कुलवार्ता
तुमच्याकडे जुने हितगुज किंवा कुलवार्ता अंक असल्यास कृपया सर्व पानांचे उच्च दर्जाचे फोटो किंवा pdf फाईल pendsesamaj@gmail.com ला पाठवावी. कृपया फोटोंवर सावल्या नाहीत याची खात्री करा. मग मी त्यांच्या pdf फाईल्स तयार करून वेबसाइटवर अपलोड करू शकतो. आपल्याला अशा अंकांची गरज आहे जेआधीच वेबसाइटवर अपलोड केलेले नाहीत.
पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या कार्याची माहिती पेंडसे कुटुंबियांपर्यंत मासिकाद्वारे पोहोचवण्याची कल्पना जनरल के. श. पेंडसे यांनी मांडली व त्या मासिकासाठी “हितगुज” असे अनुरूप नाव कार्यकारिणीने निश्चित केले. मे १९९२ ला 'हितगुज' चा पहिला चार्तुमासिक अंक प्रसिद्ध झाला. काही अंक प्रसिद्ध झाल्यानंतर 'हितगुज* बंद पडले.
त्यानंतर जानेवारी १९९७ पासून 'पेंडसे कुलवार्ता' या नावाने द्वैमासिक नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागले. “कुलवार्ता'ची “वृत्तपत्र नोंदणी करण्यासाठी शरद रामचंद्र पेंडसे आणि प्रकाश सीताराम पेंडसे यांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे स. २00२ साठी कुलवार्ताला वृत्तपत्र नोंदणी क्र. 41 //3१/2002/7583 मिळाला. परंतू अंक दर महिन्याला प्रसिद्ध होत नसल्यामुळे पोस्टाची सवलत मिळू शकली नाही.
जानेवारी २00४ पासून "पेंडसे कुलवार्ता' त्रेमासिकाच्या स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या कायबद्दलच्या माहितीबरोबर वैचारिक लेख, कविता आणि पेंडसे मंडळींसंबंधीच्या सुखद आणि दु:खद घटनांची नोंद कुलवार्तामध्ये केली जाते. पेंडसे समाज कल्याण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य पेंडसे कुलवार्ताच्या संपादक मंडळात कार्य करतात.