऊ अशी अपेक्षा धरणे व तसे प्रयत्न करणे निव्वळ मूर्खपणा आहे.

उलट मनुष्याने देवाबद्दल खरं खुरं प्रेम विकसित करून, त्याची श्रेष्ठ भक्ती केली पाहिजे. असे केले तरचं त्याला देवाच्या सामर्थ्याचा परिपूर्ण लाभ होतो आणि तो देवाच्या कृपेनेच खऱ्या अर्थाने संसारात तसेच परमार्थात सुखी होतो आणि शेवटी देव पदाला पोहोचतो आणि मुक्त होतो. खरी भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करण्यासाठी देव फार आतुर असतो !!

====================================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

मुंबईत साई महानिर्वाणाचा पुरावा

ॐ श्री साईनाथाय नमः

यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा श्री मोरेश्वर प्रधान यांना अस्थमाचा झटका पुन्हा आला तेव्हा बाबांच्या उदीचा औषधी उपयोग कसा झाला. त्या वेळी माझ्या आजोबांनी त्यांना बाबांची पवित्र उदी पाण्यात घालून पिण्यासाठी दिली होती, ज्याने त्यांना बरं वाटलं होतं. माझे वडील व आजोबा खूप आनंदी झाले कारण ही तीच उदी होती जी बाबांनी त्यांना फार खात्री देऊन दिली होती आणि त्यांनी कधीच कल्पना केली नाही की त्यांना ती एवढ्या लवकर वापरावी लागेल. पण खरं पाहू जाता काहीतरी विशेष घडलं. श्री मोरेश्वर यांच्या घरातून स्वतःच्या वांद्रे येथील घरी परत येताच, जेव्हा ते बाबांचे आभार मानण्याकरिता चंदनी मंदिराच्या समोर गेले, त्यांनी पाहिलं की बाबांची तसबीर ही बांधणीतून निखळली होती व झुकलेल्या अवस्थेत लोंबकळत होती. त्यांनी माझ्या आजीकडे चौकशी केली की कुठल्या गड्याने त्यांच्या अनुपस्थितीत तिथे स्वच्छता केली होती का. पण ते शक्य नव्हतं कारण तो विजयादशमीचा दिवस होता आणि सर्व स्वच्छता आणि पूजा सकाळीच होऊन गेली होती. ते मग त्या दोन घटनांमध्ये काही योगायोग आहे का याचा अंदाज लावू लागले. ते श्री तेंडूलकर किंवा श्री दाभोळकर यांच्या घरी जाण्याचा विचार करू लागले, जे वांद्र्यातच जवळ राहात होते. पण याची गरज पडली नाही कारण विले पार्ले येथे राहाणारे श्री दीक्षित यांचा नोकर संध्याकाळी त्यांच्या घरी आला. त्याने त्यांना सांगितलं की बाबांनी दुपारी शिर्डी येथे निर्वाण घेतलं आहे आणि श्री दीक्षित हे शिर्डी येथे जाण्याकरता निघणार आहेत आणि त्यांनी बाबासाहेब तर्खड (माझे आजोबा) यांना त्यांच्या सोबत येण्याची विनंती केली आहे.

हे समजताच, त्यांना दोन घटनांमागील गूढ आकळलं आणि जाणवलं की बाबांनी त्यांना बिनतारी संदेश पाठवून कळवलं आहे की ते महानिर्वाण घेत आहेत आणि जगाचा निरोप घेत आहेत. म्हणून अस्थमाचा तात्पुरता झटका आला आणि चंदनी मंदिरातील बाबांची तसबीर निखळली. शिर्डी आणि मुंबई यांतील अंतर किती आहे याची कल्पना करा. ही किती विलक्षण पद्धत आहे आपल्या पेमळ भक्तांना सुचित करण्याची की ते कायमचा निरोप घेत आहेत. प्रिय साई भक्तांनो बाबांना फार यथायोग्य रीतीने संबोधलं जात "अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री साईनाथ" आणि आपल्या प्रमेळ भक्तांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या आगळ्या पद्धतीने, भक्तांच्या अंगात रोमांच उभे राहत असेल, जे फक्त तेच चांगल्या रीतीने जाणू शकतात. अर्थात साई बाबांचे महानिर्वाण हा फक्त त्यांच्या शरीराचा निरोप होता कारण त्यांच्या अवतारकार्याच्या वेळी, त्यांनी आपल्या भक्तांच्या मनावर हे ठसवलं होत की ते त्यांच्या बरोबर सदैव असतील, जेव्हा पण ते हाक मारतील. त्यांनी जाहीर केलं होतं की "माझी हाडं माझ्या समाधितून तुमच्याशी बोलतील आणि माझ्यावर अगाध श्रद्धा ठेवा. अनादि सत्य हे आहे की मी नित्य जिवंत आहे आणि हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे, जे तुम्ही कधीच विसरता कामा नये." ("नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य")

आपण २१ व्या शतकात आहोत आणि आजही रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी या उत्सव काळात आपण त्यांच्या शिर्डीत त्यांच्या भक्तांमध्ये असलेल्या उत्साह पाहू शकतो. माझ्या प्रिय वाचकांनो, मी पण ह्या गोष्टीचं आश्चर्य करत राहतो की पभू साईंबरोबरचा असा दैवी अध्यात्मिक सहवास अनुभवल्यानंतर, माझ्या वडिलांनी उर्वरित जीवन जगण्यासाठी एका सामान्य माणसाचा मार्ग कसा काय स्वीकारला. सामान्य रीत अशी आहे की एखादा माणूस प्रपंचातील (कौटुंबिक जीवनातील) अडीअडचणीतून सुटण्यासाठी परमार्थाचा मार्ग स्वीकारतो. पण माझ्या वडिलांच आयुष्य याला अपवाद होतं आणि हेच योग्य स्पष्टीकरण आहे जे स्विकारलं पाहिजे. मी माझ्या वडिलांच्या अखेरच्या प्रवासासंबंधी काही विवरण देईन, जे सुद्धा माझ्या दृष्टीने अद्वितीय आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संत तसेच देव हे काही फक्त त्यांच्या साडे तीन हाताच्या देहात राहतात असे नाही. ते संपूर्ण विश्वात व चराचरात भरून उरले आहेत. म्हणून ते आपल्या भक्तांना, ते साता समुद्रा पलीकडे असले तरी संकेत देऊ शकतात, मदत करू शकतात तसेच प्रकट होऊ शकतात.

=======================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

श्रावणी सोमवार - १६ ऑगस्ट १९६५

ॐ श्री साईनाथाय नमः

१९१८ ते १९६५ हा ४७ वर्षांचा काळ हा फार मोठा अवधी आहे आणि माझ्या वडिलांनी हा दीर्घ प्रवास कसा संक्रमित केला, हे मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छित नाही. माझं हे पुस्तक लिहिण्यामागचा एकमेव हेतू हा आहे की, शिर्डीच्या साई बाबांबरोबरचे त्यांचे अनुभव तुम्हाला सांगावे आणि ज्याद्वारे आपण श्री साईंप्रती आपले प्रेम व भक्ती व्यक्त करू शकतो. अर्थात, ह्या काळात, त्यांचा माझ्या आईशी विवाह झाला, जीचं माहेर मुंबई येथील केळवे माहीम ह्या ठिकाणी होतं. तिचं नाव होतं लक्ष्मीदेवी केळवेकर. आणखी एक गोष्ट अशी की ह्या काळात माझे आई-वडील महाराष्ट्रातील थोर संतांमधील एक संत, श्री गाडगे महाराज यांच्याशी परिचित झाले, ज्यांनी माझ्या वडिलांना स्वतःच्या कुटुंबाकरता एक बंगला विकत घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी खार येथे एक बंगला विकत घेतला (जो ५१ ई, खार पाली रोड येथे होता) आणि त्या सर्वांनी टाटा ब्लॉक्स या आपल्या जुन्या निवासस्थानाचा १९२३ मध्ये निरोप घेतला.

माझ्या कथनामध्ये संत गाडगे महाराजांचा उल्लेख आला आहे, म्हणून मी त्यांच्या संबंधी काही तथ्य, माझ्या पुढच्या अध्यायात देऊ इच्छितो. त्यांच्या विवाहानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला शिर्डीला फक्त एकदाच नेलं होतं आणि तिला आपल्या पूर्वायुष्याची आणि प्रभू साईंशी घडलेल्या सहवासाची सविस्तर माहिती दिली होती. माझी आई सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. थोडक्यात सांगायचं तर, मी स्वतःला भाग्यवान समजतो, जे मला त्यांच्यासारखे देवामध्ये विश्वास ठेवणारे पालक मिळाले आणि ज्यांच्याकडून मी चांगले संस्कार आत्मसात केले, जे २१व्या शतकात दुर्लभ गोष्ट आहेत. माझे वडील हे फार आरोग्यसंपन्न व्यक्ती होते. मी त्यांना कधीही आजारी पडताना बघितलं नाही, त्यांना कधी साधा सर्दी खोकला सुद्धा झाला नाही. त्यांना ५ मुली आणि २ मुले होती. त्यांनी आपल्या ५ मुलींची लग्न करण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आणि आपल्या २ मुलांची लग्ने पाहू शकले नाहीत.

१९६५ चा जुलै महिना चालला होता. ते आजारी झाले. त्यांना तीव्र ब्रोन्कायटिस (फुप्फुसनलिकादाह) हा आजार झाला आणि त्यानंतर कंबर लचकली, ज्यामुळे त्यांना अंथरुणात पडी घेऊन राहावं लागलं. आम्हा सर्वाना ती वृद्धापकाळाची लक्षणं वाटली. मी वी.जे.टी.आय. अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. च्या शेवटच्या वर्षात शिकत होतो आणि माझे थोरले बंधू रवींद्र हे त्यांच्या कापड गिरणी मध्ये काम करत होते जेथून वडील निवृत्त झाले होते. त्या दिवसांत माझी आई उच्च रक्त दाब, मधुमेह, दमा यांसारख्या सर्व प्रकारच्या दुखण्यांचा त्रास सोसायची. ती कधी कधी गंभीर आजारी व्हायची, तेव्हा आम्हाला तिला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन(प्राणवायू) द्यावा लागत असे. खरं पाहू जाता नेहमी आम्ही ऑक्सिजनचं एक नळकांड घरी हाताशी ठेवायचो. माझे वडील फार वेदानेमध्ये होते आणि सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांना कटिवात (लुंबागो) हा रोग झाल्याचं निदान केल होतं. मी विण्टोजीनो किंवा महानारायण तेल त्यांच्या कमरेला लावायचो, ज्यामुळे त्यांना थोडा आराम मिळायचा. त्यांना खूप उदास वाटायचं की आम्हाला त्यांची सेवा सुश्रुषा करावी लागे. त्यांनी आम्हाला कधीही पाय सुद्धा चेपायला सांगीतले नव्हते आणि म्हणून त्यांना अंथरुणाला खिळून राहिलेली व्यक्ती बनणे फार विचित्र वाटायचं. एकदा त्यांनी मला विचारलं की ते त्यांच्या आजारातून बाहेर येतील काय. मला आठवतं की मी त्यांना त्यांच्या बाबांकडे आपात संदेश देण्याचा सल्ला दिला, जेच फक्त त्यांच्या सुटकेसाठी येऊ शकत होते. पण हे काही घडलं नाही. त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि डॉक्टर जोशी यांच्या सल्यानुसार आम्हाला त्यांना सांताक्रूझ येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली. माझी आई त्यांची सुश्रुषा सेवा करण्यासाठी पूर्णपणे कर्तव्यबद्ध होती. तिला या गोष्टीचा पूर्ण विसर पडला की ती स्वतः एक रुग्ण आहे. ती त्यांच्यासाठी सकाळचा चहा आणि नाश्ता घेऊन जायाची आणि संध्याकाळी, रात्रीचं जेवण घेऊन जायाची. मी महाविध्यालायातून परत आल्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल तिला विचारायचो. ती म्हणायची की काही विशेष सुधारणा नाही पण त्यांचे सर्व इंद्रिय कार्यरत आहेत.

मला वाटतं की ते जवळपास एक आठवडाभर रुग्णालयात दाखल होते. माझी आई त्यांना रोज सकाळी चहाच्या प्याल्या बरोर पवित्र उदी द्यायची जी बाबांनी त्यांना दिली होती. मग १६ ऑगस्ट चा दिवस उजाडला, जो मराठी तारखेप्रमाणे श्रावणी सोमवार होता. माझ्या आईने माझ्या बंधूंना व मला घरी लवकर परत येण्यास सांगितलं कारण आम्ही सर्व श्रावणी सोमवारी सूर्यास्तापूर्वी लवकर रात्रीच जेवण करायचो. मी दुपारी महाविद्यालयातून परत आलो. रुग्णालयात जाताना, ती म्हणाली की आजचा दिवस फार निर्णायक आहे. जर तुझे दादा या दिवसातून सुखरूप गेले तर ते कमीत कमी आणखी एक वर्ष जगतील. मी तिला विचारलं की ती असं का म्हणत आहे. तिने उत्तर दिलं की तिने तिच्या सासूकडून ऐकलं होतं की श्रावणी सोमवार हा तर्खड कुटुंबीयांतील पुरुष मंडळींकरीता अशुभ दिवस आहे कारण त्यांच्या पैकी बरेचसे त्या दिवशी निर्वाण पावले.

आता ती रुग्णालयात पोहोचली तेव्हा काय झालं? जवळपास दुपारी ३.३० वाजता, तिने माझ्या वडिलांना चहाचा प्याला दिला, जो ती थर्मोस मधून घेऊन जायची. माझे वडील हे चहाचे तलपी होते. त्यांना बरं वाटलं आणि जवळपास ४ वाजता, त्यांनी माझ्या आईकडे पुन्हा चहा मागितली. माझ्या आईने त्यांना सांगितलं की अर्ध्या तासाआधीच तिने त्यांना चहा दिला होता आणि तो श्रावणी सोमवार असल्यामुळे ती लवकर घरी जाणार आहे. ५ वाजता, ती त्यांना चहा देईल आणि घरी जाण्याकरिता निघेल. पण माझ्या वडिलांनी हट्ट धरला की तिने त्यांना चहा द्यावा कारण त्यांना काहीतरी दिसत आहे जे एवढ स्पष्ट नाही आहे. माझ्या आईने त्यांना काळजी न करण्यास सांगितलं आणि तिने त्यांना त्यांच्या हातात तुळशीची माळ दिली आणि त्यांना बाबांकडे प्रार्थना करायला सांगितलं. तिने त्यांच्या कपाळाला पवित्र उदी सुद्धा लावली. चहाचा पहिला घोट घेताच ते माझ्या आईला सांगू लागले की कोणीतरी बोलवत आहे पण त्यांना चेहरा निट दिसत नव्हता आणि ओळखता येत नव्हत की तो कोण मनुष्य आहे. माझ्या आईने त्यांना सांगितलं की त्या खोलीत आपण दोघेच व्यक्ती आहोत आणि त्यांनी तुळशी माळेचा वापर करून बाबांचा जप करावा. मग ते बाबांचे नाव पुटपुटु लागले. काही काळाकरता त्यांचा चेहरा उजळला होता. दुखण्याच्या वेदना गायब झाल्या होत्या आणि ते जवळपास ओरडून म्हणाले "बाबा, मी आलो". हे त्यांचे शेवटचे शब्द होते आणि ते प्राणरहित झाले. हा त्यांचा अंत होता. मला वाटतं की त्यांनी त्या वेळी बाबांना बघितलं असावं. निर्वाणाची ही किती आगळी रीत !! असं म्हणतात की प्रत्येक जीवाला, जेव्हा त्याचा प्राण शरीराला सोडून जातो तेव्हा फार यातना होतात. पण माझे वडील "बाबा मी आलो" असं म्हणत निर्वाण पावले. तर अशा प्रकारे, बाबांनी त्यांच्या भाऊंना स्वतः बरोबर नेले. मला माझ्या आईच्या धैर्याचं विस्मय वाटतं, जी एकटीच घरी परतली. ती म्हणाली की तुमचे दादा स्वर्ग लोकाकडे निघून गेले. कृपया सर्वांना कळवा आणि अंतिम यात्रेची तयारी करा. मला आठवतं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एक धडा होता ज्याचं शीर्षक होतं "मरणात खरोखर जग जगते". दादांनी हे वाक्य १०० टक्के खरं करून दाखवलं होतं. माझी आई सामान्यपणे फार भावूक व्यक्ती होती पण तिने अश्रुंचा एक थेंबही धाळला नाही. कदाचीत ती मृत्यूचे ते अकल्पित दृश्य पाहून स्तब्ध झाली असावी किंवा कदाचित बाबांकडून त्या अश्रूंना सक्त आदेश असावेत की त्या दिवशी वाहू नयेत. तर अशा प्रकारे १६ ऑगस्ट १९६५ च्या त्या श्रावणी सोमवारी माझ्या आजीचं वक्तव्य खरं सिद्ध झालं.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

देव तसेच संत अंतकाळी(देह त्यागताना), आपल्या भक्तांची अंतर्बाह्य काळजी घेतात. भाताच्या देहाला दुर्बलता आली तरी त्याला ते ध्यानाची सुखद सावली देतात, ज्यामुळे त्याला कष्ट होत नाहीत. काही भाग्यवान भक्तांना तर ते अनायासे निर्वाण देतात, म्हणजेच कोणताही आजार न होता, चालता बोलता निर्वाण होणे.

===============================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

संत गाडगे महाराजांचे अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

आधी सांगितल्या प्रमाणे, मी महाराष्ट्रातील थोर संतांपैकी एक श्री गाडगे महाराज यांबद्दल सांगण्यासाठी माझी स्मरणशक्ती उजागर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते पूर्वसूचना न देता कधी संध्याकाळी आमच्या खार येथील बंगल्याला भेट देत असत आणि भल्या पहाटेच्या प्रहरी निरोप घेत असत. मी त्यांना स्वतः पाहिलं आहे. ते रंगीबेरंगी कपड्याचे तुकडे जोडून शिवलेला पोषाख घालत असत आणि आपलं डोक कापडाच्या एका फडक्याने बांधत असत. त्यांच्या अशा पेहरावामुळे ते गोधडी महाराज किंवा गोधडी बाबा ह्या नावाने सुद्धा ओळखले जायाचे.

ते चामड्याचे "चढाव" चप्पल म्हणून घालायचे आणि त्यांच्या हातात नेहमी बांबूची काठी असायची. झिजण्यापासुन रक्षणासाठी बांबूच्या काठीला खाली लोखंडी आवरण होतं. ते श्री विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते आणि नेहमी पांडुरंग… पांडुरंग… म्हणत असायचे. मला वाटतं दासगणू महाराज, जे आपल्या कीर्तनांतून साई महिमेचा प्रसार अवघ्या महाराष्ट्रभर करायचे, त्यांनी त्यांची ओळख आमच्या कुटुंबाला करून दिली. संत गाडगे महाराजांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा मुख्यतः, दिन गांजलेल्या जनांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणे हा होता. ते त्यांना स्वच्छतेचे महत्त्व ही शिकवत असत आणि अवघ्या महाराष्ट्रभर गावांतील रस्ते झाडून स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत. 'स्वच्छता हा देव' आहे अशी त्यांची शिकवण होती. फक्त स्वच्छताच,गावांना रोग आणि महामाऱ्यांपासून मुक्त करू शकते, हा त्यांचा सर्व गावकऱ्यांना संदेश असायचा.

अर्थात, हे कार्य करत असताना जर त्यांना श्रीमंत लोकांकडून देणग्या मिळाल्या तर ते त्या जमा करून गावातील गरजू लोकांना वाटत असत. साई बाबांच्या महासमाधी नंतर, माझे आजोबा संत गाडगे महाराजांना कापडाचे ताग दान करू लागले. माझी आई स्वतःच्या हातांनी गोधडी शिवायची आणि जेव्हा पण गाडगे बाबा आमच्या घरी भेट द्यायचे तेव्हा ती त्यांना ती प्रदान करायची. ते मग तिला आशीर्वाद द्यायचे आणि ती गोधडी स्वतःच्या वैयक्तिक वापरा करता घेऊन जायाचे. मला वाटतंकी त्या काळचे लोक ज्या प्रेम व स्नेहाची वृष्टी करायचे, तसं आजच्या काळी सापडणे कठीण आहे.

आधी सांगितल्या प्रमाणे संत गाडगे महाराज हे माझ्या वडिलांना बंगला विकत घेण्यास प्रेरित करण्यास कारणीभूत होते. ते जवळपास नेहमीच अनवाणी चालायचे आणि त्यांनी खार येथे एक बंगला बघितला होता जो माझ्या वडिलांनी १९२३ साली रु. १५०००/- या किमतीला थेट विकत घेतला होता. त्या काळी, जुन्या खार येथे ते एकमेव बांधकाम होतं आणि मला आठवतं की बंगल्याच्या गच्ची वरून आम्हाला रेल्वे स्टेशन, माउंट मेरी चर्च ई. कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसायचं. जेव्हापण गाडगे बाबा यायचे, ते माझ्या आईला आदेश द्यायचे, जी मग त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आणि झुणका बनवायची आणि त्या रात्री आम्ही सर्व जेवण म्हणून झुणका भाकर खायचो. माझ्यावर विश्वास ठेवा की त्या पदार्थाची उत्कृष्ट चव माझ्या स्मरणामध्ये कायमची घर करून राहिली आहे. रात्रीच्या जेवणानंतर संत गाडगेबाबा त्यांच्या विविध गावांतील पदायात्रांच्यावेळी प्राप्त झालेले त्यांचे अनुभव सांगायचे. गाडगेबाबा हे निश्चितपणे सामान्य मनुष्य नव्हते तर देवाचे आणखी एक दूत होते. मी आता तुम्हाला सांगणार आहे, माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर कोणता दैवी अनुभव मिळाला, जेव्हा ते त्यांच्या बरोबर पंढरपूर येथे गेले.

गाडगे बाबा हे पंढरपूर या तीर्थक्षेत्री नियमित भेट देणारे वारकरी होते. तिथे भेट देणे हे तीर्थाटन आहे. ते श्री विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते आणि मोकळ्या वेळी पांडुरंग…पांडुरंग… म्हणत सतत आपला नामजप करत असत. एकदा माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं की त्यांची आयुष्यात कधी श्री पांडूरंगांशी भेट झाली आहे का. गाडगे बाबांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे चलण्यास सांगितलं. ते माझ्या वडिलांना म्हणाले की त्यांना तेथे एका तीर्थयात्रेकरू सारखे राहावे लागेल आणि त्यांच्या आरामशीर बंगल्यात उपलब्ध असलेल्या सुख सोयींपासून दूर राहावे लागेल. माझ्या वडिलांनी मग पंढरपुरास आपली दुसरी भेट, संत गाडगे बाबांबरोबर आरंभली.

त्यांनी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात बांधलेल्या एका तंबूत मुक्काम केला. संपूर्ण दिवसभर ते महाराजांबरोबर हिंडले आणि त्यांनी (महाराजांनी) स्वच्छतेची कामं कशाप्रकारे हाती घेतली ते पाहिलं, कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भोवती गोळा झालेल्या व शांतपणे त्यांचे उपदेश ऐकणाऱ्या दिन जनांना सल्ला दिला. माझ्या वडिलांना संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याची बऱ्यापैकी कल्पना आली आणि संध्याकाळी ते तंबूत परत आले. माझ्या वडिलांनी पाहिलं की तंबूत तीन चटया अंथरलेल्या आहेत आणि प्रत्येक चटईबरोबर एक घोंगडी ठेवण्यात आलेली आहे आणि रॉकेलचा कंदील तंबूच्या मध्यभागी लावण्यात आलेला आहे. गाडगे बाबांनी माझ्या वडिलांना आराम करण्यास सांगीतला आणि ते जाऊन, खाण्यासाठी झुणका भाकर आणत आहेत असं म्हणाले. माझ्या वडीलांची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी त्यांना तिसरी चटई आणि तिचा वापर कोण करणार आहे याबद्दल विचारलं. गाडगे बाबा त्यांना म्हणाले की ते त्यांना सांगण्यास विसरले की एक रात्र राहाण्याकरता त्यांचा एक पाहुणा येणार आहे आणि पहाट होण्यापूर्वीच तो निघून जाईल. पाहुणा त्यांना कोणतीही गैरसोय करणार नाही. त्यांनी सांगीतलं की ते जेव्हाही पंढरपूरला येतात तेव्हा हा पाहुणा त्यांना रात्री सोबत देतो. हे सांगितल्यावर गाडगे बाबा तंबूतून निघून गेले. लवकरच तंबूत अंधार होऊन राहिला होता आणि तापमान सुद्धा कमी झालं होतं. माझ्या वडीलांना पेंग येऊ लागली आणि ते झोपी गेले. ते गाडगे बाबांच्या हाकेने उठले, ज्यांनी माझ्या वडिलांकरता झुणका भाकर आणली होती. त्यांनी त्यांची क्षमा मागितली कारण त्यांनी पाहुण्याबरोबर आधीच आपलं रात्रीचं जेवण उरकलं होत आणि माझ्या वडिलांना जेवण करण्यास सांगीतलं कारण ते फार भुकेले असतील. तोपर्यंत ते फेरपटका मारण्याकरता नदीच्या किनाऱ्यावर जात आहेत असं म्हणाले. माझ्या वडिलांनी त्या पाहुण्याकडे पाहिलं. त्याने धोतर घातला होता आणि वर उघडाच होता. त्याचा वर्ण भिल्लांसारखा गडद काळा होता आणि त्याचे डोळे जळणाऱ्या कोळशासारखे लाल होते. त्याच्या खांद्यावर घोंगडी होती. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की संपूर्ण तंबू कस्तुरीच्या उग्र सुवासाने भरून गेला होता, ज्याचा वासमाझ्या वडिलांनी पूर्वी कधीही अनुभवला नव्हता. ते दोघे तंबू सोडून गेले आणि माझे वडील आपले रूचकर जेवण करू लागले. होय हे खरं आहे की त्यांनी असं रुचकर जेवण पूर्वी कधीच चाखलं नव्हतं. कस्तुरीच्या सुवासाने आपलं काम केलं आणि माझे वडील जेवण घेऊन झाल्यावर लगेच गाढ झोपी गेले. ते सकाळी कोंबड्याच्या आरवण्याच्या मोठ्या आवाजाने उठले.

गाडगे बाबा आधीच जागे होते. त्यांनी माझ्या वडिलांना तोंड धुण्यास व गरम चहा पिण्यास सांगितला, जो मातीच्या भांड्यात ठेवलेला होता व त्यांची वाट बघत होता. माझ्या वडिलांनी पाहुण्याबद्दल चौकशी केली, तेव्हा गाडगे बाबा त्यांना म्हणाले की पाहुणा आधीच चहा पिउन निघून गेला होता कारण त्याला मंदिर उघडण्याआधीच कामावर हजार व्हायचं होतं. माझ्या वडिलांना थोड विचित्र वाटलं की ------आणि त्यांनी महाराजांना विचारलं की त्यांनी पाहुण्याची ओळख त्यांच्या बरोबर का करून दिली नाही. गाडगे बाबांनी मग माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांना वाटलं की माझ्या वडिलांनी पाहुण्याला ओळखलं असावं कारण पंढरपुरात त्या पाहुण्याची ओळख करून देणे गरजेचे नाही. माझ्या वडिलांनी त्यांना सांगीतलं की रात्री ते त्या पाहुण्याला निट पाहू शकले नाहीत आणि त्यांना वाटलं की सकाळी तो जाण्यापूर्वी, महाराज निश्चितपणे त्याची ओळख करून देतीलच. मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर पंढरपूरचा विठोबा होता. त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं की त्यांना, त्यांनी मागे बंगल्यात त्यांना (गाडगे बाबांना) विचारलेल्या आपल्या प्रश्नाचं उत्तरमिळालं का ते. आता माझ्या वडिलांना त्या गोड आणि संम्मोहित करणाऱ्या कस्तुरीच्या सुवासामागचे रहस्य आकळले. माझे वडील म्हणायचे की कस्तुरीचा सुवास त्यांच्याबरोबर बराच काळ राहिला आणि त्यांना श्री विठोबांची उपस्तीथी जाणवून देत राहिला.

संत गाडगे बाबांनी एक सुखद अनुभव सुद्धा दिला. ते काळाच्या ओघाबरोबर वृद्ध झाले होते आणि त्यांची आमच्या बंगल्यातील शेवटची भेट सुद्धा अविस्मरणीय होती. ते नेहमी यायचे ते घोंगडी आणि काठी घेऊन आणि आमच्या घरातून निरोप घेऊन जाताना आपल्या चीजवस्तू घेऊन जायाचे. त्यांच्या शेवटच्या भेटीच्या वेळी, ते त्यांची काठी घेऊन जायाला विसरले. खरं पाहू जाता प्रत्यक्षात ते घेऊन जायाला विसरले नव्हते किंबहुना मला वाटतं की त्यांनी, स्मृतीची खुण म्हणून, ती जाणुनबुजून मागे ठेवली असावी. मी हे असं म्हणतो कारण त्यांची चालण्याची पद्धत अशी होती की ते काठी शिवाय चालू शकले नसते. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याचा शोध घेऊन त्यांची काठी त्यांना परत देण्याबाबत एकमेकांबरोबर सल्ला-मसलत केली. पण त्यांना शोधून काढणं शक्य नव्हतं कारण ते खऱ्या अर्थाने "महाराष्ट्राचे भटकणारे संत" होते, जे नेहमी दिनांच्या सेवेत असायचे.

माझे आईवडील त्या काठीला अत्यंत पवित्र वस्तू मानायचे आणि ती आमच्या चंदनी मंदिराच्या जवळ ठेवली होती. माझ्या आईवडिलांनी त्यांची एक तसबीर विकत घेऊन ती आमच्या चंदनी मंदिरात ठेवली जेणे करून त्यांची नित्य पूजा होईल, कारण, तुम्ही वाखाणाल की, ते त्यांच्यासाठी दैवतासमान होते.

प्रिय वाचकांनो, मला खात्री वाटते, तुम्हा सर्वांना हा अध्याय सुद्धा मनोरंजक वाटला असेल. मला पुन्हा एकदा वाटतं, की आज आपण अशा संत व आपल्या मध्ये असणाऱ्या देव दूतांना मुकत आहोत आणि निस्सीम भक्त, ज्यांची संतांप्रती निस्वार्थी भक्ती आहे, अशांचे अस्तित्व सुद्धा मुकत आहोत.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संत संगती प्राप्त होणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. पूर्व पुण्याई केली असेल तर ती प्राप्त होते. पाडुरंग हा संतांच्या हृदयात वास करतो म्हणून जे संतांना अनन्य शरण आले आहेत त्यांना तो सहज साध्या आहे. किंबहुना संत आणि अनंत हे काही वेगवेगळे नाहीत. ते एकच आहेत, म्हणून त्यांनमध्ये भेद पाहू नाहे.

आपण संतांना अनन्य शरण आलो पाहिजे आणि त्यांची भक्ती सेवा केली पाहिजे. यातच आपला परम उत्कर्ष आहे. ते आपल्याला स्वार्थ (संसारामध्ये बरकत) व परमार्थ (आध्यात्मिक प्रगती) दोन्ही साधून देतात. =================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

लेखकाचे स्वतःचे अनुभव

ॐ श्री साईनाथाय नमः

मला खात्री वाटते की माझ्या वडिलांचे हे अमुल्य अनुभव वाचल्यावर, तुम्ही असा विचार करण्यास प्रवृत्त व्हाल की, मी सुद्धा स्वतःचे काही अनुभव गोळा केले असतील. तसं पाहिलं तर, मी ह्या पैकी एक अनुभव एका भक्त असणाऱ्या बाईंनासांगितला. त्या मला म्हणाल्या, की मला माझ्या वडिलांप्रमाणे व त्याच गुणवत्तेचे अध्यात्मिक अनुभव मिळाले नसतील, पण ज्या अर्थी मी अशा "पुण्यात्म्याच्या" घरी जन्म घेतला आहे, त्या अर्थी त्यांच्यापासून थोडं तरी पुण्य वारस म्हणून प्राप्त केलं असेल आणि म्हणून काही अनुभव मिळाले असतील जे निश्चितपणे आजच्या काळच्या सगळ्या साई भक्तांना सांगण्यायोग्य असतील. अशाप्रकारे, मी त्या "पुण्याचा" काही भाग त्या सर्वांमध्ये वाटू शकतो. त्या बाईंच्या प्रतिक्रियेने मला भावनिक धक्का दिला आणि मी निश्चय केला की माझ्या दृष्टीने ते कितीही लहान व क्षुद्र असले तरी मला तुम्हा सर्वांपुढे, मी आतापर्यंत जे काही अनुभवलं ते उजागर केलं पाहिजे. अशा प्रकारे, मी माझी "साई प्रीती" व माझ्या तर्फे साई सेवेचं प्रतिक व्यक्त करू शकतो.

माझं पूर्ण नाव आहे, वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड. आमच्या नावांमागे एक छोटी गोष्ट आहे. ती अशी आहे. माझ्या पणजोबांनी,त्यांच्या सर्व पुत्रांची नावं अशी ठेवली की त्यांच्या पाहिल्या नावाचा शेवट "द्र" या अक्षराने होईल. या सिद्धांताचे प्रणेते हे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर नोबेल पारितोषिक प्राप्त कै. श्री रविंद्रनाथ टागोर होते. असं घडलं की इंग्लंडला जाण्यापूर्वी ते माझ्या पणजोबांबरोबर त्याच्या चौपाटी येथील बंगल्यात राहिले होते. इंग्रजांच्या आचारपद्धतीची ओळख व्हावी हा ह्या मागचा उद्देश्य होता, कारण त्या काळी तर्खड कुटुंब ह्या साठी फार प्रसिद्ध होतं. कै. रविंद्रनाथ हे ज्योतिष शास्त्राचे चाहते होते आणि त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी माझ्या पणजोबांची कुंडली तयार केली आणि ह्या निष्कर्षापर्यंत आले की तर्खड हे इंद्र देवापासून निर्माण झाले आहेत आणि म्हणून त्यांनी स्वतःला (पुरुष मंडळींनी) त्या नावाने ओळखलं पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्या पणजोबांकडे त्यांच्या पुत्रांना तशा प्रकारे नाव ठेवण्याचा आग्रह केला. माझ्या पणजोबांना ते पटलं असावंआणि त्यांनी त्यांच्या पुत्रांची नावं रामचंद्र(माझे आजोबा), ज्ञानेंद्र ई. ठेवली. माझ्या आजोबांनी त्यांच्या दोन पुत्रांना सत्येंद्र व ज्योतिंद्र अशी नावं दिली. पुढे ज्योतिंद्र यांनी त्यांच्या पुत्रांची नावं रवींद्र(माझे थोरले बंधू) व वीरेंद्र(मी स्वतः) अशी ठेवली. रवींद्र यांनी त्यांच्या मुलाचं नाव देवेंद्र ठेवलं आणि मी माझ्या मुलाचं नाव महेंद्र ठेवलं.

अर्थात, माझ्या बालपणापासून मी आमच्या घरात दर गुरुवारी सायंकाळी होत असलेल्या साई आरतीला उपस्थित असतो आणि हा विधी आज मितीपर्यंत चालू आहे. सुदैवाने माझी पत्नी सुद्धा साई भक्त आहे. ती ५ वर्षांची असल्यापासून नेहमी शिर्डीला भेट देत आहे. मी सर्वात पहिल्यांदा शिर्डीला भेट दिली ते १८ वर्षांचे असताना, आणि ते सुद्धा दोन मित्रांबरोबर ज्यांची नावं आहेत अमर भगातानी आणि शशी भाटिया. विवाहानंतर मी सासुरवाडीच्या घरात राहायाला लागलो. माझ्या पत्नीचे वडील, ती ५ वर्षांची असतानाच निर्वाण पावले होते आणि त्या दोघ्या बाईमाणसांना घरात एक पुरुष माणूस असण्याची गरज भासली. माझी सासू आणि पत्नी दोघीही साई भक्त असल्यामुळे माझ्या 'साई संस्कारांमध्ये' कोणताही अडथळा आला नाही,उलट ते वाढत वाढतच गेले.

====================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

शिर्डीतील गुरुपौर्णिमा

मी माझ्या सासू बरोबर शिर्डी येथील गुरुपौर्णिमा उत्सवाला उपस्थित राहू लागलो आणि माझ्या सर्वोत्तम स्मृतीप्रमाणे मी सलग १८ गुरुपौर्णिमा उत्सवांना उपस्थित राहिलो. तुम्हा सर्वांना ठाउक असेल की गुरुपौर्णिमा उत्सव हा तीन दिवसांचा असतो आणि यातील एक कार्यक्रम असतो तो म्हणजे साई सच्चरित्रातचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड वाचन, ज्याला 'अखंड पारायण' म्हणतात. साई भक्तांना आपली नावं नोंदवायची असतात आणि एका लहान मुलाकडून ५४ नावं बिनक्रमाने (चिठ्या टाकून) निवडली जातात. त्यांना द्वारकामाईत बाबांच्या तसबिरीसमोर साई सच्चरित्रातचे अध्याय वाचायचे असतात. अशा एका पौर्णिमा उत्सवात, मी सुद्धा माझ नाव दिलं आणि ९ हा आकडा मला देण्यात आला. ह्याचा अर्थ असा होता की मला ९ वा अध्याय वाचायचा होता, ज्याच्यात तर्खड कुटुंबियांचे साईंप्रती असलेले प्रेम व भक्ती यांचे वर्णन केलेले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हे फार आनंददायी होतं. मी द्वारकामाईत अध्याय वाचल्यावर, मला प्रतिफळ म्हणुन एक नारळ व साईंची तसबीर प्रसाद रूपाने देण्यात आली. ही तसबीर आवरणबद्ध करून फोटो फ्रेम मध्ये बसवण्यात आली आणि नित्य पूजेसाठी आमच्या घरी ठेवण्यात आली. आजमितीपर्यंत दर सकाळी, जेव्हा मी अंथरुणातून उठतो तेव्हा मी ह्या तसबिरीसमोर उभा राहातो आणि नमस्कार करतो आणि श्री साईंकडे प्रार्थना करत म्हणतो, "हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा".

====================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

विज्योत ची निर्मिती

प्रिय वाचकांनो, माझं असं मत आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतः बरोबर एक तीव्र इच्छा बाळगुन असतो. माझे वडील आम्हाला आठवण करून देत असत की ते सुद्धा श्रीमंत माणूस होते ज्यांच्या कडे बंगला, गाडी व भांडारगृह होता, जो चीनी मातीच्या भांड्यांमध्ये भरून ठेवलेल्या सर्व प्रकारच्या मिष्टान्नाने भरलेला होता. अर्थात, त्यांच्या जीवनाच्या पुढच्या काळात हे सर्व नाहीसं झालं होतं. मी त्यांचा शेवटचा मुलगा होतो. म्हणून स्वाभाविकपणे मी एक तीव्र इच्छा बाळगुन होतो की भगवंताची इच्छा झाली तर ती गमावलेली संपत्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी माझ्या पद्धतीने झटेन. अर्थात मुंबईत स्वत:चा बंगला असणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. माझी पत्नी सुद्धा खार येथील एका बंगल्यात वाढली. म्हणून ही संयुक्त इच्छा होती की स्वतःचा बंगला असावा जेणेकरून कमीतकमी आमच्या म्हातारपणात, वेळ आरामात घालवता येईल. मग १९९१ मध्ये आम्ही वानगाव येथे ६ गुंठ मापाची जागा विकत घेतली. (वानगाव हे मुंबई पासून १०० कि. मि. अंतरावर पश्चिम रेल्वेचं एक स्थानक आहे). मला माझ्या कंपनीकडून कर्ज मिळणं शक्य झालं आणि १९९३ पर्यंत आम्हाला वानगाव येथे स्वतःचा बंगला बांधता आला. आम्ही त्याला 'विज्योत' असं नाव ठेवलं. फार काळ आधी, १९६० मध्ये, जेव्हा मी पुण्याला गेलो होतो तेव्हा माझ्या शाळेच्या मित्राने मला एक बंगला दाखवला होता ज्याचं नाव होतं "लकाकी". तो बंगला होता प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मणराव काकासाहेब किर्लोस्कर यांचा. तुम्हाला त्या नावा मागचं रहस्य कळेल जर तुम्ही त्यांच्या नावाची पहिली अक्षरं काढून जोडली तर. म्हणजेच ल - का - कि. आम्हाला आमचा खार येथील बंगला आर्थिक अडचणींमुळे १९५९ मध्ये विकावा लागला होता. लकाकीला बघितल्यावर माझ्या १६ वर्षांच्या बाल मनाला तेव्हा एकच विचार आला होता की जर यदा कदाचित मी माझा बंगला बांधला तर मी त्याचं नाव विज्योत ठेवीन.

=====================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

आबा पणशीकर यांच्या कडून साई प्रसाद

अर्थात मुख्य गोष्ट पुढे आहे. जेव्हा आम्ही आमच्या बंगल्याचा आराखडा बनवला तेव्हा आम्ही पूजा व ध्यान साधण्याच्या हेतूने एक छोटं संगमरवरी मंदिर ठेवण्याचा निश्चय केला. मंदिर तयार झालं आणि आम्हाला त्यात साई बाबांची सजीव आकाराची रंगीत तसबीर ठेवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले पण आम्हाला तशी तसबीर भेटली नाही. तो एप्रिल १९९३ चा महिना होता. मुंबईने मार्चच्या महिनात दुर्दैवी बॉम्बस्फोट पाहिले होते आणि लोक अनोळखी व्यक्तीशी बोलायला भीत असत. एके दिवशी संध्याकाळी उशिरा एका अनोळखी व्यक्तीने आमच्या दरवाज्याची घंटी वाजवली. माझ्या पत्नीने दरवाजा उघडला, तेव्हा एक अनोळखी माणूस आग्रह करत होता की त्याला विशेषकरून मला भेटायचं आहे. तो माझ नाव सांगू शकत नव्हता म्हणून माझी पत्नी त्याच्या ओळखीबद्दल काहीशी शंका बाळगुन होती. मग मी हस्तक्षेप केला आणि त्यांनी मला ओळखलं. त्यांनी आठवण करून दिली की आम्ही शिर्डीत लेंडी बागेत भेटलो होतो आणि मी त्यांना बाबांचे अनुभव सांगितले होते. आता मात्र मला स्पष्ट झालं होतं की ते साई मंदिर पुणे येथील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मी त्यांना घरात येण्यास अनुमती दिली. तेव्हा आमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही त्यांना जेवण दिलं आणि त्यांनी स्वीकार केला. आमच्या चर्चेच्या वेळी, मी त्यांना आमच्या साईंच्या रंगीत तसबिरीच्या इच्छेबद्दल सांगितलं. त्यांनी त्वरित उत्तर दिलं की आम्हाला सजीव आकारची तसबीर एका चित्रकाराकडून कॅनव्हासवर काढून घ्यावी लागेल आणि जर का आम्ही रंगीत तसबीर शोधत असू तर फक्त श्री आबा पणशीकरच आम्हाला मदत करू शकतात. त्यांच्याकडे श्री प्रभाकर पणशीकर यांचा दूरध्वनी क्रमांक होता, जे मराठीतील प्रसिद्ध रंगमंच कलाकार होते आणि आबा पणशीकर यांचे धाकटे बंडू होते.

मी मग त्यांना दूरध्वनी केला आणि श्री आबा पणशीकर यांचा दूरध्वनी क्रमांक प्राप्त केला आणि त्यांना दूरध्वनी केला. माझी रंगीत तसबिरीसाठीची विनंती ऐकल्यावर ते एवढेच म्हणाले की ते मे महिन्यात मुंबईत येणार आहेत आणि तेव्हा मी त्यांची त्यांच्या भावाच्या घरी प्रभादेवी येथे भेट घेऊ शकतो. मग मी मे पर्यंत वाट बघितली आणि एका शनिवारी संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित केली. २२ मे १९९३ला आम्ही सर्व गेलो, माझी पत्नी कुंदा, माझी मुलगी सुजल आणि माझा मुलगा महेंद्र. मला त्यांच्या बद्दल काहीच कल्पना नव्हती. एक भगवे वस्त्र परिधान केलेले व रुद्राक्ष माळा घातलेले पुरुष आमच्या समोर आले. श्री आबा पणशीकर यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि मी हात जोडून नमस्कार केला आणि माझ्या कुटुंबाची ओळख करून दिली. ते जवळपास माझ्यावर रागावले आणि म्हणाले की आम्ही रिकाम्या हाताने कसे काय आलो आणि हार पेढे ई. का नाही आणले. मी थोडा आश्चर्यचकितच झालो कारण त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हत की त्यांनी आमच्यासाठी तसबीर आणली होती. मी काही करून चूक काबुल केली आणि त्वरित सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेलो आणि फुलांचा हार आणि काही पेढे विकत घेतले. ते मग आत गेले आणि स्वतः बरोबर एक विशाल आकाराचा चित्रकाम ठेवण्याचा खोका घेऊन आले. त्यांनी तो ऊघडला आणि चित्रकाम करण्याच्या कागदाचा रोल काढला. त्यांनी ती गुंडाळी उघडली आणि तेथेच आमचे साई आमच्या समोर होते, जे त्यांच्या विख्यात सिंहासनावर बसले होते आणि त्यांचे चिरंतन स्मितहास्य आम्हाला देत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मी त्या रंगीत तसबिरीला हार घातला, जी १ मी.मी. जाड कोडॅक कागदावर छापण्यात आली होती आणि सर्वांना पेढे वाटले. श्री आबांनी मग त्यावर एक मजकूर लिहिला "वीरेंद्र, कुंदा, सुजल, महेंद्र यांस आबा पणशीकर यांसकडून साई प्रसाद" आणि खाली सही केली. ते मग म्हणाले, "हा तुमचा खजीना घ्या". वाचकांनो माझ्यावर विश्वास ठेवा,तो माझ्या आयुष्याचा सुवर्ण क्षण होता. माझी वाचाच स्तब्ध झाली आणि काय करावे ते समजलेच नाही. निःसंशय, हा माझ्यासाठी अमूल्य खाजीना होता. मी पाकीटातून रु. १००१/- काढले आणि त्यांना देऊ केले पण त्यांनी ते घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की ते बाबांचे फोटो विकत नाहीत. मग मी त्यांना ते पैसे त्यांच्या लंडन येथील साई मंदिराकरिता दक्षिणा म्हणून घेण्यास सांगितले. फार अवघडपणे त्यांनी ते मान्य केलं पण पैशे हातात घेतले नाहीत आणि मला ते टेबलावर ठेवायला सांगितले. त्यांनी मग आमच्या पूर्व इतिहासाबद्दल विचारणा केली. मी मग त्यांना माझ्या वडीलांच्या साई बाबांबरोबर असलेल्या सानिध्याबद्दल सांगितलं. ते ऐकल्यावर, त्यांनी अक्षरशः मला आलिंगन दिलं आणि म्हणाले की त्यांना त्या दिवशी आपल्या जीवनाचा सर्वोच्च आनंद प्राप्त झाला आहे. ते भावूक झाले, आत गेले आणि एक रुपयाची दोन नाणी आणली आणि मला दिली. मी ती घेतली आणि त्यांच्या समोर नमस्कार केला आणि म्हणालो, "आता, मला बाबांचा खरा प्रसाद मिळाला". त्यांनी त्याचा अर्थ विचाराला. मी म्हणालो की "ही दोन नाणी बाबांच्या विश्व संदेशाचे प्रतिक आहेत, म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी, जो त्यांनी त्यांच्या जीवन काळात सबंध जगाला दिला". आबा माझ्या स्पष्टीकरणाने गहिवरून गेले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि ते असं म्हणाले की त्यांना त्या दिवशी खरा साई भक्त भेटला होता आणि त्यांनी मला आलिंगन दिलं.

मग आबांनी आम्हाला स्वतःची कहाणी सांगितली. त्यांचे वडील गिरगावच्या गणपती मंदिराचे मुख्य पुजारी होते आणि ते जेव्हा ८ वर्षांचे होते तेव्हा एक मुस्लीम फकीर त्यांच्या आवारात आला आणि त्याने साई बाबांचा फोटो त्यांना दिला. आबांनी फकिराला सांगितलं की ते एका ब्राम्हणाचे पुत्र आहेत आणि म्हणून एका मुस्लीम बाबाचा फोटो त्यांच्या घरात ठेवण्याची त्यांना स्वतःला अनुमती नाही. फकीर म्हणाला "बेटे, अब तू इसे मत ले, पर तेरी किस्मत मे लिखा है की तू इसकी जिंदगीभर सेवा करेगा और इसकी फोटो लोगोंको बॉंटा करेगा". त्या फकीराची भविष्यवाणी १०० टक्के खरी होती आणि आबा पणशीकर त्यांच्या शेवटपर्यंत साई बाबांच्या सेवेत होते. मला क्षमा करा ही विनंती करतो; मी त्यांना कैलासवासी आबा पणशीकर असं संबोधायला पाहीजे होतं कारण ते आता आपल्या मध्ये नाहीत.

त्यानंतर मी त्या मौल्यवान तसबिरीला आवरणबद्ध करण्याची उपाययोजना केली आणि तिच्यासाठी एक चांगली लाकडी फ्रेम तयार केली. १९९३ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आम्ही वानगाव येथील "विज्योत" या आमच्या बंगल्यातील छोट्या साई मंदिरात तिची स्थापना केली. तेव्हापासून आम्ही आमची गुरु पौर्णिमा तेथेच साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करतो.

तर हा होता माझा स्वतःचा छोटा स्वानुभव. मी जेव्हा इच्छा होईल तेव्हा शिर्डीला भेट देतो. मी आता एक सेवानिवृत्त व्यक्ती आहे आणि साईंच्या कृपेने एक आरामदायी जीवन जगत आहे. आम्ही आता बाबांकडे फक्त ही प्रार्थना करतो की आमच्या दोन्ही मुलांना सुद्धा जीवनसाथी म्हणून साई भक्तच मिळावेत, जेणेकरून तर्खड कुटुंबाची साई बाबांप्रती असलेली प्रेम व भक्ती अशीच चालू राहावी.

शेवटी मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की त्यांनी साई बाबांनी आपल्याला दिलेले दोन महामंत्र कधीच न विसरावेत -- ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. जर कोणी हे दोन मंत्र खरोखर पाळले तर बाबा आपल्या इच्छा न चुकता पुरवतात. मी माझे अनंत नमस्कार अर्पण करून आणि आपल्या चीर-प्रेममय साई बाबांना ही खाली दिलेली यथायोग्य घोषणा म्हणत वंदन करतो आणि आता हे पुस्तक संपवू इच्छितो.

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजा धीराज योगीराज परब्रम्ह

श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय"

======================================================================