Tarkhad4

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरू नमः ।।

================Page 1====================================

तर्खड कुटुंबाचे शिर्डी साई बाबांबरोबरचे स्वानुभव

लेखक : वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड

================Page 2====================================

परिचय

प्रिय वाचकांनो, मी हे सत्य अनुभव लिहिण्यापूर्वी तुम्हा सर्वांकडे क्षमा याचना करतो, ह्या एकाच कारणासाठी की हे माझे स्वतःचे अनुभव नाहीत, पण हे आम्हाला आमचे वडील श्री ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांनी ते हयात असताना वेळोवेळी कथन केले होते. माझ्या बालपणी, मी जेव्हा त्यांना कथन करताना ऐकायचो, तेव्हा ते मला काल्पनिक परीकथे प्रमाणे वाटायचे. जेव्हा मी मोठा झालो, आणि मला शिर्डीच्या श्री साई बाबांचे अलौकिक सामर्थ्य माहित झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या वडिलांनी साई बाबांबरोबरील आपल्या १० वर्षाच्या सानिध्यात काहीतरी दिव्य अनुभवलं होतं आणि तो त्यांच्याआयुष्याचा मौल्यवान संपत्ती ठेवा होता, जो एकाध्या सामान्य माणसाला प्राप्त करण्यासाठी अवघड आहे. मला नेहमी वाटायचं की हा मौल्यवान ठेवा तुम्हा सर्वांसाठी उघड केला पाहिजे पण आपली रोजची दिनचर्या अशी असते की अशा अध्यात्मिक लिखाणाकरता समर्पित करण्यासाठी आपल्याला वेळ भेटणे अवघड असतो.

मी साई बाबांच्या कर्मभूमी शिर्डीला आतापर्यंत अनेक वेळ भेट दिली आहे आणि ह्या भेटींच्या वेळी, मी बऱ्याच साई भक्तांना भेटलो आहे. ह्या भेटींच्यावेळी, एक स्वाभाविक प्रश्न उभा राहायचा की मी सुद्धा साई भक्त आहे का. मला तसं जाहीर करताना थोडा संकोच व्हायचा कारण माझे वडील ज्याप्रकारे साई पूजा करायचे, मी त्या प्रकारच्या भक्ती सेवेच्या जवळपास सुद्धा नव्हतो आणि त्या साई भक्तांना सांगायचो की श्री साई बाबांबरोबर माझा विशिष्ट प्रकारचा संबंध जोडला गेला आहे तो माझ्या वडिलांच्या त्यांच्या सानिध्यामुळे, जेव्हा ते हयात होते आणि शिर्डीत कार्यरत होते आणि हेच मुख्य कारण आहे, मी शिर्डीला का भेट देतो ह्याचे. मुख्यतः आमच्या तर्खड कुटुंबीयांत तीन व्यक्ती आहेत ज्या अशा संपर्कासाठी प्रमुखपणे कारणीभूत ठरल्या. माझी आजी, माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड आणि माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड. ह्या तीन व्यक्ती श्री साई बाबांच्या संपर्कात आल्या आणि त्यांचा संग १९०८ ते १९१८ असा चालला, म्हणजेच साईंनी महासमाधी घेईपर्यंत चालला. त्यांच्या संगतीमुळे, पुढे, तर्खड कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी साई बाबा हे देव बनले.

मग तो साई भक्त, माझ्या वडिलांनी अनुभवलेला एखादा दिव्य अनुभव कथन करण्याची मला विनंती करायचा. मी तेव्हा माझ्या मनाला येईल ते सांगून त्याचं समाधान करायचो. हे घडायचं ते एका स्थळी - ते म्हणजे शिर्डीतील लेंडी बाग येथे. अनुभव ऐकल्यावर भक्त नेहमीच माझ्या समोर नमस्कार करायचा आणि माझ्या पायाला स्पर्श करायचा. मला तेव्हा फार संकोच वाटायचा. एकदा असं घडलं की पुण्यातील एका साई मंडळाने मला पुण्याला येउन, असे अनुभव पुण्यातील साई अनुयायांना कथन करण्याची विनंती केली. मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पुण्याला जाउन त्याचं समाधान केलं. तो कार्यक्रम २ तास चालला आणि माझा कथन झाल्यावर, मला नमस्कार करण्यासाठी, माझ्यासमोर एक मोठी रांग होती. मी कौटुंबिक माणूस असल्यामुळे, अशा कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निश्चय केला, या साध्या कारणासाठी की ते माझ्या वडिलांचे अनुभव होते आणि मी कथन करत असताना काही चूक करू शकतो. त्याच वेळी मी निश्चय केला की मी सेवानिवृत्त झाल्यावर, माझ्याकडे पुष्कळ मोकळा वेळ असेल, ज्याचा वापर मी तर्खड कुटुंबियांचे हे जगावेगळे अनुभव लिहिण्याकरता करेन. अर्थात, हेतू हा आहे की माझी शिर्डी साई बाबांप्रती असलेली भक्ती व प्रेम व्यक्त करणे. १८ जुन २००३ रोजी मला ६० वर्षं पूर्ण झाली व आज १५ ऑगस्ट २००३, म्हणजेच आपल्या लाडक्या भारत देशाच्या ५७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, मी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आहे.

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला हे सांगावसं वाटतं की मी मा. हेमाडपंत म्हणजेच कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर नाही,ज्यांनी चिरायू असं श्री साई सच्चरित्र लिहिलं. मी नियमितपणे हे पवित्र पुस्तक वाचतो, ज्यात ५४ अध्याय आहेत, जे शिर्डी साई बाबांच्या जीवन कालावधीच्या कार्याचा वृत्तांत देतात. ह्या पवित्र पुस्तकात काही घटना आहेत, त्या जेव्हा घडल्या तेव्हामाझे वडील सुद्धा शिर्डीत उपस्थित होते आणि मी विनम्रपणे तुम्हाला त्या सांगणार आहे, त्याच प्रकारे, ज्या प्रकारे माझ्या वडिलांनी त्या पहिल्या होत्या आणि मला सांगितल्या होत्या. प्रिय वाचकांनो, मला कृपया क्षमा करा कारण मी ह्या घटनांची नेमकी तारीख व वेळ सांगण्यास असमर्थ आहे पण १९०८ ते १९१८ ह्या कालावधीत, माझ्या वडिलांनी शिर्डीला १७ वेळा भेट दिली होती आणि प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचा मुक्काम ८ दिवस ते एक महिना एवढा असायचा. ह्या १७ भेटींच्या दरम्यान,माझ्यावर विश्वास ठेवा, की माझ्या वडिलांना श्री साई बाबांच्या दिव्य शक्तींचा प्रत्यक्ष अनुभव आला, ज्या खऱ्या अर्थाने अदभुत होत्या. वास्तविक, मला वाटतं की त्यांनी ह्या स्वतःच लिहिल्या पाहिजे होत्या कारण ते सेंट झेवियर ह्या शाळेत शिकले होते. अर्थात, माझ्या लिहिण्याचा एकमेव हेतू निव्वळ असा आहे की श्री साई बाबांवर असलेली आमची गहन व प्रामाणिक श्रद्धा व्यक्त करावी, ज्याने मला अत्यंत मनःशांती प्राप्त होते.

प्रिय साई भक्त वाचकांनो, मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यावर, तुम्हाला वाटेल की मला सुद्धा काही दैवी अनुभव आले असतील, पण मी नम्रपणे सांगतो की, माझ्या वडिलांना ज्या प्रकारचे अनुभव मिळाले होते त्या प्रकारचे मला निश्चितपणे मिळाले नाहीत. माझी अशी धृढ समजूत आहे की माझे वडील हे श्री साई बाबांच्या संपर्कात येणे त्यांचा नशिबात लिहिलं होतं, बहुधा त्यांच्या पूर्व पुण्याई मुळे असेल आणि त्यांचे अनुभव हे सर्व त्यांच्या विवाहाच्या आधीचे होते म्हणजेच वय वर्ष १४ ते २५ या कालावधीतले. कित्येक वेळा मला आश्चर्य वाटतं की अशी दिव्य शक्ती अनुभवल्यानंतर, माझ्या वडिलांनी कौटुंबिक जीवन का स्विकारलं? तर त्या स्थितित, मी नसतो आणि कदाचित हे पुस्तक सुद्धा अस्तित्वात आलं नसतं.

आता तर्खड कुटुंबाची संक्षिप्त ओळख. आमचं मूळ जाव आहे तर्खड गाव जे वसईच्या किल्ल्यानजिक आहे. म्हणून आमचं आडनाव तर्खडकर. इतिहास काही असा आहे की माझ्या पूर्वजांनी थोर मराठा योद्धा चिमाजी आप्पा यांचा बाजूने पोर्तुगीजांविरुद्ध वसई किल्ल्याचं युद्ध लढलं होतं व त्यांना ह्या युद्धात पराभूत केलं होतं. त्यांच्या शौर्याची नोंद घेत, चिमाजी अप्पा यांनी त्यांना तर्खड गावाची जहागिरी दिली. पुढे इंग्रजांनी हा किल्ला मराठ्यांकडून घेतला आणि माझ्या पणजोबांचे वडील पांडुरंग तर्खड हे मुंबईला स्थलांतरित झाले. त्यांनी त्यांचा बंगला विल्सन महाविद्यालयाच्या नजीक चरनी रोड चौपाटीला बांधला. पांडुरंगांना दोन मुलं होती - दादोबा आणि आत्माराम. यापैकी दादोबा हे फार प्रसिद्ध व्याकरणकार झाले व त्यांनी मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी व्याकरणाची पुस्तकं लिहिली जेणेकरून ते इंग्रजी भाषा बरोबर बोलू व लिहू शकत होते. दुसरे पुत्र आत्माराम हे व्यवसायाने डॉक्टर होते. ते मुंबईचे भूतपूर्व व्हाईसरॉय(राजाचे प्रतिनिधी) यांचे कौटुंबिक डॉक्टर होते. माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड हे सुत वस्त्र उद्योगातील तज्ञ होते आणि ते खटाव गिरणी उद्योग समुहाचे सचिव होते. त्यांनी त्यांचं घर दार वांद्रे येथे स्थापन केलं होतं आणि पुढे शिर्डी साई बाबांच्या सान्निध्यात आले. ते शिर्डी साई संस्थानचे संस्थापक सदस्य तसेच पहिले खजिनदार होते. त्यांनी दासगणू महाराजांना सर्वतोपरी सहाय्य देऊ केलं, जे बाबांचा संदेश मुंबई तसेच महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवत होते. जेव्हा तुम्ही शिर्डी साई समाधी मंदिराला भेट द्याल, तेव्हा तुम्हाला त्या काळच्या बाबांच्या भक्तांच्या फोटोंमध्ये त्यांचे फोटो दिसतील. कै. अण्णासाहेब दाभोळकर यांनी विख्यात साई सच्चरित्र हे पुस्तक लिहिलं आहे, ज्यात शिर्डीतील बाबांच्या त्यांच्या जीवन काळातील लीला विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत.

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय तर्खड कुटुंबियांचे साई बाबांबरोबरचे अनुभव कथन करतो. ९ व्या अध्यायात सांगितलेले बाबासाहेब तर्खड हे माझ आजोबा आहेत. ज्या श्रीमती तर्खड सांगण्यात आल्या आहेत, ती माझी आजी आणि त्यांचा मुलगा सांगण्यात आला आहे ते माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड. ह्या पुस्तकात जे जीवन अनुभव मी सांगणार आहे ते मुख्यतः माझे वडील ज्योतिंद्र यांचे आहेत. ते १५ जून १८९५ ला जन्मले आणि १६ ऑगस्ट १९६५ ला त्याचं निर्वाण झालं. लेखकाची संक्षिप्त माहिती देणे या क्षणी योग्य राहील. माझं नाव आहे वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड, ज्योतीन्द्रांचा दुसरा मुलगा. पहिला मुलगा म्हणजे रवींद्र, ज्याचं निर्वाण झालं आहे. मी व्यवसायाने एक अभियंता आहे आणि दोन कंपन्यांमध्ये व्यवस्थापकिय अधिकारी म्हणून काम केलं आहे, क्रॉम्पटन ग्रिव्ज व सिमेन्स इंडिया. सध्या मी एक सेवानिवृत्त व्यक्ती आहे आणि सांताक्रूझ येथे राहात आहे.

प्रिय साई भक्तांनो, हे पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला माझी भेट घ्यायची इच्छा झाली तर अवश्य घ्या पण निव्वळ साई बाबांप्रती असलेली आपली परस्परांची भक्ती व्यक्त करण्यासाठी.

-- वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड

===================Page 3===========================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

प्रस्तावना

सांताक्रूझ, मुंबईचे श्री ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांनी शिर्डीच्या साई बाबांबरोबरच्या आपल्या जिवंत अनुभवांचा चांगला वृत्तांतदिला होता. खरं पाहू जाता, त्यांच्या कथनातून ते साई बाबांची शिकवण चांगल्या प्रकारे उजागर करत आहेत. हे कथन,वाचकांना तर्खड कुटुंबाची बऱ्यापैकी ओळख सुद्धा करून देत आहे.

लेखक व प्रकाशक श्री वीरेंद्र ज्योतिंद्र तर्खड हे सेवानिवृत्त अभियंता आहेत, जे सांताक्रूझ, मुंबई येथे राहतात, ज्याबद्दल मुंबईतील साई भक्तांना माहिती असेल. लेखकांनी एकूण १७ अध्याय लिहिले आहेत ज्यापैकी १६ अध्याय हे त्यांच्या वडिलांचे स्वानुभव आहेत, जे ते निव्वळ आपल्या स्मृतीच्या आधारे मांडू शकले आणि वाचक, कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी लिहिलेल्या श्री साई सच्चरित्राबरोबर ते जुळवून पाहू शकतात.

श्री वीरेंद्र तर्खड यांनी त्यांच्या वडिलांच्या स्वानुभवांचा वृत्तांत साई भक्त वाचकांना दिला आहे आणि मी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. साई बाबांच्या सानिध्यात ज्योतिंद्र यांनी अनुभवलेल्या घटना ह्या साईंच्या सामर्थ्याचे बऱ्यापैकी वर्णन करतात, ज्या लेखकाने त्यांची स्मृती जिथवर आठवण करून देईल, तिथवर वस्तुस्थितीशी सुसंगत अशा प्रकाशित केल्या आहेत. लेखक एका अनोख्या पद्धतीने त्यांच्या वडिलांचा श्री साईंशी असलेला निकट ऋणानुबंध व्यक्त करत आहेत, जो माझ्या मते कौतुकास्पद आहे. मला असं वाटत की हे कथन असं सुचवतं की जेव्हा भक्त शिर्डीला जातात तेव्हा त्यांनी समाधी मंदिराचे व खंडोबा मंदिराचे दर्शन घेतले पाहिजे आणि साईंच्या शिकवणी आचरणात आणल्या पाहिजेत - म्हणजेच श्रद्धा आणि सबुरी - जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनात सहजतेने मार्गक्रमण करता येईल.

श्री बाबासाहेब तर्खड यांना आपलं आयुष्य सुखकर करता आलं. माझे आजोबा व साई बाबांचे एक सर्वात जवळचे भक्त श्री म्हाळसापती चिमणाजी नगारे (भगत) यांनी ते पाहिलं. मला खात्री वाटते की ह्या पुस्तकाच्या वाचनाने साई भक्त वाचकांना काही मार्गदर्शन व आत्म-संतुष्टी प्राप्त होईल. हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकदा साई बाबांच्या जवळ घेऊन जाते असं मला ही प्रस्तावना लिहिताना वाटतं. मी, जो श्री म्हाळसापतींचा नातू आहे, मला ही प्रस्तावना प्रस्तुत करताना सम्मानित झाल्यासारखं वाटतं. वास्तविकपणे, मी ह्याला आमच्या कुटुंबाचा खरा सम्मान झाला असं समजतो.

रामचंद्र आत्माराम तर्खड उर्फ बाबासाहेब तर्खड यांनी श्री दासगणू महाराज यांच्या संगतीने शिर्डीतील श्री साई बाबा संस्थांनच्या स्थापनेत फार मोठं योगदान केलं होतं आणि ते संस्थांनचे पहिले खजिनदार होते. त्यांनी पुढे जाउन 'साई लीला' हे मासिक प्रकाशित केलं आणि मासिकाच्या सर्वात पहिल्या अंकासाठी प्रस्तावना लिहिली होती, आणि अशा प्रकारे इतिहास घडवला. मला सर्व साई भक्तांना सांगावसं वाटत की कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी लिहिलेल्या साई सच्चरित्राचा ९ वा अध्याय हा तर्खड कुटुंबाची साई बाबांप्रती असलेल्या शुद्ध भक्तीचा खरा खुरा वृत्तांत देतो.

शेवटी मी असं म्हणून प्रस्तावना संपवू इच्छितो :-

"अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह

श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय"

येणाऱ्या काळात, श्री साई बाबांच्या ह्या कथा असंख्य साई भक्तांकडून चांगल्या प्रकारे स्मरणात ठेवल्या जातील, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि अशाप्रकारे मी ही प्रस्तावना माझे आजोबा श्री म्हाळसापती यांच्या स्मृतीस समर्पित करत आहे, ज्यांनी श्री साई बाबांच "आओ साई" असं म्हणत खंडोबा मंदिरासमोर स्वागत केलं होतं.

मी आता ही प्रस्तावना श्री वीरेंद्र ज्योतींद्र तर्खड यांच्याकडे प्रकाशनासाठी सुपूर्द करत आहे.

मनोहर मार्तंड नगारे

==================Page 3a=========================================

Index

==================Page 4=========================================

श्री साई बाबांची भक्तांना ११ वचने

=======================

शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।

टळती अपाय सर्व त्याचे । || १ ||

माझ्या समाधीची पायरी चढेल ।

दुःख हे हरेल सर्व त्याचे || २ ||

जरी हे शरीर गेलो भी टाकून ।

तरी भी धावेन भक्तांसाठी || ३ ||

नवसास माझी पावेल समाधी ।

धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||

नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य ।

नित्य घ्या प्रचीत अनुभवे || ५ ||

शरण मज आला आणि वाया गेला ।

दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||

जो जो मज भजे जैशा जैशा भावे ।

तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||

तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।

नव्हे हे अन्यथा वचन माझे || ८ ||

जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।

मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ ||

माझा जो जाहला काया वाचा मनी ।

तयाचा मी ऋणी सर्वकाळ || १० ||

साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।

झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

==================Page 5=========================================

फलश्रुती

साई बाबांच्या लिला आदरपूर्वक वाचल्या असता साई बाबा वाचकावर प्रसन्न होतात आणि त्याचे अज्ञान व दारिद्र्य घालवून, त्याला ज्ञान व सुःख संपत्ती प्रदान करतात. साई लीलांच्या वाचनाने, रोगी आणि आजारी जनांना आरोग्य प्राप्त होईल, धनहिनता असणाऱ्यांना संपत्ती प्राप्त होईल, दुःखी कष्टी जीवांना संपन्नता प्राप्त होईल तसेच मनातील चंचल विचार जाऊन त्याला स्थैर्य प्राप्त होईल.

साई कथांबद्दल सहज विचार केला असता, तुमच्या नकळतच तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये आवड निर्माण होईल आणि मग जर प्रेमपूर्वक त्यांचे अध्ययन केले तर, तर तुमची सर्व पापे नष्ट होतील.

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

समुद्राच्या मधोमध दीपस्तंभ उभारले जातात, जेणेकरून नाविकांचे, खडक तसेच इतर धोक्यांपासून रक्षण व्हावे व त्यांचा समुद्रातील प्रवास सुरक्षित व्हावा. साई बाबांच्या कथा सुद्धा संसार सागरात तोच उद्देश साध्य करतात. त्या अमृतापेक्षाही गोड आहेत आणि आपला संसारातील मार्ग गमन करण्यास सुकर करतात. धन्य आहेत संतांच्या गोष्टी.

संतांच्या कथा ऐकणे हे काही अवघड काम नाही. किंबहुना बाकी अनेक साधनांपेक्षा सर्वात सोपे साधन आहे. ह्या कथा संसार भयापासून मुक्त करतात आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर घेऊन जातात. म्हणून ह्या कथा ऐकल्या पाहिजेत, त्यावर मनन केले पाहिजे आणि त्या आत्मसात केल्या पाहिजेत. हे केले असता केवळ ब्राम्हणच नव्हे तर स्त्रिया तसेच कनिष्ठ लोक सुद्धा निर्मळ व पावन होतील. आपण आपली सांसारिक कर्तव्ये करणे चालू ठेवू शकतो, पण आपले मन हे साईंच्या व त्यांच्या कथांकडे दिले पाहिजे, मग ते आपल्यावर कृपाशीर्वाद करतील हे निश्चित.

जर कोणी साईंसमोर साष्टांग नमस्कार करून त्यांना संपूर्ण हृदयाने शरण गेला, तर, न मागता, त्याला जीवनाचे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात, म्हणजेच धर्म, अर्थ(संपत्ती), काम(इच्छापूर्ती), मोक्ष. जर आपण पूर्ण हृदयापासून संतांमध्ये आश्रय घेतला तर ते आपल्याला संसार सागरातून सुखरूप घेऊन जातात.

साई बाबांचे बोल

१. "माझ्या कथा व शिकवणी ऐकल्या असता, भक्तांच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण होईल आणि त्यांना सहजगत्या आत्म साक्षात्कार व परमानंद प्राप्ती होईल."

२. "माझ्या लीला लिहिल्या गेल्या, तर अविद्या नाहीशी होईल आणि जर का त्या ध्यानपूर्वक तसेच भक्तिमय अंतःकरणाने ऐकल्या तर लौकिकी जगाच्या अस्तित्वाची जाणीव मावळेल आणि प्रेम भक्तीच्या प्रबळ लाटा उसळतील आणि जर कोणी माझ्या लीलांमध्ये खोल गढून गेला तर त्याला ज्ञानाचे मौल्यवान रत्न मिळतील."

३. "माझ्या कथा ऐकल्या असता, सर्व रोग नाहीसे होतील. म्हणून माझ्या कथा आदराने वाचा, त्यावर विचार करा, त्यांचं मनन करा व त्या आत्मसात करा. हाच आत्मसंतुष्टी आणि सुखाचा राजमार्ग आहे."

४. "तुम्ही कुठेही असा, काहीही करा, पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करता ते सर्व मला ठाऊक आहे. मी सर्वांचा अंतर्यामी आहे आणि सर्वांच्या हृदयात वास करतो. सर्व जीवांत तसेच चराचर विश्वात मी व्यापून राहिलो आहे. मी या जगाचा नियंता तसेच सूत्रधार आहे. मीच निर्माता, संरक्षक तसेच विनाश करणारा आहे. जो माझ्याकडे आपलं ध्यान वळवेळ त्यास काहीच बाधणार नाही, पण जो मला विसरला, त्यास माया सतावेल. किडा, मुंगी, दृश्य चराचर विश्व हे सर्व माझे शरीर आहे."

५. "माझ्या भक्तांच्या घरात अन्न वस्त्राची कोणतीही कमतरता असणार नाही. माझा हा एक विशेष गुण आहे की मी नेहमी माझ्या भक्तांची काळजी घेतो आणि त्यांना पुरवतो, जे पूर्ण हृदयाने माझी भक्ती करतात आणि आपलं मन माझ्यावर स्थिर करून ठेवतात. भगवद गीतेत सुद्धा श्री कृष्ण भगवान हेच सांगतात. म्हणून अन्न वस्त्रासाठी जास्त कष्ट न करता माणसाने आपले सर्व इंद्रिय, मन, बुद्धी देवाच्या भक्तीमध्ये लावले पाहिजे. जगाच्या मान सन्मानाचा नाद सोडला पाहिजे आणि देवाच्या दरबारात सन्मानीत व्हावे. आपलं मन हे निरंतर माझं स्मरण करण्यात लावावं, म्हणजे ते देह-वित्त-गृह यांमध्ये भटकणार नाही. मग ते शांत, स्थिर व काळजीमुक्त राहील."

६. "माझ्या सरकारचा खजिना ओतून चालला आहे. तो खणा आणि गाडे भरून खजिना घेऊन जा. एका खऱ्या आईच्या भाग्यवान मुलाने ह्या संपत्तीने स्वतःला भरून घेतलं पाहिजे."

==================Page 6=========================================

Stories

|| Shri ||

1. Shri Sai baba 11 vachan

2. Tatparya of each chapter (if necessary)

3. Falashruti of reading Sai Stories

4. Important Sai Utterances about the same.

5. Pictures of Sai.

EpiLogue

If you read this respectfully, Sai will be pleased, and removing you ignorance and

poverty, He will give you knowledge, wealth and prosperity.

By its study, the diseased and sick will get health, the poor wealth, the mean and

afflicted prosperity, and the mind will get rid of all ideas and get steadiness.

Casually thinking about the stories of Sai, you will get unconsciously interested

in spiritual life and if you then go on through the work with love, all your sins

will be destroyed.

Chp- 2

Hearing my stories and teachings will create faith in devotees’ hearts and they

will easily get self - realization and Bliss;

Chp- 3

If My Leelas are written, the Avidya (nescience) will vanish and if they are

attentively, and devoutly listened to, the consciousness of the worldly existence

will abate, and strong waves of devotion, and love will rise up and if one dives

deep into My Leelas, he would get precious jewels of knowledge."

If My stories are listened to, all the diseases will be got rid of. So, hear My

stories with respect; and think and meditate on them, assimilate them. This is the

way of happiness and contentment.

Light houses are constructed at various places in the sea, to enable the boatmen to

avoid rocks and dangers, and make them sail safely. Sai Baba’s stories serve a

similar purpose in the ocean of worldly existence. They surpass nectar in

sweetness, and make our worldly path smooth and easy to traverse. Blessed are the

stories of the saints.

"Be wherever you like, do whatever you choose, remember this well that all what you

do is known to Me. I am the Inner Ruler of all and seated in their hearts. I

envelope all the creatures, the movable and immovable world. I am the Controller -

the wirepuller of the show of this Universe. I am the mother - origin of all beings

- the Harmony of three Gunas, the propeller of all senses, the Creator, Preserver

and Destroyer. Nothing will harm him, who turns his attention towards Me, but Maya

will lash or whip him who forgets Me. All the insects, ants, the visible, movable

and immovable world, is My Body or Form".

let them not exhaust themselves by other Sadhanas, let them stick to this one

simple remedy, i.e. listening to Sai Baba’s stories. This will destroy their

ignorance and will secure for them salvation.

ch -5

If any one prostrates before Sai and surrenders heart and soul to Him, then

unsolicited, all the chief objects of life viz. Dharma (righteousness), Artha

(wealth), Kama (Desire) and Moksha (Deliverance), are easily and unsolicitedly

attained.

"There will never be any dearth or scarcity, regarding food and clothes, in any

devotees’ homes. It is my special characteristic, that I always look to, and

provide, for the welfare of those devotees, who worship Me whole-heartedly with

their minds ever fixed on Me. Lord Krishna has also said the same in the Gita.

Therefore, strive not much for food and clothes. If you want anything, beg of the

Lord, leave worldly honours, try to get Lord’s grace and blessings, and be honored

in His Court. Do not be deluded by worldly honor. The form of the Deity should be

firmly fixed in the mind. Let all the senses and mind be ever devoted to the

worship of the Lord, let there be no attraction for any other thing; fix the mind

in remembering Me always, so that it will not wander elsewhere, towards body,

wealth and home. Then it will be calm, peaceful and carefree. This is the sign of

the mind, being well engaged in good company. If the mind is vagrant, it cannot be

called well-merged."

Ch-10

Hearing the stories of the Saints is not so difficult, as the other Sadhanas

mentioned above. They (stories) remove all fear of this Samsar (worldly existence),

and take you on to the spiritual path. So listen to these stories, meditate on

them, and assimilate them. If this is done, not only the Brahmins, but women and

lower clases will get pure and holy. You may do or attend to your worldy duties,

but give your mind to Sai and His stories, and then, He is sure to bless you.

Hearing the stories of the Saints is, in a way, keeping their company. The

importance of the company of Saints is very great. It removes our body-

consciousness and egoism, destroys completely the chain of our birth and death,

cuts asunder all the knots of the heart, and takes us to God, Who is pure

Consciousness.

If you have no other Sadhana, such as uttering God's name, worship or devotion

etc., but if you take refuge in them (Saints) whole-heartedly, they will carry you

off safety across the ocean of wordly existence.

Chp-32

I kept this dress intact withoutusing it. I thought that what a man might give does

not last long and it is always imperfect. But what My Sircar (God) gives, lasts to

the end of time. No other gift from any man can be compared to His. My Sircar says

"Take, take," but everybody comes to me and says 'Give, give.' Nobody attends

carefully to the meaning of what I say. My Sircar's treasury (spiritual wealth) is

full, it is overflowing. I say, "Dig out and take away this wealth in cartloads,

the blessed son of a true mother should fill himself with this wealth.