स्तुतिसुमने
स्तुतिसुमने
पेंडसे समाजकल्याण मंडळाचे उधिष्ट: शिक्षण प्रसारासाठी व शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती कामे हाती घेणे
आपल्या मंडळातर्फे दरवर्षी शैक्षणिक मदत घेणारी विद्यार्थिनी सिमरन शेख हिने मंडळाच्या शैक्षणिक साहाय्या विषयी कवितेतून व्यक्त केलेले आभार
# आभार....
शिक्षणाची हौस आणि
होती परिस्थितीची मार....
तेव्हा आपुल्या मंडळाने
उतरवला आमुचा भार!!
आर्थिक स्थितित जेव्हा
आली होती मंदी....
तेव्हा दिली आपण
आम्हा शिक्षणाची संधी!!
जेव्हा आमुचे मन
परिस्थितीमुळे घाबरले....
तेव्हा आम्हा गरिबांचे
भविष्य आपण सावरले!!
चांगले आमुचे भाग्य
लाभली आपुली साथ....
आपुल्यामुळे करू शकलो
आम्ही परिस्थिती वर मात!!
खुप मोठा आहे हा
आपुला पुढाकार....
मनापासुनी करावा वाटतो
आपुला जय-जयकार!!
चरणी आपुल्या फुले आणि
गळ्यात फुलांचा हार....
सदैव कार्यरत राहो
हा आपुला कारभार!!
आपुल्या प्रती आज मी
व्यक्त करते कृतज्ञता....
खरं म्हणजे आहात आपण
मानवताचे देवता!!
आपुल्या अमूल्य मदतीने
माझे स्वप्न करेल साकार....
मोलाच्या या सहकार्यासाठी
आपुले मनापासूनी आभार!!
--- सिमरन शेख !