खालील सभासदांचे गेल्या काही वर्षात निधन झाले. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना. त्यांच्या परिवाराच्या दु:खात मंडळ सहभागी आहे.
सुबोध वसंत जोशी, यांचे दि. १९-२-२०२५ रोजी निधन झाले.
विजय निळकंठ पेंडसे, (घराणे ३रे) यांचे दि. १५-१२-२०२४ रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.
मधुकर श्रीपाद पेंडसे, (आ. सभासद क्र. १७७) यांचे दि. २-४-२०२४ रोजी निधन झाले.
स्नेहलता वसंत बाम, (आ. सभासद क्र. ६४१) यांची दि. २५-३-२०२४ रोजी दुपारी देवाज्ञा झाली.
श्रीमती सरिता मुकुंद साठे, वय ७८ (आ. सभासद क्र. ६४२) यांचे दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले.
सौ. उमा वैजनाथ पेंडसे, वय ९१ (आ. सभासद क्र. ६०७) यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.
विजय गजानन पेंडसे, (आ. सभासद क्र. ३९०) अथश्री पाषाण (एफ २६) पुणे यांचे दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले.
माजी कार्यकारिणी सदस्य अनिरुध्द पेंडसे यांच्या मातोश्री अपर्णा पेंडसे यांना रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ६.१५ वाजता देवाज्ञा झाली.
आपल्या मंडळाचे आजीव सभासद श्री. शशिकांत कृष्णाजी पेंडसे यांचे दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
आपल्या मंडळाचे सहकोषाध्यक्ष श्री. श्रीकांत दिगंबर पेंडसे यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला दिगंबर पेंडसे यांचे दि. २९ मे २०२३ रोजी रात्री १२.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
मयुरी महाजन आ. क्र. नं. २४५ यांचे दु:खद निधन झाले.
प्रतिभा पेंडसे, (आ. सभासद क्र. ४०५) डोंबिवली यांचे दि. १९ मे २०२३ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
आपले आजीव सभासद क्र. १००१ व पेंडसे समाज कल्याण मंडळाच्या कार्यकारिणीतील सह-कार्यवाह श्री. महेश दत्तात्रय पेंडसे यांचे वडील श्री. दत्तात्रय पुरुषोत्तम पेंडसे ह्यांचे दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ११च्या सुमारास वयाच्या '७३व्या वर्षी अल्पशा आजाराने वसई येथील राहत्या घरी देहावसान झाले. श्री. दत्तात्रय पेंडसे भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून २०१० साली निवृत्त झाले होते.
सौ. प्रिया सुहास पेंडसे, (आ. सभासद क्र. १२०६) यांचे वयाच्या ६८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे मंगळवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दु:खद निधन झाले. तळेगाव दाभाडे येथील रहिवासी व शिक्षकी पेशानंतर वाहन विक्री व इन्शुरन्स हा व्यवसाय होता. भारत सरकार अर्थ मंत्रालयातर्फे उच्च इन्कम टॅक्स पेयरचा राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाला होता. पेंडसे फायनान्स लिमिटेड या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात पती श्री. सुहास पेंडसे, कन्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. पल्लवी व अस्थिरोग तज्ञ डॉ. रवैंद्र व दोन नातू असा परिवार आहे.
कर्नल (नि.) जयसिंह पेंडसे यांचे निधन, पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णलयाचे विश्वस्त कर्नल (निवृत्त) जयसिंह चिंतामणी पेंडसे (८६ वर्षे) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. कर्नल पेंडसे हे ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक आप पेंडसे यांचे पुतणे होते. पदवी पूर्ण केल्यानंतर कर्नल (नि) पेंडसे हे भारतीय लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. लष्करातील सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. लष्करातून निवृत्त झाल्यांतर सुरुवातीला बजाज ऑटोच्या प्रशासनामध्ये ते कार्यरत होते. १९९३ मध्ये ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टतर्फे संजीवन रुग्णालयाचे प्रशासक आणि २००१ पासून मंगेशकर रुग्णालयाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या मागे पत्नी सुरेखा, मुलगा एअर कमांडो समीर पेंडसे आणि मुलगी सुचेता करंदीकर असा परिवार आहे.
श्री. दिगंबर शंकर पेंडसे, रा. पुणे यांचे दि. ०९/०९/२०२२ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. आपल्या मंडळाचे सहकोषाध्यक्ष श्रीकांत पेंडसे (पुणे) यांचे ते वडील होते.
सौ. भावना राम पेंडसे, यांचे दि. २४/०८/२०२२ रोजी निधन झाले.
श्री. चंद्रशेखर पेंडसे, (आ. क्र. ५९४) यांचे दि. १८/०८/२०२२ रोजी अपघाती निधन झाले.
आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. श्रीराम भास्कर पेंडसे यांचे दि. २४/०७/२०२२ रोजी दु:खद निधन झाले.
राजाभाऊ सखाराम पेंडसे, रा. नागपूर (श्री. संजय पेंडसे, आ. ८६८ यांचे वडील) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दि. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.
चंद्रकांत निलकंठ पेंडसे, रा. पुणे (आ. ७८) कार्यकारिणीचे (माजी कार्यवाह) सदस्य यांचे दि. २६ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
सौ. संजीवनी श्रीकांत पेंडसे, रा. सांगली (श्री. श्रीकांत पेंडसे, आ. ३७१ यांच्या पत्नी) यांचे दि. १३ जानेवारी २०१६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रभाकर मोरेश्वर पेंडसे, रा. डोंबिवली (श्री. संतोष पेंडसे आ. २५३ यांचे वडील) यांचे १४/१/२०१४ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले.
कृष्णाजी गंगाधर उर्फ अप्पा पेंडसे, रा. अलिबाग (आ. ७८३) यांचे दि. २४/१२/२०१३ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले.
श्रीमती मालती शरदचंद्र पेंडसे, रा. सातारा (आ. ३७८) यांचे दि. २४/७/२०१३ ला वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
श्रीमती इंदिरा श्रीराम पेंडसे, रा. माखजन (श्री. प्रमोद पेंडसे आ. ९१९ यांच्या मातोश्री) यांचे दि. १५/७/२०१३ ला वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. त्यांना रत्नागिरी जिल्हाचा “आदर्श शिक्षिका” हा पुरस्कार मिळाला होता.
दत्तात्रय रंगनाथ पेंडसे, मु. डोंबिवली (आ. ९८) यांचे दि. १०/६/२०१३ ला वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.
बाळकृष्ण रघुनाथ पेंडसे, रा. चिपळूण (आ. १६२) यांचे दि. १७/३/२०१३ ला वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.