महाराष्ट्र संस्कृती

महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास

इ. स. पूर्व २३५ ते इ. स. १९४७

लेखक – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए. पीएचडी.

*** अर्पणपत्रिका ***

महाराष्ट्र संस्कृती ज्यांनी घडविली

~ त्या सर्व थोर स्त्रीपुरुषांना ~

उपोद्घात

स्वातंत्र्योत्तर काळात निबंधकार आणि विचारवंत म्हणून डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे नाव मराठी साहित्यात अग्रभागी झळकणारे आहे. किंबहुना ऐन महत्त्वाच्या काळात क्षीण झालेल्या निबंध-प्रबंध या वाङ्मयप्रकारात ते जास्तच प्रकर्षाने उठून दिसणारे आहे.

डॉक्टर हे नुसतेच टीकाकार नाहीत, तर आधुनिक आव्हानांच्या संदर्भात सकस जीवनवादी विचार मांडणारे लोकशिक्षक आहेत. प्रवृत्तिधर्म, समाजसन्मुखता, इहवादी विज्ञाननिष्ठा, सामर्थ्याची उपासना करणारा राष्ट्रवाद, वैय्यक्तिक व सामाजिक चारित्र्य जपू शकणारा प्रयत्नवाद यांचे महत्त्व मराठी मनावर बिंबविण्याची त्यांची भूमिका परिचित आहे. प्रस्तुतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहासदेखील त्यांनी याच व्यापक, परंतु कणखर भूमिकेचे भान ठेवून मांडला आहे.

‘महाराष्ट्र’ मग तो प्राचीन असो, मध्ययुगीन असो की अर्वाचीन असो, त्यासंबंधीचा केवळ तपशील एकत्र करण्याचा हा प्रयत्न नाही. तपशिलाच्या जोडीला त्याचे तर्ककठोर विश्लेषण आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक-ऐतिहासिक घडामोडींचा भारतीय इतिहासाच्या संदर्भात अन्वय लावण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रौढ व पुरुषी शैलीत लिहिलेला हा इतिहास वाचताना वाचक रंगून जाईल. परंतु या इतिहासापासून त्याने काहीतरी धडा घ्यावा, प्रेरणा घ्यावी अशी सहस्रबुद्धे यांची इच्छा आहे आणि त्यांनी ती उघडपणे व्यक्तही केली आहे.

=== अनुक्रमणिका ===

प्रस्तावना

*** भाग पहिला - सातवाहन ते यादव काल ***

*****************************************

प्रकरण क्र. ०१. महाराष्ट्राची पृथगात्मता

०२. अस्मितेचा उदय

०३. मरहट्ट सम्राट सातवाहन

०४. महाराष्ट्रीय राजघराणी

०५. राजकीय कर्तृत्व

०६. राजसत्ता

०७. स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना

०८. धार्मिक जीवन

०९. समाजरचना

१०. आर्थिक जीवन

११. साहित्य, कला व विद्या

===============================================================

*** भाग दुसरा - बहामनी व मराठा काल ***

***************************************

प्रकरण क्र. १२. बहामनी काल

१३. मराठा सरदार

१४. शास्त्री पंडित

१५. संतांचे कार्य

१६. संतकार्य चिकित्सा

१७. महाराष्ट्र धर्म

१८. स्वराज्य आणि स्वधर्म

१९. मराठा काल

२०. अर्थमूलो हि धर्म:

२१. मर्‍हाष्ट्र राज्य

२२. शिवछत्रपतींची युद्धविद्या

२३. यशापयश मीमांसा

२४. स्वातंत्र्ययुद्ध

२५. स्वातंत्र्ययुद्ध: प्रेरणांची मीमांसा

२६. पेशवाईचा उदय

२७. स्वराज्याचे साम्राज्य

२८. साम्राज्याचा विस्तार

२९. मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब

३०. खर्डा – अखेरचा विजय

३१. मराठेशाहीचा अंत

३२. साहित्य आणि कला

३३. प्रबोधनाच्या अभावी

===============================================================

*** भाग तिसरा - ब्रिटिश काल ***

****************************

३४. नव्या प्रेरणा

३५. धर्मक्रांती

३६. समाज परिवर्तन

३७. आर्थिक साम्राज्यशाही

३८. राजकारण

३९. विद्या आणि संशोधन

४०. मराठी ललित साहित्य

४१. विचारप्रधान साहित्य

४२. महाराष्ट्रीयांची कलोपासना (१)

४३. महाराष्ट्रीयांची कलोपासना (२)

४४. समारोप