=== वैय्यक्तिक व सामाजिक (निबंधसंग्रह) ===

(व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधांतून निर्माण झालेल्या समस्यांबद्दल काही विचार)

लेखक – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए., पीएच्.डी.

प्रथमावृत्ती सप्टेंबर १९६३.

== अर्पणपत्रिका ==

पुढल्या वर्षी जून १९६४ मध्ये मी अध्यापनाच्या क्षेत्रातून निवृत्त होत आहे.

१९२८ ते १९६४ या तीन तपांच्या काळात हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून

शिकून गेले. या सर्व विद्यार्थ्यांच्या मनांवर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे

संस्कार करावे ही माझ्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती. ज्यांच्या प्रेरणेमुळे,

अशा रीतीने, मी लेखन केले त्या सर्व महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना

मी हा निबंधसंग्रह अर्पण केला आहे.

== अनुक्रमणिका ==

प्रस्तावना

१ - वैय्यक्तिक पुण्य आणि सामाजिक पुण्य (नोव्हेंबर १९५९)

२ - ते समाजाला विचारा (नोव्हेंबर १९६१)

३ - श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य (नोव्हेंबर १९६०)

४ - मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य (सप्टेंबर १९५८)

५ - मार्क्सचे भविष्यपुराण (मे १९५९)

६ - समाजकारणाची बचावती ढाल (जानेवारी १९६१)

७ - आपल्या लोकशाहीवरील नवे संकट (डिसेंबर १९५८)

८ - अमेरिका (फेब्रुवारी १९६३)