वरील लेखनाव्यतिरिक्त डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी लिहिलेले आणखी १००-१२५ लेख निरनिराळ्या मासिकांत प्रसिद्ध झाले होते. ते मला अनेक प्रयत्न करूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत. ते कोणाकडे असतील तर त्यांनी कृपया मला द्यावेत, ही नम्र विनंती. आभारपूर्वक ते लेख मी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करीन,