Haripath with meaning

।। श्री गणेशाय नमः:।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरू नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरू नमः ।।

॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥

॥ एक ॥

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥

॥ दोन ॥

चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥

Know that all the 4 Vedas, all the 6shastras &karans and 18 Puranas sing about the glory of Hari.

मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मागु ॥२॥

Just as butter is obtained by churning milk, same way by churning all the sacred literature, take the essence I.e. Hari. & leave aside all other unnecessary stories (unsacred literature) behind.

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥

Hari, Atma, Jiva, Shiva are all one & the same. Do not unnecessarily put your mind (take interest) in other difficult practices, other than Hari.

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥

Saint Dnyandev says that for me HariPath is Vaikuntha, because by singing HariPath, one is able to see Hari conspicuously filled everywhere (just as by going to Vaikuntha, one can see Lord Vishnu)

॥ तिन ॥

त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥

सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥

अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

॥ चार ॥

भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥

कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥

सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥

ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥

॥ पाच ॥

योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥

भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥

तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांग ॥३॥

ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥

॥ सहा ॥

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥

कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥

मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥

ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥

॥ सात ॥

पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥

अभक्त लोक सतत पापे करत जातात आणि ती पर्वता एवढी मोठी होतात. अशी पापे त्यांना न निघणाऱ्या लेपाप्रमाणे चिकटून राहतात.

नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥

ज्यांना देवाची भक्ती नाही, ते पापी अभक्त होत. ते दैवहीन आहेत म्हणून हरीला भजत नाहीत.

अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥

अभक्त लोक आपल्या तोंडाने हरिवाचुनची अनंत वायफळ बडबड करतात, मग त्यांना हरी दयाळू असला तरी कसा काय पावेल ?

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥

ज्ञानोबा म्हणतात की, माझ्यासाठी, सर्व देहामध्यें एक परिपूर्ण असणारा आत्मा/देव हीच खरी संपत्ती आहे.

॥ आठ ॥

संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥

एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥

नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥

सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥

ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥

॥ न‌ऊ ॥

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

॥ दहा ॥

त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥

नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥

पुराणप्रसिद्ध वोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥

॥ अकरा ॥

हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥

हरिनामाचं उच्चारण केल्याने असंख्य पापांचे ढीगच्या ढीग क्षणात नष्ट होतात.

तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥

जसे वाळलेल्या गवताच्या कांड्या अग्निला मिळताच अग्निरूप होऊन भस्म होतात, अगदी तसेच, आपली पापे, हरी नामाचे उच्चारण केले असता, त्यात जळून भस्म होतात.

हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे याचे ॥३॥

हरि नामाचे उच्चारण करणे हा एवढा प्रभावी मंत्र आहे कि याच्या भयाने भूतबाधा पळून जाते.

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥

ज्ञानोबा म्हणतात की माझा हरी इतका सामर्थ्यशाली आहे कि त्याचे सामर्थ्य उपनिषदांना सुद्धा न कळण्यासारखे आहे.

॥ बारा ॥

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥

भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥

पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

॥ तेरा ॥

समाधि हरिची सम सुखेंवीण् । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥

ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥

ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥

॥ चौदा ॥

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥

रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

॥ पंधरा ॥

एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥

सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥

ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥

॥ सोळा ॥

हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥

राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥

सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥

॥ सतरा ॥

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥

तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदे ॥२॥

मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥

ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिले माझ्या हातीं ॥४॥

॥ अठरा ॥

हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥

त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥

मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥

॥ एकोणीस ॥

वेदशास्त्रपुराण श्रेतींचें वचन । एक नारायण सार जप ॥१॥

जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥

हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥

ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥

॥ विस ॥

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोडी गेली त्यांची ॥१॥

अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्वमार्ग सुगम हरिपाठ ॥२॥

योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥

ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

॥ एकविस ॥

काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥

रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥

हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥

ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥

॥ बाविस ॥

नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥

हरीचं आवडीने नित्य स्मरण तसेच नित्य नाम उच्चारण करणारे लोक फार थोडे आहेत. लक्ष्मीपती, म्हणजेच भगवंत, त्यांच्या अत्यंत जवळ असतो, म्हणजे सहज साध्य असतो.

नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥

'नारायण हरि, नारायण हरि...' या नामाचा उच्चार करणाऱ्या भक्तांच्या घरी भुक्ति (म्हणजे सांसारिक सुख संपन्नता) तसेच चारही मुक्ती वास करतात.

हरिविण जन्म नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥

हरीवाचुनचं जे जगणं असतं ते नरका समान असतं, कारण हरिभक्तीवाचून मनुष्याचा कल, पाप व दोष करण्याकडेच असतो. म्हणून तो यमाचा पाहुणा होतो, अर्थात देहत्यागा नंतर नरकवासास पात्र होतो.

ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥

ज्ञानोबा म्हणतात की मी माझे गुरु निवृत्ती, यांना हरीनामाचा महिमा विचारला असता ते म्हणाले कि नामाचा महिमा हा आकाशाहुनी मोठा आहे.

॥ तेविस ॥

सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥

तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥

अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥

ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥

॥ चौविस ॥

जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥

न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥

जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥

॥ पंचविस ॥

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥

भगवंत ज्ञानी-अज्ञानी, असा भेद करत नाही. हरीनामाचं उच्चारण करणारा कोणीही (मग तो ज्ञानी असो वा अज्ञानी) मोक्षास पात्र आहे.

नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

जेथे 'नारायण हरि' या नावाचा उच्चार असतो, तेथे कळीला (म्हणजे वाईट गोष्टींना/पापाला) प्रवेश नसतो, तसेच काळाला (म्हणजेच अनिष्ट व विपत्तीना) प्रवेश नसतो.

तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥

हरिनामाच्या उच्चारणाने किती हित होतं ते वेदांनाही माहीत नाही, मग सामान्य जीवांना ते कसं कळणार ?

ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

ज्ञानोबा म्हणतात की नारायणाचा पाठ करून त्यांना जे फळ भेटलं आहे, ते म्हणजे सर्वत्र वैकुंठ (म्हणजे सर्वत्र सुख, शांती, आनंद) असण्याचा अनुभव.

॥ सव्वीस ॥

एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥

भगवंताचे नाव हे एक सार आहे जे मनामध्ये धृढ धरल्याने हरीला तुझी करुणा येईल.

तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥

राम-कृष्ण गोविंद हे भगवंताचे नाव, हे उच्चारण्यास अत्यंत सोपे आहे. हृदयाने सद्गदित होऊन, वाचेने त्याचा जप केला पाहिजे.

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥

भगवंताच्या नामासारखी दुसरी कल्याणकारी गोष्ट नाहीच आहे, उगाच चुकून अन्य आडमार्गावर जाऊन वाया शीण करून घेशील.

ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥

ज्ञानोबा म्हणतात की मी बाहेरून मौन धरून, अंतरंगात काल्पनिक* अशी जप माळ धरून 'श्रीहरी श्रीहरी.... ' असा जप सदा करतो.

*काल्पनिक अशी जप माळ - म्हणजे स्वरूप अनुसंधान धरून जप करणे. म्हणजे मुख देवाचं नाव घेत असतांना, मन त्याच्या रूप, गुण व कीर्ती यांचे स्मरण करणे.

॥ सत्तावीस ॥

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥

लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥

नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥

निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥

तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

॥ अठ्ठावीस ॥

या अभंगात हरिपाठाची फलश्रुती सांगण्यात आली आहे. ही फलश्रुती हि ज्ञानोबांचे गुरु श्री निवृत्ती महाराज यांनी वचन रूपाने ज्ञानोबांना दिली आहे.

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥

हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग आहेत जे श्री ज्ञानदेवांनी अत्यंत विश्वासाने रचलेले आहेत, अर्थात हे अभंग प्रमाण मानले पाहिजेत.

नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥

जो कोणी इंद्रायणी नदीच्या तीरावर राहून या अभंगांचा रोज पाठ करेल, तो अधिकारी म्हणजेच अध्यातमात ज्ञानसंपन्न होईल.

असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरावा हरि ॥३॥

मन स्वस्थ चित्त व हरीवर एकाग्र करून, उल्हासाने हरीचं नित्य स्मरण करावं.

अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥

जो नित्य हरिस्मरण करतो, त्याला अंतकाळी तसेच संकटाच्या वेळी, हरी आतून तसेच बाहेरून सांभाळतो.

संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥

संत व सज्जनांनी वरील दिलेल्या वाचनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे व घेत आहेत, परंतु जे अध्यात्म विषयाबाबतीत उदासीन आहेत, आळशी आहेत व म्हणून मंदमति आहेत, त्यांना हरी कसा काय तारेल ?

श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

वरील हरीपाठाची फलश्रुती हि गुरु श्री निवृत्ती महाराज यांनी वचन रूपाने ज्ञानोबांना दिली आणि म्हणून ज्ञानोबांना तात्काळ संतोष झाला.

॥ एकोणतीस ॥

कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥१॥

मी तूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंदामाधवा याच देहीं ॥२॥

देहीं ध्यातां ध्यान त्रिपुटींवेगळा । सहस्र दळी उगवला सूर्य जैसा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योति । या नांवे रूपें तीं तुम्ही जाणा ॥४॥

॥ तीस ॥

नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींची ॥१॥

न लगती सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥२॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥३॥

रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥

यावीण असतां आणीक साधन । वाहातसें आण विठोबाची ॥५॥

तुका म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥

॥ एकतीस ॥

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरी ॥४॥