कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक ( वर्ष २०२४-२०२७)
आपले मंडळाचे नियमाप्रमाणे कार्यकारी मंडळाचे १/३ सभासद दर तीन वर्षांनी निवृत होऊन त्या रिक्त पदांसाठी नव्याने निवडणूक घेण्यात येते. वर्ष २०२१-२०२४ चे कार्यकारिणीतील जे सभासद सेवा ज्येष्ठतेनुसार निवृत्त झाले आहेत. त्या सर्व व्यक्ती फेरनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पात्र आहेत.
मुंबई
ठाणे
उर्वरित विभाग
पुणे
निवडणूक नियमाप्रमाणे वरील पदे रिक्त घोषित करण्यात आली असून वर्ष २०२४च्या वार्षिक सभेमध्ये वरील ६ पदांसाठी निवडणूक घेण्यात येईल. नवीन नियमाप्रमाणे विभागवार रिक्त पदे खालील प्रमाणे घोषित करण्यात येत आहेत.
मुंबई विभाग जागा १ + १ = २ जागा
ठाणे विभाग जागा १ + १ = २ जागा
पुणे विभाग ३ जागा
उर्वरित विभाग १ जागा
---------------
एकूण जागा ८ जागा
उमेदवारी अर्ज पाठविण्याची पध्दत :
१. उमेदवाराने अर्जांच्या नमुन्याप्रमाणे वेगळ्या कागदावर अर्ज लिहून पाकिटावर कार्यकारिणी उमेदवाराचा अर्ज असा उल्लेख करावा.
२. प्रत्येक उमेदवाराचा अर्ज वेगळ्या पाकिटातून पाठवावा.
उमेदवारी अर्ज (नमुना)
१) अर्जदाराचे संपूर्ण नाव
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता व असल्यास दूरध्वनी क्र. व मोबाईल क्र.
३) जन्मदिनांक
४) शिक्षण
५) सामाजिक कार्यांचा अनुभव
दिनांक अर्जदाराची स्वाक्षरी
अ) अर्जदाराचे नाव आजीव सभासद क्रमांक स्वाक्षरी
ब) सूचकाचे नाव आजीव सभासद क्रमांक स्वाक्षरी
क) अनुमोदकाचे नाव आजीव सभासद क्रमांक स्वाक्षरी
पेंडसे समाज कल्याण मंडळ
त्रेवार्षिक निवडणूक नियम आणि नियमावली २००८
(दि. ४ मे २००८ रोजी कार्यकारी मंडळाने मंजुरी दिल्याप्रमाणे)
निवडणुक केव्हा व कशी घ्यावी :
पेंडसे समाजकल्याण मंडळ पुणे या संस्थेचा उल्लेख मंडळ असा करण्यात येईल. मंडळाचे घटनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे मंडळाच्या (कमीतकमी ९ आणि जास्तीत जास्त १५) एकूण उपलब्ध कार्यकारिणी सभासदांपैकी स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या/सेवा ज्येष्ठतेनुसार निवृत्त होणाऱ्या १/३ किंवा अधिक रिक्त कार्यकारिणी सभासदांसाठी निवडणूक दर तीन वर्षांनी घेण्यात यावी. त्याबद्दल सर्वसाधारण नियम पुढीलप्रमाणे असावे. निवडणूक घटनेचे परिच्छेद क्र. ४/३ (कार्यकारी मंडळ) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित सभासदांकडून प्रत्यक्ष मतदान पध्दतीने घेण्यात यावी.
परिच्छेद क्र. ४/३ (कार्यकारी मंडळ) नुसार निवडणुकीबद्दल खालील बदल करण्यात येत आहे.
कार्यकारी मंडळाच्या १५ निवडून येण्याऱ्या सभासदांसाठी विभागवार प्रतिनिधित्व देण्यामुळे विभागवार प्रतिनिधी निवडून येतील व ते त्या विभागातील कार्यावर लक्ष केंद्रीत करतील.
स्थूल मानाने विभागवार प्रतिनिधित्व खालील प्रमाणे असेल.
मुंबई विभाग ५ जागा
पुणे विभाग ५ जागा
ठाणे विभाग ४ जागा
उर्वरित विभाग १ जागा
स्वीकृत सभासद घेताना विभागवार प्रतिनिधित्व न देता संबंधित कार्यकर्त्याचे संस्थेला मिळणारे योगदान महत्वाचे ठरेल.
मंडळाचे आर्थिक वर्ष संपल्या नंतरच्या (३१ मार्च नंतरच्या) पहिल्या कार्यकारिणीचे सभेमध्ये रिक्त पदे घोषित करण्यात येऊन त्यासाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येईल.
निवडणूक अधिकारी : हा स्वेच्छेने काम करणारा मंडळाचा आजीव सभासद असेल परंतु तो कार्यकारी मंडळाचा सभासद/उमेदवार नसेल.
उमेदवाराची पात्रता :
१. सदर व्यक्ति अर्ज करताना किमान १ वर्ष मंडळाचा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे वय १९ पूर्ण असले पाहिजे.
2. उमेदवार हा त्या विभागात किमान ३ वर्ष निवासी असला पाहिजे.
मतदाराची पात्रता : आजीव सभासदाचे वार्षिक सभेचे एक दिवस आधी मंडळाचा आजीव सभासद असणाऱ्या प्रत्येक सभासदाला मताधिकार असेल.
निवडणूकीची पध्दत
अ) रिक्त पदांची घोषणा आणि निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर सदर निवडणूक अधिकारी पुढील कुलवार्ता मध्ये निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करील. त्यामध्ये उमेदवारी अर्ज मागविण्याचा दिनांक, अर्ज छाननीचा दिनांक आणि अर्ज मागे घेण्याचा दिनांक निश्चित करण्यात येतील. उमेदवारी अर्जांचा नमुनाही. त्यामध्ये दिला जाईल.
ब) वैध उमेदवारांची नावे वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनेमध्ये त्यांचे अल्प परिचयासह देण्यात येतील. त्याबरोबर मतपत्रिकाही जोडण्यात येईल.
क) ज्या सभासदांना सभेला उपस्थित रहाणे शक्य नसेल ते स्वखर्चाने टपालाने अथवा प्रत्यक्ष निवडणूक अधिकारी यांचेकडे वार्षिक सभेचे आधी ३ दिवस पर्यंत मतपत्रिका पाठवू शकतील व त्या मतपत्रिका निवडणूक अधिकारी विचारात घेतील.
ड़) वार्षिक सर्वसाधारण सभेचे दिवशी सभेचे प्रारंभी उपस्थित सभासद मत नोंदणी करतील.
इ) वरील क आणि ड पध्दतीने मतदान झाल्यावर या सर्व मतपत्रिका विचारांत घेऊन निवडणूक अधिकारी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अखेरीस निवडणुकीचे निकाल जाहीर करतील.
फ) पुनर्गठीत कार्यकारी मंडळ वार्षिक सभेचे दिवशी अस्तित्वात येईल व नवीन पदाधिकाऱ्यांची निवड त्याच दिवशी वार्षिक सभेनंतर करण्यात येईल. विसर्जित कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांनी सुमारे १ महिन्याचे कालावधीत नवीन पदाधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे सुपूर्द करावी.
कार्यकारी मंडळ
१) कार्यकारी मंडळ हे कमीत कमी ९ आणि जास्तीत जास्त १५ सभासदांचे राहील. त्यामध्ये कार्याध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष, सहकार्यवाह व इतर ५ ते ११ सभासद असतील. या शिवाय कार्यकारी मंडळ कामाचे व्याप्तीनुसार जास्तीत जास्त ३ स्वीकृत सभासद नियुक्त करू शकेल ज्यांचा कालावधी पुढील त्रैवार्षिक निवडणुकीपर्यंतच मर्यादित राहील.
२) दर तीन वर्षांनी कार्यकारी मंडळाच्या एकूण संस्थेपैकी १/३ सभासद व्यक्ती निवृत्त होतील. उपरिनिर्दिष्ट कार्यकारी मंडळापैकी पहिल्या तीन वर्षांनंतर निवृत्त होण्याकरता जे स्वेच्छेने निवृत्त होऊ इच्छितील त्यांना तशी सवड, उचित असल्यास दिली जाईल. एकमत न झाल्यास चिठ्या टाकून नावे ठरविली जातील. त्यानंतर आणखी तीन वर्षांनी ज्येष्ठ सभासदांपैकी निम्म्या व्यक्ती वरीलप्रमाणे निवृत्त होतील. तदनंतर दर तीन वर्षांनी कार्यकारी मंडळातील ज्येष्ठता क्रमानुसार १/३ सभासद निवृत्त होतील.
३) निवृत्त होणाऱ्या सभासदांच्या ठिकाणी त्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत निवडणुका घेऊन नवीन सभासदांच्या नेमणुका केल्या जातील. निवृत्त झालेल्या वा होत असलेल्या सभासदाला परत निवडणुकीस उभे राहाण्याचा अधिकार राहील. निवडणुकीबद्दलचे नियम कार्यकारी मंडळ वेळोवेळी करून त्यात योग्य ते बदल करतील.
४) दर तीन वर्षांनी ज्या-ज्या वेळी कार्यकारी मंडळ पुनर्घटित होईल तेव्हा आपल्या सभासदांमधून वरीलप्रमाणे पदाधिकारी निवडेल.
५) या तीन वर्षांत एखाद्या सभासदाने राजीनामा दिल्याने अथवा इतर कारणाने जागा रिकामी झाल्यास कार्यकारी मंडळ त्या सभासदाच्या उर्वरत कालावधीसाठी सर्वसाधारण सभेच्या सभासदांमधून योग्य त्या व्यक्तींची निवड करील. असे करताना कार्यकारी मंडळाची संस्था ९च्या खाली जाणार नाही अशी खात्री करावी.
अध्यक्ष
अध्यक्ष है सर्वसाधारण सभेमध्ये पुढील १ वर्षाचे मुदतीसाठी निवडले जातील म्हणजे त्यांचे मुदतीचे सर्वसाधारण सभेचे अखेरीस नविन अध्यक्षांची निवड उपस्थित आजीव सभासद बहुमताने करतील, ते अध्यक्ष म्हणून संबोधिले जातील. त्यांचे अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे कामकाज संपन्न होईल.