कुलदीपिका पुरस्कार (कर्तबगार महिलेसाठी)
पुरस्काराचे स्वरूप - मानपत्र आणि रोख बक्षीस
संकल्पना : अनेकवेळा कुटुंबावर आपत्ती येणे हा जीवनाचा अनिवार्य प्रसंग ठरु शकतो. कधी कर्त्या पुरूषाचे अकाली निधन होणे, खर्चिक दुखण्याने कुटुंबातील कोणी आजारी पडणे, त्यापायी कुटुंब कर्जबाजारी होणे, अन्य काही कारणाने कुटुंब अपघातात सापडणे हे कितीही अप्रिय असले तरी त्यामुळे संपुर्ण कुटुंब उध्वस्त होते. मग मुलींची लग्ने मुलांचे शिक्षण असल्या गंभीर अडचणी येतात. भले भले कर्ते पुरूष हातपाय गाळतात किंवा कुटुंबप्रमुख अपंग होतो अशा वेळी एखादी स्त्री स्वकर्तृत्वाने सर्व कुटुंबाची धीरोदात्तपणे मार्गदर्शक ठरते. ती अंगातील सुप्त बळाचे पराकाष्ठा करून सर्व कुटुंबाचा आधार होते. हळुहळू परिस्थिती सुधारते आणि पूर्ववत होते- केव्हा केव्हा ती पुर्वीपेक्षा भरभराटीला येते. ह्याचे श्रेय त्या स्त्रीचे असते अशा पेंडसे-महाजन (पेंडसे) कुलातील स्त्री आणि त्यांचे माहेरवाशीणींचे कौतुक करणे हा आपल्या आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा : वरील सूत्रामध्ये समाविष्ट केलेल्या परिस्थितीमधील सर्व पेंडसे कुलभगिनी अथवा माहेरवाशीण महिला वयोमर्यादा न ठेवता पात्र असतील
कुलभूषण पुरस्कार (कर्तबगार पुरुषासाठी - १९९८ पासून)
संकल्पना : नेहमीची रुळलेली चाकोरी सोडून जीवनामध्ये नवीन वाट धरलेल्या आणि त्यामध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या, युवक-युवतींना स्फूर्तिदायक वाटेल अशा व्यक्तींची निवड करून त्यांचे मंडळातर्फे कौतुक, गुणगौरवाचे प्रतीक.
वयोमर्यादा : वय वर्षे ६0 (स्थूलमानाने)
विचारात घेण्याची कार्यक्षेत्रे : सामाजिक संस्थांमधील कार्य, शैक्षणिक, अभियांत्रिकी, कला-नाट्य, क्रीडाक्षेत्र, चित्रकला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांतील देदीप्यमान कामगिरी (अपवादात्मक राजकीय व्यक्तीचा समावेश व्हावा) नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय दोन्ही विचारात घ्यावेत.
निवड करण्याची पद्धत : दरवर्षी कुलवार्ता द्वारे कुलबंधुभगिनोंकडून योग्य व्यक्तींची माहिती मागवावी आणि त्यामागील योग्य व्यक्तींची निवड व्हावी. अंतिम निवड सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि कार्यवाह यांनी करावी. त्यांना जरुरीची वाटल्यास योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
अनिवार्य पात्रता : ती व्यक्ती पेंडसे-महाजन (पेंडसे) कुलातील अथवा त्यांची माहेरवाशीण असावी व निवडीचे वेळी एक वर्ष आधी आजीव सभासद झालेली असावी.
विशेष कार्यगौरव पुरस्कार
संकल्पना : हा पुरस्कार पेंडसे समाज कल्याण मंडळाचे आद्यप्रवर्तक कै. कृष्णाजी विनायक पेंडसे स्मृत्यर्थ उभारलेल्या निधीवरील व्याजातून देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरूप : रोख रु. ७५00/- आणि मानपत्र
निवडीचे निकष :
पर्याय १: महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजातील कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे व देवरुखे या चार शाखापैकी एखाद्या व्यक्तीने/ व्यक्तीसमुहाने / संस्थेने आपल्या घराण्याचा कुलवृत्तांत जानेवारी २00६ नंतर प्रकाशित केला असल्यास ते या पुरस्कारासाठी प्राप्त ठरतील.
पर्याय २: वरील पर्याय क्र. १ प्रमाणे पुरस्कारासाठी विचार होऊ न शकल्यास पेंडसे, महाजन कुलातील व्यक्ती तसेच पेंडसे-महाजन माहेरवाशिणींचे पुत्र / कन्या यापैकी कोणत्याही व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात उदा. विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, संगीत, वेदाध्यापन इ. समाजोपयोगी अथवा संशोधनात्मक स्वरूपाचे विशेष कार्य, सातत्याने व निरपेक्ष बुद्धीने केले असल्यास अशा व्यक्तींची निवड होईल.
इतर नियम व अटी :
१) अशा व्यक्तींचे कार्यक्षेत्र व वास्तव्य भारतात असावे. २) वयाची अट नाही. ३) योग्य व्यक्तीची माहिती मिळवून मंडळाकडे शिफारस करावी. (४) निवडीबाबत मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह यांचा निर्णय अंतिम राहील. ५) हा पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यात येईल. ६) हा पुरस्कार मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेळी देण्यात येईल. ७) योग्य व्यक्ती न मिळाल्यास पुरस्काराची रक्कम कै. कृ. वि. पेंडसे स्मृतिनिधीमध्ये जमा करण्यात येईल.
विशेष कार्यगौरव पुरस्कार (२००५ पासून)
२0१५ - मे. ज. (नि) केशव शंकर पेंडसे, भारतीय सेनेसाठी उपयुक्त संशोधन, पेंडसे समाजकल्याण मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष
२०१३ - श्री. दत्तात्रय नारायण पेंडसे, ज्येष्ठ वकील, मंडळाचे माजी अध्यक्ष व सल्लागार
२०१३ - श्री. वैजनाथ परशुराम पेंडसे, डिव्हिजनल अकाऊटंस् ऑफिसर, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सभासद
२0११ - कै. शरद रामचंद्र पेंडसे, मंडळाचे माजी कार्यध्यक्ष व दत्त देवस्थान औरंगाबादचे माजी विश्वस्त
२०११ - श्री. यशवंत नारायण पेंडसे, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, निरनिराळ्या संस्थांचे आधारस्तंभ व ठाणे ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त
२००९ - श्री. दत्तात्रेय रामचंद्र पेंडसे, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
२००७ - कै. श्री. ना. पेंडसे, प्रसिद्ध कादंबरीकार व नाटककार
२००५ - कै. डॉ. क्रषीकेश कृष्णाजी पेंडसे, कुलवृत्तांत या आवृत्तीचे संपादक व माजी कार्यकारिणी पदाधिकारी