संस्था स्थापने विषयी
हा न्यास जरी पेंडसे कुटुंबीयांकडून स्थापित होत असला तरी न्यासाचे नाव सर्वसमावेशक हवे. आपण सर्व समाजासाठी कार्य करत आहोत असे नावात दिसले पाहिजे हे ध्यानात ठेवून न्यासाचे नामकरण 'पेंडसे समाज कल्याण मंडळ' असे झाले.
अशा प्रकारे आदरणीय राजगुरु श्रीधर विनायक पेंडसे यांनी सुचवलेल्या कायमस्वरूपी कार्यांच्या संकल्पनेला "पेंडसे समाज कल्याण मंडळा" च्या रूपाने मूर्तस्वरूप मिळाले.
नोंदणीकृत कार्यालय : द्वारा ले. कर्नल (नि) वसंत बापूजी पेंडसे, विश्वकर्मा गृहरचना संस्था, ५४ रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे ४११०३८
पत्रव्यवहाराचा पत्ता : पेंडसे समाज कल्याण मंडळ, 'हरीकुंज', फडके रोड, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प) पिन - ४००६०२
ईपत्र: pskm1990@gmail.com
नोंदणी क्रमांक : महा / ५१३३ / पुणे / २५ मे १९९०
संस्थेच्या सभासदत्वाविषयी
सभासदत्व आणि त्याचे प्रकार
अ) सभासदत्व
अठरा वर्षे वयावरील स्त्री-पुरुष यांना या मंडळाचे सभासद होता येईल. त्यासाठी त्यांनी विहित नमुन्यांत कार्यकार मंडळास अर्ज करावा. सभासदत्व देणे अथवा न देण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाकडे राहील. त्यासाठी कार्यकारी मंडळाने कारणे देण्याची आवश्यकता नाही.
ब) प्रकार
१) आजीव पेंडसे
महाजन (पेंडसे) कुळाशी थेट संबंधित असलेली व्यक्ती रु. १०००/- अथवा कार्यकारी मंडळ ठरवेल ती रक्कम देईल अशी व्यक्ती. कार्यकारी मंडळाला रु. १०००/- पेक्षा कमी रक्कम स्वीकारून सभासदत्व देता येणार नाही.
२) सन्माननीय
कार्यकारी मंडळ वेळोवेळी ठरवील अशा व्यक्तींना सन्माननीय सभासदत्वाने भूषविता येईल.
३) हितचिंतक
जी व्यक्ती पेंडसे-महाजन (पेंडसे) कुळाशी वरील प्रकार १ मध्ये अंतर्भूत होत नाही (म्हणजेच पेंडसे-महाजन कुळाशी थेट संबंधित नाही) अशी व्यक्ती दोन आजीव सभासदांनी शिफारस केल्यास रु. १०००/- देणगी घेऊन त्यांना हितचिंतक सभासदत्व देण्यात येईल.
आकडेवारी
सभासद संख्या: १२५८
आजीव: ११५४
सन्माननीय: १८
हितचिंतक: ८६
पेंडसे समाजकल्याण मंडळाची उद्दिष्ट्ये
१. शिक्षण प्रसारासाठी व शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती कामे हाती घेणे.
२. गरजू आणि होतकरू व्यक्तींना मदत करून त्यांना आलेल्या अडचणींवर मात करण्यात मदत करणे.
३. स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य व मार्गदर्शन करणे.
४. सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी व कोणत्याही कल्याणकारी कामासाठी उपक्रम हाती घेऊन कार्यान्वित करणे.
५. वरील उद्दिष्टपूर्तीसाठी तदनुषंगिक आवश्यक कामे हाती घेऊन पार पाडणे. आजीव सदस्य आणि हितचिंतक संख्या -वाढवणे
संस्थेच्या संलग्न संस्था
पेंडसे समाज कल्याण मंडळाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने दोन संलग्न संस्थांच्या माध्यमातून कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली परंतू स्वतंत्रपणे कार्य केले जाते. मंडळाचे सभासद, पेंडसे कुटुंबीयांनी एकत्र यावे, त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, त्यांच्या अडीअडचणी मंडळापर्यंत याव्यात, त्यांच्या उपक्रमांचे, मिळवलेल्या पुरस्कारांचे कौतुक करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, आरोग्यविषयक विषयांवर भाषणे, एकदिवसीय सहली अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
ही स्थानिक संलग्न संस्था ठाणे, मुंबई व उपनगरातील सभासदांकरिता मर्यादित आहे. पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या स्नेहसंमेलनाच्या व इतर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पेंडसे जनकल्याण मंडळ सहभागी असते. ठाणे येथील पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या जागेमध्ये पेंडसे जनकल्याण मंडळ भागीदार आहे.
ही स्थानिक संलग्न संस्था पुणे शहरात आणि उपनगरांतील सभासद व कुलबंधूंसाठी मर्यादित आहे. पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी पेंडसे स्नेहवर्धिनीकडे असते.