उद्यमशीलता प्रोत्साहन पुरस्कार
पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या कार्यकारी मंडळाने 'उद्यमशीलतेला प्रोत्साहन' या मंडळाच्या ध्येय धोरणास चालना देण्यासाठी पेंडसे परिवारातील उद्योजक/उद्योजिकेस आकर्षक 'प्रोत्साहन पुरस्कार' प्रतिवर्षी देण्याचे योजले आहे. या संदर्भात “कुलवार्ता' या त्रैमासिकात मार्च ते डिसेंबर २०२४ पर्यंतच्या तिन्ही अंकात पुढील आवाहन प्रकाशित करत आहोत.
आवाहन - उद्यमशीलता प्रोत्साहन पुरस्कार
१) पेंडसे समाज कल्याण मंडळाचे आजीव सभासद / त्यांचे कुटुंबातील व्यक्ती यांनी सुरु केलेला उद्योग/व्यवसाय किमान पाच वर्षांपूर्वी सुरू केलेला असावा.
२) वस्तु निर्मिती केंद्रे / वर्कशॉप / कारखाना / स्वत: चालवत असलेले दुकान / गृहउद्योग / असे त्याचे स्वरूप असावे.
३) उद्योजकाने स्वत:च्या उद्योगाची सविस्तर माहिती, स्थान व स्वरूप हे पुढील पत्त्यावर पाठवावी.
श्री. राजीव भालचंद्र पेंडसे, ३०१, सिध्दीविनायक अँनेक्स, चोगले नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६, मो.: ७५०६६४५००३
४) हे 'प्रोत्साहन पारितोषिक' प्रतिवर्षी वेगवेगळया उद्योजकास दिले जाईल. मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण होईल. या प्रसंगी उद्योजकाने समक्ष उपस्थित राहून परितोषिक घ्यावयाचे आहे.
५) हे 'आवाहन' मार्च ते डिसेंबर २०२४ पर्यंतच्या तीनही कुलवार्तात प्रकाशित होईल. त्यामुळे पेंडसे उद्योजकांची माहिती मंडळाकडे उपलब्ध होईल.
६) पेंडसे उद्योजकाने पाठवलेल्या माहितीपत्रावर एका स्थानिक पेंडसे आजीव सभासदाची 'शिफारस' नाव (आ.स.क्र.) व पत्ता / मोबाईल नंबर यासह असावी.