*** लपलेले खडक ***

(सामाजिक जीवनसरितेत लपून बसलेल्या काही घातुक खडकांबद्दल –

सामाजिक समस्यांबद्दल धोक्याचा इशारा देणार्‍या लघुकथांचा संग्रह)

लेखक - पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए.

प्रथमावृत्ती : १९३४.


साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचा अभिप्राय

रा. रा. सहस्रबुद्धे यांस,

सा. न. वि. वि.

आपण आपल्या लघुकथा मला वाचावयास दिल्या, त्यांतील बर्‍याच मी वाचल्या. त्यांत कल्पनेचा चतुरस्रपणा असून वैचित्र्यही आहे. ज्या अनेक लेखकांच्या अभ्यासाने व प्रयत्नाने चांगल्या लघुकथेचा नमुना मराठीत बनत चालला आहे त्यांतील तुम्ही एक आहा, असे म्हणण्यास हरकत नाही. तुमच्या सर्व लघुकथांचा संग्रह एकत्र झालेले पुस्तक वाचावयास मिळेल तर ती रिकाम्या वेळात एक चांगली करमणूक होईल. कळावे.

आपला,

न. चिं. केळकर

=== अनुक्रमणिका ===

१ - थोडीशी तोंडओळख (प्रस्तावना) - प्रा. के. ना. वाटवे

२ - विवाहित कुमारी

३ - सुशीला

४ - जर्मन हेर

५ - प्रेमाचे पृथ:करण

६ - कॉलेजचे वातावरण

७ - पतिहत्त्या

८ - पाणी तेरा रंग कैसा?

९ - एकाच कणसातील दोन दाणे

१० - विमला

११ - दोन दिवसांची चुकामूक

१२ - एकांगी घटस्फोट

१३ - शिवामूठ

१४ - न खणलेल्या खाणी