२०२५ वार्षिक सर्वसाधरण सभेची सूचना
दिनांक : ९ ऑगस्ट २०२५
वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
आपले मंडळाचे आजीव सभासद, हितचिंतक आणि सन्माननीय सभासद यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता खालील विषयांवर चर्चा/विचार विनिमय करुन निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली आहे. तरी आपण अवश्य उपस्थित राहून संस्थेचे कार्यामध्ये सहभागी व्हावे हि विनंती.
सभेचे स्थळ : ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सोसायटी, ठाणे.
संपर्क : श्री. राजीव भालचंद्र पेंडसे, भ्र. ध्वनी : ७५०६६४५००३ / ९८१९७५९६०३
सूचना : गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास त्याच ठिकाणी सकाळी ११.३० वाजता तहकूब सभा सुरु होईल, त्यास गणपूर्तीची आवश्यकता रहाणार नाही.
विषय पत्रिकाः
१. उपस्थित सभासदांमधुन अध्यक्षांची निवड करणे.
२. कार्याध्यक्षा सौ. हेमांगी महाजन यांचे प्रास्ताविक.
३. मागील दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृतांत वाचन.
४. कार्यवाह श्री. राजीव भालचंद्र पेंडसे यांचे वर्ष २०२४-२५ चे अहवाल वाचन.
५. कोषाध्यक्ष सौ. वर्षा विद्येश पेंडसे यांचेकडून वर्ष २०२४-२५ चा ताळेबंद
व लेखापरीक्षकांचा अहवाल सादर आणि सभेकडून मंजूरी.
६. कोषाध्यक्षांकडून वर्ष २०२५-२०२६ चे अंदाजपत्रक सादर करणे व मंजुरी.
७. वर्ष २०२५-२०२६ करीता सनदी लेखापरीक्षक यांची नियुक्ती आणि मानधन निश्चित करणे.
८. संस्थेच्या नविन कार्यालयासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी कार्यकारिणीला अधिकारासाठी आजीव सभेची अनुमती.
९. संस्थेची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी अनुमती आणि त्यासाठी पेंडसे समाज मंडळ आणि पेंडसे जनकल्याण मंडळ यांची परस्पर अनुमती करार करण्यास अनुमती
१०. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षांचे मार्गदर्शन.
११. अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्या वेळेचे विषयांवर चर्चा.
आपला नम्र,
राजीव भा. पेंडसे
कार्यवाह
कृपया ही सर्वसाधारण सभेची सूचना आपल्या संदर्भासाठी येताना बरोबर घेऊन यावी.