-वेदांत खोडके
वर्ग ८ वा (ब)
१) नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो
…
२)आई :- “चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!”
चिंटु :- “आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
३) चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!
मिहीर पावडे
वर्ग ८ वा (ब)
नवीन वर्ष लवकरच येणार आहे. कोविड – 19 अजूनही गेलेला नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक दुरी ठेवावीच लागणार आहे. मला असं वाटतं आपण यंदा मोबाईलवरच सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. मोबाईलवर विडीओ कॉल वरूनच नवीन वर्ष साजरे करावे व इतरांनाही तसेच करायला सांगावे. दरवर्षी जशा सगळीकडे नवीन वर्षाच्या पार्ट्या होतात , काहीजण आपल्या कुटुंबासोबत बाहेर जातात. पण कोरोनाची लस निघेपर्यंत आपण सर्वांनी हा उत्सव घरी राहूनच साजरा करावा व कोरोना पसरण्यापासून थांबवावे असे मी तुम्हां सर्वांना निवेदन करतो.
-आर्या वाडीचार
वर्ग ६ वा (अ)
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
अजिंठा-एलोराच्या लेण्यांविषयी, वैज्ञानिक म्हणतात की ते परक्या लोकांच्या गटाने तयार केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, ते कमीतकमी 4 हजार वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. असे मानले जाते की एलोरा लेण्यांच्या खाली एक गुप्त शहर आहे.
द्वारका हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. एकेकाळी लोक म्हणायचे की द्वारका शहर एक कल्पनारम्य शहर आहे. प्रो. राव आणि त्यांच्या टीमने 1979-80 मध्ये समुद्रात 560 मीटर लांबीच्या द्वारकाची भिंत शोधली.
उत्तराखंडमध्ये देवस्थान नावाचे एक रहस्यमय स्थान आहे. त्यांचे केंद्र उत्तराखंडमधील हिमालयात आहे. या दुर्गम भागात स्थूल शारीरिक सामान्य व्यक्ती पोहोचू शकत नाही.
-नंदेश एस.
वर्ग ८ वा (अ)
३६५ दिवसांचं.
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं.
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं.
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष.
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
-डॉ. शितल जोशी
अध्यापिका - मराठी
विनोबांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ राजी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात गागोदे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव नरहरी शंभुराव भावे असे होते. त्यांच्या आईचे नाव रखुमाबाई नरहर भावे असे होते. विनोबांचे स्वतःचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. आचार्य विनोबा भावे या नावाने ते प्रसिद्ध होते. भावे कुटूंबात ते जन्माला आले.
भावे कुटुंबाला जणू विरक्तीचा जणू वारसाच होता. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. विनोबांना धाकटे तीन भाऊ व एक बहीण होती. त्यांचे दोन भाऊ शिवाजी व बाळकृष्ण आजन्म ब्रम्हचारी राहून लोकसेवा व्रताने गांधींच्या आश्रमीय जीवनाशी समरस झाले होते. विनोबा हे सर्वात मोठे होते. विनोबांची आई तर अत्यंत परोपकारी आणि धार्मिक वृत्तीची होती. विनोबांच्या आजोबांनी आपल्या उत्तर आयुष्यात अग्निहोत्र घेतले होते. यामुळे विनोबांची वृत्ती विरक्त झाली व ते आजन्म ब्रम्हचारी राहिले.
विनोबांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. अभ्यासात एकाग्रता, त्यामुळे हुशार विद्यार्थी म्हणून लवकरच लौकिक संपादन केला. त्यांना वाचनाची फार आवड होती. संत वाङ्मयाचे वाचन करण्यात त्यांचे मन रमून जाई. निबंधमाला, केसरी इ. वाचनाने राष्ट्राच्या सद्य परिस्थितीचे ज्ञान ते करून घेत, पण राजकारणाकडे त्यांचे मन कधीच वळले नाही. ब्रम्ह प्राप्तीच्या जिज्ञासेनेत त्यांचे मन भरलेले होते.
मॅट्रिक पास झाल्यावर काशीला जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला व मॅट्रिकच्या सर्टिफिकेटची गुंडाळी करून त्यांनी ती पेटविली. आईने काय पेटविलेस असे विचारताच ‘माझे मॅट्रिकची सर्टिफिकेट’ असे उत्तर त्यांनी दिले. निर्मोही होण्याची काय ही जबरदस्त जिज्ञासा, ते काशीस गेले. तेथे ‘बनारस हिंदू युनिव्हर्सिटी’च्या स्थापनेच्या समारंभात महात्मा गांधींचे सुप्रसिद्ध भाषण त्यांनी ऐकले व गांधींबद्दल एक वेगळी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. विनोबांचे महात्मा गांधी गुरु झाले व ते साबरमतीला आश्रमात आले.
साबरमती, पवनार येथील आश्रमांत राहून अध्ययन, अध्यापन, शरीरश्रम, कातणे, विणणे असे नियतकर्म व संशोधन कार्य करत विनोबा ब्रम्हप्राप्तीकडे वाटचाल करीत होते. राष्ट्रीय चळवळीत ही सहभागी होत होते. तुरुंगवास भोगीत होते. तुरुंगात असताना त्यांनी गीतेचे मराठीत भाषांतर केले ‘गीताई’ म्हणून भारतभर तिचा प्रसार झाला. तसेच ‘गीत प्रवचने’ म्हणूनही प्रसिद्ध झाली. दुसरे म्हणजे त्यांनी भू-दान चळवळ केली. भू-दानासाठी पदयात्रा करीत ते भारताच्या खेड्याखेड्यांतुन हिंडले.
भारताचा हा सुपुत्र, एक प्रकांडपंडित, एक स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, भू-दानाचा महान मंत्रद्रष्टा, भावी पिढ्यांसाठी ‘जय- जगत’चा विचार देऊन गेला स्वतः स्थितप्रज्ञावस्थेत शेवटपर्यंत ब्रम्हप्राप्तीसाठी कार्यरत राहिले. महात्मा गांधींच्या अध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पावणार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले.
भारत- पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरिता विनोबांना बोलवून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभाव आदेश देऊन प्रेम आणि सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न विनोबांनी केला. दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी पवनार येथे परंधाम आश्रमात सतत आत दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्यावर्षी प्राणत्याग केला.