Tarkhad2

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

नानावलींच्या क्लुप्त्या

साई बाबांचे एक विक्षिप्त भक्त होते, ज्यांचे नाव नानावली होते. मी त्यांना विक्षिप्त संबोधण्याचं स्वातंत्र्य घेतोय कारण ते फार विनोदी चाळे करायचे (माकड चाळे किंवा मर्कट लीला) ज्यामुळे लोकांना थोडा त्रास व्हायचा आणि ते बाबांकडे त्यांच्या गैरवर्तणुकी बद्दल तक्रार करायचे. बाबा मग नानांना दरडावत म्हणायचे की तू जर असाच गैरवर्तणूक करत राहिलास तर भक्त शिर्डी सोडून जातील. माझ्या वडिलांना नानावलींबद्दल एका वेगळ्या प्रकारचं कौतुक होतं. त्यांना हर्निया (अन्तर्गळ) हा आजार होता. तो एवढा होता की त्यांचा वाढलेला भाग जमिनीला स्पर्श करायचा आणि ते त्याच पद्धतीने चालायचे. कधीकधी ते आपल्या पायजम्याला मागच्या बाजूने कापडाचे फडके बांधायचे जेणेकरून लांब शेपूट तयार होईल आणि मग माकडासारखे उडी घ्यायचे. गावातली सगळ्या मुलांची त्यांच्या मर्कट लिला पाहून करमणूक व्हायची आणि मग त्या अवस्थेत ते मुलांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी बाबांकडे धावत यायचे. माझ्या वडीलांना आश्चर्य वाटायचं की हे मनुष्य हर्निया च्या त्या अवस्थेत, एवढ्या वेगाने कसे काय पळू शकतात. त्यांना ते वेडे मनुष्य आहेत असं कधीच वाटलं नाही. नानावली माझ्या वडिलांना "गवळ्या" या नावाने हाक मारायचे आणि त्यांच्याकडे अन्नाची भिक्षा मागायचे. मग माझे वडील श्री सगुण हे चालवत असलेल्या खानावळीत जायाचे आणि त्यांना नानावलींना पुरेसं जेवण खाऊ घालायला सांगायचे. माझ्या वडिलांच्यामते साई बाबा आणि नानावली हे प्रभू श्री राम आणि त्यांचा निस्सीम भक्त श्री हनुमान यांच्या जोडी सारखे होते.

नानावलींनी एकदा बाबांकडे त्यांच्या जागेवर बसण्याची परावानागी देण्याचं फर्मान सोडलं. बाबांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या जागेवरून उठले आणि नानावालींना ती जागा व्यापाण्यास अनुमती दिली. नानावली त्या जागी काही वेळ बसले आणि मग उठले आणि म्हणाले, "हे देवा, फक्त तूच ही जागा घेऊ शकतोस, कारण ती तुलाच शोभते, माझी खरी जागा तुझ्या पायापाशीच आहे". तुम्ही सर्व कल्पना करू शकता की नानावालींकडे किती धाडस असेल, बाबांकडे त्यांच्या जागेवर बसण्यास, त्यांना अनुमती देण्यासंबंधी विचारण्याचं आणि बाबांनीही त्यांना किती प्रचंड प्रमाणांत प्रेम दिलं आणि आपलं आसन प्रिय नानावलींसाठी रिकामं केलं. अर्थात, माझे वडील त्यांना प्रभू राम आणि हनुमान या जोडीसामान का मानत होते, त्याला वेगळच कारण आहे. एकदा नानावली माझ्या वडिलांना म्हणाले "ए गवळ्या, माझ्या बरोबर चल, मी तुला थोडी गंमत दाखवतो". त्यांनी मग माझ्या वडिलांना चावडीकडे नेलं जी द्वारकामाई पासून थोड्या अंतरावर आहे. बाबा तेथे चावडीत बसले होते. काही क्षणाचाही विलंब न लागता, नानावालींनी आपली उंची कमी केली आणि स्वतःला येवढं छोटं केलं की ते 'हंडी' (काचेचे वाडगे जे रशीने चावडीच्या छताला टांगून ठेवलेला असायचे) मध्ये मावू शकत होते आणि मग अक्षरशः वर उडी मारून एका हंडीत जाऊन बसले. एका माकडाप्रमाणे, ते हंडीत बसून माझ्या वडिलांना चिडवून दाखवत होते. माझे वडील ते कृत्य पाहून आश्चर्यचकित झाले. ते अविश्वसनीय होतं. ते एका चमात्कारापेक्षा कमी नव्हतं. नानावली त्यांच्या शरीराच्या त्या अवस्थेत, एवढ्या उंच उडी कसे काय घेऊ शकत होते आणि त्या हंडीत बसण्याएवडे स्वतःला छोटे कसे काय करू शकत होते. ते निव्वळ विस्मयकारक आणि अविश्वसनीय होतं. त्यांना मग जाणवलं की साई बाबा आणि नानावली हे शिर्डीत प्रभू श्री राम आणि श्री हनुमान यांचे अवतार आहेत. त्यांनी लगेचच बाबांसमोर नमस्कार केला आणि मग त्यांची पूजा केली.

प्रिय साई भक्त वाचकांनो, बाबांनी समाधी घेतल्यावर नानावली तीव्र दुखात होते आणि तेराव्या दिवशी ते स्वतः जग सोडून गेले. नानावलींची समाधी लेंडी बागेच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या नजीक स्थित आहे. मी जेव्हा पण शिर्डीला जातो तेव्हा तिच्यासमोर नमस्कार करतो. प्रभू साई आणि त्यांच्या लीलांना माझे लाख लाख नमस्कार.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

नानावलींच्या क्लुप्त्या

संतांच्या सानिध्यात राहिल्याने मनुष्यामध्ये अद्भूत शक्ती निर्माण होतात.

साई बाबा हे लौकिकी माणसाप्रमाणे गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी असा भेदभाव कधीही करत नसत कारण ते सर्व जीवांमध्ये नारायण पाहत असत. ते सर्वांच्या विश्रांतीचे स्थान होते. त्यांनी नानावलींना आपली बसण्याची जागा सुद्धा रिकामी करून दिली. यावरून संतांमध्ये अहंभाव तसेच मान सम्मानाची इच्छा किंचितसुद्धा नसते हे दिसून येते.

===========================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबंचे चंदनी मंदिर

ॐ श्री साईनाथाय नमः

आधी वर्णन केल्या प्रमाणे, तर्खड कुटुंबीयांच्या शिर्डी भेटी वाढल्या होत्या. त्यांचे बाबांप्रती प्रेम हे शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. जरी त्यांना शिर्डीत बाबांच्या चरणांपाशी सदा सर्वकाळ असावं अस वाटायचं, पण ते कुठल्याही परिस्थितीत शक्य नव्हतं. त्यांना तीव्र इच्छा निर्माण झाली की त्यांच्या वांद्र्यातील घरी बाबांचा एक मोठ्या आकाराचा फोटो असावा, ज्याची पूजा करता येईल. ह्या मागचा हेतू असा होता की जेव्हा ते शिर्डीपासून दूर असायचे तेव्हा त्यांना बाबांचा विसर न पडावा. कारण दृष्टीच्या आड म्हणजे स्मृतीच्या आड. वडील व मुलगा दोघांचाही एक विशेष स्वभाव होता तो असा की ते बाबांप्रती त्यांच्यात असणाऱ्या प्रेमाबद्दल कधीच बोलायचे नाहीत. त्यांची बाबांवर प्रचंड श्रद्धा होती. त्यांना माहीत होतं की बाबा हे अंतर्यामी आहेत जे त्यांच्या मनातील विचार वाचू शकत होते आणि ते निश्चितपणे त्यांची इच्छा योग्य वेळी पूर्ण करण्याचे योजतील. तसं बाबांच्या दोन मुख्य शिकवणी होत्या - श्रद्धा आणि सबुरी.

एका भल्या पहाटे, बाबासाहेब आणि ज्योतिंद्र यांना एक स्वप्न पडलं. त्यांना एक सुंदर कोरीवकाम केलेलं मंदिर दिसलं ज्यात बाबा बसले होते. त्या स्वप्नाचा त्यांचा मनावर खोल ठसा पडला. ते जागे झाले आणि त्यांनी त्याचे चित्र रेखाटले. तसं दोघेही चित्रकलेत प्रवीण होते. जेव्हा ते सकाळच्या न्याहारीच्या वेळी एकत्र आले त्यांनी सकाळी पडलेल्या स्वप्नाबद्दलचे आपले विचार एकमेकांना सांगितले. त्यांनी त्यांची रेखाटलेली चित्र आणली आणि हे पाहून आश्चर्यचकित झाले की दोघांनी रेखाटलेली चित्र तंतोतंत जुळत होती. त्यांनी तसे मंदिर त्यांच्या घरी असावे असा लगेच निश्चय केला. त्यांनी चौकशी करून २ किलो लगेच चंदन विकत घेतलं. त्यांनी एका कुशल सुताराची नेमणूक केली आणि त्यांना मंदिराचं रेखाटलेलं चित्र दाखवलं आणि त्यांच्यासाठी तसं एक मंदिर घडवण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्या वांद्र्यातील घराला एक छोटी गच्ची होती आणि मंदिर बनवण्याचं काम तिथे सुरु झाले. मला वाटतं की मंदिर पूर्णपणे आकारास येण्यास एका वर्षापेक्षा जास्त काळ लागला. ह्या काळाच्या शेवटी ९ फुट उंच व २ १/२ x २ १/२ फुट चौकोनी चंदनी मंदिर तयार झालं. आता ते एका दुविधेत पडले की बाबांची तसबीर कुठून आणायची, जी त्या मंदिरात पूजेसाठी लावली जाऊ शकेल.

प्रिय वाचकांनो, तुम्हाला माहीत असेल की बाबा कुणालाही कॅमेराने स्वतःचे छायाचित्र घेऊ देत नसत म्हणून त्यांची तसबीर मिळणं हे एक मोठ काम होतं. पण तर्खडांना विश्वास वाटत होता की ते स्वप्न हे बाबांची निर्मिती होती आणि म्हणून तेच हे काम पूर्ण करतील.

त्यांच्या सवईप्रमाणे ते एका शुक्रवारी दुपारी मुंबईतल्या चोर बाजारात गेले. ते एक ठरलेला पोशाख करत असत. बाबासाहेब कोट व विजार आणि इंग्रजांप्रमाणे डोक्यावर हॅट घालायचे व ज्योतिंद्र कोट विजार व डोक्यावर काळ्या रंगाची गांधी टोपी घालायचे.

ते चोर बाजाराच्या गल्लीबोळांतून जात असताना काहीतरी विशेष घडलं. एक मुसलमान दुकानदार त्यांच्या दिशेने ओरडत आला आणि म्हणाला "हे सज्जनांनो, मी इतके दिवस तुम्हाला भेटण्यासाठी वाट बघत होतो, कारण माझ्याकडे माझ्या दुकानात तुमच्याकरता एक पुडके आहे". बाबासाहेब आणि ज्योतिंद्र विस्मित झाले आणि काळजीत पडले की तो दुकानदार काही चोरीचा माल त्यांच्या गळ्यात बांधेल. त्यांनी त्याला प्रश्न विचारला की एवढ्या माणसांमधून त्याने त्यांनाच कसे काय निवडले. दुकानदाराने मग त्यांना त्यांच्या दुकानात चलण्याची विनंती केली जेथे तो सर्व काही खुलासा करू शकत होता. त्याच्या दुकानात पोहोचताच, त्याने त्यांना सांगितलं की काही दिवस आधी, साधू सारखा दिसणारा एक वयस्कर पुरुष त्याचा दुकानात आला आणि त्यांनी त्याला एक गठडा दिला. तो पुरुष त्याला म्हणाला की शुक्रवारी एक हिंदू वडील-पुत्र त्या जागी येणार आहेत. वडील इंग्रज टोपी (हॅट) घालतात आणि पुत्र काळी गांधी टोपी घालतो. त्याने त्यांना देण्याकरता एक गठडा दिला आणि सेवा शुल्क म्हणून रु. ५० सुद्धा दिले.

म्हणून मी जोडीने फिरणाऱ्या माणसांवर नजर ठेवून होतो आणि तुम्हाला बरोबर ओळखलं. आता त्यांना त्याच्या बोलण्याची खात्री पटू लागली. त्याने मग गठडा आणला आणि त्यांना दिला. पण अजूनही त्यांच्या मनात चोरीचा माल असण्याचा संशय होता म्हणून ते घेण्यापूर्वी त्यांनी त्याला ते गठडे उघडावयास सांगितले. त्याने ते गठडे उघडले आणि माहित झालं की एका सुंदर लाकडी फोटो फ्रेम मध्ये बसवलेली ती श्री साईंची कृष्ण-धवल तसबीर होती. दोघांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू दाटले आणि त्यांनी दुकानदाराला पुष्टी दिली की ते त्यांचेच गठडे आहे. त्यांनी त्याचे भरपूर आभार मानले आणि बदल्यात काही पैसे देऊ केले. दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिला कारण त्याला गठडा देणाऱ्याचे सक्त आदेश मिळाले होते. ते 'स्टुडबेकर चॅम्पिअन' प्रकारच्या मोटार कारीतून प्रवास करायचे आणि ते तीतून वांद्र्याला ती फोटो फ्रेम सुरक्षित घेऊन जाऊ शकले.

त्यांना आणखी एक सुखद धक्का मिळाला कारण फोटो फ्रेम कुठलाही बदल न करता चंदनी मंदिरात बरोबर मावली. पूर्ण तर्खड कुटुंब आनंदाने भारावून गेलं, ज्याला काही सीमा नव्हती. मग त्यांनी साई बाबांच्या तसबिरीची चंदनी मंदिरात प्राण प्रतिष्ठापना केली. माझे वडील नेमाने पहाटे लवकर उठायचे आणि ५ वाजता बाबांच्या कपाळाला चंदनाचा लेप लावून व दिवा व अगरबत्ती लावून पूजा करायचे. खडी साखर नैवेद्य म्हणून दाखवला जायाचा, जो ते सर्व, दुपारच्या जेवणाच्या वेळी भक्षण करायचे. आता ते सर्व त्यांच्या शिर्डीच्या पुढच्या भेटीची आतुरतेने वाट बघत होते.

नेहमीप्रमाणे ते द्वारकामाईत आले आणि आपल्या भेट वस्तू साई बाबांना अर्पण केल्या. बाबांनी त्यांना तेथे बसायाला सांगितलं. शिर्डीत वसतीला असलेले एक साई भक्त फार उमेदीने मागील काही दिवसांपासून कॅमेराने साईंचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते ज्यात त्यांना यश मिळालं नव्हतं. ते बाबांकडे आले आणि शेवटची संधी देण्याची विनंती केली. बाबा अचानक रागावले आणि त्यांच्यावर ओरडले आणि म्हणाले, "ए, तू माझा फोटो घेण्यासाठी आसुसलेला का आहेस. कृपया माझ्या भाऊच्या घरी जा आणि तेथे त्याच्या मंदिरातील फोटोत मी तुला जिवंत भेटीन". हे ऐकताच माझे वडील, त्यांनी आपल्या घरी जे काही केले होते त्याबद्दल फार सुखावले. बाबा ह्या गोष्टीची पुष्टी देत होते की त्यांना त्यांची रोजची पूजा प्राप्त होत होती. माझे वडील त्वरित उठले आणि बाबांसमोर नतमस्तक झाले. माझ्या वडिलांनी प्रभू साईंकडे अंतरात प्रार्थना केली की त्यांना असा वर मिळावा की त्यांना साईंचा कधीच विसर न पडावा आणि ते निरंतर बाबांच्याच आणि फक्त बाबांच्याच प्रार्थना गात राहावेत. (हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.)

तर अशा प्रकारे शिर्डी साई बाबांनी तर्खडांच्या घरच्या चंदनी मंदिरात स्वतःला स्थापन केलं. हे मंदिर दर्शनासाठी माझे दिवंगत बंधू रवींद्र यांच्या घरी वसई येथे उपलब्ध आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

साई बाबंचे चंदनी मंदिर

नाना योजना आखून, नाना लीला करून, संत आपल्या भक्तांची आध्यात्मिक प्रगती साधतात कारण त्यातच त्यांचे कायमचे हित असते आणि संतांना आपल्या भक्तांच्या उद्धाराची नेहमी तळमळ लागलेली असते. हे आई-मुला सारखेच नाते आहे. लहान मुलाला जरी कसली काळजी नसली तरी त्याच्या आईला त्याची पूर्ण काळजी असते.

तसेच या अनुभवातून, घरामध्ये देवपूजेचे महत्व सुद्धा विषद होते. आपण केलेली रोजची पूजा, देवापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला दीर्घ आयुष्य, स्वास्थ्य, संतती, संपत्ती तसेच सात्विक बुद्धीची प्राप्ती होते तसेच आपल्या मनातील कलिमल (स्वार्थीपणा, विषयासक्तपणा, लोभ, क्रोध, मत्सर, लबाडी करण्याचे विचार ई.) क्रमाक्रमाने नष्ट होवून चित्तशुद्धी होते. म्हणून संत आपल्या गृहस्थ भक्तांना नित्य पूजेचा नेम लावून देतात तसेच भक्तांचे त्यांच्यावर असलेले प्रेम दृढ व्हावे म्हणून स्वतःच्या तसबिरीच्या रुपाने त्यांच्या देव घरात स्वतःची स्थापना करून घेतात. अर्थात हे सर्व ते स्वतःसाठी नाही करत तर भक्तांच्या शीघ्र उद्धाराकरता.

======================================================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

गणेश मूर्तीचे रक्षक साई

ॐ श्री साईनाथाय नमः

चंदनी मंदिरात, गणपतीची एक लहान संगमरवरी मूर्ती आहे. ही एक अनोखी मूर्ती आहे कारण गणपतीची सोंड उजवीकडे वळली आहे. ही मूर्ती एका चंदनाच्या मंदिरात ठेवलेली आहे, जे खास ह्या मूर्तीसाठी बनवलेलं होतं. ह्या गणेश मूर्तीची गोष्ट फार रंजक आहे आणि म्हणून मला तुम्हा सर्व वाचकांना सांगावीशी वाटते.

माझे आजोबा मुंबईतील रिगल सिनेमागृहाजवळील एका जुन्या दुकानात जायचे. अशाच एका भेटीच्या वेळी, दुकानाभोवती जाताना, त्यांनी एका इंग्रज माणसाला दुकानदाराबरोबर घासाघीस करताना ऐकलं. माझ्या आजोबांना कुतूहल वाटलं की एक इंग्रज माणूस घासाघीस करत आहे, म्हणून त्यांनी त्यात सक्रीय रस घेतला. घासाघीस ही गणपतीच्या एका सुंदर संगमरवरी मूर्तीसाठी होती. ती ९ इंच उंच होती व कमळाच्या फुलात बसलेली होती आणि विविध रंगात खूप योग्य रितीने रंगवलेली होती. दुकानदार १५ रुपये किंमत मागत होता आणि हे स्पष्टीकरण देत होता की ती सोमनाथ मंदिरातील आहे आणि फार पुरातन आहे म्हणून तिची तेवढी किंमत आहे. त्या इंग्रज माणसाने मूर्तीसाठी सुरुवातीला ५ रु. देऊ केले आणि मग ८ रुपयांपर्यंत गेला. माझे आजोबा आता त्या खरेदी व्यवहाराकडे आकर्षित झाले. त्यांनी निव्वळ कुतूहलाने त्या इंग्रजाकडे विचारणा केली की तो मूर्तीचा कसा वापर करू इच्छितो. इंग्रजाने उत्तर दिलं की तो त्या सुंदर संगमरवरी मूर्तीचा स्वतःच्या टेबलावर पेपरवेट म्हणून वापर करू इच्छितो. ते ऐकल्यावर, माझे आजोबा खूप रागावले. त्यांनी स्वतःच्या पाकीटातून १०० रुपयांची नोट काढली आणि दुकानदाराला दिली. त्यांनी त्याला ८० रुपये घेण्यास सांगितले (म्हणजेच इंग्रजाने देऊ केलेल्या किंमतीच्या दहा पट) आणि त्यांच्यासाठी मूर्ती आवरणबद्ध करण्यास सांगितली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ते कुणालाही त्यांच्या देवाचा वापर पेपरवेट म्हणून करू देणार नाहीत. दुकानदाराकडे अधिक चोकशी करता, त्यांना असं कळलं की ती मूर्ती सोमनाथ मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वारातील होती आणि म्हणून खूप पुरातन होती. घरी पोहोचताच त्यांनी जाहीर केलं की ते ती मूर्ती चंदनी मंदिरात ठेऊ इच्छितात जेणेकरून साई पूजेबरोबर तिची सुद्धा पूजा घडेल, जी कुठल्याही परीस्थित पेपरवेट म्हणून वापर होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुटुंबातील लोक त्यांच्याशी सहमत झाले. खोका उघडताच, माझ्या आजीला समजलं की मूर्तीला सोंड आहे जी उजवीकडे वळलेली आहे आणि अशा प्रकारचा गणपती (सिद्धिविनायक) हा सहसा पूजेसाठी घरात ठेवत नाहीत कारण त्यामुळे घराच्या सर्व क्रिया कर्मांमध्ये फार कडक शिस्त पाळावी लागते. मग त्यांनी पुजाऱ्यांचा सल्ला घेतला, ज्यांनी त्यांना सल्ला दिला की ते एका अटीवर मूर्तीची पूजा करू शकतात की प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी ते तिला नवा रंग देतील आणि ते तिचे विसर्जन करणार नाहीत. तर्खड कुटुंबीय ह्या योजनेने आनंदी झाले आणि पुढील गणेश चतुर्थीच्या दिवशी, त्यांनी मूर्तीसाठी चांदीचे मंदिर आणले आणि त्याची समारंभपूर्वक चंदनी मंदिरात स्थापना केली.

तेव्हापासून प्रत्येक हरताळकेला (गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी) माझे वडील मुर्तिवरचा जुना रंग टर्पेन्टाइनने काढत असत. मग सुगंधी जलाने तिला अंघोळ घालीत. आमच्या पैकी प्रत्येक जण त्यात सहभागी होत असे आणि मूर्तीला पुन्हा रंग द्यायचो. गणेश चतुर्थीच्या दिवशी ते तिची पुन्हा आपल्या चांदीच्या मंदिरात स्थापना करायचे आणि आम्ही सर्व पूजा करायचो. मला आठवतं की मी युवा अवस्थेत असताना, माझे शाळेचे मित्र मला विचारायचे की तुमच्या घरी गणपती येतो का. मी त्यांना सांगायचो की आमचा गणपती कायमचा आहे. तेव्हा ते माझे बोलणे समजू शकत नसत. अशा प्रकारे तर्खड कुटुंबीयांचं परिवर्तन प्रार्थना सामाजीष्ट असण्यापासून मूर्ती पूजक होण्यामध्ये झालं.

आमच्या घरातील ही गणेश मूर्ती एकदा माझ्या आजीद्वारे अग्नी परीक्षेला घातली गेली. माझे आजोबा जे कापड उद्योग जगतात विख्यात होते, त्यांना बरोदाच्या महाराजांकडून, त्यांच्या राज्यात कापड गिरणी स्थापन करण्याचे काम मिळाले. म्हणून ते बारोद्याला स्थलांतरित झाले आणि त्यांना नदीच्या काठी असलेल्या एका बंगलयात राहण्याची सोय मिळाली. एका पावसाळ्यात, रात्रभर भरपूर पाउस झाला आणि सकाळ होइस तोवर त्यांचा बंगला पाण्याने वेढला गेला. हा त्यांच्या साठी नवीन अनुभव होता. माझी आजी घाबरली कारण जसजसे तास जात होते, पाण्याची पातळी वाढत होती. शेवटची पायरी सोडून बंगल्याच्या इतर सर्व पायऱ्या पाण्याखाली गेल्या. माझ्या आजीने मग तांब्याचं एक सपाट भांडं आणलं आणि ते शेवटच्या पायरीवर ठेवलं. मग तिने चांदीच्या मंदिरातील "विघ्नहर्त्याला" उचललं आणि तांब्याच्या भांड्यात ठेवलं आणि घोषणा केली की जर मूर्ती पाण्याखाली गेली तर ती त्याच पाण्यात गणेश मूर्तिच्या विसर्जनाचा कार्यक्रम करण्यास प्रारंभ करेल. अर्थात तिचा असा पवित्र हेतू होता की देवाने त्यांना त्या गंभीर अवस्थेतून वाचवलं पाहिजे. मला वाटतं की फक्त पूर्ण श्रद्धा असलेले भक्तच असं बेधड़क साहस करण्याची जोखीम घेऊ शकतात आणि बहुदा देवाला ते आवडत असावं. पाण्याची पातळी आणखी वाढली आणि तिने तांब्याच्या पात्राला स्पर्श केला आणि आणखी वाढण्याची थांबली. ३-४ तासांनंतर, पाण्याची पातळी कमी झाली आणि ते सगळे सुखावले. त्यांनी इच्छा केल्या प्रमाणे विघ्नहर्ता त्यांच्या बचावाकरता आला होता. त्या वर्षी त्यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव दिड दिवसांऐवजी पाच दिवसांकरिता साजरा केला.

मी ह्या गणेश मूर्ती बद्दल अजून एक किस्सा सांगण्यासाठी पुढे सरसावत आहे. ही घटना ह्या अध्यायाच्या शिर्षकावरती प्रकाश टाकेल. एका हर्ताळकेच्या दिवशी (प्रिय वाचकांनो, योगायोगाने माझी आजी हर्ताळकेच्या दिवशी निर्वाण पावली) जुना रंग काढत असताना, मूर्तीचा उजव्या हाताचा भाग कोपऱ्यापासून निघाला. माझे वडील फार घाबरले कारण हिंदू धर्माप्रमाणे, विघटीत झालेल्या मूर्तीची पूजा करण निषिद्ध मानले जाते. पण आतापर्यंत ती मूर्ती कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली होती आणि तिच्या पासून वेगळं होणं त्यांना जमलं नसतं. त्यांनी तो उत्सव पूर्ण करून मग साई बाबांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. अशा प्रकारे ते शिर्डीला गेले. प्रिय वाचकांनो, ही त्यांच्या कडून अनुचित कृती नाही का घडली? त्यांनी आतापर्यंत गणेश मूर्तीच्या व्यवहारात बाबांना कधीच सामील करून घेतलं नव्हतं आणि आता कठीण काळी त्यांना त्यांची मदत हवी होती. त्या प्रसंगी ते जेव्हा द्वारकामाईत होते, तेव्हा बाबा असामान्यपणे त्यांच्याशी गप्प होते. त्यांना त्यांची चूक कळली होती आणि ह्या गोष्टीचे अपराधी वाटत होते की बाबांना सुरुवातीपासून सामील करून घेतलं नाही. ते आतल्या आत ह्या गोष्टीसाठी क्षमा मागत होते. ते संयमाने वाट बघत बसले. मग द्वाराकाईतली गर्दी कमी झाल्यावर बाबांनी त्यांना जवळ बोलावलं. ते म्हणाले, "ए आई, आपल्या मुलाचा हात अस्थिभंग पावला तर आपण त्याला आपल्या घरातून काढून टाकत नाही. उलट आपण त्याला खाऊ घालतो आणि पोषण करतो जेणेकरून तो प्रौढ़त्व प्राप्त करेल." हे ऐकताच, ते लगेच त्यांच्या पायावरती पडले आणि त्यांचे भरपूर आभार मानले. प्रिय वाचकांनो, बाबांच्या प्रज्ञेचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे योग्य शब्द नाहीत. ते खरे खुरे अंतरज्ञानी होते कारण ते कुणाच्या मनात काय चालले आहे ते वाचू शकत होते.

बाबांच्या लीला थोर होत्या आणि ते आई पुत्र सुद्धा थोर होते. तर अशा प्रकारे बाबांनी त्या गणेश मूर्तीचं रक्षण केलं जी अजूनही तर्खड कुटुंबीयांकडे पूजेसाठी आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

गणेश मूर्तीचे रक्षक साई

सनातन हिंदू धर्मात मूर्ती पुजेला महत्व आहे. अशा प्रकारे केलेली पूजा देवा पर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. परंतु असे करत असताना काही दोष होवू नये याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः देवघराचे पावित्र्य व सुचीभूर्तपणा हे राखले पाहिजेत. यासंबंधी काही संशय किंवा दुविधा असेल तर जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे.

======================================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय

ॐ श्री साईनाथाय नमः

मी तुमच्या पुढे तर्खड कुटुंबियांच्या अनुभवांचा खजिना उघडून ठेवला आहे आणि मला खात्री वाटते की तो वाचल्यावर तुमचा बाबांवर असलेला विश्वास द्विगुणीत झाला असेल. आता आपण साई सच्चरित्रात दिलेल्या अनुभवांकडे वळणार आहोत.

मी साई सच्चरित्रातील ९ व्या अध्यायाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. अर्थात इथे मी गृहीत धरतो की आपले वाचक ह्या पवित्र ग्रंथाबद्दल सुज्ञ आहेत आणि त्यांनी तो कमीतकमी एक वेळ तरी वाचला असेल. जर आपण तसं केलं नसेल तर माझी नम्र विनंती आहे की कृपया तसं करावं. तो ग्रंथ शिर्डी साई बाबांच्या जीवन चरित्राचे फार सखोल वर्णन करतो आणि त्यांनी शिर्डीतील आपल्या आयुष्य कालखंडात आपल्या भक्तांसाठी केलेल्या विविध लीलांचे ही वर्णन करतो. ह्या पवित्र ग्रंथाचा ९ वा अध्याय हा मुख्यतः तर्खड कुटुंबाप्रती समर्पित आहे, म्हणजेच माझी आजी, माझे आजोबा रामचंद्र आत्माराम तर्खड उर्फ बाबासाहेब तर्खड आणि माझे वडील ज्योतिंद्र रामचंद्र तर्खड यांच्या प्रती. आधी सांगितल्या प्रमाणे तर्खड कुटुंबीय हे पक्के प्रार्थना सामाजीष्ट होते आणि त्यांचा मूर्ती पूजेवर विश्वास नव्हता. त्या बाबतीत त्यांचा देवावर विश्वास नव्हता. पण त्यांच्या नियतिने त्यांना शिर्डी साई बाबांच्या संपर्कात आणले आणि मग एक फार मोठा बदल घडला. तसं पाहिलं तर साई बाबांची विख्यात आरती सांगते की त्यांच्या कडे नास्तिकालाही, देवावर पूर्ण श्रद्धा असलेला बनवण्याचं सामर्थ्य आहे. (नास्तीकांनाही तू लाविसी नीज भजनी). तर्खड कुटुंबियांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडलं.

साई सच्चरित्राचे लेखक कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर ९ व्या अध्यायात सांगतात की बाबासहेब तर्खड हे फार भाग्यवान होते जेणेकरून त्यांना माझ्या वडिलांसारखा पुत्र मिळाला, जो देवाची फार चांगली पूजा करायचा. माझे वडील पहाटे ४ वाजता उठायचे आणि आंघोळ केल्यानंतर ते घरातील देव्हाऱ्यातल्या बाबांच्या तसबिरीला चंदनाचा लेप लावून बाबांची आरती करायचे. ते चांदीचे निरंजन लावायचे ज्यात बाबांनी दिलेलं १ पैश्याचं नाणं ठेवलेलं होतं. आणि खडी साखरेचा नैवेद्य प्रसाद म्हणून रोज दाखवला जायाचा, जो ते सर्व दुपारच्या जेवणाच्या वेळी खायचे. पूजा झाल्यानंतर वडील व मुलगा हे दोघे भायखळा येथील आपल्या कापड गिरणीत जायला निघायचे. बाबांच्या कृपेने त्या काळात माझे आजोबा दर महा ५००० रुपये व माझे वडील २००० रुपये एवढे वेतन प्राप्त करत होते. एकदा माझ्या आजोबांना बाबांना सुताचे ताग पाठवण्याची इच्छा निर्माण झाली, ज्याचा वापर करून ते स्वतःच्या वापरासाठी कफनी शिवू शकले असते. त्यांनी ज्योतींद्राला आपल्या आई बरोबर शिर्डीला जाण्याचं व ते साहित्य बाबांना देणाचं सुचवलं. पण ज्योतिंद्र हा काही जायाला तयार नव्हता कारण मग घरातील पूजा कोणी केली असती? मग माझ्या आजोबांनी ती जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्याला आश्वासन दिलं की तो करायचा त्याप्रमाणे ते पूजा विधी करतील आणि त्या बाबतीत कोणतीही उणीव राहणार नाही. हे आश्वासन मिळाल्यावर माझे वडील त्यांच्या आई बरोबर शिर्डीला रवाना झाले. पुढचे २ दिवस सुरळीत गेले पण तिसऱ्या दिवशी माझे आजोबा पूजेच्या वेळी खडी साखरेचा नैवेद्य दाखवायला विसरले. हे त्यांच्या लक्षात आलं ते दुपारीच जेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटात प्रसादाची खडी साखर नव्हती. ते लगेच उठले आणि त्यांनी शिर्डीतील ज्योतिंद्र यांना पत्र लिहून त्यांच्या घोड चुकीबद्दल बाबांकडे माफी मागण्यास सांगितलं.

तेथे शिर्डीत त्या वेळी एक मनोरंजक गोष्ट घडली. द्वारकामाईतील मध्यान्ह आरती नंतर, जेव्हा माझी आजी आणि वडील बाबांकडे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले, बाबा माझ्या आजीला म्हणाले "अग आई! आज मी फार भुकेला आहे. नेहमीप्रमाणे मी वांद्र्याला गेलो, आणि पाहिलं की दार बंद आहे पण कोणीही मला अडवू शकत नाही कारण मी दाराच्या फटीतून आत गेलो पण पूर्णपणे निराश झालो कारण मला दुपारच्या जेवणाकरिता काहीच भेटलं नाही आणि मला उपाशी पोटी परत यावं लागलं". माझ्या आजीला बाबा काय म्हणत होते ते काहीच कळलं नाही पण माझ्या वडिलांनी लगेच ताडलं की त्यांचे वडील सकाळच्या पूजेच्या वेळी बाबांना प्रसाद दाखवायला विसरले असावेत. त्यांनी बाबांकडे, त्यांच्या वडिलांना त्यांच्या घोड चुकी बद्दल क्षमा करण्याची विनंती केली आणि मुंबईला त्वरित जाण्याची परवानगी मागितली. बाबांनी परवानगी दिली नाही आणि आणखी काही दिवस राहण्यास सांगितलं. तरीही माझे वडील अधीर झाले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना पत्र लिहून बाबा काय उद्गारले त्याचा तपशील कळवला. दोन्ही पत्र एकमेकांना मिळाली आणि ती वाचल्यावर पिता पुत्र दोघांच्याही डोळ्यात प्रेमाश्रू आले. त्यांना बाबांचे त्यांच्यावरील प्रेम किती अगाध आहे याची जाणीव झाली. दुसऱ्या दृष्टीकोनातून बघायचं झालं तर बाबांनी त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली की ते त्या तसबिरीत निश्चितपणे जिवंत आहेत आणि ते त्यांनी दाखवलेला नैवेद्य न चुकता स्वीकार करतात.

एकदा ते शिर्डीत असताना, माझी आजी तीचं दुपारचं जेवण घेणार होती इतक्यात एक कुत्रा तिथे आला आणि आपली शेपटी हलवू लागला. माझ्या आजीने त्याला चपातीचा एक तुकडा टाकला जो त्याने आवडीने खाल्ला आणि तिथून निघून गेला. थोड्या वेळाने चिखलाने संपूर्णपणे माखलेला एक डुक्कर तिथे आला. सामान्यपणे असा घाणेरडा दिसणारा जीव पाहिल्यानंतर एखाद्याला जेवणाचा घास गळ्याखाली उतरवणं जड जाईल पण माझी आजी फार दयाळू व देवा मध्ये श्रद्धा ठेवणारी होती. तिने चपातीचा तुकडा त्या कुरूप डुकराला सुद्धा दिला. डुकाराने तो तुकडा खाल्ला आणि निघून गेला. मग त्याच दिवशी नंतर जेव्हा ते द्वारकामाईत गेले आणि बाबांच्या जवळ पोहोचले तेव्हा ते तिला म्हणाले "अग आई, तू आज मला स्वतःच्या हाताने भरवलस आणि ते जेवण एवढं चमचमीत होत की मी अजूनही ढेकर देत आहे." माजी आजी हे ऐकून आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली "बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तुम्हाला शिर्डीत असताना कधीही अन्न दिलेलं नाही, कारण काही झालं तरी मी इथे जेवण बनवतच नाही.

खर हे आहे की मी स्वतः श्री सगुण यांनी चालवलेल्या इथल्या एका खानावळीत पैसे देवून जेवते". मग बाबा तिला म्हणाले "अग आई, आज दुपारी, जेव्हा तू जेवण करत होतीस, तेव्हा तू एका कुत्र्याला आणि मग एका कुरूप दिसणाऱ्या डुकराला नाही का अन्न दिलस? ते अन्न माझ्या पर्यंत पोहोचलं." मग माझी आजी त्यांना म्हणाली, "बाबा याचा अर्थ तुम्ही प्राण्यांचं रूप घेऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेता." बाबा मग तिला म्हणाले "अग आई, तू ह्या जीवांवर दया दाखवणं चालू ठेव आणि मग देव तुझ्यावर कृपा करणं चालू ठेवेल. देव काळजी घेईल की तुझ्या घरात अन्नाचा तुटवडा कधीच होणार नाही".

आता पर्यंत तर्खड कुटुंबियांच्या इतर साई भक्तांबरोबर फार ओळखी झाल्या होत्या आणि त्या पैकी काही जसे श्री दाभोळकर, श्री पुरंदरे, श्री तेंडूलकर हे त्यांच्या वांद्रे येथील घराच्या जागेपासून जवळ अंतरावर राहात होते. ते एकमेकांना भेटत असत आणि मग आपले बाबांबरोबरचे गोड अनुभव एकमेकांना सांगत असत. जेव्हाही ते शिर्डीला जाण्याचे ठरवत, तेव्हा एकमेकांना खबर देत असत आणि जर कोणाला बाबांकरिता काही पाठवायचं असेल तर ते त्या भक्तासाठी दूत बनत असत. अर्थात ह्या मागचा उद्देश्य होता की बाबांप्रती शुद्ध भक्ती आणि प्रेम व्यक्त करणे. एकदा श्री पुरंदरे कुटुंबासहित शिर्डीला जायला निघाले आणि माझ्या आजीने श्रीमती पुरंदरे यांना दोन मोठी गडद रंगाची वांगी दिली आणि त्यांना विनंती केली की एका वांग्याचे भरीत करावे आणि दुसऱ्या वांग्याच्या काचऱ्या (तळलेली वांग्याची कापं) कराव्यात आणि त्या बाबांना दुपारच्या जेवणात द्याव्या. श्रीमती पुरंदरे यांनी पहिल्या दिवशी भरीत बनवले आणि स्वतः बनवलेल्या इतर जेवणाबरोबर ते बाबांच्या दुपारच्या जेवणाच्या ताटात दिलं. बाबांनी भरीत खाल्लं आणि काचऱ्या खाण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमती राधाकृष्णमाई, ज्या शिर्डीच्या स्थानिक भक्त होत्या आणि ज्या बाबांच्या जेवण व्यवस्थेची काळजी घेत असत, त्या चक्रावून गेल्या. त्यांनी इतर बायकांकडे चौकशी केली आणि त्यांना माहित झालं की श्रीमती पुरंदरे यांनी वांग्याचा पदार्थ आणला होता. काही असलं तरी तो वांग्याचा हंगाम नव्हता आणि म्हणून शिर्डीत एखाधं वांग मिळणं कठीण होतं. म्हणून श्रीमती राधाकृष्णमाई श्रीमती पुरंदरे यांच्याकडे घाईने गेल्या आणि वांग्याच्या उपलब्धतेबद्दल चौकशी केली. त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे एक वांग आहे आणि त्याच्या काचऱ्या बनवून पुढच्या दिवशी बाबांना देण्याचा त्यांचा बेत आहे. मग श्रीमती राधाकृष्णमाई यांनी ते वांग घेतलं आणि घाईघाई बाबांसाठी काचऱ्या तळल्या कारण त्या खाऊनच दुपारचं जेवण आटोपण्याचा त्यांचा विचार होता.

आता हे तर निव्वळ, भक्तांप्रती आपल तीव्र प्रेम व्यक्त करण्याचं कृत्य होतं आणि भक्ताला बदल्यात या गोष्टीची सुद्धा पोच देत होतं की त्याच्याकडून/तिच्याकडून भक्ती पोहोचली. जेव्हा श्रीमती पुरंदरे यांनी वांद्र्याला परत येताच माझ्या आजीला या घटनेची माहिती दिली, ती संपूर्णपणे भारावून गेली आणि तिने बाबांचे हृदयापासून आभार मानले.

अशाच प्रकारे, एका संध्याकाळी श्री गोविंदजी (श्री बाळकराम यांचे पुत्र) तर्खड यांच्या घरी आले कारण ते त्या रात्री शिर्डी येथे जाण्यासाठी निघणार होते. ते नाशिक येथे आपल्या दिवंगत वडिलांच्या अस्थींचे विसर्जन विधी करणार होते आणि मग शिर्डीला जाणार होते. ते फार घाईत होते आणि माझी आजी बाबांकडे पाठवण्याकरिता काहीतरी चांगली भेटवस्तू जुळवू शकली नाही.

तिला एक पेढा मिळाला जो चंदनी मंदिरातील बाबांच्या तसबिरीसामोरील प्रसादाच्या डब्यात ठेवलेला होता. तिने त्यांना तो पेढा बाबांना अर्पण करायला सांगितला, जरी ती आतून नाखूष होती कारण तो पेढा आधीच प्रसाद म्हणून दाखवण्यात आलेला होता. आणखी एक गोष्ट ही होती की श्री गोविंदजी यांनी आपली अस्थीविसर्जनासाठीची यात्रा शिर्डी भेटीबरोबर जोडून घेतली होती. तरीही माझ्या आजीने हे सर्व तर्कशुन्य विचार बाजूला ठेवले कारण तिच्या हेतू मध्ये दिव्य प्रेम होतं. तेच प्रेम जे शबरी ने श्री रामांप्रती व्यक्त केलं होतं जेव्हा तिने त्यांना उष्टी बोरं दिली होती.

जेव्हा गोविंदजी आपले सर्व इतर विधी करून द्वारकामाईत पोहोचले, ते पेड्याबद्दल पूर्णपणे विसरले होते. बाबांनी त्यांना विचारलं की तू माझ्यासाठी काही आणलस का?. गोविंदजींनी नकारार्थी उत्तर दिलं. मग बाबांनी त्यांना आठवण करून दिली की कोणीतरी त्यांना (बाबांना) देण्याकरिता त्यांच्याकडे काहीतरी दिलं होतं. गोविंदजी दगडासारखे अनभिज्ञ उभे राहिले आणि पुन्हा नकारार्थी उत्तर दिलं. बाबा आता रागावले आणि अक्षरशः त्यांच्या वर ओरडले आणि म्हणाले "अरे, मुंबईतून निघताना माझ्या आईने मला देण्याकरिता तुझ्याकडे काहीतरी दिल होतं. ते कुठे आहे?" आता गोविंदजींच्या ध्यानात आलं. ते जिथे उतरले होते तिथे धावत गेले आणि त्यांनी पेढा आणून बाबांना दिला. बाबांनी तो पेढा लगेच खाउन टाकला आणि त्यांनी गोविंदजींना आईला सांगण्यास सांगितलं की पेढा फार गोड लागला.

प्रिय साई भक्त वाचकांनो, अशा दैवी प्रेमाची उदाहरणं कै. श्री अण्णासाहेब दाभोळकर यांनी साई सच्चरित्राच्या ९ व्या अध्यायात फार प्रभावशाली पद्धतीने दर्शवलेली आहेत. माझे वडील जेव्हा हे अनुभव आम्हाला सांगायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाह्याचे. मला वाटतं की कुठल्या भक्ताला तसं वाटणार नाही, जेव्हा त्याला भगवंताकडून अशा प्रकारे पोच मिळाल्याची पावती मिळेल. मला एकाला असं वाटतं "तशी लोक आज कुठे गेली? आणि तसे भक्त आज कुठे आहेत आणि तशा प्रकारची भक्ती आज कुठे आहे?". पण साई बाबाचं आपल्या भक्तांप्रती प्रेम चिरंतन आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई सच्चरित्रातला ९ वा अध्याय

आधी सांगितल्या प्रमाणे, आपण देवघरात केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत असते आणि आपल्याला त्याचा लाभही होत असतो. पहिल्या अनुभवातून साई बाबांनी आठवण करून दिली आहे की, देवघरातील तसबिरीत ते जिवंत आहेत आणि त्यांना दाखवलेला नैवेद्य ते निश्चितपणे ग्रहण करतात.

दुसऱ्या अनुभवातून साई बाबांनी फार मोलाची शिकवण दिली आहे की "सर्व जीवांमध्ये देव वास करत असतो". सामान्य माणसाचा असा समाज असतो की देव हा फक्त देवळात किंवा पवित्र तीर्थक्षेत्रात असतो आणि तिथेच त्याला गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत, पण हे काही खरं नाही. भगवंताने स्वतः भगवद गीतेत सांगितलं आहे की तो सर्व जग व्यापून आहे. म्हणजेच तो किडा मुन्गीत सुद्धा आहे, पशु पक्ष्यात सुद्धा आहे, मनुष्यात सुद्धा आहे आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टींत सुद्धा आहे. म्हणून आपण जर कुत्रा मांजर किंवा कुठल्याही जीवाला खाऊ घातले आणि त्याची भूक भागली तर ते सरळ सरळ देवापर्यंत पोहोचत असतं आणि देव आपल्यावर संतुष्ट होतो आणि आपलं कल्याण करतो. आपल्याला काही कमी पडणार नाही याची काळजी घेतो. म्हणून आपण नेहमी सर्व जीवांवर भूतद्या दाखवली पाहिजे. कुणाला हड-हड करू नये.

तिसऱ्या आणि चवथ्या अनुभवातून, आपल्याला समजतं की संत तसेच देव, त्यांना प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टी फार आवडीने घेतात आणि त्या मिळाल्याची पोच सुद्धा देतात.

=============================================================================

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

माझ्या पणजीला मिळालेले साई दर्शन

प्रिय साई भक्त वाचकांनो, शिर्डीच्या त्या १७ भेटींमधून माझे वडील बहुसंख्य अनुभवांनी समृद्ध झाले आणि जेव्हाही ते त्या अध्यात्मिक रंगात रंगून जायचे तेव्हा ते, आपले ते अनुभव सांगायचे आणि आम्हाला तृप्त करायचे. मला खात्री आहे की त्यांना त्यातून भरघोस आनंद प्राप्त होत असेल. मला पुन्हा एकदा प्रामाणिकपणे वाटतं की त्यांनी ते लिहून ठेवायला पाहिजे होते. मी तुम्हाला ते थोडे अनुभव सांगतोय जे माझ्या मनावर कायमचे बिंबले आणि अर्थात ते जे मला आठवतात. माझा हेतू निव्वळ हा आहे की शिर्डी साई बाबांचे सामर्थ्य साई भक्तांपर्यंत पोहोचावे आणि तसं करत असताना माझी त्यांच्या प्रती भक्ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे.

माझे पणजोबा-पणजी, जे चरनी रोड चौपाटी (गिरगाव चौपाटी) येथील त्यांच्या बंगल्यात राहात होते, त्यांना माहीत झालं की रामचंद्र (माझे आजोबा) व ज्योतिंद्र (माझे वडील) वारंवार शिर्डीला जात होते. वडील व आजोबा वांद्रे येथील टाटा ब्लॉक्स येथे भाड्याने राहात असल्यामुळे, ते त्यांना फक्त क्वचित भेटायचे. माझ्या पणजोबा-पणजी यांची जीवन शैली त्या काळच्या इंग्रज लोकांसारखी होती. पण माझी पणजी फार जिज्ञासू स्वभावाची व्यक्ती होती आणि माझे वडील जेव्हापण त्यांच्याकडे चौपाटी येथे भेट देत, तेव्हा ती माझ्या वडिलांकडे शिर्डी साई बाबा आणि त्यांच्या लीलांबद्दल चौकशी करायची. ती नेहमी त्यांना, तिला साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला घेऊन जाण्यास सांगायची आणि माझे वडील नेहमी तिला आश्वासन द्यायचे. त्यांची खात्री होती, की हे कधीच शक्य होणार नाही कारण त्यांचे आजोबा अशा भेटीसाठी कधीच परवानगी देणार नाहीत. तीचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक होतं आणि आजोबा, संत व बाबा यांमध्ये विश्वास ठेवणारे नव्हते.

पुढे असं घडलं की मुंबईत प्लेगची साथ पसरली आणि डॉक्टरांना काही त्या काळापर्यंत त्या भयाण रोगावर कुठलंही ठोस औषध किंवा उपचार सापडलेला नव्हता. माझ्या पणजीला ताप आला आणि तिच्या डॉक्टर असलेल्या पतींनी दिलेल्या उपचाराने कोणतेच चांगले परिणाम हाती येत नव्हते. तिच्या आजाराबद्दल समजताच, माझे वडील त्यांच्या घरी गेले. त्या भेटीच्या दरम्यान, माझी पणजी माझ्या वडिलांना म्हणाली की ती त्या प्लेगच्या आजारातून बरी होणार नाही आणि तिच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी त्यांनी साई बाबांकडे प्रार्थना करावी. मग ती शिर्डीला येईल आणि बाबांचे दर्शन घेईल. तिची याचना ऐकल्यावर, माझ्या वडिलांनी तिला सल्ला दिला की तिचा साईंवर खराखुरा विश्वास असेल तर तिने अंथरुणातूनच त्यांची प्रार्थना करावी आणि प्रभू साई निश्चितपणे तिच्या मदतीसाठी धावून येतील. माझ्या वडिलांनी उदीचं एक छोटं पाकीट (जे नेहमी ते आपल्या पाकिटात ठेवायचे) तिच्या उशी खाली ठेवलं आणि घरी परत येऊन तिला बरं वाटण्यासाठी भगवान साईंकडे प्रार्थाना केली. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे, चौपाटी बंगल्यातला नोकर वांद्र्याला आला आणि म्हणाला की ज्योतीबाला (माझ्या वडिलांना) बरोबर घेऊन येण्यास त्याला सांगण्यात आलं आहे. माझे आजोबा आणि वडील दोघेही घाबरले आणि प्रार्थना करू लागले की कोणतीही अनुचित घटना घडलेली नसावी. ते लगेच चौपाटीला गेले. तिथे पोहोचताच आणि पणजीला खाटेवर बसलेले पाहून, त्यांना जन्मभरीचा धक्काच बसला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती म्हणाली "ज्योतिबा, काल रात्री तुझे साईबाबा इथे आले होते. त्यांनी सफेद कपडे घातले होते आणि डोक्याला सफेद कपडा बांधलेला होता. त्यांना सफेद दाढी होती. ते माझ्या खाटेजवळ उभे राहिले आणि उदीने भरलेला आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले की, आई, आता पासून तुला बरं वाटू लागेल आणि ते अदृश्य झाले. त्यानंतर, मला दरदरून घाम फुटला आणि माझा ताप गेला. भल्या पहाटे, मला एकदम बरं वाटत होतं आणि मी माझे दात घासले नाहीत आणि गड्याला माझ्यासाठी आरसा आणण्यास सांगितला. माझा चेहरा त्यात पाहताच, मला माझ्या कपाळावर उदीने माखलेल्या हाताची छाप स्पष्ट दिसली. म्हणून मी गड्याला तुला बोलावण्याकरता पाठवलं आणि आता तू स्वतः पाहू शकतोस." पणजीचा आणि नातवाचा आनंद त्या क्षणी गगनात मावेनासा झाला. माझ्या वडिलांनी तात्काळ प्रभू साईंचे त्यांच्या दैवी मदतीसाठी आभार मानले. डॉक्टर तर्खड (पणजोबा) सुद्धा अचंबित झाले कारण प्लेगने ग्रासलेले त्यांचे कित्येक रुग्ण दगावले होते. त्यांनी त्यांच्या बंगल्यात दासगणू महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तसं पाहिलं तर पणजीला बाबांचं दर्शन आधीच घडून गेलं होतं. प्रभू साईंनी स्वतःहून तिची इच्छा पूर्ण केली होती. साई बाबा, आमची तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. कृपा करून आम्हां सर्वांवर तुमचा कृपाशीर्वाद चालू राहू देत.

प्रिय साई भक्त वाचकांनो, तर्खड कुटुंबियांचा हा स्वतःचा अनुभव सांगून मी हा अध्याय संपवू इच्छितो. पुढे जाण्यापूर्वी, मी माझ्या वडिलांच्या (ज्यांना आम्ही दादा म्हणायचो) आत्म्याला खरीखुरी प्रार्थना करतो की मी जर का हा बहुमूल्य अनुभव सांगताना कुठे चुकलो असेल आणि काही चुका केल्या असतील तर मला खरीखुरी क्षमा करावी. मला खात्री आहे की तो पवित्र आत्मा जिकडे कुठे असेल, तो मला क्षमा करेल, कारण हे पुस्तक लिहिण्यामागे माझा एकमेव हेतू हा आहे की दादांना अनन्यपणे वंदन करावं जे मी त्यांच्या हयातीत करू शकलो नाही आणि मला वाटतं की कधीच न करण्यापेक्षा उशिराने केलेल बरे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संतांकडे आपल्या भक्तांचे प्रारब्धाने आलेले भोगांचे निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. साई बाबांनी त्यांच्या अनेक भक्तांचे भोग व रोग दूर केले आहेत आणि आजही दूर करत आहेत. कित्येक दृष्टीहीनांना दृष्टी दिली आहे, अपंगांना त्यांचे पाय दिले आहेत, दुर्धर आजारांनी ग्रासालेल्यांचे रोग बरे केले आहेत. अर्थात हे फक्त देवच करू शकतो. कुठलाही सामान्य माणूस, किंवा डॉक्टर किंवा वैद्य असे चमत्कार करू शकत नाही. म्हणून आपण संतांना नेहमी शरण येऊन राहिले पाहिजे.

==================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

मुंबईत साई महानिर्वाणाचा पुरावा

ॐ श्री साईनाथाय नमः

यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा श्री मोरेश्वर प्रधान यांना अस्थमाचा झटका पुन्हा आला तेव्हा बाबांच्या उदीचा औषधी उपयोग कसा झाला. त्या वेळी माझ्या आजोबांनी त्यांना बाबांची पवित्र उदी पाण्यात घालून पिण्यासाठी दिली होती, ज्याने त्यांना बरं वाटलं होतं. माझे वडील व आजोबा खूप आनंदी झाले कारण ही तीच उदी होती जी बाबांनी त्यांना फार खात्री देऊन दिली होती आणि त्यांनी कधीच कल्पना केली नाही की त्यांना ती एवढ्या लवकर वापरावी लागेल. पण खरं पाहू जाता काहीतरी विशेष घडलं. श्री मोरेश्वर यांच्या घरातून स्वतःच्या वांद्रे येथील घरी परत येताच, जेव्हा ते बाबांचे आभार मानण्याकरिता चंदनी मंदिराच्या समोर गेले, त्यांनी पाहिलं की बाबांची तसबीर ही बांधणीतून निखळली होती व झुकलेल्या अवस्थेत लोंबकळत होती. त्यांनी माझ्या आजीकडे चौकशी केली की कुठल्या गड्याने त्यांच्या अनुपस्थितीत तिथे स्वच्छता केली होती का. पण ते शक्य नव्हतं कारण तो विजयादशमीचा दिवस होता आणि सर्व स्वच्छता आणि पूजा सकाळीच होऊन गेली होती. ते मग त्या दोन घटनांमध्ये काही योगायोग आहे का याचा अंदाज लावू लागले. ते श्री तेंडूलकर किंवा श्री दाभोळकर यांच्या घरी जाण्याचा विचार करू लागले, जे वांद्र्यातच जवळ राहात होते. पण याची गरज पडली नाही कारण विले पार्ले येथे राहाणारे श्री दीक्षित यांचा नोकर संध्याकाळी त्यांच्या घरी आला. त्याने त्यांना सांगितलं की बाबांनी दुपारी शिर्डी येथे निर्वाण घेतलं आहे आणि श्री दीक्षित हे शिर्डी येथे जाण्याकरता निघणार आहेत आणि त्यांनी बाबासाहेब तर्खड (माझे आजोबा) यांना त्यांच्या सोबत येण्याची विनंती केली आहे.

हे समजताच, त्यांना दोन घटनांमागील गूढ आकळलं आणि जाणवलं की बाबांनी त्यांना बिनतारी संदेश पाठवून कळवलं आहे की ते महानिर्वाण घेत आहेत आणि जगाचा निरोप घेत आहेत. म्हणून अस्थमाचा तात्पुरता झटका आला आणि चंदनी मंदिरातील बाबांची तसबीर निखळली. शिर्डी आणि मुंबई यांतील अंतर किती आहे याची कल्पना करा. ही किती विलक्षण पद्धत आहे आपल्या पेमळ भक्तांना सुचित करण्याची की ते कायमचा निरोप घेत आहेत. प्रिय साई भक्तांनो बाबांना फार यथायोग्य रीतीने संबोधलं जात "अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री साईनाथ" आणि आपल्या प्रमेळ भक्तांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या आगळ्या पद्धतीने, भक्तांच्या अंगात रोमांच उभे राहत असेल, जे फक्त तेच चांगल्या रीतीने जाणू शकतात. अर्थात साई बाबांचे महानिर्वाण हा फक्त त्यांच्या शरीराचा निरोप होता कारण त्यांच्या अवतारकार्याच्या वेळी, त्यांनी आपल्या भक्तांच्या मनावर हे ठसवलं होत की ते त्यांच्या बरोबर सदैव असतील, जेव्हा पण ते हाक मारतील. त्यांनी जाहीर केलं होतं की "माझी हाडं माझ्या समाधितून तुमच्याशी बोलतील आणि माझ्यावर अगाध श्रद्धा ठेवा. अनादि सत्य हे आहे की मी नित्य जिवंत आहे आणि हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे, जे तुम्ही कधीच विसरता कामा नये." ("नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य")

आपण २१ व्या शतकात आहोत आणि आजही रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी या उत्सव काळात आपण त्यांच्या शिर्डीत त्यांच्या भक्तांमध्ये असलेल्या उत्साह पाहू शकतो. माझ्या प्रिय वाचकांनो, मी पण ह्या गोष्टीचं आश्चर्य करत राहतो की पभू साईंबरोबरचा असा दैवी अध्यात्मिक सहवास अनुभवल्यानंतर, माझ्या वडिलांनी उर्वरित जीवन जगण्यासाठी एका सामान्य माणसाचा मार्ग कसा काय स्वीकारला. सामान्य रीत अशी आहे की एखादा माणूस प्रपंचातील (कौटुंबिक जीवनातील) अडीअडचणीतून सुटण्यासाठी परमार्थाचा मार्ग स्वीकारतो. पण माझ्या वडिलांच आयुष्य याला अपवाद होतं आणि हेच योग्य स्पष्टीकरण आहे जे स्विकारलं पाहिजे. मी माझ्या वडिलांच्या अखेरच्या प्रवासासंबंधी काही विवरण देईन, जे सुद्धा माझ्या दृष्टीने अद्वितीय आहे.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

संत तसेच देव हे काही फक्त त्यांच्या साडे तीन हाताच्या देहात राहतात असे नाही. ते संपूर्ण विश्वात व चराचरात भरून उरले आहेत. म्हणून ते आपल्या भक्तांना, ते साता समुद्रा पलीकडे असले तरी संकेत देऊ शकतात, मदत करू शकतात तसेच प्रकट होऊ शकतात.

=======================================================================

।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री शारदा नमः ।।

।। श्री सद्गुरु नमः ।।

श्रावणी सोमवार - १६ ऑगस्ट १९६५

ॐ श्री साईनाथाय नमः

१९१८ ते १९६५ हा ४७ वर्षांचा काळ हा फार मोठा अवधी आहे आणि माझ्या वडिलांनी हा दीर्घ प्रवास कसा संक्रमित केला, हे मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छित नाही. माझं हे पुस्तक लिहिण्यामागचा एकमेव हेतू हा आहे की, शिर्डीच्या साई बाबांबरोबरचे त्यांचे अनुभव तुम्हाला सांगावे आणि ज्याद्वारे आपण श्री साईंप्रती आपले प्रेम व भक्ती व्यक्त करू शकतो. अर्थात, ह्या काळात, त्यांचा माझ्या आईशी विवाह झाला, जीचं माहेर मुंबई येथील केळवे माहीम ह्या ठिकाणी होतं. तिचं नाव होतं लक्ष्मीदेवी केळवेकर. आणखी एक गोष्ट अशी की ह्या काळात माझे आई-वडील महाराष्ट्रातील थोर संतांमधील एक संत, श्री गाडगे महाराज यांच्याशी परिचित झाले, ज्यांनी माझ्या वडिलांना स्वतःच्या कुटुंबाकरता एक बंगला विकत घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी खार येथे एक बंगला विकत घेतला (जो ५१ ई, खार पाली रोड येथे होता) आणि त्या सर्वांनी टाटा ब्लॉक्स या आपल्या जुन्या निवासस्थानाचा १९२३ मध्ये निरोप घेतला.

माझ्या कथनामध्ये संत गाडगे महाराजांचा उल्लेख आला आहे, म्हणून मी त्यांच्या संबंधी काही तथ्य, माझ्या पुढच्या अध्यायात देऊ इच्छितो. त्यांच्या विवाहानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला शिर्डीला फक्त एकदाच नेलं होतं आणि तिला आपल्या पूर्वायुष्याची आणि प्रभू साईंशी घडलेल्या सहवासाची सविस्तर माहिती दिली होती. माझी आई सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. थोडक्यात सांगायचं तर, मी स्वतःला भाग्यवान समजतो, जे मला त्यांच्यासारखे देवामध्ये विश्वास ठेवणारे पालक मिळाले आणि ज्यांच्याकडून मी चांगले संस्कार आत्मसात केले, जे २१व्या शतकात दुर्लभ गोष्ट आहेत. माझे वडील हे फार आरोग्यसंपन्न व्यक्ती होते. मी त्यांना कधीही आजारी पडताना बघितलं नाही, त्यांना कधी साधा सर्दी खोकला सुद्धा झाला नाही. त्यांना ५ मुली आणि २ मुले होती. त्यांनी आपल्या ५ मुलींची लग्न करण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आणि आपल्या २ मुलांची लग्ने पाहू शकले नाहीत.

१९६५ चा जुलै महिना चालला होता. ते आजारी झाले. त्यांना तीव्र ब्रोन्कायटिस (फुप्फुसनलिकादाह) हा आजार झाला आणि त्यानंतर कंबर लचकली, ज्यामुळे त्यांना अंथरुणात पडी घेऊन राहावं लागलं. आम्हा सर्वाना ती वृद्धापकाळाची लक्षणं वाटली. मी वी.जे.टी.आय. अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. च्या शेवटच्या वर्षात शिकत होतो आणि माझे थोरले बंधू रवींद्र हे त्यांच्या कापड गिरणी मध्ये काम करत होते जेथून वडील निवृत्त झाले होते. त्या दिवसांत माझी आई उच्च रक्त दाब, मधुमेह, दमा यांसारख्या सर्व प्रकारच्या दुखण्यांचा त्रास सोसायची. ती कधी कधी गंभीर आजारी व्हायची, तेव्हा आम्हाला तिला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन(प्राणवायू) द्यावा लागत असे. खरं पाहू जाता नेहमी आम्ही ऑक्सिजनचं एक नळकांड घरी हाताशी ठेवायचो. माझे वडील फार वेदानेमध्ये होते आणि सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांना कटिवात (लुंबागो) हा रोग झाल्याचं निदान केल होतं. मी विण्टोजीनो किंवा महानारायण तेल त्यांच्या कमरेला लावायचो, ज्यामुळे त्यांना थोडा आराम मिळायचा. त्यांना खूप उदास वाटायचं की आम्हाला त्यांची सेवा सुश्रुषा करावी लागे. त्यांनी आम्हाला कधीही पाय सुद्धा चेपायला सांगीतले नव्हते आणि म्हणून त्यांना अंथरुणाला खिळून राहिलेली व्यक्ती बनणे फार विचित्र वाटायचं. एकदा त्यांनी मला विचारलं की ते त्यांच्या आजारातून बाहेर येतील काय. मला आठवतं की मी त्यांना त्यांच्या बाबांकडे आपात संदेश देण्याचा सल्ला दिला, जेच फक्त त्यांच्या सुटकेसाठी येऊ शकत होते. पण हे काही घडलं नाही. त्यांची तब्येत आणखी बिघडली आणि डॉक्टर जोशी यांच्या सल्यानुसार आम्हाला त्यांना सांताक्रूझ येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली. माझी आई त्यांची सुश्रुषा सेवा करण्यासाठी पूर्णपणे कर्तव्यबद्ध होती. तिला या गोष्टीचा पूर्ण विसर पडला की ती स्वतः एक रुग्ण आहे. ती त्यांच्यासाठी सकाळचा चहा आणि नाश्ता घेऊन जायाची आणि संध्याकाळी, रात्रीचं जेवण घेऊन जायाची. मी महाविध्यालायातून परत आल्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल तिला विचारायचो. ती म्हणायची की काही विशेष सुधारणा नाही पण त्यांचे सर्व इंद्रिय कार्यरत आहेत.

मला वाटतं की ते जवळपास एक आठवडाभर रुग्णालयात दाखल होते. माझी आई त्यांना रोज सकाळी चहाच्या प्याल्या बरोर पवित्र उदी द्यायची जी बाबांनी त्यांना दिली होती. मग १६ ऑगस्ट चा दिवस उजाडला, जो मराठी तारखेप्रमाणे श्रावणी सोमवार होता. माझ्या आईने माझ्या बंधूंना व मला घरी लवकर परत येण्यास सांगितलं कारण आम्ही सर्व श्रावणी सोमवारी सूर्यास्तापूर्वी लवकर रात्रीच जेवण करायचो. मी दुपारी महाविद्यालयातून परत आलो. रुग्णालयात जाताना, ती म्हणाली की आजचा दिवस फार निर्णायक आहे. जर तुझे दादा या दिवसातून सुखरूप गेले तर ते कमीत कमी आणखी एक वर्ष जगतील. मी तिला विचारलं की ती असं का म्हणत आहे. तिने उत्तर दिलं की तिने तिच्या सासूकडून ऐकलं होतं की श्रावणी सोमवार हा तर्खड कुटुंबीयांतील पुरुष मंडळींकरीता अशुभ दिवस आहे कारण त्यांच्या पैकी बरेचसे त्या दिवशी निर्वाण पावले.

आता ती रुग्णालयात पोहोचली तेव्हा काय झालं? जवळपास दुपारी ३.३० वाजता, तिने माझ्या वडिलांना चहाचा प्याला दिला, जो ती थर्मोस मधून घेऊन जायची. माझे वडील हे चहाचे तलपी होते. त्यांना बरं वाटलं आणि जवळपास ४ वाजता, त्यांनी माझ्या आईकडे पुन्हा चहा मागितली. माझ्या आईने त्यांना सांगितलं की अर्ध्या तासाआधीच तिने त्यांना चहा दिला होता आणि तो श्रावणी सोमवार असल्यामुळे ती लवकर घरी जाणार आहे. ५ वाजता, ती त्यांना चहा देईल आणि घरी जाण्याकरिता निघेल. पण माझ्या वडिलांनी हट्ट धरला की तिने त्यांना चहा द्यावा कारण त्यांना काहीतरी दिसत आहे जे एवढ स्पष्ट नाही आहे. माझ्या आईने त्यांना काळजी न करण्यास सांगितलं आणि तिने त्यांना त्यांच्या हातात तुळशीची माळ दिली आणि त्यांना बाबांकडे प्रार्थना करायला सांगितलं. तिने त्यांच्या कपाळाला पवित्र उदी सुद्धा लावली. चहाचा पहिला घोट घेताच ते माझ्या आईला सांगू लागले की कोणीतरी बोलवत आहे पण त्यांना चेहरा निट दिसत नव्हता आणि ओळखता येत नव्हत की तो कोण मनुष्य आहे. माझ्या आईने त्यांना सांगितलं की त्या खोलीत आपण दोघेच व्यक्ती आहोत आणि त्यांनी तुळशी माळेचा वापर करून बाबांचा जप करावा. मग ते बाबांचे नाव पुटपुटु लागले. काही काळाकरता त्यांचा चेहरा उजळला होता. दुखण्याच्या वेदना गायब झाल्या होत्या आणि ते जवळपास ओरडून म्हणाले "बाबा, मी आलो". हे त्यांचे शेवटचे शब्द होते आणि ते प्राणरहित झाले. हा त्यांचा अंत होता. मला वाटतं की त्यांनी त्या वेळी बाबांना बघितलं असावं. निर्वाणाची ही किती आगळी रीत !! असं म्हणतात की प्रत्येक जीवाला, जेव्हा त्याचा प्राण शरीराला सोडून जातो तेव्हा फार यातना होतात. पण माझे वडील "बाबा मी आलो" असं म्हणत निर्वाण पावले. तर अशा प्रकारे, बाबांनी त्यांच्या भाऊंना स्वतः बरोबर नेले. मला माझ्या आईच्या धैर्याचं विस्मय वाटतं, जी एकटीच घरी परतली. ती म्हणाली की तुमचे दादा स्वर्ग लोकाकडे निघून गेले. कृपया सर्वांना कळवा आणि अंतिम यात्रेची तयारी करा. मला आठवतं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एक धडा होता ज्याचं शीर्षक होतं "मरणात खरोखर जग जगते". दादांनी हे वाक्य १०० टक्के खरं करून दाखवलं होतं. माझी आई सामान्यपणे फार भावूक व्यक्ती होती पण तिने अश्रुंचा एक थेंबही धाळला नाही. कदाचीत ती मृत्यूचे ते अकल्पित दृश्य पाहून स्तब्ध झाली असावी किंवा कदाचित बाबांकडून त्या अश्रूंना सक्त आदेश असावेत की त्या दिवशी वाहू नयेत. तर अशा प्रकारे १६ ऑगस्ट १९६५ च्या त्या श्रावणी सोमवारी माझ्या आजीचं वक्तव्य खरं सिद्ध झालं.

|| श्री गणेशाय नमः ||

|| श्री शारदा नमः ||

|| श्री सद्गुरू नमः ||

साई बाबा

देव तसेच संत अंतकाळी(देह त्यागताना), आपल्या भक्तांची अंतर्बाह्य काळजी घेतात. भाताच्या देहाला दुर्बलता आली तरी त्याला ते ध्यानाची सुखद सावली देतात, ज्यामुळे त्याला कष्ट होत नाहीत. काही भाग्यवान भक्तांना तर ते अनायासे निर्वाण देतात, म्हणजेच कोणताही आजार न होता, चालता बोलता निर्वाण होणे.