शैक्षणिक सहाय्य
आपल्या मंडळाच्या उद्दीष्टामध्ये शैक्षणिक मदत, प्रोत्साहन यांना महत्वाचे स्थान आहे. त्यासाठी विविध योजनांद्वारे आपण प्रतिवर्षी अधिकाधिक रक्कम मंडळाचे निधीमधून खर्च करीत असतो. मंडळावरील वाढत्या विश्वासामुळे देणगीदार उदारहस्ते पारितोषिकांसाठी वाढता निधी उपलब्ध करुन देत आहेत. या योजनेसाठी पात्रता आणि इतर नियम खाली दिले आहेत.
अ) शैक्षणिक सहाय्य (समाजातील कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांसाठी)
इयत्ता ८ वी ते १० वी रु. १५००/- प्रत्येकी
माध्यमिक शालांत परीक्षेनंतर रु. २०००/- प्रत्येकी
ब) शैक्षणिक सहाय्य (विशेष) इ. १० वी पाससाठी
१) माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला/ विद्यार्थीनीला कै. दत्तात्रय मोरेश्वर व कै. कमल दत्तात्रय महाजन, ठाणे स्मृत्यर्थ रु. ३०००/-
२) माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला कै. शंकर रघुनाथ व कै. रमाबाई शंकर आपटे, पुणे स्मृत्यर्थ - रु. २०००/-
क) शैक्षणिक सहाय्य (विशेष) इ. १२ वी पाससाठी
१) उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांस/ विद्यार्थीनीस कै. दत्तात्रय मोरेश्वर व कै. कमल दत्तात्रय महाजन, ठाणे. स्मृत्यर्थ - रु. ३०००/-
२) उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणानुक्रमे दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थीनीस कै. नारायण केशव व कै. गंगाधर केशव पेंडसे, रायपूर, स्मृत्यर्थ - रु. २०००/-
शैक्षणिक सहाय्याचे अर्ज पूर्ण भरून दि. ३१ऑगस्टपर्यत खालील पत्त्यावर पोचले पाहिजेत. नंतर येणारे व अपुरे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पेंडसे समाज कल्याण मंडळ
C/o सौ. अनल्पा अमित पेंडसे: ९. ग्रीन पार्क, सी ३०३
सहकार नगर नं. २, पुणे ४११००९ भ्रमण ध्वनि ९८५०६९८९३८