आज दिनांक 12/08/2023 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाविद्यालयातील युवक व युवतींना एड्स व गुप्त रोगाविषयी माहिती देण्यात आली. युवक व युवतींमध्ये एचआयव्ही एड्स विषयाची मोठ्या प्रमाणात माहिती व्हावी याउद्देशाने जनजागृती करण्यात आली. तसेच मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते व पंचप्राणाची शपथ देण्यात आली. महायुवा संवाद एचआयव्ही/एड्स जनजागरण अभियान व आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी युवक युतींशी ऑनलाईन संवाद साधला. आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय पाचोरा वैद्यकीय अधिक्षक डॉ.सतिष टाक / पिंपळगांव हरेश्वर आणि श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका (एस.एस.एम.एम.) महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन 2023 साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सर ,उपप्राचार्य डॉक्टर जे. व्ही. पाटिल, IQAC समन्वयक प्रा. एस. टी.सूर्यवंशी, डॉ. जे.डी.गोपाळ, डॉ.के.एस. इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.बी.वळवी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.क्रांति सोनवणे, प्रा.वाय.बी.पुरी, प्रा.पी.एम. डोंगरे, प्रा.स्वप्नील भोसले, डॉ. माणिक पाटील, डॉ.शारदा शिरोळे, प्रा.नितीन पाटील, श्री.अभिषेक जाधव, श्री. जयेश कुमावत आदी उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील आयसीटीसी समुपदेशक श्रीमती लता चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री श्रीकांत भोई, पिंपळगांव हरेश्वर येथील आयसीटीसी समुपदेशक श्री सचिन सोनवणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती प्रतिभा परदेशी तसेच साने गुरुजी फाउंडेशन चे समाधान पाटील, आकाश महाजन, लिंक वर्कर सलिम पटेल आणि रेड रिबन क्लब चे सदस्य तसेच महाविद्यालयाच्या युवक युवती मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.